Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

HISTORYINDIAMAHARASHTRANewsPostbox Marathi

shivaji maharaj father – शहाजीराजे भोसले यांना कैद

1 Mins read

Shivaji Maharaj Father –  शहाजीराजे भोसले यांना कैद

 

shivaji maharaj father – शहाजीराजे भोसले

२५ जुलै १६४८ मध्ये विजापूरच्या आदिलशहाच्या आज्ञेने मुस्तफाखान याने किल्ले जिंजीजवळ

shivaji maharaj father शहाजीराजांना कैद केले. शहाजीराजांना कैद करून त्यांच्या हातापायात बेड्या ठोकल्या.

शहाजीराजांची रवानगी कैदी म्हणून विजापुरास झाली. shivaji maharaj father शहाजीराजे जिंजी जवळ असताना हजारो सैनिक

शहाजीराजांच्या फौजेच्या रोखाने निघाले. खासा मुधोळकर बाजी घोरपडे, खंडोजी, अंबाजी ,भानाजी ,

हे त्यांचे बंधू ,याकुतखान , दिलावरखान, मसूद खान ,वेदाजी भास्कर,राघो मंबाजी, बाळाजी हैबतराव,

मंबाजी पवार, मंबाजी भोसले असे कितीतरी जण राजांवर धावून गेले .मुस्तफाखान मागे राहून सारे

कारस्थान घडवून आणत होता.

शहाजीराजांची फौज झोपेतून जागी होऊन तलवार, घोडा करीत आरडाओरडा करू लागली.

स्वतः शहाजीराजेही या सगळ्या कोलाहलामुळे खडबडून जागे झाले. आता त्यांना आपण त्या

खबरगीरावर विश्वास ठेवला नाही याचा शहाजीराजांना पश्चाताप होऊ लागला.पण लागलीच

भानावर येत शहाजीराजांनी ढाल तलवार उचलली आणि घोड्यावर मांड ठोकली. शहाजीराजांच्या

पदरी असलेला खंडोजी पाटीलही तलवार घेऊन रणांगणात उतरला. साक्षात खंडोबाच संचारला होता

जणू त्याच्या अंगात! इतक्या विलक्षण वेगानी हा बहाद्दर तलवार घुमवत होता की, वेदनेची जाणीव व्हायच्या

आतच शत्रूचे मस्तक धडावेगळे होत होते…….पण

इतक्यात बाजी घोरपडे शहाजीराजांच्याच सामने खडा ठाकला.शहाजीराजे क्षणभर चमकलेच.

हा तर रक्ताचा भाऊबंद अन आपल्याशीच लढायला उठला आहे ?वास्तविक ह्या इतक्या प्राणांतिक

संकटात ह्याने आपली मदत करावयाची तर ती सोडून हा……. पण एक क्षणभरच हे विचार

शहाजीराजांच्या मनात तरळले.अन दुसऱ्याच क्षणी त्यांची भवानी तलवार बिजली सारखी बाजीवर कोसळली.

शहाजीराजांच्या मदतीला त्यांचा पुतण्या त्र्यंबकजी शरीफजी भोसले, योगाजी भांडकर , मेघाजी ठाकुर,दसोजी

गवळी असे अनेक लढवय्ये धावून आले.

इकडे नभांगणात शुद्ध पौर्णिमा संपून वद्य प्रतिपदा लागली होती. चंद्राचे बळ त्याचे तेज आता कलेकलेने

उतरत चालले होते.तर इथे रणांगणात shivaji maharaj father शहाजीराजे थकत चालले होते.त्यांचे शरीर म्हणजे नुकत्याच

उमललेल्या जर्द तांबड्या जास्वंदीसारखे दिसत होते. जखमातर इतक्या झाल्या होत्या की,

गणती करणेच अशक्य होते. शहाजीराजांच्या रक्ताने अवघी रणभुमी लालेलाल झाली होती.

शरीरातून इतके रक्त वाहून गेल्या कारणाने राजांचा युद्धाचा वेग कमी होऊ लागला होता.

राजांची जिद्द तिळभरही कमी झाली नव्हती पण शरीर साथ देत नव्हते……. अन अखेरीस राजे धाडकन

घोड्यावरून खाली कोसळले.अती रक्तपात झाल्याने राजांना भोवळ आली होती. ते बघताच बाजी

घोरपड्यांनी अत्यानंदाने आरोळी ठोकली .इतक्यात पारडे फिरले. इतका वेळ राजांचा शत्रु म्हणून

लढणारा बाळाजी हैबतराव वेगानी पुढे झाला आणि त्याने राजांच्या मस्तकावर आपली ढाल धरून

त्यांचे रक्षण करण्यास सुरुवात केली. पण बाजी घोरपड्यांनी त्याला बाजुला ढकलुन बेहोष शहाजीराजांना कैद केले.

व्वा रे! ही मर्दानगी !अहो केवढे कौशल्य बाजीचे की,त्याने बेशुध्द पडलेल्या shivaji maharaj father शहाजीराजांना कैद केले.

शहाजीराजांना छावणीत नेण्यात आले.आणि सर्वप्रथम त्यांच्या हातीपायी काढण्या चढवण्यात आल्या.

कारण तेवढ्यात शहाजीराजे शुद्धीवर आले तर आपले कोणाचेच काही खरे नाही हे प्रत्येक जण जाणून होता.

एकाचवेळी दिल्लीचा पातशहा आणि विजापूरचा आदिलशहा ह्नांना आपल्या तलवारीवर तोलून धरणारे महाराज

शहाजीराजे केवळ दगाबाजीमुळे कैद झाले. काही वेळाने शहाजीराजे शुद्धीवर आले अन तेंव्हाच त्यांना

आपल्याला कैदी बनविल्याचे लक्षात आले तर….

हा दिवस होता दिनांक २५ जुलै १६४८ बादशहा आदिलशहाने अलगत जिजाऊंच्या सौभाग्यावरच घाला घातला

होता.शहाजीराजेंच्या कैदेनंतर अदिलशहाने बेंगलोर व कोंडाणा हस्तगत करण्यासाठी फौजा रवाना केल्या.

बेंगलोरला शहाजीराजांचे जेष्ठ पुत्र संभाजी यांनी , तर मावळात शिवाजीमहाराज यांनी या दोन्ही ठिकाणाहून

अदिलशहाच्या फौजा मागे हटवल्या.हे वर्तमान अदिलशहाला समजल्यावर पुढे काय करायचे याचा विचार

अदिलशहाला पडला.

तर मोगलाकडे वशिला लावून shivaji maharaj father शहाजीराजे यांच्या सुटकेसाठी शिवाजीराजे यांनी प्रयत्न चालू केले.

संभाजीराजे व शिवाजीराजे यांचे वजन पाहता ,आपल्यावर कठीण प्रसंग ओढवेल हे आदिलशहाला

पटताच हे प्रकरण समजुतीने मिटविण्याचे ठरवले आणि आदिलशहाने शहाजीराजांची गौरवपूर्ण सुटका केली.

या सर्व प्रकारात शिवाजीमहाराजांनी कोंढाणा किल्ला तह करून अदिलशहाच्या ताब्यात दिला.

डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर

Leave a Reply

error: Content is protected !!