Pune crime news - Pune - Joshi - Abhyankar murder case - part - 1
Pune crime news - Pune - Joshi - Abhyankar murder case - part - 1
Pune crime news - Pune - Joshi - Abhyankar murder case - part - 1

Pune crime news – भाग पहिला – प्रकाश हेगडे खून

Pune crime news - आरोपी नं. १,२,३,४ - जोशी अभ्यंकर खून खटला, पुणे

Pune crime news – भाग पहिला – प्रकाश हेगडे खून

 

Pune crime news – आरोपी नं. १,२,३,४ – जोशी अभ्यंकर खून खटला, पुणे

 

 

15/9/2021,

सर्व मराठी भाषीकांचे आवडते शहर पुणे, अनेक ऐतिहासिक घटनांनी गाजलेले आणि लोकप्रिय मराठी चित्रपटांची जिथे निर्मीती झाली अशा सुप्रसिध्द प्रभात

फिल्म स्टुडिओने भूषविलेले शहर, आणि नामवंत शिक्षण संस्थाची, उच्चभू समाजाची नगरी पुणे. अशा या पुण्य नगरीत ३१ ऑक्टोबर, १ नोव्हेंबर १९७६

आणि ३० नोव्हेंबर १ डिसेंबर १९७६ ( शुक्ल पक्ष दशमी ) या रात्री दोन ब्राह्मण कुटुंबात एकूण (३+५) ८ जणांची त्यांचे राहात्या घरात हत्या झाली, ही

घटनाच इतकी विलक्षण होती की त्यांने सारे पुणे शहर हादरून गेले. सारे पोलीस अधिकारी अवाक झाले. रक्ताचा एकही थेंब न सांडता एकूण आठ

व्यक्तींना मृत्युमुखी देणारे होते तरी कोण ? हे खून झाले कशा साठी ? काय कारण झाले असावे या भीषण हत्याकांडास ? पुणे येथील जोशी व अभ्यंकर या

सुखवस्तू कुटुंबातील सामूहिक खुनाचे (Multiple Murders) चे रहस्य उकलून काढण्यासाठी व सत्य समजावून देण्यासाठी हा लेखन प्रपंच.

या जोशी अभ्यंकरांच्या सामूहिक खून प्रकरणापूर्वी सुमारे १० महिन्यापूर्वी झालेला प्रकाश हेगडेचा खूनव अभ्यंकर कुटुंबाच्या हत्येनंतर ५ महिन्यांनी घडलेला अनिल

गोखले या युवकाचा खून यांचा वर उल्लेखिलेल्या सामूहिक खुनाशी काहीही संबंध नव्हता हे मला आवर्जून सांगावयाचे आहे. कारण प्रश्न असा आहे

की प्रकाश हेगडे व अनिल गोखले यांचे मारेकरी आणि जोशी/अभ्यंकर कुटुंबाचे मारेकरी एकच होते की, वेगवेगळे होते ? यास उत्तर असे की ते एकाच

टोळीतील नव्हते. जोशी-अभ्यंकर कुटुंबाचे मारेकरी पुण्याचे बाहेरून आले असावेत, पुणे पोलीसांनी केलेला तपास किती अपुरा होता व त्यातून काढलेला

निष्कर्ष कसा चुकीचा होता हे यापुढील विवेचनावरून सूज्ञ वाचकांस समजून येईलच.

