shahaji raje bhosale
shahaji raje bhosale
shahaji raje bhosale वीर बाजी पासलकर यांच्या 371 व्या पुण्यतिथि निमित्त विनम्र अभिवादन 

shahaji raje bhosale close – वीर बाजी पासलकर

shahaji raje bhosale close - 371 व्या पुण्यतिथि निमित्त विनम्र अभिवादन 

Shahaji raje bhosale close – वीर बाजी पासलकर

 

 

shahaji raje bhosale close – 371 व्या पुण्यतिथि निमित्त विनम्र अभिवादन 

 

 


नव्याने अधिष्ठित होणाऱ्या हिंदवी स्वराज्यासाठी सासवडी प्राणार्पण करून स्वराज्यासाठी आत्मबलिदान करणाऱ्या वीर शिरोमणींच्या पंक्तीत अग्रस्थान

भूषवणारे वीर बाजी पासलकर हे मोसे खोऱ्याचे एक पिढीजात बडे देशमुख होते .वीर बाजी पासलकर हे बारा मावळांपैकी एक असलेल्या मोसे

खोऱ्यातील ८४ खेड्यांचे राजे होते,शिवबांच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या कार्यात त्यांना अनेकांची मदत मिळाली.

त्यात तरुण सळसळत्या रक्ताची जशी झुंजार तरुण मंडळी होती, त्याप्रमाणेच वय,अनुभव आणि तरुणांनाही लाजवतील अशी पराक्रमी वयस्कर जी

माणसे होती त्यातील एक भव्य दिव्य व्यक्तिमत्व म्हणजे बाजी पासलकर. इतिहासात बाजी पासलकर ह्यांना स्वराज्याचे पहिले सरसेनापती


होण्याचे भाग्य लाभले. बाजी पासलकर हे मोसे खोऱ्यातील वतनदारांचे देशमुख घराणे. मावळ प्रांतात त्याचा मोठा दरारा होता.

शिवरायांना हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या कार्यात अनेकांची मदत मिळाली. त्यात तरुण सळसळत्या रक्ताची जशी मंडळी होती त्याप्रमाणेच वय,

अनुभव आणि तरुणांनाही लाजवतील अशी पराक्रमी वयस्कर जी माणसे होती त्यातील एक भव्य दिव्य व्यक्तिमत्व म्हणजे बाजी पासलकर.

बलदंड शरीर,अक्कडबाज मिशा. फौलादी रुंद छाती,तरुणांना लाजवेल असा पराक्रम करून दाखवण्याची बळकट मनगटाची ताकद.

त्यामुळे या साठीच्या माणसाला स्वराज्याच्या कामी वळून घ्यावे,त्यांच्याबरोबर मावळ प्रांतातली आणखीही अनेक मंडळी या स्वराज्यकार्यात

मदत करतील असा शिवरायांना जो जेष्ठांकडून सल्ला मिळाला,त्यानुसार राजांनी एक पत्र लिहून ते बाजी पासलकर ह्यांना मोसे खोर्यात पाठवले.

पत्र वाचून बाजींच्या मनातील शिवबांबद्दल आदर दुणावला. वयाच्या अवघ्यां सोळा सतरावा वर्षी हिंदवी स्वराज्य स्थापनेचे स्वप्न शिवबा पाहत होते.

या देव, देश आणि धर्म कार्याला मदत करावी शिवबाच्या विनम्र आमंत्रणाचा स्वीकार करावा,आपण जर त्यांच्या मागे उभे राहिलो तर इतर मंडळीही

या कामी पुढे येतील,असा विचार करून त्या पत्राचा व शिवबाचा मान राखत स्वतः बाजी पासलकरांनी येऊन पुणे मुक्कामी त्यांची भेट घेतली. इतकेच नव्हे


तर पंतांच्या शिवबांच्या विनंतीचा,मासाहेबांच्या आज्ञेचा मान राखत बाजी पासलकर यांनी या स्वराज्य स्थापनेच्या कामी शिवरायांना मदत करण्याचा शब्द दिला.

बाजी नुसता शब्द देऊनच थांबले नाहीत तर त्यांनी अनेक मोठे सरदार,देशमुख जे गेली अनेक वर्षे दुसऱ्यांची चाकरी करत होते, त्यांना या पवित्र कार्यासाठी प्रवृत्त केले.

त्यासाठी त्यांना पत्रे पाठवली. प्रत्यक्ष भेटी घेतल्या आणि एक मोठी फौज शिवबांच्या पाठी उभी केली.बाजी पासलकर ह्यांनी

शिवाजीराजेंच्या shahaji raje bhosale सैन्यात हिंदवी स्वराज्याचे पहिले सरसेनापती पद भूषविल.

बाजी पासलकर हे स्वतःच्या बलिदानाद्वारे स्वराज्यातील मावळ्यांत सर्वस्वाचा त्याग करण्याचा आदर्श निर्माण करणारे एक वीर सेनानी होते.

यांच्या दंडा एवढ्या मिशीचे कौतुक सार्‍या मावळ खोर्‍यावर वाटे, म्हणूनच त्यांच्या मिशीचे कौतुक करताना शाहीर यमाजी म्हणतो,

‘दंडा एवढी मिशी बाजी पाच्छाई महाजर’ .बाजी हे मोसे खोर्‍यातील एक तोलदार आसामी होते.अवघ्या मावळात त्यांचे विलक्षण वजन

व धाक होता. बाजी सारखा शूर सज्जन दिलदार व परोपकारी माणूस अवघ्या मोसे खोऱ्यात दुसरा नव्हता. संकटात सापडलेल्या

लोकांच्या मदतीसाठी ते सदैव तत्पर असत.एखाद्या देशमुखाचा खून होऊन त्याची बायकामुले देशोधडीस लागल्यास बाजीच त्यांना आश्रय देत.

मावळातील लोकांच्या कर्जाबद्दल किंवा चांगल्या वागणुकीबद्दल जामीन राहून ते सदैव त्यांच्या उपयोगी पडत. अवघ्या मावळातील


लोकांच्या भांडण तंट्यांचे निवाडे बाजी पासलकरच करीत. बाजींच्या दारी येणारा याचक कधीही विन्मुख परतत नसे. असंख्य निराधारांचे

बाजी हेच आश्रयदाते होते, तर अनेक गरजवंतांचे ते देव होते! साऱ्या मोसे खोर्‍याला बाजी हे एखाद्या  पुणेपुरातन परोपकारी वटवृक्षासारखे

भासत आणि खरोखरच बाजीरुपी या पुरातन परोपकारी वटवृक्षाच्या छायेत अवघे मोसे खोरे कसे सुखा-समाधानाने नांदत होते!बाजींच्या

देहयष्टीप्रमाणे त्यांचा कुटुंबकबिला ही भारदस्त होता.त्यांना दोन मुली एक कान्होजी जेधे यांना तर दुसरी मोसे खोर्यातील मरकतरावांना दिली होती.

त्यांची पुत्राची उणीव कान्होजी जेधेंनी भरून काढली होती.

बाजींना गुणी लोकांचे फार कौतुक वाटे .अनेक गुणी लोकांना त्यांनी आपल्या पदरी आश्रय दिला होता.

बाजी जसे सज्जन व दिलदार होते तसेच ते अतिशय शूर व बेडर होते .शत्रूवर बेफान होऊन तुटून पडण्याची त्यांची वृत्ती होती .

हाती सापडलेल्या शत्रूची ते कधीही गय करीत नसत .प्रत्यक्ष जावयाची देखील त्यांनी गय केली नाही .बाजींच्या बागेतील यशवंती घोडी

यांच्या बागेतून पळवून नेऊन विजापूरच्या बादशहाला नजर करण्याता घाट बाजींचे धाकटे जावई मरकत राव व त्याचा मित्र सोनू दळवी यांनी घातला .

एक दिवस बाजी जेवणात गुंतले असल्याचे पाहून या उभयतांनी पाचशे लोकांच्या जमावानिशी बाजींच्या वाड्यावर छापा घातला.

खासा जावई वाड्यावर चालून आल्याचे पाहून बाजी भरलेल्या ताटावरून उठले व प्रत्यक्ष जावयांशी दोन हात करून त्यांनी त्यास आस्मान दाखविले .

मरकतरावाच्या पाठोपाठ सोनू दळव्यालाही त्यांनी यमसदनी धाडले.


शहाजीराजे भोसले shahaji raje bhosale व बाजी यांचा पुरातन घरोबा होता. शहाजीराजांच्या राजकारणास बाजींचा नेहमीच पाठींबा असे.

राजकारणात मुरार जगदेव रावांच्या स्वारीमुळे उध्वस्त झालेले पुणे नव्याने वसविण्याचा व प्रांतातील पुंड पाळेगार व शिरजोर वतनदार

मंडळींना वठणीवर आणून त्यांना वश करवून घेण्याच्याकामी शिवरायांना बाजींची मोलाची मदत झाली होती. बाल शिवाजींच्या वतीने पुणे

प्रांताचा कारभार पाहणाऱ्या दादोजी कोंडदेवांच्या अनेक निकाल पत्रावर बाजींची साक्ष आहे. शिवरायांच्या आश्वासनाने समाधान पावलेले

बाजी बेलसर येथील फत्तेखानाच्या छावणीवर चालून गेले,. संतापलेल्या फत्तेखानाने पुरंदरवर चालून जाऊन अविरत मारा चालवला.

शिवरायांचे सहकारी विजेच्या लोळाप्रमाणे शत्रू सैन्यावर तुटून पडले .

गोदाजी जगतापांनी भाला मारून मुसे खानास जखमी केल्यानंतर खांद्यावर तलवारीचा जोरकस वार करून त्यांचे शरीर खांद्यापासून


मध्यापर्यंत चिरत नेले .गोदाजींच्या या प्राणघातक वाऱामुळे मुसेखान जागच्या जागीच गतप्राण झाला .त्यामुळे विजापुरी फौज वाट दिसत

तिकडे पळत सुटली. विजयोन्मादाने बेहोष झालेल्या मराठी फौजेने विजापुरी फौजेचा पाठलाग सुरू केला. यात ६० वर्षाचे बाजीही पाठलागात सामील झाले होते.

सासवडजवळ पुन्हा एकदा युद्धाची चकमक उडाली. आणि अचानक नियतीने घात केला. शत्रु सैनिकाचा एक घाव बाजींच्या वर्मी बसला व ते

धरणीवर कोसळले. लढताना एक घाव बाजी पासलकरांच्या पाठीमागून त्यांच्या समशेरधारी उजव्या हातावर झाला. वेदनेने कळवळलेले बाजी

त्या वार करणाऱ्याचा प्रतिकार करण्यासाठी त्याही परिस्थितीत वळले आणि तोच क्षण साधत गनिमाची तलवार त्यांच्या छातीवर उतरली.

पासष्ट वर्षांचे बाजी पडले. आपले काम फत्ते झाले हे लक्षात येताच फत्तेखान आपल्या सैन्यासह परत मागे वळून पळून गेला.

कावजी मल्हारला हे समजताच तो तीरासारखा सासवडला धावला. आपल्या धन्याचे जखमी शरीर पाठीवर लादून वाहून नेणारी बाजींची

यशवंती घोडी आणि कावजी मल्हार यांच्या दु:खाची जात एकच होती. पुरंदर किल्ला येईतो बाजींनी शरीरातली धुगधुगी फक्त आपल्या


शिवरायांना पहाण्यासाठी व दोन अखेरचे शब्द बोलण्यासाठी शिल्लक ठेवली होती. गडाच्या पायथ्यापासून बाजींची पालखी वर आली

आणि वाट चुकलेले कोकरू आपल्या आईला गोमातेला बघताच धावत सुटते तसे राजे पालखीकडे धावले.छत्रपती शिवाजी राजांच्या

मांडीवर डोके ठेवून बाजी पासलकरांनी प्राण सोडला.. त्यादिवशी २४ मे १६४९ ही तारीख होती.

मराठ्यांनी स्वराज्याचा पहिला रणसंग्राम जिंकला, पण बाजी पासलकर यांच्यासारखा वीर रणी धारातीर्थी पडले! स्वराज्याच्या यज्ञवेदीत

बाजींच्या रूपाने पहिली समिधा पडली! स्वराज्याच्या आरंभीच्या काळात छत्रपती शिवरायांच्या वर छत्र छाया धरणारा बाजीरुपी विशाल

वटवृक्ष नियतीच्या क्रूर तडाख्याने आकस्मितरीत्या उन्मळून पडला! बाजींच्या मृत्यूचे शिवरायांना अतीव दुःख झाले !

 

अशा या “वीर बाजी पासलकर स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन आणि आमचा मानाचा मुजरा “


लेखन 
डाॅ. सुवर्णा नाईक निंबाळकर 
इतिहास अभ्यासक 


संदर्भ 
शिवछत्रपतीचे शिलेदार- लेखक सचिन पोवार

Advertisement

More Stories
dattaji shinde
dattaji shinde – मराठ्यांच्या पालखीचा गोंडा दत्ताजी शिंदे
error: Content is protected !!
%d bloggers like this: