Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

INDIAMAHARASHTRANewsPostbox Marathi

sharad pawar autobiography – शरद पवारांचे गुण.. कुणातच नाहीत

1 Mins read

Sharad Pawar autobiography – शरद पवारांचे गुण.. कुणातच नाहीत

 

 

sharad pawar autobiography – शरद पवारांचे गुण.. कुणातच नाहीत मनात शत्रुत्त्व- शब्दांत मैत्री,

स्थितीनुसार बदलती भूमिका टोकाची टीका नाही, अपशब्द नाहीत, आर्थिक कणा कापूनच वार !

 

 

30/8/2021,

महाराष्ट्रातील राजकारण्यांची उंची दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. बेफाट वक्तव्य, बिभित्स वागणं आणि बेलगाम जगणं या अवगुणांमुळे जवळजवळ प्रत्येकाने

कधी न कधी आपटी खाल्ली आहे. काहींना आपली कुटुंब सांभाळता न आल्याने यशाच्या पायऱ्याच चढता आल्या नाहीत. त्यामुळे अलीकडच्या काळात राजकारण्यांच्या

बाबतीत जे घडू नये ते घडू लागले आहे. कुणाची सीडी उघड होते, कुणाची जीभ घसरते, कुणी लाच घेताना पकडला जातो, कुणी स्वत: गुंडासारखा दुसऱ्यांना मारतो,

कुणी भर सभेत शिव्या घालून स्वत:ची संस्कृती दाखवतो. अशा राजकारण्यांचे कार्याचे कर्तृत्त्व तर नसतेच, पण त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आदरही राहत नाही.

महाराष्ट्रातील राजकारण्यांच्या या गटारीत एकच ‘सुसंस्कृत चेहरा’ राहिला आहे आणि तो म्हणजे शरद पवारांचा आहे. शरद पवार हे शंभर टक्के राजकारणी आहेत.

त्यांच्या प्रत्येक शत्रुला त्यांनी संपविले किंवा लाचार केले. पण हे करताना जनतेला अपेक्षित सुसंस्कृत वागणे त्यांनी कधीही सोडले नाही. यामुळेच ते राजकारणात प्रदीर्घकाळ

उच्च स्थानावर राहिले आणि त्यांचा हा गुण आताच्या कोणत्याच पक्षातील राजकारण्यात नसल्याने हे सर्व नेते वीस-पंचवीस वर्षांचे बुडबुडे ठरणार आहेत.

 

शरद पवारांचा राजकीय प्रवास पाहिला तर त्यांनी जाहीरपणे कधीहीकुणाला टोकाचे दुखविले नाही, त्यांच्या मनात एखाद्याबद्दल शत्रुत्व असले तरी त्या व्यक्तीशी बोलताना

ओठावर मैत्रीचेच शब्द आले. शरद पवारांनी कधीही काळ्या दगडावर पांढरी रेघ अशी न बदलणारी भूमिका घेतली नाही. ध्येय गाठण्यासाठी ज्या स्थितीत जशी भूमिका घेणे

आवश्‍यक आहे तशी घेत राहिले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी शत्रुवर उघड वार कधीही केला नाही. अपशब्द बोलणे, शत्रुच्या कुटुंबाबद्दल वक्तव्य करणे, शत्रुला काळे फासणे,

दगडफेक करणे, अटक करणे असा प्रकार त्यांच्याकडून झाला नाही. याचा अर्थ ते शत्रुला माफ करतात असेही नाही. शत्रू ताकदवान नसतो तेव्हा अनुल्लेखाने त्याला संपवतात.

शत्रू ताकदवान असतो तेव्हा त्याची आर्थिक रसद कापून ते शत्रुला गलितगात्र करतात. ( sharad pawar autobiography )

 

सोनिया गांधी यांना ‘परदेशी’ ठरवून शरद पवारांनी काँग्रेस सोडली आणि स्वत:चा पक्ष काढला. पण त्यांना अपेक्षित यश आले नाही. सोनिया गांधी अध्यक्षपदावर कायम

राहिल्या तेव्हा शरद पवारांनी परदेशी व्यक्ती हा मुद्दा सोडला आणि शांतपणे अनेक राज्यांत काँग्रेसशी युती केली. नरेंद्र मोदी यांनी निवडणूक प्रचारात बारामतीत येऊन

भरसभेत ‘चाचा-भतिजा हटाव’ अशा गर्जना केल्या, पण निवडणूक संपून नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर शरद पवार महाराष्ट्राचे प्रश्‍न घेऊन नरेंद्र मोदींना भेटतात आणि

नरेंद्र मोदीही त्यांना सन्मान देतात. याचे एकच कारण म्हणजे टीका करताना शरद पवारांचा कधीही तोल गेला नाही. त्यांनी कधीही टोक गाठले नाही. ते कायम एक पायरी खाली थांबले.

आपल्यासारखी सामान्य माणसं मयतापर्यंत दुश्‍मनी नेतात. पण शरद पवार परिस्थितीनुसार जे त्यावेळी योग्य असते ते करतात. सध्या शरद पवार हे सतत संजय राऊतना भेटत असतात.

संजय राऊत रुग्णालयात दाखल झाले तेव्हा शरद पवार स्वत: त्यांना रुग्णालयातही भेटायला गेले. सर्वांना या भेटीचे आश्‍चर्य वाटले, पण हेच तर राजकारण आहे. अशी अनेक उदाहरणे आहेत.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी शरद पवारांविरोधात दंड ठोकले होते. ते फडणवीस सरकारमध्ये दाखल झाले होते. पण त्याच राजू शेट्टींना बोलावून शरद पवारांनी

त्यांना ‘सहयोगी पक्ष’ करून टाकले. ( sharad pawar autobiography )

 

अगदी अजित पवार आणि त्यांचे पुत्र पार्थ पवार यांच्याही बाबतीत हेच घडले. पार्थ पवार हे स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करू लागले तेव्हा शरद पवार यांनी ‘पार्थ अपरिपक्व’ आहे,

इतकेच म्हणून पार्थ यांचे राजकारण बंद पाडले. त्याचवेळी रोहित पवारांच्या पाठीवर हात ठेवून पार्थला इशाराही दिला. अजित पवार आणि शरद पवार यांचे संबंध सलोख्याचे नाहीत

हे तर उघड सत्य आहे. पण आजवर अजित पवार यांना शरद पवारांनी जाहीरपणे साधा टोमणाही मारला नाही. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी रात्रीत शपथ घेतली तेव्हा

दुसऱ्या दिवशीही शरद पवारांनी अजित पवारांच्या विरोधात एक शब्द उच्चारला नाही. किंबहुना त्या दिवसापासून आजपर्यंत शरद पवारांनी जाहीरपणे याबाबतीत टीकाच केली नाही.

शरद पवारांनी काय केले? त्यांनी अजित पवारांसह गेलेल्या राष्ट्रवादीच्या तीन आमदारांना राज्यपालांपुढे काही तासांत उभे केले आणि आमदारांनी सांगितले की, आम्हाला या

कारणासाठी बोलावले होते हे आम्हाला माहीतच नव्हते. त्यानंतर सपासप वातावरण बदलले आणि एका रात्रीचे सरकार कोसळले. हा इतका धक्कादायक प्रकार झाल्यावरही

अजित पवारांना दूर न लोटता नव्या सरकारमध्ये त्यांना उपमुख्यमंत्रिपद दिले. हे शरद पवारच करू शकतात. इतर कुणाला हे जमणार नाही.

 

Also Visit : https://www.postboxlive.com

 

छगन भुजबळांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप होऊन त्यांना कैदेत धाडले तेव्हाचे प्रसंग आठवा. छगन भुजबळांसाठी मार्चे काढणे, पोस्टर लावणे, त्यांच्यासाठी उत्तम वकील देणे

असे काहीही राष्ट्रवादीने केले नाही. कारण त्या काळात भुजबळांच्या विरोधात जनता होती. पण जाहीर काही केले नसले तरी शरद पवार सतत भुजबळांच्या संपर्कात राहिले.

त्यांनी सुप्रिया सुळे यांना भुजबळांना भेटायला पाठवले आणि भुजबळ जामिनावर सुटल्यानंतर आता त्यांना मंत्रिमंडळात स्थानही दिले. त्यामुळे अटकेत एकटे राहिलेले

भुजबळ आज प्रत्येक भाषणात शरद पवारांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. 2019 साली जुलै महिन्यांत राष्ट्रवादीचे एकेक दिग्गज नेते शरद पवारांना सोडून गेले.

गणेश नाईक, मधुकर पिचड, विजयसिंह मोहिते पाटील, सचिन अहीर अशी फुटीर नेत्यांची माळच निर्माण झाली होती. त्यावेळीही शरद पवारांनी या नेत्यांवर टीका केली नाही.

या नेत्यांच्या घरावर कार्यकर्ते पाठवले नाहीत, त्यांच्या पोस्टरना काळे फासले नाही. शरद पवारांनी त्यांचा उल्लेखच केला नाही. त्यांना महत्त्वच दिले नाही. अनुल्लेखाने त्यांना जेरीस आणले.

मधुकर पिचड तर यामुळे इतके अस्वस्थ झाले की, स्वत:च पक्ष का सोडला ते सांगत फिरू लागले. ( sharad pawar autobiography )

 

ज्यांनी शरद पवारांना आव्हान दिले त्यांच्या विरुद्धही शरद पवार बोलले नाहीत. शेळपट, बेडूक, गांडूळ असे शब्द वापरायचे असे शरद पवारांनी कधीही केले नाही.

त्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने या व्यक्तींची आर्थिक रसद कापून टाकली आणि हे ताकदवान गड पाडले. यामुळेच शरद पवारांचा दरारा आहे. त्यांच्या विरोधात बोलण्यास भलेभले कचरतात.

राजकीय क्षेत्रात टिकायचे तर शरद पवारांसारखे असावे लागते. हृदयाने विचार करणारे आणि गल्लीबोळातील राजकारण करणारे म्हणजे पावसाळी छत्र्या असतात.

काही काळाने त्यांचे नामोनिषाण राहत नाही. राजकारणात शरद पवारांसारखे राजमार्गाने जायला हवे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस

आदींनी याचा अभ्यास केला पाहिजे. नाहीतर भविष्यात महाराष्ट्राला बुजगावणी नेते सहन करावे लागतील आणि राज्याचा ऱ्हास होईल.

 

 

जयश्री खाडिलकर-पांडेकृत

 

Leave a Reply

error: Content is protected !!