Rajput women
Rajput women
Rajput women

Rajput women – चितोडच्या राणी पद्मिनी व रजपूत स्रियां

Rajput women - चितोडच्या राणी पद्मिनी व रजपूत स्रियांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन

Rajput women – चितोडच्या राणी पद्मिनी व रजपूत स्रियां

Rajput women – चितोडच्या राणी पद्मिनी व रजपूत स्रियांना

स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन


24/8/2021

भारतातील स्त्रियांच्या पवित्रतेचा आणि पराक्रमाचा तो इतिहास जगाच्या सर्व काळासाठी अविनाशी

आणि अजिंक्य राहीला आहे.अशा कथांनी भरलेली पाने भारतीय इतिहासाचा अमूल्य वारसा आहे.

असे प्रसंग एकदाच आले नाहीतर बऱ्याच वेळा आले. जेव्हा जेव्हा हिंदू स्रियांनी सामुहिक अग्नीत

आपल्या पवित्रतेचे रक्षण करण्यासाठी’ जय हर- जय हर’ म्हणून अग्नीत प्रवेश करत पुढे हीच घोषणा

नंतर “जौहर ” म्हणून प्रसिद्ध झाली.


जोहरच्या गाथा मधील सर्वात प्रसिद्ध गाथा म्हणजे चितोडची राणी पद्मिनी हीचा जोहर.

पद्मिनीने २६ ऑगस्ट १३०४ रोजी १६००० rajput women स्त्रिया सोबत जोहार केला.

परंतु अल्लाऊदिन खिलजीची सावलीही अंगावर पडू दिली नाही.

पद्मिनी ही सिंहलद्वीप बेटातील राजा गंधर्व सेन आणि राणी चंपावती यांची कन्या पद्मिनी चे लग्न

चितोडचा राजा रतनसिंह यांच्याशी झाला होता. राणी पद्मिनी या दिसायला अतिशय सुंदर अशा राजकन्या

होत्या. एकदा चितोड येथील चित्रकार चेतन राघवन याने राणी पद्मिनीचे सुंदर चित्र काढून रतनसिंह यांना

अर्पण केले.हे सुंदर चित्र पाहून राजा रतणसिंह यांनी स्वपराक्रमाने विजयी होऊन पद्मिनी यांना

चितोडची राणी बनवले.


मेवाडची पहिली राजधानी चितोडगड येथे होती .नंतर ही राजधानी अकबर बादशहाने काबीज केल्यावर

तेथील राजा उदयसिंह याने या शहराची स्थापना केली. आपल्या घराण्याची उत्पत्ती सूर्यवंशी या पासून झाली

असे उदयपूरचे राजे मानतात .सूर्यवंशी राजे पूर्वी अयोध्येस राज्य करीत होते. कालांतराने आयोध्या प्रांत

जाऊन त्यांचे राज्य अजमेरला आले .अखेरीस पृथ्वीराजाचे वेळेस दिल्ली व अजमेर राज्य एक होऊन ती

शहाबुद्दीन घोरीने जिंकली ,तेव्हा त्यांच्या वंशजांनी मेवाडात चितोड येथे येऊन नवीन राज्य स्थापन केले.

शहाबुद्दीन घोरी निघून गेल्यावर सुमारे शंभर सव्वाशे वर्षे पर्यंत चितोडच्या राजांना बरीच विश्रांती मिळाली.

गुलामवंशी सुलतानांनी त्यांना फारसा उपद्रव दिला नाही .परंतु अल्ला-उद्दीन खिलजी यांची सर्वव्यापी दृष्टी

त्यांना फार दिवस चूकवता आली नाही. राणा लक्ष्मणसिंह चितोड येथे राज्य करीत होते. त्यांचे काका रतन सिंह

यांनी रुपवती कन्या पद्मावती यांच्याशी विवाह केला होता.


पद्मिनीच्या सौंदर्याची किर्ती अल्लाऊदिन खिलजी याच्या कानावर पडली.पद्मिनीला मिळवण्यासाठी

अल्लाऊदीन खिलजी याने चितोडवर स्वारी केली.कोणत्याही परिस्थितीत अल्लाऊदिन खिलजीला पद्मिनी

यांना हस्तगत करावयाचे होते. पद्मिनीला मिळवण्यासाठी अल्लाउद्दीन खिलजीने जंग जंग पछाडलं आणि

चित्तोड वर स्वारी केली व पद्मिनीला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. अल्लाऊदिन खिलजी राजा रतनसिंहला

म्हणाला ,मला पद्मिनीला भेटावयाचे आहे. पद्मिनी मला बहिणी सारखी आहे,असाही त्यांनी निरोप दिला.

