Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

News

housing society rule book – सोसायटीतील दंड आणि कायदा

1 Mins read

housing society rule book – सोसायटीतील दंड आणि कायदा

 

 

housing society rule book – को.ऑप.हौ. सोसायटीतील लिकेज, दंड आणि कायदा

मुंबई,

दुसऱ्याच्या फ्लॅटमधून होणाऱ्या लिकेजमुळे सदनिकाधारकाला होणाऱ्या त्रासाची वेळीच दखल न घेतल्यास सोसायटीला नुकसान भरपाईचा दंड होऊ शकतो, असा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य ग्राहक तक्रार निवारण मंचने केला आहे. तक्रारदार सदस्याला सोसायटीने सुमारे तीन लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. दोन सदस्यांच्या वादात सोसायटीने हस्तक्षेप करायला हवा होता, मात्र तसे न करता त्यांनी सेवेत कसूर केली होती. तिसऱ्या सदस्यांच्या घरातील दुरुस्ती काम तक्रारदाराने करणे म्हणजे सोसायटीकडून अक्षम्य दुर्लक्ष करण्यासारखे आहे,असे न्यायालयाने म्हटले आहे.

राज्य ग्राहक न्यायालयात धाव !

मेहता यांना सर्व कामाचा एकूण खर्च आणि भाडे असे मिळून सुमारे चार लाख खर्च आला. ही रक्कम सोसायटीने परत करावी, अशी मागणी त्यांनी केली. मात्र सोसायटीने ही मागणी मान्य केली नाही. याविरोधात त्यांनी ग्राहक न्यायालयात तक्रार केली. जिल्हा ग्राहक न्यायालयाने मेहता
यांचा दावा मान्य केला. तसेच त्यांना अडीच लाख भरपाई देण्याचे आदेश सोसायटीला दिले. या विरोधात मेहता यांनी राज्य ग्राहक न्यायालयात याचिका दाखल केली आणि ही रक्कम वाढवून देण्याची मागणी केली. न्यायालयाने ही मागणी मान्य करून तीन लाख दहा हजार भरपाई देण्याचे
आदेश दिले. नेरूळमध्ये राहणाऱ्या धनराम मेहता ( नाव बदलले आहे ) यांच्या सदनिकेच्या वरच्या फ्लॅटमधून सात वर्षांपूर्वी स्वयंपाकघरामध्ये लिकेज होत होते. याप्रकरणी ग्राहक तक्रार
निवारण मंचने हा निर्णय दिला आहे. अशीच एक घटना नवी मुंबई मध्ये घडली होती, सदर बिल्डरकडून फसवणूक झालेल्या काही सभासदांनी सशर्त रहिवाशी दाखला ( कंडिशनल ओसी ) प्राप्त झाल्यानंतर कायदेशीर सल्ल्यानुसार सोसायटी स्थापण्याचा निर्णय घेतला. पण त्याच सोसायटीतील वाघमारे नामक व्यक्तीने सोसायटीतील या कायदेशीर न्यायिक मार्गामध्ये अनेक अडचणी निर्माण केल्या, बिल्डरच्या फसवणुकीतून सर्वाना न्याय मिळावा या हेतूने सोसायटीतील सर्वानी सामंजस्याने घेत अशा निर्बुद्ध सभासदांना दुर्लक्षित करण्याचे ठरविले. पण सोसायटी स्थापनेच्या दिवशी अशा निर्बुद्ध व्यक्तीने निर्वाचित अध्यक्षांच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न केला, पण अध्यक्षांकडून आपली कॉलर पकडली गेल्यामुळे चारचौघात अपमानित झालेल्या आणि अध्यक्षांविरुद्ध पोलिसात खोटी तक्रार दाखल करून पण काहीच फायदा झाला नाही हे पाहून बदल्याच्या भावनेने ग्रासलेला, अपमानित, अहंकार दुखावलेल्या त्याने केवळ सोसायटीतील आपल्याच फ्लॅट मध्ये लिकेज करून ठेवले. अशा लिकेज चा त्रास त्याच्याखाली असणाऱ्या फ्लॅट, त्या सोसायटीच्या विंग आणि पार्किंग ला होऊ लागला. अपमानित झालेला हा निर्बुद्ध सोसायटीने वारंवार कळवल्यानंतर सुद्धा सोसायटीतील फ्लॅट भाड्याने देवून या लिकेज कडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत राहिला. अशा अहंकार दुणावलेल्या आणि अपमानित झालेल्या व्यक्ती बदल्याच्या भावनेत आपल्या प्रॉपर्टी चे नुकसान तर करतात पण चांगल्या सोसायटीचे सुद्धा करतात. अशा व्यक्ती अनेक सोसायटींना त्रासदायक डोकेदुखी ठरतात. खरे तर अशा निर्बुद्ध व्यक्ती सोसायटीला समाजाला आणि समाजहिताला नपुसंकच असतात. अशा वेळी अशा व्यक्तींविरुद्ध सोसायटी कमिटी ला त्यांच्या अधिकाराने दंडित करता येणे शक्य असते. आपली सोसायटी आपले घर ही भावना इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतलेल्या प्रॉपर्टी च्या इन्व्हेस्टरकडून करणे शक्य नसते त्यामुळे शक्यतो सोसायटी चालविणाऱ्या कमिटी सभासदांनी अशा सभासदांना नियमांचे पालन सक्तीने व्हावे यासाठी वेळोवेळी मार्गदर्शक तत्वे व नियम यांचे काडेकोर पालन करण्यास भाग करावे. सोसायटी कमिटी आणि सदस्यांनी वेळोवेळी कायदेशीर सल्ला घेण्याचे काम करावे.

 

प्रशांत माने अँड असोसिएट.

ऍडव्होकेट हायकोर्ट

९६६४३९२७९४
९८६७८१७६७३

www.postboxindia.com

www.postboxindia.com

 

Leave a Reply

error: Content is protected !!