Senior Citizen Idea of Time Bank
Senior Citizen Idea of Time Bank
Senior Citizen Idea of Time Bank

senior citizen Idea of Time Bank टाइमबँक भन्नाट कल्पना

senior citizen Idea of Time Bank

Senior Citizen Idea of Time Bank टाइमबँक भन्नाट कल्पना

 

Senior citizen Idea of Time Bank

 

 

 

 

 

स्वित्झर्लंडमधे असतांना मी एका भाड्याच्या घरात राहत होतो. त्या घराची मालकीण श्रीमती क्रित्सीना ही ६७ वर्षांची बाई शिक्षिका म्हणून रिटायर्ड झाली.

खरं म्हणजे तेथले पेन्शन इतकं मोठं असतं की तिला तिच्या उत्तरायुष्यात खायची, प्यायची काही ददात नव्हती.

तरीसुध्दा आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिने एका ८७ वर्षांच्या महिलेची सेवा करण्याचे काम पत्करले काळजीवाहक म्हणून.

मी तिला विचारले अधिक पैशाच्या मोहाने तू हे स्वीकारले आहेस कां? तर तिने दिलेले उत्तर मला संभ्रमीत करणारे होते.

ती म्हणाली, नाही, मी पैशांसाठी नाही हे करीत. मी माझा हा कामाचा वेळ टाइमबँक मध्ये टाकते.

आणि मी जेंव्हा म्हातारी होईन तेंव्हा मी ह्या टाईमबँकमधून मला सेवेचा वेळ काढून घेईन.

मला टाईमबँक असं काही असतं, हे ऐकूनच आश्चर्याचा धक्काच बसला. मी तिला विस्ताराने  या ( senior citizen Idea of Time Bank )संकल्पनेची माहिती विचारली.

ती म्हणाली, स्वीसच्या शासनाने एक कल्याणकारी कार्यक्रम म्हणून याची सुरुवात केली.

त्याचं असं आहे की जेंव्हा व्यक्ती सुद्रुढपणे तारुण्यात असते तेंव्हा ती आपल्यापेक्षा व्रुध्दाची सेवा करतात आणि

ती जेंव्हा व्रुध्द होते तेंव्हा अशा सेवेची तिला आवश्यकता भासते. तेंव्हा अशा पूर्वी सेवा केलेल्या वेळेची परतफेड म्हणून तिला सेवा मिळते.

अशी सेवेकरी व्यक्ती सुद्रुढ, संवेदनशील आणि प्रेमळ स्वभावाची असावी. ज्या व्रुध्दांनासेवेची अपेक्षा असते

अशा अनेक संधी त्या तरुण व्यक्तीला मिळू शकतात. अशी त्यांची सेवेची वेळ त्यांच्या सेवा खात्यात जमा होते.

सामाजिक कल्याण विभागाच्या. त्याच घराची मालकीण आठवड्यातून दोन वेळा दोन दोन तास व्रुध्दांना त्यांच्या

काही गोष्टी खरेदीसाठी किंवा त्यांच्या घरकामासाठी किंवा त्यांच्याशी गप्पा मारण्यासाठी,

वाचनासाठी अथवा बाहेर फिरण्यासाठी व्यतीत करीत होती. अशाप्रकारे एक वर्षापर्यंत सेवा दिल्यावर

तिच्या सेवेची गणना करुन तिला टाइमबँक कार्ड दिलं जाईल. त्यात त्या सेवेची वेळ नमूद केलेली असेल.

जेंव्हा सेवेकरी व्रुध्द होईल, तेंव्हा तिला तिच्यासाठी त्या टाइमबँक कार्डाव्दारे सेवा मिळू शकेल.

तिच्या टाइमकार्डाची तपासणी होऊन टाइमबँक तिच्यासाठी सेवेकरी तिच्या घरी अथवा हाँस्पिटलमधे पाठवून देईल.

एके दिवशी मला माझ्या घरमालकीणीचा फोन आला. ती म्हणाली, काही गोष्टी काढण्यासाठी ती स्टुलावर उभी होती.

तोल जाऊन ती पडली आणि तिच्या मांडीचे हाड मोडले आहे. मी तिला हाँस्पिटलमधे पोहोचवली.

मी तिच्या सेवेसाठी तत्पर होतो. पण ती म्हणाली, तशी काही जरुरी नाही. मी माझ्या टाइमबँकेतून सेवेसाठी टाइम विड्राव्हल फाँर्म भरला आहे.

आणि टाइमबँक आता माझी काळजी घेईल. आणि खरेच दोन तासात टाइमबँकेतून सेवेकरी हजर झाले.

त्यानंतर महिनाभर त्या सेवा स्वयंसेविकेने माझ्या घर मालकिणीचे घर सांभाळले. तिच्यासाठी स्वयंपाक करुन जेवू घातले.

तिच्याशी गप्पा मारुन आनंदी ठेवले. सेवेकरीच्या सहाय्याने घरमाकीण लवकरघ पूर्ण बरी झाली.

बरी झाल्यावर लगेच ती आपल्या सेवाभावी कार्याला लागली. तिचे म्हणणे असे की, ती जोपर्यंत कार्यक्षम आहे तोपर्यंत ती जास्तीत जास्त वेळ टाइमबँक मध्ये टाकू इच्छिते.

सध्या स्वित्झर्लंडमध्ये टाइमबँकहा विषय अगदी सर्वमान्य झाला आहे. यामुळे शासनाला केवळ आर्थिक फायदाच नव्हे

तर अनेक सामाजिक समस्या त्यामुळे मिटल्या आहेत. समाजामध्ये अधिक सामंजस्य व सहिष्णुततेची वाढ होण्यास मदत झाली आहे.

बहुसंख्य स्वीस नागरिकांनी हा विषय उचलून धरला आहे. शासनाने केलेल्या पाहणीत लोकसंख्येच्या

मोठ्या प्रमाणात नागरिक या संकल्पनेत सहभागी होऊ इच्छीतात, हे दिसून आले आहे. त्यामुळे स्वित्झर्लंडमध्ये शासनाने

अशाप्रकारचे कायदे करण्यात तत्परता दाखविली आहे.

ज्येष्ठ नागरिकांच्या भारतातील सर्वात मोठ्या संघटनेचा दोन टर्म असण्याच्या पूर्वीपासून सक्षम ज्येष्ठांची

अति ज्येष्ठांच्या ( senior citizen Idea of Time Bank ) सेवेसाठी काही वेळ देऊन हा विषय आपलासा करावा हा प्रयत्न अनेक श्रेष्ठींनी नागरिकांत प्रस्रुत करण्याचा प्रयत्न केला

पण सर्व काही फक्त शासनानेचकरावे ही मनिषा असल्याने त्या विषयावर बहुसंख्यांनी पाठ फिरवली.

आपणही पुढे व्रुध्द होणार आहोत आणि सध्या न्यूक्लीअर कुटुंबाची प्रथा मूळ धरु पहात असल्याने

आपल्या व्रुध्दत्वी काळजीवाहक म्हणून आपल्याला कोणी साथी उपलब्ध होऊ शकेल ह्या भावनेने

आजच्या तरुणाईने व्रुध्दांशी सेवाभाव ठेवावा हा विचार केल्यास भारतीय व्रुध्दांचे भवितव्य उज्वल असेल.

मूळ लेखक

अज्ञात

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisement

More Stories
faltan
faltan – फलटणचा मुधोजी मनमोहन राजवाडा
error: Content is protected !!
%d bloggers like this: