Selfie सेल्फी
Selfie सेल्फी
Selfie सेल्फी

Selfie सेल्फी – तरुणाईची मोबाईल भाषा,त्यावर बंदी कशाला ?

माहिती व तंत्रज्ञान

Selfie सेल्फी – तरुणाईची मोबाईल भाषा,त्यावर बंदी कशाला ?

 

Selfie सेल्फी मोबाईल भाषा माहिती व तंत्रज्ञान

समीर मणियार

 

 

 

 

30/6/2021

माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांती झाल्यानंतर बऱ्याच गोष्टी मनुष्यप्राण्याच्या आवाक्यात आल्या आहेत. अर्थातच माहितीची

जलदगतीने देवाणघेवाण होण्यात आणि संपर्क साधण्यात कमालीची गती आली आहे. मोबाईल खासकरुन स्मार्ट फोन

आल्यानंतर तुमच्या हातात संगणक आला आहे. आज आबालवृद्धांच्या हातात सतत मोबाईल दिसतो. तरुणाईची भाषा मोबाईल बनू पाहतो.

मोबाईलमुळे चांगल्या गोष्टी घडल्या. तसे काही अवगुण त्यात आहेत. बहुतांश व्यक्ती स्वयंप्रतिमेच्या प्रेमात पडली आहे.

आपलाच चेहरा वेगवेगळ्या अंगाने मोबाईल शूट करणे हा फंडा बनत चालला आहे.

मोबाईलचा कॅमेरा अत्याधुनिक असल्यामुळे मानवी मनाच्या कंगोऱ्यांना एक भाषा येऊ लागली आहे.

आप्त नातलग, मित्र परिवार, निसर्गासोबत सेल्फी काढण्यात तरुणाईच नव्हे तर सारी मंडळी दंग होत आहे. यात Selfie सेल्फी ला महत्व येत आहे.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग म्हणून आपल्याला हवी तशी  सेल्फी काढण्यात मनुष्य दंग होऊ लागला आहे.

त्यात जरा हटके  सेल्फी काढण्यात काही मंडळी रममाण होऊ लागली आहेत. पण  सेल्फी काढत असताना ती आपल्या जीवावर बेतणार नाही

याची काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी.  सेल्फी जरुर काढावी पण धोकादायक जागेवर Selfie सेल्फी काढताना लहानशी मानवी चूक

जीवावर बेतायला लागली आहे. प्रत्येकाने स्वयंशासन आणि जबाबदारी ओळखून सेल्फी काढली तर त्यात वावगे काहीच नाही.

पावसाळ्यात खासकरुन वैशाख, आषाढ, श्रावण आणि भाद्रपद महिन्यात निसर्गाचा अनोखा आविष्कार पाहायला मिळतो.

नदी, नाले, धबधबा, रांजण खळगे, कुंड, बागा, डोंगर, पर्वतराजी, दरी आणि पावसात ओलेचिंब भिजण्यातील सेल्फी काढण्याची मजा काही औरच असते.

सध्याच्या जीवघेण्या जगण्या मरण्याच्या स्पर्धेत एक विरंगुळा म्हणून निसर्गासोबत सेल्फी काढण्यात मानवी मनाला मिळणारा

आनंद विलोभनीय असतो. चिंता. ताणतणाव यातून मुक्तता मिळते. यामुळे  सेल्फी काढण्यावर निर्बंध असता कामा नये या मताचे आपण आहोत.

शेजारच्या गुजरातमध्ये सापुतरा हिल स्टेशन नावाजलेले आहे. पावसाळ्यात पर्यटन स्थळे गजबजलेली असतात.

पर्यटकांचा ओढा हिल स्टेशन, धबधबे, नदी नाले, समुद्र किनारे आणि अन्य पर्यटन स्थळांकडे अधिक असतात.

पावसाळ्यातील दुर्घटना घडू नयेत यासाठी गुजरातच्या डांग जिल्ह्यात सेल्फी काढण्यावर तेथील प्रशासनाने बंदी घातली आहे.

डांग जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी टी. के. तोमर यांनी संपूर्ण जिल्ह्यात सेल्फी काढण्यावर बंदी घातली आहे.

सेल्फी काढणे हा त्या जिल्ह्यात गुन्हा समजण्यात येतो. प्रवाही नदी नाले, धबधबे येथे पाण्यात उतरताना, आंघोळ करताना सेल्फी

काढण्यावर बंदी घालण्यात आली आहे. या भागात या काळात कोणी Selfie सेल्फी काढली तर संबंधित व्यक्तीवर भारतीय

दंड संहितेच्या कलम १८८ अन्वये गुन्हा नोंदविण्याचे फर्मान काढण्यात आले आहे. गतवर्षी वाघाई सापुतरा महामार्गावर

आणि ठिकठिकाणच्या धबधबे म्हणजेच वॉटर फॉलवर Selfie सेल्फी काढण्यास बंदी घालण्यात आली होती. ती संयुक्तीक होती.

तथापि, यंदाच्या पावसाळ्यात संपूर्ण डांग जिल्ह्यात सेल्फी काढण्यावर बंदी घालण्याचा तेथील प्र्रशासनाचा खाक्या हा अभिव्यक्ती

स्वातंत्र्यावर अतिक्रमण करणारा आहे. संभाव्य अपघात टाळण्याचा नावाखाली हा आदेश मनमानीचा वाटतो. प्रत्येक व्यक्तीने

आपल्या जिवित रक्षणाची काळजी Selfie सेल्फी काढताना घ्यायला हवी. सारी जबाबदारी प्रशासनावर टाकता कामा नये. पावसाळ्यात

काही धोकादायक ठिकाणी सेल्फी काढताना अपघात अथवा जिवितहानी होऊ नये यासाठी काही स्वयंसेवी संस्थांनी जीवरक्षक तैनात केले आहेत.

मात्र, प्रत्येकानी सेल्फी काढताना काळजी घ्यायला हवी.

जगात २०११ ते २०१७ या काळात Selfie सेल्फी काढण्यामुळे झालेले एकूण अपघाताच्या घटना पाहता त्यातील निम्मे अपघात हे आपल्या भारत

देशात घडल्याचे निदर्शनास आले आहे. युएस नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसीनच्या पाहणीत हा निष्कर्ष नमूद करण्यात आला आहे.

काही धोक्याच्या ठिकाणी सेल्फी काढणे जीवावर बेतू शकते अशा ठिकाणी सेल्फीला प्रतिबंध हवाच.

पण संपूर्ण डांग जिल्ह्यात सेल्फी काढण्यावर कायद्याने बंदी घालणे हा प्रकार चुकीचा वाटतो. गुजरात प्रशासनाने या बंदीचा फेरविचार करायला हवा.

बंदी हा त्यावर मार्ग असू शकत नाही. जनजागृती व स्वयं अनुशासन हाच त्यावर तोडगा आहे.

काळ बदलतो आहे. राहणीमान बदलत चालले आहे. स्मार्ट फोन हा प्रत्येकाच्या जगण्याच्या अविभाज्य भाग बनत चालला आहे.

अशा काळात सेल्फी काढण्यावर कायद्याने बंदी टाकण्याचा प्रकार रानटी काळात नेण्यासारखा वाटतो.

कायदा आणि बंदी यातून काय साध्य होणार ते कळत नाही. पॉवर अल्सो करप्ट म्हणजे अधिकार हा भ्रष्टसुद्धा असू शकतो.

करोना साथरोगाच्या काळात पोलिसांनी निर्माण केलेली दंडेलशाही आपण अनुभवलेली असून, आजही ती अनुभवत आहोत.

कायदा चांगल्या गोष्टींसाठी असतो पण त्याचा गैरवापर अधिक होतो. गुजरातच्या डांग जिल्ह्याचे अन्य जिल्हे अनुकरण करु शकतात.

तसे झाल्यास चुकीचा पायंडा पडेल.

यासाठीच सेल्फी काढण्यावर बंदी असता कामा नये. सेल्फी हा आबालवृद्ध आणि तरुणाईचा हक्क आहे.

आपण काय उत्तर कोरियात राहतो काय अशी माझी लेक सानिया म्हणते. ती नव्या पिढीची प्रतिनिधी आहे.

म्हणून Selfie सेल्फीवर कोणतेही निर्बंध असता कामा नये असे मला वाटते. तुमचे मत असेच असू शकते?

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisement

More Stories
Mpsc world
Mpsc world च्या मायाजाळात, कर्जबाजार वस्त्या आन गाव गाळात !
error: Content is protected !!
%d bloggers like this: