Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

HISTORYINDIAMAHARASHTRANewsPostbox Marathi

Rabindranath Tagore speech – विश्वकवी रवींद्रनाथ टागोर

1 Mins read

Rabindranath Tagore speech – विश्वकवी रवींद्रनाथ टागोर

 

Rabindranath Tagore speech – विश्वकवी रवींद्रनाथ टागोर यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन


 

 

4/8/2021,
रवींद्रनाथ टागोर हे थोर साहित्यिक, कवी, नाटककार , संगीतकार व चित्रकार होते . त्यांचे साहित्यक्षेत्रातील नोबेल या उच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

त्यांचे बंगाली साहित्यावर विशेष प्रभुत्व होते.तसेच शांतिनिकेतनची उभारणी करणारे,सृजन साहित्यिक म्हणून ते ओळखले जात.


शिक्षणासाठी शाळेत जावे लागते हा जगाचा न्याय आहे; शाळा सोडल्या शिवाय शिक्षणाला आरंभच होत नाही, हा रविंद्रनाथ टागोरांनी लावलेला शोध आहे.

अनेकांना आजवर घडलेला बोध आणि टागोरांनी लावलेला शोध यात जमीन-अस्मानाचे अंतर आहे.टागोर कोणत्याही शाळेत रमले नाहीत,

कोणत्याही वर्गात थांबले नाहीत, गुरुजनांच्या वाऱ्याला किंवा थार्यालासुद्दा उभे राहिले नाहीत. तरी टागोर सुविद्य झाले. घराघरात पोहोचलेल्या

एका राष्ट्रगीताचे रचनाकार झाले. एक हजार कविता, दोन हजार गीते, कादंबऱ्या,नाट्य, निबंध, प्रबंध, समीक्षा,पत्रे, प्रवासवर्णने

अशा नाना परींनी प्रकट झालेली त्यांची साहित्यसंपदा हे भारताचे ऐश्वर्य ठरले. त्यांची योग्यता ओळखून जीवनाच्या उत्तरार्धात नियतीने

त्यांच्यावर मानसन्मानांचा वर्षाव केला.त्यांच्य ‘ गीतांजली ‘ नावाच्या गीतसंग्रहास 1913 मध्ये नोबेल पारितोषिक मिळाले.


त्याच वर्षी कलकत्ता विद्यापीठाने त्यांना ‘डी. लिट.’ही पदवी दिली. त्यापाठोपाठ बनारस विद्यापीठ, ढाका विद्यापीठ, उस्मानिया विद्यापीठ

यांनीही टागोरांचा याच उपाधीने गौरव केला.जागतिक कीर्तीचे आॅक्सफर्ड विद्यापीठ शांतिनिकेतनच्या दिशेने धावले.

आणि दिनांक ७ ऑगस्ट १९४० या दिवशी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत टागोरांना डॉक्टरेटची पदवी देऊन धन्य झाले.

टागोरांनी शाळा नाकारली, पण शिक्षण नाकारले नाही. त्यांचे जीवन ही एक अविरत संस्कारसाधना होती. सगेसोयरे नोकरचाकर यांनी

गजबजून गेलेला जोडोसाँको’ या नावाचा टागोरांचा वाडा हे एक विद्यापीठ होते. हे चरित्रकार म्हणतात रात्रंदिवस नानाविध उपक्रमांनी निनादत

असणारे मुलखावेगळे घरकुल ही टागोरांची संपत्ती होती. या वाड्यात रामायणाचे, महाभारताचे, गीतेचे, उपनिषदाचे वाचन होत असे.

संगीताच्या मैफली होत. बंगाली नाटके होत ; Rabindranath Tagore speech इंग्लिश भाषणे होत; चित्रप्रदर्शने भरत. विचारांची वादळे

विश्रांतीसाठी या वाड्यात येत. प्रबोधनाची स्पंदने कानाकोपऱ्यात भावभावनांची कंपने निर्माण करीत. घरात धर्म होता; पण अंधश्रद्धा नव्हती .

भारतीय संस्कृती लोकजीवन आणि धर्म यांना कलंकित करणारा अस्पृश्यतेचा शाप टागोरांना व्याकुळ करत होता.


बंगालमध्ये मूळ धरू पाहणारी प्रांतीयता आणि भारताला काळवंडून टाकणारी अस्पृश्यता टागोरांनी निषिद्ध मानली,विषतुल्य लेखली.

वर्तमानकाळातील विद्रोही कवितेची दाहकता रविंद्राच्या त्या काळातील कवितेत आढळते.

टागोर हे तत्त्वज्ञ आणि कवी होते. त्यांच्या कवितेत त्यांचे तत्वज्ञान प्रतिबिंबित झाले होते. त्यांच्या जीवनात त्यांचे तत्वज्ञान घर करून राहिले होते.

पण हे तत्त्वज्ञान आले कोठून?बंगालमध्ये भ्रमंतीत रमणारा आणि गात गात पुढे जात राहणारा “बाऊल”या नावाचा लोककवींचा एक वर्ग होता.

‘ मनुष्यगौरवात ‘ धर्माचे सार शोधणारा हा बंगाली ‘ वासुदेव ‘ अंगणाप्रांगणात नाचत-नाचत ,मागे गीतांचा सुगंध ठेवून निघून जात होता.

टागोरांनी बालपणी ही लोकगीते पाठ केली.वारंवार म्हटली,वेळीअवेळी आठवली, आळवली.या निरक्षर कवींचे अक्षरवांग्मय हे रविंद्राच्या प्रतिभेचे अन्न झाले.

एक कवी देवाला आळवताना म्हणतो,” ही मंदिरे आणि या मशिदी हे तुझ्या मार्गावरचे अडथळे आहेत. या पंडितांचा आणि पुरोहितांचा गलबला तुझा शब्द मला ऐकू येत नाहीत.

रविंद्रनाथांच्या प्रतिभेची तार छेडली जात होती.तिच्यातून नवी कंपने निर्माण होत होती. लोककवीप्रमाणे वैष्णव कवींनी रवींद्रनाथांना काही काळ वेड लावले.

त्या मागोमाग भक्त कबीर आणि भगवान बुद्ध यांच्या जीवनात आले.व्यास, वाल्मिकी, कालिदास, जयदेव, अश्वघोष हे प्राचीन


पुरुषोत्तम टागोरांच्या साहित्यकुंडलीत उच्च स्थानी जाऊन बसले. रवींद्रनाथांची प्रतिमा भारतीय भक्तिभावनेची रूद्रवीणा घेऊन आपले जीवनसंगीत आळवू लागली.

एका कवितेत टागोर Rabindranath Tagore speech म्हणतात,” देवा घरटेही तुच, पक्षी पण तूच आणि आकाश पण तूच……” एकच एक चेतना नाना रूपांनी नटली आहे .

अशा स्थितीत परमेश्वरप्राप्तीसाठी दूर जाण्याची गरज नाही .परमेश्वरप्राप्तीच्या प्रयत्नातून जो पलायनवाद वाढीस लागतो त्यामुळे जीवनाची अपार हानी होते.

गुरुदेव म्हणतात,” हे मंदिरात बसणे ,डोळे मिटून घेणे, जपमाळ ओढत राहणे सोडून दे. देव खडी फोडणार्यांच्या घामात आहे,श्रमिकांच्या कामात आहे,

शेतकऱ्यांच्या सावलीत आहे. त्यांच्या अंगावरचे वस्त्र धुळीने माखले आहे,घामाने चिंब झाले आहे.” हे जग सुंदर करण्याचा प्रत्येक प्रयत्न ही प्रार्थना आहे.

प्रसन्नतेशिवाय प्रसाद नाही ;आर्ततेवाचून आरती नाही; पुज्यतेवाचून पूजा नाही. टागोरांना मायावाद मान्य नव्हता.मुक्ती किंवा मोक्ष हा जीवनाच्या प्रतारणेत नाही:

एकांतात किंवा विभक्ततेत नाही ; तो आहे समर्पणात’.प्रथम लीन व्हा,मग विलीन व्हा,मग एकरूप व्हा.’हा जीवनसायुज्यतायोग आहे.



. गीतांजलीतील प्रत्येक गीत हे टागोरांच्या जीवनदर्शनाचे एक पान आहे.ते म्हणत मुलांना मातृभाषेतून शिकवावे, हा टागोरांचा आग्रह होता.

शाळा ही समाजाची प्रतिकृती असावी. शिक्षण ही जीवनाची आवृत्ती असावी. शिक्षण सर्वार्थाने सर्वांगीण असावे.

प्रत्येक ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय आणि मन:शक्ती यांची त्यात गुंतवणूक असावी. शरीराचे मनाशी बोलणे व्हावे. मनाचे शरीराबरोबर चालणे व्हावे.

त्यात हसणे, खेळणे असावे. मुलांनी खुलावे ,फुलावे,बहरावे, मोहरावे, उमलावे ,नाचावे ,बागडावे, जीवनप्रवाहात डुंबत रहावे – असा हा एकूण विचार होता .

गुरूदेव टागोरांचे आणखी एक स्वप्न होते. भारतात देशोदेशीच्या आणि प्रांतोप्रांतीच्या जीवनवैशिष्टांचा अभ्यास व्हावा.

संस्कृतीची अनेक दालने ज्यात असतील आणि अभ्यासाच्या अनेक वाटा जेथे असतील असे एक संस्कारपीठ अस्तित्वात यावे.


शांतिनिकेतन चालू झाल्यावर ते चालते ठेवण्यासाठी टागोरांना चालत्या आपल्या संसाराला खीळ घालावी लागली. पुरीच्या किनाऱ्यावर

ब्रह्मचिंतन आणि लेखन निर्वेधपणे घडावे यासाठी बांधलेले एक घरकुल रहावयास जाण्यापूर्वीच त्यांना विकावे लागले.

पत्नीच्या अंगावरचे अलंकार संस्थेच्या स्वभाग्यरक्षणासाठी खर्ची पडले. पण हे सर्व कशासाठी केले गेले ? विद्येचे निशाण फडकत राहावे म्हणून.

भारतातील आणि भारताबाहेरील उगवती पिढी नव्या जगाच्या निर्मितीसाठी, नव्या युगाच्या स्वागतासाठी कटिबद्व व्हावी याचसाठी.

विद्या आणि कला यांच्या व्यासंगासाठी उभारलेले हे विद्यापीठ नालंदा आणि तक्षशिला या प्राचीन ज्ञानपीठाप्रमाणे चालावे, अशी टागोरांची अपेक्षा होती.

आळंदीच्या ज्ञानदेवाप्रमाणे या विश्व कवीने विश्‍वात्मक देवाजवळ एक प्रार्थना केली ,’या माझ्या देशाला उदात्त आणि उन्नत अशा स्वर्गभूमीत नेऊन ठेव.

‘टागोरांची ही प्रार्थना अवघ्या मानवकुलासाठी होती.


टागोरांना अभिप्रेत असणारे हे उद्याचे जग अजून तरी क्षितिजावर दिसत नाही.या उद्याच्या जगाची चाहूल घेणारा हा

विश्वकवी त्याच्या शोधार्थ या मर्त्य लोकातून चालता झाला ,तो दिनांक 7 ऑगस्ट 1914 हा होता.

अशा या विश्वकवीला स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन



लेखन 
डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर

Leave a Reply

error: Content is protected !!