sant sena maharaj
sant sena maharaj
sant sena maharaj

sant sena maharaj – वारकरी सांप्रदाय संत सेनामहाराज

sant sena maharaj - संत सेनामहाराजांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन

sant sena maharaj – वारकरी सांप्रदाय

संत सेनामहाराज

 

sant sena maharaj – संत सेनामहाराजांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन

 

 

 

 

 

श्री विठ्ठल आणि वारकरी सांप्रदायाने
फक्त जातीपातींच्या सीमा मोडल्या
नाहीत तर प्रांताप्रांताच्याही सीमा ओलांडल्या.संत सेना महाराज sant sena maharaj त्याचेच एक उदाहरण. मध्यप्रदेशातील बांधवगडमध्ये जन्मलेल्या

सेना महाराजांचा मूळ व्यवसाय नाभिकाचा.

देव आणि भक्त यातील नाते अधोरेखित करण्यासाठी मांडलेल्या या कथेतील भावार्थ समजून घ्यायला हवा.

sant sena maharaj सेना महाराजांनी आपल्या अभंगातूनही याच भक्तिरसाची उपासना केलेली आढळते.

‘जाता पंढरीसी सूख वाटे जीवा’ असे म्हणत हा वारकरी संत विठ्ठलचरणी लिन झाला. पंढरी ही त्यांच्या

जीवनाचा ध्यास बनली. श्रावण वद्य द्वादशी ही त्यांची पुण्यतिथी मानली जाते.

संतसेना महाराजांबद्दल पुरेशी माहिती व त्यांचे सविस्तर चरित्र उपलब्ध नाही. त्यांच्या चरित्रा विषयी

दोन मतप्रवाह आहेत. एकामतानुसार ते महाराष्ट्रीयन होते तर दुसऱ्या मतानुसार ते झारखंडमधील बांधवगड

या संस्थाना मधील होते. सेना महाराजांनी मराठीमध्ये अभंगरचना केल्या आहेत. त्यावर हिंदीचा विशेष प्रभाव

दिसून येत नाही. ते जर उत्तर भारतीय असते तर त्यांच्या भाषेवर हिंदीचा खूप प्रभाव जाणवला असता. त्यामुळे

सेना महाराज मूळ महाराष्ट्रातील होते असे काही अभ्यासकांचे मत आहे. महाराष्ट्राबरोबरच उत्तर भारतात सुद्धा

सेना महाराजांचा खूप प्रभाव आहे. विशेष करून उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश व राजस्थान या ठिकाणी त्यांना

मानणारा मोठा वर्ग आहे व ते त्या त्या भागात राहत होते असे वर्णन करणारी चरित्र उपलब्ध आहेत.त्यामुळे

सेनामहाराज उत्तर भारतीय होते व तीर्थयात्रा करत पांडुरंग दर्शनासाठी महाराष्ट्रात आले व नामदेव व इतर

संतांसोबत येथेच रमले व राहिले असेही काही अभ्यासकांचे मत आहे.

सेना महाराजांच्या sant sena maharaj चरित्रा बाबत सध्या उपलब्ध असलेल्या व बहुतेक सर्व चरित्रकारांनी

वर्णन केलेल्या गोष्टी पुढीलप्रमाणे –सेना न्हावी महाराजांचे वडील रामानंद स्वामींचे शिष्य होते व सेना महाराजांना सुद्धा रामानंद स्वामींचा

अनुग्रह लाभला होता.

सेना महाराज बांधवगडच्या राजाकडे नाभिक म्हणून काम करत होते. रोज जाऊन राजाची दाढी करणे,

प्रसंगी केस कापणे इत्यादी कामे करणे हा त्यांचा व्यवसाय होता.

रोज दोन प्रहर चरितार्थासाठी काम करणे व उरलेला वेळ हरी चिंतनामधे व्यतित करणे अशी त्यांची दिनचर्या होती.

याचा उल्लेख सुद्धा त्यांनी आपल्या एका अभंगामध्ये केला आहे.एके दिवशी सेना महाराजांकडे काही साधुसंत

आले होते व त्यांच्याबरोबर ते चर्चा करत बसले होते. त्याचवेळेस त्यांना राजवाड्यातून कामासाठी बोलावणे आले.

तेव्हा सेना महाराजांच्या पत्नीने ते थोड्याच वेळात येत आहेत असा निरोप पाठवला. निरोप देणा-यांनी मात्र

सेना महाराज sant sena maharaj त्यांचे पाहुणे गेल्याशिवाय येणार नाही असा चुकीचा निरोप दिला. यामुळे

राजाला राग आला व त्याने त्‍यांना दरबारात हजर करण्याची आज्ञा दिली. अर्थात याच वेळेस भगवंत सेना

महाराजांचे रूप घेऊन राजदरबारात राजाकडे आले व देवाने राजाची दाढी केली. त्यावेळेस आरशामध्ये

मधेच राजाला सेना महाराजांच्या जागी भगवंताचे रूप दिसले. तेव्हा आश्चर्यचकित झालेल्या राजाला काही सूचेना.

राजाने मोहरा देऊन त्यांचा सत्कार केला व सेना महाराजांच्या रूपातील देव परत गेले. इकडे थोड्यावेळाने

सेना महाराज आपली धोकटी घेऊन राजाची सेवा करण्यासाठी आले. आल्यावर त्यांना झालेला प्रकार समजला.

अशी आख्यायिका आहे.


या चमत्काराचे वर्णन करणारे सेना महाराजांचे , संत जनाबाईंचे अभंग उपलब्ध आहेत.

संत ज्ञानदेव महाराज व मुक्ताईला मांडेकरण्यासाठी खापर म्हणजेच मातीचे भांडे आणायचे असते.

ते मिळत नाही यावेळी योगसामर्थ्याने ज्ञानदेव माउलींनी आपली पाठ तापवली व त्यावर मुक्ताई मांडे भाजतात.

हा चमत्कार पाहून विसोबा खेचर या भावंडांना शरण जातात. अशा अनेक आख्यायातून विसोबा खेचर वारंवार

आपल्या समोर येतात.
खेचर म्हणजे आकाशात उडणारा .जगातील कोणतीही गोष्ट विसोबाना बांधू शकत नाही हे खऱ्या अर्थाने मोकळे होते,

स्वतंत्र होते ,खऱ्या विवेकाचा सल्ला फक्त त्यांच्याकडूनच मिळणार होता.यामुळे संत ज्ञानदेवांचे व विसोबांचे नाते

पुढे बळकट झाले .ते या भावंडांना गुरूस्थानी मानत. कधी सोपान देव तर कधी मुक्ताई त्यांच्या समोर गुरु म्हणून

येतात. एवढेच नव्हे तर संत सोपानदेवावर विसोबांनीस आरती लिहिलेली आहे.

संत नामदेव महाराजांना मार्गदर्शक म्हणून विसोबा खेचर सर्वांगाने परिपूर्ण वाटले असावेत.कारण विसोबा

हे संत नामदेव महाराजांचे गुरु आहेत. सर्व संतांची मांदियाळीतील वारकरी चळवळीच्या पाय वाटेतली एक वीट

संत विसोबा खेचर यांची देखील आहे. संत नामदेव महाराजांना विसोबा खेचरयांचे कडून बरेच काही मिळाले .

त्यांच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा लाभ समकालीन संतांना व संत प्रेमींना मिळाला.

बांधवगड येथे सेना महाराजांचे स्मृती म्हणून काही बांधकाम अजूनही आहे. याशिवाय श्रीक्षेत्र पंढरपूर येथे

प्रदक्षिणा मार्गावर बेलीचा महादेव मंदिरासमोर संतसेना महाराज समाधी मंदिर आहे. याठिकाणी सेना

महाराजांचा समाधी उत्सव श्रावण महिन्यात पंधरा दिवस साजरा होतो .सेना महाराजांचे मराठी अभंग उपलब्ध आहेत. संत नामदेवांप्रमाणेच सेना महाराजांच्या काही रचना शीखांच्या पवित्र अशा गुरुग्रंथसाहेब या ग्रंथात समाविष्ट आहेत. सेना महाराजांच्या अभंगामध्ये नामपर, पंढरी वर्णनपर, उपदेशपर, आत्मपर, पाखंड खंडन पर व संत महिमा सांगणारे ,निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, नामदेव, यांचे वर्णन करणारे अभंग ऊपलब्ध आहेत.
आम्ही वारीक वारीक ,करू हजामत बारीक
विवेक दर्पन आयना दाऊ ,वैराग्य चिमटा हालवू
उदक शांती डोई घोळू । अहंकाराची शेंडी पिळू ।।
भावार्थाच्या बगला झाडू । काम क्रोध नखे काढू ।।
चौवर्णा देऊनी हात । सेना राहिला निवांत ।।

संत सेनामहाराज यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन

 

लेखन
डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर


Advertisement

More Stories
real life sex - marriages & sex life satisfaction
real life sex – सेक्स विझलेली लग्नं !
error: Content is protected !!
%d bloggers like this: