Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSINDIAMAHARASHTRANewsPostbox Marathi

Pune Crime News – भाग सहावा – जोशी अभ्यंकर खून खटला

1 Mins read

Pune Crime News – भाग सहावा – जोशी अभ्यंकर खून खटला

Pune Crime News – जोशी अभ्यंकर खून खटला – खरे मारेकरी कोण ?

 

 

21/9/2021

 

Also Read : https://www.postboxindia.com/pune-crime-news-conspiracy-maficha-sakshidar-pune-police/

 

 

आरोपपत्र (Charge-Sheet) : Pune Crime News 

Pune crime news - murder case information part 6

Pune crime news – murder case information part 6

पुणे शहरातील वर उल्लेखित चार कॉलेज कुमारांवर फिर्यादी पक्षाने कोण कोणते आरोप ठेवले ते आता पाहू या : आणि नंतर त्यातील किती आरोप
सिध्द होऊ शकतात ते पाहू :

 

(१) – कलम ३02, इडियन पीनल कोड :-

Pune crime news - भाग 6 - जोशी अभ्यंकर खून खटला

Pune crime news – भाग 6 – जोशी अभ्यंकर खून खटला

Murder या चार तरुणांवर एकूण दहा जणांचे खून केल्याचे आरोप – पत्र फिर्यादी पक्षाने ठेवले. त्यापैकी किती
व्यकितंच्या खूनाचा आरोप ( Charge ) सिध्द होऊ शकतो ते आता पाहू:

( एक ) प्रकाश हेगडे :- आरोपी नं. १,२ व ३ – जक्कल, सुतार व जगताप या तिघांनी मिळून हा खून केला हे सिध्द झाले आहे. कारण त्यांच्या संगतीत
त्यांना सहकार्य देणारा माफीचा साक्षीदार ( Approver ) सुहास चांडक याने त्या संदर्भात प्रामाणिक निवेदन कोर्टात केले होते.

Pune crime news - भाग 6 - जोशी अभ्यंकर खून

Pune crime news – भाग 6 – जोशी अभ्यंकर खून

(दोन) जोशी कुटुंब :- ( तीन व्यक्ति ) :- आरोपी नं.१ व २ जक्कल व सुतार यांच्यावरच या सामुहिक खूनाचा आरोप – ते सिध्द होऊ शकत नाही. कारण
त्यासंबंधी एकही डोळस साक्षीदार नाही, की माफीचा साक्षीदार ही नाही, जक्कल व सुतार यांच्या मनांत जर जोशांच्या घरांत घुसुन खून करण्याचा विचार
आला असता, तर त्यांनी शांताराम जगताप व मुनावर शहा, किंवा सुहास चांडकला ही आपल्या मदतीला बोलाविले असते. जोशांच्या कुटुंबातील तीन
व्यक्तिंच्या खूनाचा आरोप फक्त दोन कॉलेज कुमारांवर ठेवला हे चूक आहे. केवळ दोन जणांचे हे कामच नव्हे. या दोघा पैकी कोणासही कोणीही
जोशांच्या घरांत प्रवेश करतांना किंवा बाहेर पडतांना पाहिलेले नाही / नव्हते. डॉक्टर परांजपे यांचे तथा कथीत ‘खोटे’ निवेदन : सुतारला जोश्यांच्या
घरांबाहेर फटाकाजवळ यांनी म्हणे ‘पाहिले’ होते – पोलीस इन्स्पेक्टरने पढविलेल्या या निवेदनाने तीन व्यक्तिंचे खून सिध्द होत नाहीतच, शिवाय रात्रीची
घरफोडी (House breaking by night) Section 456 इंडियन पीनल कोड हा आरोपही सिध्द होत नाही.

Pune crime news - जोशी अभ्यंकर खून खटला part 6

Pune crime news – जोशी अभ्यंकर खून खटला part 6

या दोन गुन्हेगारांनी (आरोपींनी) जोशांच्या घरांत हाऊस ब्रेकींग- रात्रीची घरफोडी केली, हा आरोप आधी सिध्द व्हायला हवा.

 

(तीन) अभ्यंकर कुटुंब :– पाच व्यक्तिंचे खून: आरोपीनं. १,२,३ व ४ यांजवर अभ्यंकरांच्या स्मृति’ बंगल्यात पांच जणांचे सामुहिक खून ( Multiple
Murders ) केल्याचा आरोप ठेवला गेला. हे खून सिध्द झाले नाहीत. कारण अभ्यंकरांच्या बंगल्यात प्रवेश करतांना या चौघांपैकी कोणासही कोणीही पाहिलेले
नव्हते. फिर्यादी पक्षास एकही डोळस साक्षीदार उपलब्ध झाला नाही. किंवा एकही खरा माफीचा साक्षीदार ( Approver ) मिळाला नाही सतीश गोरे हा
पढविलेला साक्षीदार (Tutored witness) त्याच्या निवेदनात ‘जक्कल मला म्हणाला अभ्यंकर यांना आम्हीच मारले’ या कथनाने हे सामूहिक खून सिध्द
झाले नाहीत, तसेच नागेश कडपे, या स्कूटर रिपेअररचे खोटे निवेदन-याने म्हणे चार आरोपींस मांडारकर रोडवर पाहिले. जक्कलचा चेहरा पेटवलेल्या
माचीसच्या ‘प्रकाशात’ पाहिला अशा खोट्या पुराव्याने पाच व्यक्तिंचे खून सिध्द होत नाहीतच, शिवाय रात्रीची घरफोडी ( House breaking by night in
Abhyankar’s House ) हा आरोपही नागेश कडपेच्या निवेदनाने सिध्द होत नाही. त्यामुळे अभ्यंकर

Pune crime news - खून खटला part 6

Pune crime news – खून खटला part 6

कुटुंबातील पांच व्यक्तिंच्या हत्येसंबंधी या चार कॉलेज कुमारांस जबाबदार धरणे चूक आहे.

( चार ) रात्रीची घरफोडी:-जोशीकुटुंबांचे घरांत प्रवेश करतांना किंवा अभ्यंकर कुटुंबाचे घरात प्रवेश करतांना या चार आरोपीपैकी कोणासही

कोणीही पाहिलेले नव्हते. तत्सम कोणताही पुरावा कोर्टाला उपलब्ध झाला नाही, तेव्हां रात्रीची घरफोडी (House breaking by night in Joshi’s & Abhyankar’s House)

कलम ४५६, इंडियन पीनल कोड हा आरोप सिध्द झाला नाही.

Pune crime news - भाग 6 - जोशी अभ्यंकर खून खटला माहिती

Pune crime news – भाग 6 – जोशी अभ्यंकर खून खटला माहिती

( पांच ) अनिल गोखले :- अनिल गोखले या तरुणाचा खून हा शेवटचा खून, या कॉलेज कुमाराच्या हत्ये संदर्भात आरोपी नं. ४ मुन्नावर
शहास कांहीही कारण नसता गोवण्यांत आले. वास्तविक पहाता राजेंद्र जक्कल याजवरही अनिल च्या खूनाचा आरोप ठेवणे योग्य होत नाही.
कारण जेव्हां जक्कल जयंत गोखलेच्या घरी काही कामानिमित्त गेला, तेव्हा तेथून परत फिरतांना अनिल च्या विनंतीवरून त्याने अनिलला आपल्या

मोटार सायकलवर लिफ्ट दिली होती. आणि अलका थियटर पर्यंत त्यास सोडले होते. पुढे अनिल गोखलेचे काय झाले त्याला माहित नाही. कर्वे रोड, येथील
दुकानदार चाकणकरांच्या निवेदनानुसार आरोपी नं. २ सुतार व नं. ३ जगताप यांच्या मोटर सायकलवर बसलेला अनिल त्यांनी पाहिला होता. म्हणजे असे
म्हणता येईल की सुतार व जगताप या दोघांनी मिळून अनिलला अलका थियटर पासून दूर पळविले. आणि नंतर जक्कलच्या टपरीत ( दुकानात )

लपवून त्याचेवर हल्ला चढविला व त्यास ठार केले. याचाच अर्थ हा की अनिलचा खून आरोपी नं. २ व नं. ३ या दोघांनी मिळून केला. सुतार व जगताप

या दोघांनी मिळून केला. जक्कल व मुन्नावर शहा, नं. १ व ४ यांचा या खुनाशी कांही ही संबंध नाही.

Pune crime news - जोशी अभ्यंकर खून खटला संपूर्ण माहिती part 6

Pune crime news – जोशी अभ्यंकर खून खटला संपूर्ण माहिती part 6

( सहा ) Criminal Conspiracy: Section 120-B इंडियन पीनल कोड क्रिमिनल कॉनसपीरसी :

 

प्रश्न असा आहे की या चारहही आरोपींचे मनामध्ये सामूहीक खून करण्याचा कट होता का ? was there a Criminal
Conspiracy among the four college students to commit multiple murders? या प्रश्नांचे संदर्भात असे म्हणता येईल की:-

ज्याअर्थी जोशी कुटुंबाच्या खूनाचा आरोप आरोपी नं.१ जक्कल आणि नं.२ सुतार यांच्यावरच ठेवला होता. आणि बाफनांच्या घरांत घुसलेले गुन्हेगार
जक्कल व सुतार हे दोघेजणच होते. त्याअर्थी या चौघांही कॉलेज कुमारांच्या मनांत Criminal Conspiracy क्रिमिनल कॉन्सपीरसी सामुहीक खून करण्याचा कट कधीही नव्हता.

अगदी सुरुवातीच्या प्रकाश हेगडेच्या खूनाचा कट आरोपी नं. १,२,३ यांनी सुहास चांडक सहकेला होता हे खरे आहे. परंतु आरोपी नं. ४ मुन्नावर शहाचा

त्या कटाशी काहीही संबंध नव्हता. जोशी व अभ्यंकर कुटुंबाच्या खूनाचा कट ही वेगळीच Conspiracy होती. ती कॉन्सपीरसी मुंबईच्या गुन्हेगारांची होती हे मला आवर्जुन सांगायचे आहे.

 

Receiving stolen property : Indian Penal Code., Sec.४११ चोरीचा माल घेणे :-

Pune crime news - भाग 6 - जोशी अभ्यंकर खून खटला जीवनपट

Pune crime news – भाग 6 – जोशी अभ्यंकर खून खटला जीवनपट

फिर्यादी पक्षाने पुण्यातील कोणाही सोनार किंवा सराफावर हा आरोप ठेवला नाही. अष्टेकर सराफ किंवा

भूमल पलरेचा यांनी अनुक्रमे सोन्याची लगड व सोन्याचे मंगळसूत्र, तनमणी खोड, लॉकेट इत्यादी वस्तू गुन्हेगारांकडून खरेदी

केल्याचे खोटे निवेदन कोर्टासमोर केले. त्याचवेळी त्यांच्यावर Receiving Stolen Property Sec. 411, L.P.C. हा
आरोप ठेवला नाही. यावरून हेच सिध्द होते, की सराफ सोनारांचा साक्षी पुरावा बनावट होता.

खरे मारेकरी कोण ? Pune Crime News 

जोशी-अभ्यंकर कुटुंबाचे सामुहीक खून कोणी केले, हा प्रश्न पुणे पोलीसांच्या दीर्घ तपासानंतरही अनुत्तरीतच राहिला आहे.
खरे मारेकरी कोण, याचा विचार करता असे आढळून येते की, हे हत्याकांड त्यावेळच्या Emergency आणीबाणीच्या काळांत घडले होते. प्रधानमंत्री
श्रीमती इंदिरा गांधी यांनी घोषित केलेल्या आणीबाणीच्या काळातच या भयानक घटना घडल्या.
त्या काळांत मुंबईत व देशाच्या इतर भागात स्मगलरर्स, गॅम्बलर्स-मटका जुगारवाले यांचा धंदा बंद पडला होता. मटका-जुगारवाल्यांचा प्रमुख-मटका
किंग रतन खत्री व त्याचे अनेक हस्तक मुंबईत आहेत त्यांच्याकडेच भाडोत्री गुन्हेगार – मारेकरीही आहेत
या भाडोत्री मारेक-यांच्या Hirelings च्या टोळी पैकी ८-१० जणांच्या टोळीने ते हत्याकांड केले असावे.

प्रत्येक मारेक-यास १ लाख,२ लाख रुपये मोबदलाही दिला असावा. हे पूर्णतय: पूर्वनियोजित खून मुंबईहून आलेल्या ९-१० जणांच्या टोळीने केले असल्याची
शक्यता आहे. पांच ते दहा हजार रुपयांचे दर्जेदार व अत्तर, सुगंधी द्रव्ये, तसेच जोशी व अभ्यंकराच्या घरांतील व्यक्तिंना झोपेची गुंगी आणणारे दर्जेदार
पेय रुपये २०००/- किंमतीचे खरेदी केले असावे. सहजा सहजी एकूण आठ व्यक्तिंना ठार मारणे हे सोपे काम नव्हे. त्याला किमान २ महिने आधी पूर्व
तयारी करावी लागते. ही तयारी करण्याची क्षमता जक्कल आणि मंडळी यांच्यामध्ये नव्हती, या सामुहीक हत्याकांडाचा Multiple Murders चा हेतू
दागिन्यांची चोरी करणे हा नव्हता, तर पुण्यातील एकूणच ब्राह्मण जमातीच्या माणसांमध्ये घबराट- दहशत निर्माण करून त्यांना पुणे शहराबाहेर जाण्यास
प्रवृत्त करणे हा उद्देश होता. पुणे पोलीसांनी केलेला तपास हा अपुरा होता. व त्यातून काढलेला निष्कर्ष चुकीचा विपर्यस्त होता.

जज्ज साहेबांस प्रणाम, Their Lordships यांस नमस्कार..

 

Pune crime news - joshi abhyankar murder case information part 6

Pune crime news – joshi abhyankar murder case information part 6

Also Visit : https://www.postboxlive.com

 

प्रभाकर प्रधान, वकील 
शोध , प्रबंध - वैभव जगताप

Leave a Reply

error: Content is protected !!