हे सर्व ऐकून नाईलाजाने पद्मिनीने आपल्या प्रतिमेचे आरशातून दर्शन घेण्याची परवानगी दिली .

पद्मिनीच्या लोभाने अल्लाउद्दीन खिलजीने सन.१३०३ मधे चितोडगडाला वेढा देऊन स्वारी केली. शहर हस्तगत

होईना तेव्हा एक वेळ पद्मिनीला पाहून मी परत जातो असे अल्लाउद्दीन खिलजीने रतनसिंह यांना निरोप सांगितला.

 

Also Visit : https://www.postboxlive.com

 

प्रत्यक्ष दर्शन तर नाहीच परंतु आरसा ठेवून त्यात तिचे प्रतिबिंब तुम्हास दाखवू असा त्यास निरोप पाठवला .

नंतर थोड्या लोकांनीशी अल्लाउद्दीन खिलजी याने चितोडच्या राजवाड्यात प्रवेश केला .पद्मिनीचे प्रतिबिंब

पाहून तो परत जात असता ही संधी साधून अल्लाउद्दीन खिलजी याने रतनसिंह यांना कैद केले व आपल्या


छावणीत नेले .अल्लाउद्दीन यांनी सांगितले की पद्मिनी माझ्या स्वाधीन केल्याशिवाय मी रतनसिंह यांना सोडणार

नाही .ही अट मान्य करून मोठ्या लवाजमाने पद्मिनी अल्लाउद्दीनास भेटण्यास निघाली. सातशे बुरख्याच्या

पालख्या अल्लाउद्दीनच्या गोटात दाखल झाल्या. स्वतः पद्मिनी त्यात नव्हतीच प्रत्येक पालखीत कोणास नकळत

एक शूर इसम बसवलेला होता.आणि दर पालखीस सहा सहा शिपाई हत्यारे छपवून भोयाच्या वेषात पालख्या

उचलायला लावल्या होत्या.पद्मिनी आली असे समजून अल्लाउद्दीनने तिला नवर्याच्या भेटीसाठी अर्धा तास दिला.

रतनसिंह यांना न सोडण्याचा अल्लाउद्दीनचा विचार होता.परंतु एका रिकाम्या पालखीत रतनसिंह यांना बसवून

पालखी किल्ल्यात परत पाठवली गेली.अल्लाउद्दीन पद्मिनीच्या भेटीची घाई करताच सर्व शिपाई एकदम बाहेर

पडले आणि कापाकापी करू लागले.अल्लाउद्दीन काही बेसावध नव्हता. त्याने त्या सर्वांची कत्तल केली,


पुढे काही दिवस निकराचे युद्ध होऊन अल्लाऊदिन यांचे अतोनात नुकसान झाले .आणि तिकडे दिल्लीवर

मोगलांनी हल्ला केला आहे असे ऐकताच अल्लाऊदिन वेढा उठवून परत गेला .

लगेच दुसर्या वर्षी सन.१३०४ मधे अल्लाऊदिन याने परत चितोडवर स्वारी केली.या प्रसंगी रजपूत लोकांनी

लढण्याची कमाल केली.या लढाईत राजा रतनसिंह यांना वीर मरण आले. शेवटी इलाज चालत नाही असे पाहून ,

आपल्या शिलाचे रक्षण करण्यासाठी पेटत्या अग्नीकुंडात उड्या टाकून राणी पद्मावतीने rajput women

१६०० स्रियासह अग्नीत प्रवेश केला.


तो दिवस होता २६आॅगस्ट १३०४ पद्मिनी जोहार करून अजरामर झाली ,आणि अल्लाऊदिन खिलजी

राखेचे ढीग तुडवीत किल्ल्यावर फिरत राहिला.

अशा या शूर व धाडसी राणी पद्मिनी व जोहार करणार्या सर्व rajput women रजपूत स्रियांना आमचा मानाचा मुजरा.

लेखन
डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisement

More Stories
lakhuji jadhav
lakhuji jadhav – विठोजी भोसले यांचे पुत्र संभाजी भोसले
error: Content is protected !!
%d bloggers like this: