Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

HISTORY

sambhaji maharaj rajyabhishek – छत्रपती संभाजीमहाराज

1 Mins read

sambhaji maharaj rajyabhishek – छत्रपती संभाजीमहाराज

 

 

sambhaji maharaj rajyabhishek – छत्रपती संभाजीमहाराज यांच्या राज्याभिषेकदिनाच्या शिव शुभेच्छा 

 

 

 

संभाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचा स्वाभिमान. शिवराय आणि सईबाई आईसाहेबांचे थोरले चिरंजीव. जिजाऊ साहेबांचे लाडके नातु. शिवराज्याभिषेकाच्या वेळीच घोषित झालेले स्वराज्याचे उत्तराधिकारी. कर्तुत्व आणि पराक्रम याचा वारसा त्यांना रक्तातून चालत आलेला. महाराजांच्या निधनानंतर राज्य चालवण्याची जबाबदारी आणि अधिकार संभाजी महाराजांचाच होता.
मराठी जनता त्यांच्यामध्ये शिवरायांचेच दुसरे रूप पहात होती. तरीही अष्टप्रधान मंडळातील काही जणांनी त्यांच्या कार्यशैलीबद्दल शंका निर्माण करण्याचा प्रयत्न  केला. त्यांना स्वराज्यापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला. संभाजी महाराजांना छत्रपतींच्या शेवटच्या आजाराची एवढेच काय त्यांच्या मृत्यूची देखील बातमी दिली नाही. बाल वयातल्या राजाराम महाराजांचे मंचकारोहन करण्यात आले. सोयराबाई राणीसाहेब यांच्या आदेशानुसार त्यांना अटक करण्यासाठी सेनापती हंबीरराव मोहित्यांना पाठवण्यात आले. पण स्वराज्याचे निष्ठावान पाईक असलेल्या सेनापतींनी आपल्या बहिणीचा अन्यायी आदेश मानला नाही. स्वराज्याची सूत्रे संभाजी महाराजांच्या हातातच सुरक्षित आहेत आणि ती सूत्रे निर्विघ्नपणे त्यांना मिळावीत यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. संभाजी महाराजांनी रायगड ताब्यात घेतले. बंडखोराना अटक करण्यात आली.

२० जुलै १६८० संभाजी महाराजांचे मंचकारोहण झाले आणि ते राजे झाले
शिवरायांच्यानंतर स्वराज्याची घडी विस्कटेल ,भाऊबंदकीमध्ये मराठी सत्ता लयाला जाईल असा  दिल्लीचा बादशहा औरंगजेबचा होरा होता.  तो चुकीचा ठरला.
संभाजी महाराजांनी राज्यकारभाराची घडी तर बसवली. वडिलांच्या आदर्शांप्रमाणे राजकीय , आर्थिक लष्करी धोरण राबवली. मुघलांपासून इंग्रज पोर्तुगीजापर्यंत मराठ्यांची जरब बसवली. स्वराज्यात स्थिरता आणली. यावेळी कोणी तरी महाराजांना सुचवले अस्थिर वातावरणात केलेल्या गडबडीतल्या मंचकारोहणापेक्षा विधिवत राज्याभिषेक करून घ्यावे. छत्रपतींच्या राजसिंहासनाची प्रतिष्ठा जपण्यासाठी हे करणे इष्ट ठरेल हे संभाजी महाराजांनी जाणले. राज्याभिषेकाची तयारी सुरु झाली.

माघ शुद्ध ७ ,शके १६०२ रौद्रनाम संवत्सरे जानेवारी १६, सन १६८१ मध्ये संभाजी राजांचा विधियुक्त राज्याभिषेक झाला व ते मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती  आणि जनतेचे धाकले धनी झाले.
संभाजीराजे धर्मप्रवण होते.त्यांनी अनेक साधु – संतांच्या मठांची वतने कायम केली.सनदापत्रे तयार करून दिली.त्यांचे आशीर्वाद घेतले. संभाजीराजांचा राज्यकारभार सुरू झाला.संभाजीराजे क्षत्रियकुलावतंस सिंहासनाधिश्वर अनभिषिक्त नृपती झाले.येसूबाई राणीसाहेब पट्टराणी म्हणून राज्याभिषेक प्रसंगी विराजमान झाल्या.येसूबाई राणीसाहेब महाराष्ट्राच्या दुसर्या महाराणी झाल्या.
संभाजीराजांना प्रथम मुलगी असल्याने समारंभात युवराजाची उणीव भासली,म्हणून संभाजीराजांनी ‘ पुत्रकामेष्टी ‘ यज्ञ केला.राज्या राज्याभिषेका पूर्वी संभाजी राजांचा येसूबाई राणीसाहेबांशी समंत्रक विवाह झाला. अनेक अडचणींना तोंड देऊन आपल्या पतीचा राज्याभिषेक झाल्याचे पाहून येसूबाईं राणीसाहेबांना अत्यंत आनंद झाला.

संभाजीराजांच्या राज्याभिषेकाने मराठी राज्याला दुसरे छत्रपती मिळाले. या राज्याभिषेक सोहळ्याने एका वेगळ्या जबाबदारीची जाणीव येसूबाईराणींना झाली.हा सोहळा स्वतः येसूबाईराणीसाहेबांनी अनुभवला .या सोहळ्याने एका वेगळ्या जबाबदारीची जाणीव येसूबाई राणीसाहेबांना झाली.
स्वराज्याची धुरा सांभाळण्याची जबाबदारी संभाजीराजांच्या खांद्यावर आली. त्याचप्रमाणे स्वराज्य रक्षणाची जबाबदारी येसूबाईराणींच्या वरती आली. राज्याभिषेकाच्या विधीनंतर राज्य स्थिरस्थावर झाल्यानंतर संभाजी राजांनी आपली मुद्रा करून घेतली. संभाजीराजांच्या राजगडावरील अनुपस्थित तेथील कारभार सांभाळणे गरजेचे होते. अशावेळी राजाराम महाराजांना युवराज पद द्यायचे म्हटले तर ते अल्पवयीन असून त्यांच्या ठिकाणी पोक्तपणा नव्हता. राज्यकारभाराचा त्यांना फारसा अनुभव नव्हता. मोगलांचे आक्रमण महाराष्ट्रावर व खास करून मराठा प्रदेशावर याच काळात चालू झालेले असल्याने, संभाजीराजांना सतत युद्ध क्षेत्रावर जावे लागत होते. त्यामुळे संभाजी राजांच्या अनुपस्थितीमध्ये स्वराज्याचा राज्यकारभार पाहण्याची जबाबदारी येसूबाई राणींच्यावरती पडलेली होती. संभाजीराजांनी येसूबाई राणीसाहेबांना अंतर्गत कारभार अधिकार देताना ‘ श्री सखी राज्ञी जयती ‘ असा शिक्का देऊन कारभार करण्याची जबाबदारी त्यांच्यावर टाकली होती.

राज्याभिषेकाच्या sambhaji maharaj rajyabhishek वेळी संभाजी महाराजांनी येसूबाई राणी यांना सन्मानपूर्वक ही उपाधी दिली.ती पुढे शब्दशः सार्थ ठरली होती.येसूबाई राणीसाहेब या त्यांच्या खरोखरच सखी व सचिवही होत्या.
अत्यंत लहान वयातील येसूबाईंना छत्रपती शिवरायांनी शिक्के कट्यारीचे अधिकार त्यांची आकलन शक्ती व कारभाराची कुवत पाहून रास्तपणे सन्मानपूर्वक बहाल केली होती. येसूबाई राणीसाहेब या आपल्या नावाने राजपत्र काढत होत्या. संभाजीराजांच्या अनुपस्थितीत येसूबाईंनी काढलेली आज्ञापत्रे संभाजीराजांच्या नावाने निघत असली तरी त्यामध्ये ‘आज्ञा ‘ या शब्दाऐवजी छत्रपतिंची ‘ राजाज्ञा ‘म्हणून  शब्दयोजना करण्यात येत होती. तसेच त्या स्वतः महाराणी म्हणून आज्ञा करीत होत्या. त्यावेळी ” अज रक्तखाने सौ. येसूबाई ” अशाप्रकारची उपाधी लिहित होत्या. यावरून संभाजीराजांच्या मनामध्ये येसूबाई राणी यांच्याबद्दल विश्वास व मानाचे आदराचे स्थान होते हे दिसून येते.

संभाजीराजांच्या राज्याभिषेकानंतर अत्यंत धामधुमीच्या काळात येसूबाई राणीसाहेबांच्यावरती अधिक जबाबदारी पडत असे. त्या जबाबदारीतून त्यांनी आपली हुकूमत अत्यंत चांगल्या प्रकारे बसवली होती. राजधानीतील किंवा इतरत्र फितुरांस तत्परतेने आळा घालण्यात जी दक्षता बाळगण्यात आली होती , यावरून हे स्पष्ट होते .संभाजीराजांची शक्ती त्यांच्या मागे होती हे खरे असले तरी या शक्तीसामर्थ्याचा वेळीच व परिणामकारकपणे उपयोग करणे हे काही तितकेसे सोपे कार्य नव्हते.येसूबाईनी शेवटपर्यंत, औरंगजेबबादशहा वर सुद्धा आपली छाप राखले होती. आपल्या चांगल्या स्वभावामुळे त्यांनी घरातील सर्व मंडळींचा त्यांच्याबद्दल उत्तम आदरही उत्पन्न केला होता.
संभाजी महाराजांचा कारभार रायगडावरुन सुरळीत सुरु झाला. त्यांनी आगळीक करणाऱ्या सर्व मंत्र्यांना माफ करुन पुन्हा त्यांच्या पदावर पुन्हा नियुक्त केले.

आपला sambhaji maharaj rajyabhishek राज्याभिषेक  झाल्यानंतर शंभुराजांनी लगेच १५ व्या दिवशी बुऱ्हाणपुरवर छापा टाकला आणि १ करोड होनांची दौलत स्वराज्यात आणली. त्यानंतर त्यांनी मोगल, इंग्रज, पोर्तुगीज आणि सिद्दी या शत्रुंना नामोहरम करीत पुढील केवळ आठच वर्षात शिवरायांनी उभारलेले स्वराज्य दुप्पट केले. सैन्यही दुपटीपेक्षा अधिक वाढविले. स्वराज्याच्या खजिन्यात तिपटीपेक्षा अधिक वाढ केली.
अशा या थोर व शोर्यशाली आमच्या छत्रपती संभाजीमहाराज यांना राज्याभिषेकदिनाच्या शुभेच्छा.

लेखन
डाॅ. सुवर्णा नाईक निंबाळकर

Leave a Reply

error: Content is protected !!