Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

HISTORYINDIAMAHARASHTRA

shahu maharaj – छत्रपती थोरले शाहू महाराज

1 Mins read

shahu maharaj – छत्रपती थोरले शाहू महाराज

 

 

shahu maharaj – जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन आणि मानाचा मुजरा

 

 


१८ मे १६ ८२ रोजी ऊत्तर कोकणात रायगड किल्ल्या जवळ गंगावली मानगाव येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी येसूबाई राणीसाहेब यांच्या

पोटी छत्रपती शाहू राजांचा जन्म झाला.शाहूचे जन्म नाव शिवाजी होते.” शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र म्हणून जन्माला आलेले संभाजी राजे यांनी

अवघ्या नऊ वर्षाच्या अल्पशा कारकिर्दीत औरंगजेबाशी लढत देऊन त्यांनी हौतात्म्य पत्करले.

स्वराज्य जगवायचे असेल तर मृत्यूला कवेत घ्यावे लागते हे छत्रपती संभाजीराजांनी जगाला दाखवून दिले .

छत्रपती संभाजी राजांच्या मृत्यूनंतर आपल्या मातोश्री येसूबाई राणीसाहेब यांच्याबरोबर सात वर्षाच्या शाहूराजांना सुद्धा औरंगजेबाची

तब्बल बारा वर्षे कैद स्वीकारावी लागली. त्यांची सुटका झाली तेव्हा shahu maharaj छ. शाहू महाराजांनी लयाला जाणाऱ्या मराठी

साम्राज्याला वाचवण्यासाठी चैतन्य निर्माण करून साऱ्या हिंदुस्तानभर मराठ्यांचा दरारा निर्माण केला.


मोगलांच्या कैदेतून सुटका होणे शाहू महाराजांच्या दृष्टीने एक क्रांतीचे पाऊल ठरले. या संधीचा फायदा घेऊन त्यांनी उत्साही कर्तबगार

व्यक्तींना प्रोत्साहित करून राज्य वृद्धीसाठी त्यांचा उपयोग करून घेतला. महाराजांच्या या उत्स्फूर्त प्रतिसादामुळेच स्वराज्याचे साम्राज्य

घडविण्याची किमया त्यांनी करून दाखवली. स्वतःच्या हिमतीवर व पराक्रमाने छत्रपती पद मिळवून ते स्वराज्याचे महाराज झाले.

या संधीचा फायदा घेऊन स्वराज्याला त्यांनी समता बंधुत्व यांचा दिव्य आदर्श निर्माण करून दिला. shahu maharaj शाहूराजांच्या सौम्य

आणि शांत स्वभावाचे प्रत्यंतर त्यांच्या जीवनात सातत्याने येत होते शत्रूला सुद्धा घात करण्याची इच्छा होऊ नये असा हा राजा अजात

शत्रू म्हणून प्रसिद्ध होता .वडिलांचे छत्र बालपणीच गेले होते व आईच्या संस्कार करण्याच्या दिवसातच आईचे जीवन कैदेत गेले.

वयाच्या सातव्या वर्षापासून शाहूराजे मोगली संस्कृतीत वाढले.


जन्मापासूनच हे मोंगल बादशहा औरंगजेबाच्या कबजामध्ये होते. औरंगजेबाचे अतिशय लाडके असले तरी, त्यांच्यामध्ये कोणतेही

शौर्यगुण येऊ नयेत अशी काळजी बादशहाने घेतली होती.शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराज यांचा मृत्यू झाल्यानंतर महाराणी

ताराबाई यांनी राज्यकारभार करायला सुरुवात केली.

ताराराणी यांना शह बसावा म्हणून औरंगजेबाने छत्रपती शााहू राजांना सोडून दिले. ताराराणींच्या सैन्याशी छत्रपती शााहूंच्या सैनिकांनी

केलेल्या लढाईनंतर झालेल्या तहान्वये राज्याची वाटणी झाली व थोरल्या छत्रपती शाहूंना सातार्‍याला राज्य स्थापन करण्याची परवानगी मिळाली.

सातार्‍याला थोरल्या छत्रपती शाहूंनी इ.स. १७०७ पासून ते मृत्यू पर्यंत म्हणजे १५ डिसेंबर इ.स.१७४९ पर्यंत राज्य चालविले.

सातार्‍याची राज्य गादी ही थोरली गादी म्हणून ओळखली जाई. मराठा साम्राज्याचे पंतप्रधान पेशवे यांना या गादीकडूनच कारभाराची वस्त्रे घ्यावी लागत.

थोरले छत्रपती शाहू युद्ध करीत नसले तरी त्यांच्या काळात मराठ्यांनी बाळाजी विश्वनाथ ते राघोबादादा आणि चिमाजी अप्पा यांनी

उत्तर हिंदुस्थानचा अटकेपर्यंत प्रदेश जिंकून दाखविला. संभाजीराजांच्या हाल-हाल करून झालेल्या मृत्यूनंतर येसूबाई राणीसाहेब व

छत्रपती शाहू राजे यांना शापित आयुष्य जगून स्वराज्यासाठी स्वतःची आहुती दिली. छत्रपती शााहूराजे दुर्बल नव्हते ते छत्रपती

संंभाजी राजांचे पुत्र होते. एक निर्मोही उदात्त व सर्वांवर उदार अंतकरणाने प्रेम करणारा हा राजा होता.


छत्रपती शाहू महाराज shahu maharaj म्हणजे सर्वांना छाया देणारे झाड होते .म्हणूनच महाराष्ट्राची भगवी पताका स्वराज्यात फडफडत राहिली.

छत्रपती शााहू राजे छत्रपती झाले त्यावेळी त्यांच्याकडे स्वतःचे राज्य नव्हते पुरेसे सैन्य नव्हते .अशा प्रतिकूल परिस्थितीत छत्रपती शाहूराजांनी

परसोजी भोसले ,धनाजी जाधवराव कानोजी आंग्रे ,खंडेराव दाभाडे ,बाजीराव पेशवे ,पिलाजी जाधवराव ,येसाजी गायकवाड ,आनंदराव पवार,

राणोजी शिंदे ,मल्हाराव होळकर असे मातब्बर सेनानी हाताशी धरून मराठा स्वराज्याचे रूपांतर साम्राज्यात केले.

शाहूमहाराजांनी औरंगजेबाच्या सहवासात १७ वर्षं काढली होती. औरंगजेबाच्या चरित्राचा त्यांनी जवळून अभ्यास केला होता.

मुघलांची वृत्ती त्यांनी पूर्णपणे जाणली होती. कोल्हापूरच्या गादीशी तंटे त्यांनी कधीही विकोपास नेले नाहीत. किंबहुना ते

सामंजस्यानेच मिटविण्याचे प्रयत्न केले. त्यामुळेच त्यांना पुण्यश्लोक हे विशेषण लावले जाते. थोरले छत्रपती शाहू महाराजांचा कालखंड

अनेक गुंतागुंतीच्या घटनांनी भरलेला आहे. कारण शाहू महाराजांच्या कर्तृत्वामुळे मराठे थेट दिल्लीच्या पुढेही पोहोचले.



छत्रपती शाहू महाराजांच्या या उत्स्फूर्त प्रतिसादामुळेच स्वराज्याचे साम्राज्य घडविण्याची किमया त्यांनी करून दाखवली. स्वतःच्या

हिमतीवर व पराक्रमाने छत्रपतिपद मिळवून ते स्वराज्याचे महाराज झाले. या संधीचा फायदा घेऊन स्वराज्याला त्यांनी समता, बंधुत्व यांचा दिव्य आदर्श निर्माण करून दिला.

शाहूमहाराजांच्या सौम्य आणि शांत स्वभावाचे प्रत्यंतर त्यांच्या जीवनात सातत्याने येत होते. शत्रूलासुद्धा घात करण्याची इच्छा होऊ नये

असा हा राजा अजातशत्रू म्हणून प्रसिद्ध होता. वडिलांचे छत्र बालपणीच गेले होते व आईच्या संस्कार करण्याच्या दिवसातच आईचे जीवन कैदेत गेले.

वयाच्या सातव्या वर्षापासून शाहूराजे मुघली संस्कृतीत वाढले. संभाजीराजांच्या हाल-हाल करून झालेल्या मृत्यूनंतर येसूबाई व शाहूराजे यांना

शापित आयुष्य जगून स्वराज्यासाठी स्वतःची आहुती दिली. शाहूराजे दुर्बल नव्हते. ते संभाजीराजांचे पुत्र होते. एक निर्मोही,

उदात्त व सर्वांवर उदार अंतःकरणाने प्रेम करणारा हा राजा होता. शाहू महाराज म्हणजे सर्वांना छाया देणारे झाड होते.

म्हणूनच महाराष्ट्राची भगवी पताका स्वराज्यात फडफडत राहिली.


दक्षिणेपासून तंजावर पर्यंत तर ओरिसा बंगाल पासून गुजरात पर्यंत मराठा साम्राज्य पसरले .आपल्या कारकिर्दीत त्यांनी

आपल्या मातोश्री महाराणी येसूबाई राणीसाहेब यांची २९ वर्षा नंतर मोगल कैदेतून सुटका करवली. छत्रपती शााहू छत्रपतींनी

आपल्या पूर्ण यशाचे श्रेय छत्रपती शिवरायांना देताना म्हटले “थोरले छत्रपती शिवाजी महाराज यांचा आशीर्वाद व त्यांचे पायाचा

प्रताप त्यांनी इतके रक्षण करून हे दिवस मला दाखवले”

आपल्या ४२ वर्षाच्या कारकिर्दीत स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर घडवून आणले .ही छत्रपती शाहू महाराजांची महान कामगिरी होय.

कुशल प्रशासक व ऊदात्तता हे शाहू महाराजांचे गुण होते.

अशा या अजातशत्रू पुण्यश्लोक प्रतापशाली shahu maharaj छत्रपती थोरले शाहू यांना जन्मदिनानिमीत्त कोटी कोटी प्रणाम 


लेखन
डाॅ.सुवर्णा नाईक निंबाळकर
इतिहास अभ्यासक


Leave a Reply

error: Content is protected !!