Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

NewsPostbox Marathi

Shahaji raje son shivaji महाराष्ट्रात आता ” छत्रपती शासन “

1 Mins read

Shahaji raje son shivaji – महाराष्ट्रात आता ” छत्रपती शासन “

 

Shahaji raje son shivaji – शिवस्वराज्य दिन

मुंबई :

12/6/2021

गुणरत्न सदावर्ते या पेशाने वकील असणाऱ्या व्यक्तीने आघाडी सरकारचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या शासकीय कार्यालयांनी छत्रपती

शिवाजी महाराज यांचा ६ जून हा राज्याभिषेक दिवस ” शिवस्वराज्य दिन ” म्हणून साजरा करताना भगवा झेंडा लावण्यात यावा,

या निर्णयाला आव्हान देत प्रसिद्धी मिळविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. खरंतर समाजातल्या कोणत्याही जाती धर्माच्या पंथाच्या लोकांनी

भगवा ध्वजाला कधीच विरोध केला नाही. मुसलमान समाजाने सुद्धा भगवा ध्वजाचा आदरच केला आहे आणि आजही करतो आहे .

“भगवा ध्वज हे खरेतर कोणत्याही एका धर्माचे अथवा जातीचे प्रतीक अथवा प्रतीकात्मक निशाण नसून ते ” त्यागाचे ” प्रतीक आहे. भगवा रंग हा त्याग दर्शवितो .

भारतीय समाजासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या प्रत्येकाचे स्मरण रहावे म्हणून भगवा रंग भारतीय तिरंग्या मध्ये घेण्यात आला आहे.

गुणरत्न सदावर्ते सारख्या प्रसिद्धी लोलुप महाभागांनी भगव्या ध्वजाबद्दल माहिती घ्यावी आणि नंतर तोंड उघडावे,

याच भगव्या ध्वजाला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे निशाण म्हणून स्वीकारले, त्यांनी जातीचे प्रतीक म्हणून किंवा धर्माचे निशाण म्हणून स्वीकारले नाही.

याच भगव्या ध्वजाच्या खाली सर्व बारा बलुते, सर्व जाती धर्माचे, पंथाचे जनतेला शिवाजी महाराजांनी एका छताखाली आणले आणि

त्यांना स्वराज्य मिळवून दिले. हाच भगवा ध्वज होता म्हणून तुम्ही तिरंगा फडकवू शकत आहात, याच भगव्या ध्वजाखाली पानिपतात

अब्दालीला सातव आस्मान दाखवलं तेव्हा पुन्हा कधी हिंदुस्तानाकडे वाकड्या नजरेने सुद्धा पाहिलं नाही त्याने.

याच भगव्या झेंड्याखाली इब्राहिम खान गार्दी त्याच्या तोफा अब्दाली वर आग ओकत होत्या.

भारताचा इतिहास आधी समजून घ्यावा आणि मग आपले तोंड इतर रंगात बुडवून घ्यावे. समाज समाजात फूट पाडण्याचे षडयंत्र हे गुणरत्न सदावर्ते

हा कोणाच्या सांगण्यावरून करत आहे हे आता सर्व जगाला माहीत झाले आहे. त्यामुळे अशा भगव्या ध्वजाला विरोध करणे असे स्टेटमेंट

याला हि जनता महत्व देत नाही, केवळ आपली बुद्धी कोणाकडे गहाण ठेवून, ब्रेड आणि बटर साठी कायद्याची भाषा आणि त्याची धाक दाखवून श्रेष्ठत्व मिळत नाही,

इथल्या जनतेचे रयतेचे प्रश्न समजत नसतील तर इथली रयत तरी कायदा का समजून घेईल. कायदा समाजावर अन्याय करण्यासाठी नसतो न्याय मिळवून देण्यासाठी सुद्धा असतो.

न्याय कसा मिळवता येईल ?  कोणत्या मार्गाने मिळवता येईल ?  काय आणि कसे करावे लागेल ? या बद्दल समाजाला दिशा

दाखविण्याचे सोडून अन्याय ग्रस्त भावना आणखी उद्युक्त होईल , समाजाच्या भावना आणखी भडकतील, समाजाचे नेते कसे वाईट आहेत ,

कसे कुठे चुकत आहेत अशी राजकीय संबोधने , वल्गना करत , एखाद्या समाजाला डिवचने कितपत योग्य आहे ?कोणत्याही समाजावर अन्याय न होता

न्याय कसा मिळवून देता येतो का अशा प्रकारची वकिली अपेक्षित असते, आपण करत आहात तशी वकिली कोणत्याही समाजाने पाहिली नाही,

म्हणून तुम्हाला कोणत्याही समाजाचा पाठिंबा नाही हे सुद्धा तुमच्या लक्षात आले असेल, समाजात दरी वाढविणाऱ्याला महाराष्ट्रातील सुज्ञ जनता भीक घालत नाही.

इतकाच न्याय देण्याची खुमखुमी आपल्याला आहे तर ज्या खाजगी कंपन्या सरकारी नोकरीतील प्रश्न, पगार, न्याय, बडतर्फी,

इतर विधी प्रकरणामध्ये स्थानिक लोकांवर अन्याय होतो, तिथे जावून कामगार प्रश्नांनावर लढा देण्याची तयारी ठेव आहे का हिंमत ?

कामगारांच्या न्याय हक्कांसाठी उभारतोस का लढा ? यावर काही बोलणार नाहीस हे आम्हा सर्वाना माहीत आहे.

आम्ही कामगारांच्या प्रश्नांवर स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून त्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारे वकील याची देही याची डोळा पाहिलेत.

तू करत आहेस ती वकिली की आणखी काही ? हे जनता चांगलेच समजते आहे.

आज गुणरत्न सदावर्ते तू ठिणगी फक्त शासकीय कार्यालयांच्या संदर्भात उठवलीस पण या महाराष्ट्राचा सुशिक्षित तरुण याच

भगव्या ध्वजासाठी नेहमीच एकत्र आला आहे. यापुढे छत्रपती शिवाजी महाराज यांचा ६ जून हा राज्यभिषेक दिवस यापुढे दरवर्षी

राज्यातील सर्व विद्यापीठे व सलग्न महाविद्यालयांमध्ये ‘शिवस्वराज्य दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे.

शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यवर आधारीत विविध प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करून हा दिवस साजरा करण्यात येणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा ६ जून १६७४ रोजी राज्याभिषेक झाला. शिवराज्यभिषेक हा स्वराज्याची, स्वातंत्र्याची,

सार्वभौमत्वाची प्रेरणा देणार दिवस म्हणून मानला जातो. या पुढे राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे,

स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे, महाविद्यालये, अभियांत्रिकी महाविद्यालये, तंत्रनिके तने व तत्सम शैक्षणिक संस्थांमध्ये

दर वर्षी ६ जून हा शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याच्या सूचना उच्च व तंत्र शिक्षण विभागाने दिल्या आहेत.

या संदर्भात उच्च व तंत्र शिक्षण विभागाने गुरुवारी शासन आदेश काढून ” शिवस्वराज्यदिन ” कशा प्रकार साजरा करावा, याची माहिती दिली आहे.

विद्यीपीठे, महाविद्यालयांमधील सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी यांनी सकाळी ११ वाजता शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस किं वा पुतळ्यास अभिवादन करावे.

त्याचबरोबर शिवचरित्रपर व्याख्याने, पथनाट्ये, गडकिल्लयांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन, निबंध, वत्कृत्व, गीत गायन, पोवाडा गायन,

क्रीडा व इतर स्पर्धांचे व उपक्रमांचे आयोजन करून हा दिवस साजरा करण्यास सांगण्यात आले आहे.

राज्यातील सर्व ग्रामपंचायती, तालुका पंचायती व जिल्हा परिषदांच्या कार्यालयांमध्ये ६ जून हा दिवस शिवस्वराज्य दिन

म्हणून साजरा करण्याचा निर्णयही ग्रामविकास विभागाने या आधी घेतला आहे. ज्या ज्या वेळी गुणरत्न सदावर्ते सारखी प्रवृत्ती कोणत्याही

समाजाला वेठीस धरून त्यांच्यावर अन्याय करत असल्याचा आभास जरी निर्माण झाला तर हा संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांच्या

विचाराखाली चालणार वागणारा समाज आणि शासन. छत्रपती शासन काय असते आणि कसे असते हे दाखवायला मागे पुढे पाहणार नाही.

रोक सके तो रोक लो.

 

 

– वैभव जगताप

Leave a Reply

error: Content is protected !!