shivaji maharaj rajyabhishek
shivaji maharaj rajyabhishek
shivaji maharaj rajyabhishek

shivaji maharaj rajyabhishek – शिवराज्याभिषेकाची तयारी

shivaji maharaj rajyabhishek - शिवराज्याभिषेक ४ जून इ.स. १६७४

shivaji maharaj rajyabhishek – शिवराज्याभिषेकाची तयारी

 

shivaji maharaj rajyabhishek – शिवराज्याभिषेक ४ जून इ.स. १६७४

 

3/6/2021,


गागाभट्टांनी राज्याभिषेकाची संपूर्ण तयारी सुरू केली होती. जे कार्य रामाने केले ,श्रीकृष्णाने केले, तेच कार्य या पुरुषोत्तमाने केले आहे व करीत आहे.

याच्या चरित्राला उपमा नाही. हे केवळ पुण्यपुरुष! यांचे नेमके ऐतिहासिक मोल जाणून राज्याभिषेकाचा विचार पुढे आला. या राजपुरुषाला सिंहासन नाही!

यांना अद्याप राज्याभिषेक झालेला नाही. का नाही? का नाही? मुसलमान बादशाह तख्ती बैसून , मस्तकावर छत्र धरवून,पातशाही करितात

आणि शिवाजीराजे यांनीही चार पातशाही दबविल्या आणि पाऊण लाख घोडा, लष्कर ,गडकोट,ऐसे असता त्यास तख्त नाही ?ही काय गोष्ट आहे!

गेल्या कित्येक शतकांत असा पराक्रमी पुरूष झालेला नाही.या राजाने तर प्राचीन भारतीय थोर राजांच्या तोलाचे कार्य केले .


उन्मळून उदद्धस्त झालेल्या या देवताभूमीच्या संस्कृतीचा संसार पुन्हा नीटनेटका मांडला. सडे शिंपले, देवघरात देव मांडले , वृंदावनात तुळस लावली, गोठ्यात गाय बांधली, नंदादीप लावले ,चार वर्णाची व चार आश्रमाची प्रतिष्ठा वाढिवली. कोणावर अन्याय म्हणून ऊरू दिला नाही .सर्वांमुखी मंगल बोलविले. सर्वात मुख्य म्हणजे पारतंत्र्य नष्ट केले. स्वराज्य,धर्मराज्य ,रामराज्य ,शिवराज्य निर्माण केले. अशा राज्याच्या राजाला सिंहासन नाही ? छत्र नाही? केवढी ही उणीव ! छत्रसिंहासना शिवाय राज्याला पूर्णत्व नाही ! शिवाजीराजांना राज्याभिषेक झाल्याशिवाय त्यांच्या युगप्रवर्तक कार्याचे महत्त्व जगाला समजणार नाही .राजाच्या मस्तकावर छत्र झळाळलेंच पाहिजे. मराठा राजा सिंहासनावर बसलाच पाहिजे!

केवढा गोड विचार! अमृताहुनही गोड ! महाराजांना shivaji maharaj rajyabhishek राज्याभिषेक झालाच पाहिजे .राज्याभिषेक? छत्र? सिंहासन? सोन्याची मोर्चेले? राजसभा? राजचिन्हे?अहो केवढी छान छान कल्पना ही ! मराठ्यांचे सिंहासन! मराठ्यांचा छत्रपति ! मराठ्यांचा महाराजाधिराज सिंहासनाधिश्वर! अहो म्हणजे बादशहाच की!अहो अयोध्येतील रामाला राज्याभिषेक झाला होता ना अगदी तसाच.


सर्वाना परमावधीचा आनंद झाला. आईसाहेबांच्या हृदयात आनंदाच्या केवढ्या ऊर्मी उठल्या असतील?अत्यंत थकलेल्या त्या मातेच्या मनाला गागाभट्टांच्या त्या गोड आज्ञेमुळे केवढे सुख झाले असेल? त्यांच्या मनालाच राज्याभिषेक सुरू झाला! त्यांचे मनच सिंहासनावर आरूढ झाले! शिवबाला राज्याभिषेक म्हणजे आईसाहेबांच्या आयुष्याच्या व्रताचे उद्यापनच! महाराजांचा राज्याभिषेक shivaji maharaj rajyabhishek म्हणजे पृथ्वीचे लग्न! महाराष्ट्राची भूमि आनंदाने गदगदली होती.

राज्याभिषेकाची वार्ता चौफेर आनंद उधळीत गडागडावरून धावत निघाली. अवघ्या मराठी सैन्याला ही वार्ता समजली आणि शूर शिवसैनिकांनी आनंदाने धुंद होऊन प्रचंड गर्जना केल्या शिवाजी महाराज की जय शिवाजी महाराज की जय
गागाभट्टांनी राजांचे संपूर्ण अंतःकरण ओळखले. जे कार्य रामाने केले ,श्रीकृष्णाने केले, तेच कार्य या पुरुषोत्तमाने केले आहे व तो करीत आहे .याच्या चरित्राला उपमाच नाही.हा केवळ पुण्यपुरुष! राजांचे नेमके ऐतिहासिक मोल जाणून राज्याभिषेकाचा एक नेमका आणि महत्त्वाचा विचार समोर आला होता. या राजपुरुषाला सिंहास याला अद्याप राज्याभिषेक झालेला नाही !का नाही? का नाही?’ मुसलमान बादशाह तख्ती बैसून , मस्तकावर छत्र धरवून पातशाही करितात आणि शिवाजीराजे यांनी चार पातशाही दबविल्या ? आणि पाऊण लाख घोडा, लष्कर, गडकोट ऐसे असता त्यास तख्त नाही?’ ही काय गोष्ट आहे! गेल्या कित्येक शतकात असा पराक्रमी पुरूष झालेला नाही. याने तर प्राचीन भारतीय थोर राजांच्या तोलाचे कार्य केले.उन्मळून उद्ध्वस्त झालेल्या या देवताभूमीच्या संस्कृतीचा संसार पुन्हा नीटनेटका मांडला .सडे शिंपले ,देवघरात देव


मांडला, वृंदावनात तुळस लावली, गोठ्यात गाय बांधली, नंदादीप लावले.चार वर्णांची व चार आश्रमाची
प्रतिष्ठा वाढवली. कोणावर अन्याय म्हणून उरू दिला नाही. सर्वामुखी मंगल बोलविले. सर्वात मुख्य म्हणजे पारतंत्र्य नष्ट केले. स्वराज्य निर्माण केले .अन अशा राज्याच्या राजाला सिंहासन नाही? छत्र नाही? केवढी ही उणीव! छत्रसिंहासनाशिवाय राज्याला पूर्णत्व नाही! शिवाजीराजाला राज्याभिषेक झाल्याशिवाय त्याच्या युगप्रवर्तक कार्याचे महत्त्व जगाला समजणार नाही. राजाच्या मस्तकावर छत्र झळाळलेंच पाहिजे ! मराठा राजा सिंहासनावर बसलाच पाहिजे !
राज्याभिषेक व्हायचा म्हणजे काय साधीसुधी गोष्ट?युगायुगांनी असा सोन्याचा दिवस उगवणार होता. शाहिरांची प्रतिभा, पंडितांचे शास्त्र, महाराजांचे ध्वेय ,आईसाहेबांच्या अपेक्षा, संतांचे आशीर्वाद,मृत वीरांच्या अतृप्त इच्छा आणि स्वतंत्र महाराष्ट्राचे आनंदाश्रू या दिवशी साकार व्हावयाचे होते .महाराजांचा shivaji maharaj rajyabhishek राज्याभिषेक म्हणजे महाराष्ट्रभूमीचा लग्नसोहळा. केवढी लगीनघाई गडावर उडाली म्हणून सांगू? समारंभासाठी आंबार्या ,अब्दागिर्या, पालख्या, मेणे, शामियाने, नानापरीची धान्ये, धार्मिक विधीसाठी लागणारे हजार प्रकारचे साहित्य.सोन्याची मोर्चेले, चौऱ्या , छत्र, सुवर्णाचे कलश, चांदीचे कलश, पडदे, फराससामान ,चिराकदाने, सोन्या-चांदीचे चौरंग ,चोपदारांचे सुवर्णदंड ,शेले, ,शालू ,हिर्यामोत्यांचे अलंकार ,सुगंधी पदार्थ ,पंचारत्या, हत्तीवरच्या नौबती,शुभलक्षणी हत्ती, शुभलक्षणी घोडे, गाई,त्यांचे सर्व वस्त्रालंकार ,स्त्रियांची सर्व सौभाग्य- उपायने, खर्चासाठी विपुल द्रव्य, सुवर्णतुलेसाठी सोन्याच्या राशी, व्याघ्रचर्मे, मृगचर्मे, नक्षत्रमाळा, मोत्याच्या झालरी, विविध धातूंची विविध पात्रे ,आता सांगू तरी काय?- हजारो प्रकारचे सामान -साहित्य, दर्भापासून सिंहासनापर्यंत, सुपारी पासून हत्तीपर्यंत आणि हळकुंडापासून होमकुंडापर्यंत झाडून सगळ्या साहित्याची व साधनांची यादीवार, तपशीलवार तयारी सुरू झाली .होती सरकारकून पंत पेशव्यांपर्यंत एकूण एक मंडळी राज्याभिषेकाच्या तयारीसाठी


कमरा बांधून झटू लागली.

आता एकच धून 6 जुन

लेखन 

डाॅ. सुवर्णा नाईक निंबाळकर
इतिहास अभ्यासक 


Advertisement

More Stories
maharashtra history
maharashtra history – चौथे छत्रपती शिवाजीमहाराज
error: Content is protected !!
%d bloggers like this: