Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

INDIAMAHARASHTRANewsPostbox Marathi

Satara स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांची कारवाई

1 Mins read

Satara – स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांची कारवाई

 

Satara ४ वर्षापासुन फरार असलेल्या अटटल गुन्हेगारास अटक

17/7/2021,

पोलीस अभिलेखावरील मागील ४ वर्षापासुन फरार असलेल्या अटटल गुन्हेगारास अटक.
घरफोडीचे १० गुन्हे उघड करुन ४ लाख ६८ हजार रुपये किमतीचे १० तोळे सोने जप्त.

श्री.अजय कुमार बंसल पोलीस अधीक्षक सातारा व श्री.धीरज पाटील अपर पोलीस अधीक्षक,
सातारा satara यांनी जिल्हयातील उघडकीस न आलेले घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सुचना श्री.किशोर
धुमाळ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांना दिल्या आहेत.
त्याप्रमाणे श्री.किशोर धुमाळ, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सातारा satara यांनी स्थानिक
गुन्हे शाखेकडील सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे व आनंदसिंग साबळे तसेच स्थानिक गुन्हे
शाख्नेकडील पोलीस अंमलदार यांची पथके तयार करुन त्यांना घरफोडीचे गुन्हे उघड करण्याच्या सुचना
दिल्या होत्या. दरम्यान पोलीस अभिलेखावरील खुन, जबरी चोरी, घरफोडी, चोरीसारख्या गुन्हयातील
मागील ४ वर्षापासुन फरार असलेला अटटल गुन्हेगार जक्कल उर्फ जकल्या रंगा काळे रा. सुरुर याने
फरार कालावधीत वाई, जावली, कोरेगाव, खंडाळा, सातारा satara तालुक्यामध्ये घरफोडया केल्या आहेत अशी
गोपनीय माहिती प्राप्त झाल्याने श्री.किशोर धुमाळ, पोलीस निरीक्षक स्था.गु.शा. यांनी स.पो.नि. रमेश
गर्जे व आनंदसिंग साबळे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार यांना सराईत गुन्हेगार जक्कल
उर्फ जकल्या रंगा काळे याचा शोध घेवून त्यास अटक करण्याच्या सुचना दिल्या होत्या.
स्थानिक गुन्हे शाखेकडील नेमण्यात आलेल्या तपास पथकाने खंडाळा, कोरेगाव व वाई
तालुक्यामध्ये त्याचा रानावनात, ऊसाचे शेतामध्ये मजूराच्या वेषात वेशांतर करुन शोध घेतला असता
११ जुलै २०२१ रोजी तो रेवडी ता.कोरेगाव जि.सातारा येथे ऊसाच्या शेतामध्ये लपला असल्याची माहिती
प्राप्त झाली. त्या अनुशंगाने नमुद पथकाने सराईत गुन्हेगार जक्कल रंगा काळे ज्या ऊसाचे शेतामध्ये
लपला होता त्याचे आजुबाजूस सापळा लावून त्यास ऊसाचे शोतातुन शिताफीने ताब्यात घेवून त्याचेकडे
विचारपूस केली असता त्याने सर्वप्रथम कोरेगाव पोलीस ठाणे गु.र.नं.९२/२०२१ भादविक ४५४, ४५७,
३८० या गुन्हयाची कबुली दिली. त्यास सदर गुन्हयात अटक करुन त्याची मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी,
कोर्ट कारेगाव यांचे कोर्टातुन ५ दिवस पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आली.

satara crime detection

satara crime detection

सदर गुन्हयाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक रमेश गजें हे करीत आहेत. आरोपी हा पोलीस
अभिलेखावरील अटटल गुन्हेगार असुन पोलीस कोठडी मुदतीमध्ये आरोपीकडे सखोल व कौशल्यपुर्वक
विचारपुस केली असता त्याने कोरेगाव, वाठार, मेढा, वाई, भुईंज, सातारा satara तालूका, खंडाळा या पोलीस
ठाणे हद्दीत एकूण १० घरफोडी चोरीचे गुन्हे केले असल्याची कबुली दिली असुन त्याचेकडून आतापर्यंत ४
लाख ६८ हजार रुपये किमतीचे १० तोळे सोने हस्तगत करण्यात आले आहे.
श्री.अजय कुमार बंसल, पोलीस अधीक्षक, सातारा व श्री.धीरज पाटील, अपर पोलीस अधीक्षक,
सातारा, यांचे सुचनांप्रमाणे तसेच श्री.किशोर धुमाळ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांचे

मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, आनंदसिंग साबळे, पोलीस उपनिरीक्षक मधुकर
गुरव, सहा.फौजदार उत्तम दबडे, तानाजी माने, पो.हवा.कांतीलाल नवघणे, संतोष पवार, संतोष सपकाळ,
संजय शिर्के, विजय कांबळे, अतिश घाडगे पो.ना. शरद बेबले, साबीर मुल्ला, नितीन गोगावले, मंगेश
महाडीक, प्रविण फडतरे, प्रमोद सावंत, रवि वाघमारे, निलेश काटकर, मुनीर मुल्ला, अर्जुन शिरतोडे,
गणेश कापरे, अमित सपकाळ, पो.कॉ.विक्रम पिसाळ, विशाल पवार, रोहित निकम, सचिन ससाणे,
वैभव सावंत, धीरज महाडीक, प्रविण पवार, विजय सावंत, गणेश कचरे यांनी सदरची कारवाई केलेली
आहे.
जक्कल रंगा काळे याचेवर यापुर्वी खूनाचे २, जबरी चोरीचे २, घरफोडीचे ९, चोरीचे २,
पोलीस अटकेतुन फरार होणे १ असे एकुण १६ गुन्हे दाखल असुन खालील गुन्हयांमध्ये मागील ४
वर्षापासुन फरार होता.

 

Anjani Mishra Reports

Leave a Reply

error: Content is protected !!