Shivaji sawant
Shivaji sawant
Shivaji sawant

Shivaji sawant – मृत्युंजयकार शिवाजी सावंत

Shivaji sawant - मृत्युंजयकार शिवाजी सावंत यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन 

Shivaji sawant – मृत्युंजयकार शिवाजी सावंत

 

Shivaji sawant – मृत्युंजयकार शिवाजी सावंत यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन 


2Game - Official Authorised Digital Retailer

13/9/2021,

शिवाजी सावंत यांचा जन्म 31 ऑगस्ट 1940 साली सामान्य शेतकरी कुटुंबात, कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा या गावात झाला. शिवाजी सावंत हे उत्कृष्ट कबड्डीपटू होते.

प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण आजऱ्यात झाल्यावर त्यांनी कोल्हापुरात बी.ए.चे प्रथम वर्ष पूर्ण केले, आणि मग वाणिज्य शाखेतील पदविका (GCD) घेतली. टायपिंग,

शॉर्टहँडचा कोर्स करून त्यांनी कोर्टात कारकुनाची नोकरी केली, आणि नंतर ते कोल्हापुरातील राजाराम प्रशालेत १९६२ ते १९७४ या काळात शिक्षक म्हणून कार्यरत राहिले.

१९६७ साली त्यांनी मृत्यूंजय ही कादंबरी लिहीली.

2Game - Official Authorised Digital Retailer

मृत्युंजय कादंबरीच्या लेखनासाठी Shivaji sawant शिवाजी सावंत यांनी थेट कुरुक्षेत्रात मुक्काम ठोकला होता. प्रदीर्घ संशोधन, चिंतन आणि मनन यांतून रससंपन्न अशा ‘मृत्युंजय’ या

वास्तववादी कादंबरीचा जन्म झाला. आणि शिवाजी सावंत हे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत जाऊन पोहोचले. कर्णाच्या दानशुरत्वाला तोड नाही हेच खरे !

‘ मृत्युंजय ‘एवढी अमाप लोकप्रियता कुठल्याही मराठी लेखकाच्या पहिल्याच कादंबरीला लाभलेले नाही. भारताच्या राजकीय पुनरुत्थानाबरोबरच महाभारताचे

आणि विशेषतः त्यातील प्रसंगाचे आणि व्यक्तिरेखांचे नव्या ,व्यापक, मानवतावादी दृष्टिकोनातून साहित्यिक पुनरुज्जीवन झाले. कुंतीपुत्र राधेया विषयी तर विशेष

आस्था व्यक्त झाली आणि कुसुमाग्रजांच्या “कौंतेय ” सारख्या अनन्यसाधारण साहित्यकृतीचा लाभही मराठी साहित्याला याच आस्थेतुंन झाला. “कौंतेय”ने

नाट्यक्षेत्रात जी यशस्वी कामगिरी केली त्यासारखी कामगिरी तशा यशस्वी तऱ्हेने कादंबरीच्या क्षेत्रात ” मृत्युंजय “ने केली आहे. हे आता सर्वमान्य झाले आहे.

अनिवार्य नियतीचे गरगर फिरणे ,महान संयमाने सहन करीत जगायचं असतं ‘ हे कर्णाचे सांगणे आहे .कृष्णाप्रमाणे कर्ण पौरूष चैतन्याचे आणि वर्णनिर्भयतेचे

समर्थ आविष्करण आहे .जो कोणी जीवनसंघर्षात पिचला आहे, त्याला संघर्षात आणि पिचण्यात सुद्धा पुरुषार्थी आणि शक्तिशाली ‘जीवन ‘ सामावले आहे,

हा कर्णाचा तेजस्वी संदेश आहे .मृत्युंजय कादंबरीतून कर्णाच्या अंतरंगात शिरून त्याच्या मनाचा, विश्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न शिवाजी सावंत यांनी केला आहे.


2Game - Official Authorised Digital Retailer

महाभारताच्या विश्वातून कर्णाला त्याच्या दुःखी यातनामय आयुष्याला अनेक संदर्भासह त्यांची प्रतिमा Shivaji sawant शिवाजी सावंत यांनी साकारली आहे. कर्णाच्या जन्मापासुन

संपूर्ण आयुष्यातील अपमानास्पद घटनांच्या प्रभावातून ही कादंबरी साकारली आहे. या कादंबरीमुळे शिवाजी सावंत यांना मृत्युंजयकार म्हणून उपाधी लाभली.

या कादंबरीने प्रभावी कादंबरीकार म्हणून त्यांची प्रतिमा प्रस्थापित झाली .बहुतेक भारतीय भाषांतून या कादंबरीचा अनुवाद झाला.

मृत्यूंजय नंतरच्या कादंबऱ्या संभाजी महाराजांच्या जीवनावरची ” छावा “तर “युगंधर “ही भगवान श्रीकृष्णाच्या जीवनावरची कादंबरी आहे .भव्योदात्त जीवनाबद्दल

त्यांना वाटणारा आदर मृत्युंजय ते युगंधर पर्यंतच्या तीनही कादंबऱ्यांमधून उत्कटपणे प्रकट झाला.”छावा “ही छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील कादंबरी.

छत्रपती संभाजी महाराजांबद्दल निर्माण झालेली नकारात्मक स्वरुपाची प्रतिमा पुसून त्याजागी औरंगजेबाने दिलेल्या क्रूर मृत्युदंडाच्या शिक्षेला छत्रपती संभाजी महाराज

कसे शांतपणे सामोरे जाऊन , आपले राजेपद जबाबदारीने आणि विवेकाने सांभाळतात ,ही खरीखुरी ऐतिहासिक प्रतिमा छत्रपतीं संभाजी महाराजांच्या

कादंबरीमधुन शिवाजी सावंत यांनी ऊभी केली आहे.


2Game - Official Authorised Digital Retailer

छत्रपती शिवाजीराजे हे निर्विवाद सिंहपुरुष होते. परंतु शिवपुत्र छत्रपती संभाजी हे ही एक छावाच होते .महाराष्ट्राला हे नव्यानं पण पुरेपूर उमजलं होते .

“छावा “च्या जोरदार स्वागताने तर हे सिद्धच झाले होते .एक दोनच नव्हे तर एकाच वेळी पाच आघाड्यांवर निकराची पंजेफाड करणारा हा सेनाधुरंधर !

मराठ्यांच्या इतिहासात असा सेनापती एकमेव छत्रपती संभाजी महाराजच होऊन गेले .जंजिरेकर सिद्धी , गोव्याचे फिरंगी, मुंबईचे टोपीकर आणि तीन लाखांची

फौज व चौदा कोटींचा खजिना घेऊन मराठ्यांचे पारिपत्य करण्यासाठी दक्षिणेत उतरलेला अवाढव्य औरंगजेब .या त्या चार आघाड्या .पाचवी आघाडी होती

स्वार्थांध स्वजनांची .अगदी घरचीच! विखारी विश्वासघातक्यांची

रणांगणाचा वाघ सतत नऊ वर्षे पाठीशी घेत मुलुखभर दौडणारा हा झुंजार राजा जन्माला येताना कविमनाचे संचित बरोबर घेऊन यावा आणि “बुधभूषणम”

काव्याची रचना करून तो कविराज म्हणून मान्यता पावावा.हे पाहिले की प्रतिभा ही देवदत्त असली तरी ती एक अजब आणि विस्मयकारी देणगी आहे असे म्हणावे लागते .


2Game - Official Authorised Digital Retailer

तसाच अटीतटीचा प्रसंग आला तर मराठी कविमन एकदा का निर्धाराने राजवस्त्र ल्याले की मृत्यूलाही कसे धडक सामोरे जाऊ शकते हे छाव्याने तुळापुरी सिद्ध केले.

ही शोकांतिका खरीच पण उत्कट आणि भव्य समर्पणाचा वेध घेणारी! ही छावा कादंबरी मधून शिवाजी सावंतांनी केली.

” मृत्युंजय’नंतर शिवाजी सावंतांनी ’छावा’ ही ऐतिहासिक व ’युगंधर’ ही पौराणिक विषयावरची कादंबरी लिहिली.

शिवाजी सावंत Shivaji sawant यांची कादंबर्‍यांसहीत अन्य पुस्तके इंग्रजी भाषेत अनुवादित झाली आहेत. युगंधरचा इंग्रजी अनुवाद सावंत यांची अमेरिकास्थीत कन्या कादंबिनी यांनी केला आहे.

मृत्युंजय या कादंबरीवर आधारलेली काही मराठी-हिंदी नाटकेही रंगभूमीवर आली.” मृत्युंजय “ही कादंबरी दानशूरपणासाठी प्रख्यात असलेला महान योद्धा

कर्णाच्या जीवनावर, तर “युगंधर “ही कादंबरी भगवान श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारलेली आहे.

मराठी भाषेत कसदार लेखन करून साहित्याची सेवा केल्याबद्दल त्यांना भारतीय ज्ञानपीठाच्या मूर्तिदेवी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.१९९४ मधे

“मृत्यूंजय ” कादंबरीसाठी त्यांना ‘ज्ञानपीठ ‘ पुरस्कार प्राप्त झाला होता.

कर्‍हाड येथे भरणार्‍या ७६व्या ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’च्या अध्यक्षपदाचे ते उमेदवार होते. आपल्या उमेदवारीच्या प्रचारासाठी गोव्यात

गेले असताना मडगाव येथे, शिवाजी सावंत यांचा १८ सप्टेंबर २००२ मधे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला.


2Game - Official Authorised Digital Retailer

अशा या मृत्यूंजयकाराला स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन

लेखन
डाॅ. सुवर्णा नाईक निंबाळकर

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisement

More Stories
shivsena pramukh
shivsena pramukh – बाळासाहेबांच्या स्मरणार्थ हॉस्पिटल
error: Content is protected !!
%d bloggers like this: