raje sambhaji bhosale – छत्रपती संभाजीराजे व महाराणी येसूबाईसाहेब यांच्या कन्या भवानीबाई
raje sambhaji bhosale – छत्रपती संभाजीराजे व महाराणी येसूबाईसाहेब यांच्या कन्या भवानीबाई यांना जन्मदिनानिमीत्त विनम्र अभिवादन
31/8/2021,
भवानीबाई संभाजीराजे भोसले यांचा जन्म ४ सप्टेंबर इ.स.१६७८ रोजी पिलाजी राजेशिर्के यांच्या ” शृंगारपूर “येथील वाड्यात झाला.येसूबाई राणीसाहेब मांसाहेब झाल्या !
छत्रपती संभाजीराजे आबासाहेब झाले ! राजकुळातील लाभाचे नातमुख जन्मास आले .
भवानीबाई या छत्रपती शिवाजीमहाराज व महाराणी सईबाई राणीसाहेब यांच्या नात व छत्रपतीं संभाजीराजे व येसूबाई राणीसाहेब यांच्या जेष्ठ कन्या.
छत्रपती संभाजीराजांच्या raje sambhaji bhosale मृत्यूनंतर भवानीबाई या आपल्या मातोश्री येसूबाईराणीसाहेब व धाकटे बंधू शाहूमहाराज यांचेबरोबर औरंगजेबाच्या कैदेत होत्या .
त्यांचे लग्न शंकराजी महाडिक यांचेशी,म्हणजेच आपल्या आत्या अंबिकाबाई यांच्या मुलाशी झाले होते.हे लग्न छत्रपती संभाजी महाराज यांनीच ठरवले होते.
परंतु शंभूराजे एका मोहिमेत सहभागी असल्यामुळे आपल्या मुलीच्या लग्नाला उपस्थित राहू शकले नव्हते. अंबिकाबाई म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज व सईबाई राणीसाहेब यांच्या सर्वात धाकट्या कन्या.
महाड बंदराची वतन व देशमुखी, खेड बंदराची मोकादमी प्राप्त झाल्यामुळे महाडिक हे आडनाव प्राप्त झाले होते. शहाजीराजांच्या स्वराज्याच्या कामात परसोजी महाडीक
यांनी अत्यंत मोलाची कामगिरी केली, तेव्हापासून या घराण्याचा शिवशाहीशी संबंध आला.परसोजी महाडिक यांच्या सात मुलांपैकी हरजीराजे महाडिक यांना अनामिका
उर्फ आंबिकाबाई यांना देऊन छत्रपती शिवरायांनी महाडिकांशी सोयरीक केली होती. ज्याप्रमाणे नाईक निंबाळकर, जाधव राव ,राजेशिर्के ,मोहिते या लोकांशी
भोसल्यांच्या घराण्याशी नातेसंबंध झाले, त्याचप्रमाणेच महाडिक यांचे भोसल्यांच्या राजघराण्याशी संबंध आले.महाडिक हे घराणे फार प्राचीन असून ते
उत्तर हिंदुस्थानातुन आलेल्या क्षत्रियांपैकी एक आहेत.
Also Visit : https://www.postboxlive.com