Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

NewsPostbox Marathi

raja ravi verma – कलेच्या दरबारातील सम्राट राजा रवि वर्मा

1 Mins read

raja ravi verma – कलेच्या दरबारातील सम्राट राजा रवि वर्मा

 

raja ravi verma – कलेच्या दरबारातील सम्राट राजा रवि वर्मा यांची आज जयंती

 

 

 

 

राजघराण्यात जन्मलेले परंतु कलेच्या दरबारातील सम्राट raja ravi verma राजा रवि वर्मा यांची आज जयंती

(२९ एप्रिल १८४८-२ ऑक्टोबर १९०६)

त्यांचा जन्म केरळ राज्यातील किलीमानूरच्या (त्रिवेंद्रमपासून सु. ४५ किमी.) राजप्रासादात-मातृगृही झाला.

त्यांची आई उमांबा ही राजघराण्यातील असून ती नृत्यनिपुण कलावती होती आणि वडील श्रीकांतन

भट्टथिरीपाद हे संस्कृत पंडित होते. अशा रीतीने त्यांना आईकडून कलेचा व वडिलांकडून संस्कृत

साहित्याचा वारसा लाभला. त्यांचा विवाह १८६६ मध्ये पुरोकृतथ्थी नाल या राजकन्येशी झाला.

भूतपूर्व त्रावणकोर संस्थानच्या राजघराण्याशी त्यांचा निकटचा नातेसंबंध होता. अशा रीतीने जन्म,

विवाह व नातेसंबंध यांद्वारे राजा रविवर्मा यांना राजघराण्याचे वलय लाभले होते.

raja ravi verma paintings

raja ravi verma paintings

त्यांना कलेचे प्राथमिक धडे व प्रोत्साहन त्यांचे काका raja ravi verma राजा राजवर्मा यांनी दिले. त्यांनी रविवर्मांना वयाच्या चौदाव्या वर्षी त्रिवेंद्रमच्या राजवाड्यात आणले. त्या काळात भारतातील अनेक संस्थानिक पाश्चात्त्य चित्रकारांना पाचारण करून, त्यांच्याकडून आपली व्यक्त्तिचित्रे रंगवून घेत असत. इंग्रज चित्रकार थीओडोर जेन्सन यांना १८६८ मध्ये त्रिवेंद्रमच्या राजवाड्यात आमंत्रित केले होते. जेन्सन व राजदरबारचे चित्रकार रामस्वामी नायडू या दोघांचाही रविवर्मा यांच्यावर प्रभाव पडला. थीओडोर जेन्सन यांनी हाताळलेले तैलरंग हे माध्यम त्या काळी भारतीय कलापरंपरेला नवीनच होते. तरुण रविवर्मांच्या पुढे या माध्यमामुळे एक नवीन विश्वच उभे राहिले. मोठ्या उत्साहाने त्यांनी हे माध्यम आत्मसात करून, त्यात विलक्षण प्रभुत्व संपादन केले.

www.postboxindia.com

Raja ravi verma

रविवर्मा raja ravi verma यांनी आपल्या कलाजीवनाच्या सुरुवातीच्या काळात तंजावर शैलीत चित्रे रंगविली.रविवर्मा यांचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी पाश्चात्त्य कलेतील वास्तववादी तंत्र व तैलरंगाचे माध्यम वापरून भारतीय महाकाव्यांतील प्रसंग आणि धार्मिक विषय रंगविले. या त्यांच्या तजेलदार व अभिनव आविष्कारमुळे त्यांना भारतीय तैलरंगचित्रणाचे आद्य जनक मानले जाते. पाश्चात्त्य चित्रतंत्रातील यथादर्शनाच्या साहाय्याने निर्माण होणारा, वातावरणाचा त्रिमितीय आभास त्यांनी आपल्या चित्रांतून परिणामकारकतेने दाखविला.

painting of raja ravi verma

painting of raja ravi verma

रविवर्मा यांच्या कलेला जशी राजदरबारी प्रतिष्ठा मिळाली; तसाच जनसामान्यांकडूनही प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. म्हैसूर आणि बडोदा या संस्थानांसाठी त्यांनी बरीच चित्रे काढली . बडोद्याचे दिवाण सर माधवराव यांच्या सल्ल्यावरून त्यांनी लोणावळ्यानजीक मळवली येथे तैलचित्र (ओलिओग्राफीक) छापखाना स्थापन केला आणि चित्रांच्या असंख्य प्रतिकृती तयार केल्या. पाश्चात्त्य तंत्रात चितारलेल्या व भारतीय वातावरण असलेल्या या चित्रांची विलक्षण मोहिनी तत्कालीन समाजावर होती. अमाप लोकप्रियतेबरोबरच त्यांना व्यावसायिक यशही मिळाले.

raja ravi verma famous paintings

raja ravi verma famous paintings

 

मद्रास येथे भरलेल्या प्रदर्शनात (१८७३) त्यांच्या शकुंतलापत्रलेखन (शकुंतलेचे दुष्यंत राजाला प्रेमपत्र) या चित्राला प्रथम पारितोषिक, गव्हर्नरच्या सुवर्णपदकाच्या रूपात, मिळाले . तेव्हापासून त्यांची कीर्तिशिखराकडे वाटचाल सुरू झाली. मद्रासचे गव्हर्नर बकिंगहॅमचे ड्यूक यांनी त्यांना बरीच कामे मिळवून दिली. १८७५ मध्ये त्रिवेंद्रमला प्रिन्स ऑफ वेल्स आले असता रविवर्मांची चित्रे राजेसाहेबांनी त्यांना भेट म्हणून दिली.

१८८० साली पुणे येथे आणि १८९२ मध्ये व्हिएन्ना व शिकागो येथील प्रदर्शनांत त्यांची चित्रे प्रदर्शित करण्यात आली व त्यांना आंतरराष्ट्रीय मानमान्यता मिळाली. कलेच्या क्षेत्रात राजा रविवर्मांना मिळालेली मान्यता तसेच त्यांची प्रतिभा व कार्य बघून सातवे एडवर्ड यांनी त्यांना ‘कैसर-इ-हिंद’ हे सुवर्णपदक देऊन गौरव केला (१९०४). त्यांनी काही व्यक्त्तिचित्रे व लोकजीवनावर आधारित प्रायिक चित्रेही काढली आहेत. त्यांनी केलेले डॉ. दादाभाई नवरोजी यांचे व्यक्त्तिचित्र प्रसिद्ध आहे.

 

Also Read : Ahilyabai – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर – https://www.postboxindia.com/ahilyabai-ahilyabai-holkar/

 

त्रावणकोरच्या अल्पवयीन राजपुत्राचे पालकत्व त्यांच्याकडे आले असता, ते न पत्करता त्यांनी आयुष्याच्या अखेरपर्यंत निष्ठेने चित्रे रंगविली. किलीमानूर येथे त्यांचे निधन झाले. रणजित देसाई यांनी त्यांच्या जीवनावर राजा रविवर्मा ही चरित्रात्मक कादंबरी लिहिली आहे (१९८४).

राजा रविवर्मा यांची चित्रे भवानी संग्रहालय औंध (सातार जवळ )‘लक्ष्मीविलास पॅलेस’, बडोदा; ‘उदयपूर पॅलेस’; ‘सालारजंग म्युझियम’, हैदराबाद; ‘श्री चित्रालयम’, त्रावणकोर; ‘चित्रशाळा’, म्हैसूर; ‘नॅशनल म्यूझियम ऑफ मॉडर्न आर्ट’, नवी दिल्ली इ. संग्रहालयांतून जतन केली आहेत .

राजा रवि वर्मा
अभिवादन

माधव विद्वांस 

(मराठी विश्वकोश )

Leave a Reply

error: Content is protected !!