आता वर उल्लेखिलेल्या एकूण दहा खुनांचे क्रमश: विश्लेषण करूया :

 

१. प्रकाश हेगडे –

 

१५/१६ जानेवारी १९७६, पुणे येथील सारसबागे जवळील ‘हॉटेल विश्व’ चे मालक सुंदरराव हेगडे यांचा मुलगा प्रकाश हेगडे. ‘हॉटेल

विश्व’ हे अभिनव कला महाविद्यालयचे जवळ वसलेले. या कला विद्यालयांत हॉटल विश्व’ चे मालक सुंदरराव हेगडे यांचा मुलगा प्रकाश हेगडे हा विद्यार्थी

होता. त्याच कॉलेजमध्ये राजेंद्र जक्कल, दिलीप सुतार, शांताराम जगताप हे विद्यार्थी होते. त्यांचे संगतीत एक सुहास चांडक नावाचा मारवाडी मुलगा ही

होता. हे चौधे कॉलेजकुमार हॉटेल विश्वमध्ये नेहमी येत असत. एकाटेबला भोवती बसून फराळ करीत, चहा वगैरे पित असत. एकदा असेच फराळ करीत

असतांना त्यांनी ठरविले, ‘प्रकाश हेगडेला आपण पळवायचे, कसेही करून प्रकाशला कॉलेजच्या आवारातून बाहेर दूरवर न्यायचे, तसे केले की मग

प्रकाशच्या वडीलांना टेलिफोनवर बोलवायचे, आणि त्यांस म्हणायचे की, ‘हवा का तुम्हाला तुमचा प्रकाश ?’ तर मग रूपये २५,०००/-तयार ठेवा. तेवढी रक्कम

देत असाल तर प्रकाशला मुक्त करू. या योजनेनुसार प्रकाश हेगडेला पळविले गेले. ते असे-कॉलेज चालू असतांना कोणीतरी बाहेरून कॉलेजचे ऑफिसला

फोन केला, की प्रकाशला बाहेर वडीलांनी बोलाविले आहे. त्यांने बाहेर यावे. त्याप्रमाणे प्रकाशला कॉलेजचे बाहेर जाण्याची परवानगी दिली. प्रकाश बाहेर आला

आणि तेथून त्याला कोणीतरी सायकलवर किंवा मोटार सायकलवर बसवून एरंडवणे (कर्वे रोड) येथे नेले. परंतू त्यास कॉलेजच्या आवारातुन बाहेर कोणी

नेले, याचा पुरावा पोलीसांना मिळाला नाही.

 

माफीचा साक्षीदार सुहास चांडक म्हणतो की :-

‘प्रकाश हेगडे यास कर्वे रोड येथील एरंडवणे भागात नेले. एरंडवणे येथे राजेंद्र जक्कलच्या वडीलांच्या मालकीचे एक लाकडी दुकान होते.

तिला टपरी असे म्हणत. त्या टपरीत (लांबी १२’x रुंदी १०’) प्रकाश हेगडे ला लपविले तेथे संध्याकाळी जक्कल, सुतार व शांताराम जगताप यांनी त्यावर हला

चढविला, त्यास मारहाण करून त्यास गुद्दे मारून पाडले. तो बेशुध्द झाला. तो बेशुध्द अवस्थेत असतांना त्याला तेथून सारस बागेत (पेशवे पार्क) येथे रात्री

नेले. राजेंद्र जक्कल मोटर सायकलवर स्वार होऊन, आणि इतर तिघे सायकलकर बसून पेशवे पार्क जवळील सारस बागेत आले. मध्य रात्रीची वेळ,

तिकडे आधीच एक पत्र्याचे पिंप तयार ठेवले होते. त्यात प्रकाश हेगडेला घालून दोरीने पिंपाचे सर्व भाग बांधून, पिंपासह प्रकाशला तलावात ढकलले.

अशा रीतीने प्रकाश हेगडेचा अंत झाला. विशेष नमूद करावयाची गोष्ट म्हणजे आरोपी नंबर ४ मुन्नावर शहा हा युवक या खुनात सहभागी झाला नव्हता.

 

Also Visit : https://www.postboxlive.com

 

 

क्रमशः

 

 

प्रभाकर प्रधान , वकील 
शोध प्रबंध लेखन - वैभव जगताप

Advertisement

More Stories
karmveer कर्मवीर भाऊराव पाटील
 karmveer – कर्मवीर भाऊराव पाटील
error: Content is protected !!
%d bloggers like this: