shivrajyabhishek - शिवराज्याभिषेक सोहळा 
shivrajyabhishek - शिवराज्याभिषेक सोहळा 
shivrajyabhishek - शिवराज्याभिषेक सोहळा 

Shivrajyabhishek din- शिवराज्याभिषेक सोहळा 

shivrajyabhishek din - ३१ मे १६७४ विधि शांतीचा मुहूर्त

Shivrajyabhishek din – शिवराज्याभिषेक सोहळा 

 

shivrajyabhishek din – ३१ मे १६७४ विधि शांतीचा मुहूर्त

 

 


All Jewelry 75% OFF

 

या दिवशी छत्रपती शिवरायांची अग्निप्रतिष्ठा करण्यात आली .यात इंद्रायणी पूजा झाली व अनुपान्गिक सर्व विधी झाल्यावर

आचार्य आणि ऋत्विक यांना सुवर्णदक्षिणा देण्यात आली. सर्व देवदेवतांना समारंभाची अक्षत गेली. महाराष्ट्राच्या आनंदाच्या, परमोच्च सुखाच्या ,

वैभवशाली सर्व शुभशकुनांनो या या ! महाराष्ट्राच्या आणि भारतवर्षाच्या देवदेवतांनो या या ! सहकुटुंब सहपरिवार या!

श्री मंगलमूर्ती मोरेश्वरा रिद्धी-सिद्धीच्या नायका, विघ्नहरा , सर्वाआधी आपण या! खंडेराया,घृष्णेश्वरा , पंढरीराया अवघे अवघे !


All Jewelry 75% OFF

या हातची हजार कामे टाकून वेगे वेगे या ! वेगवेगळ्या धार्मिक विधींना प्रारंभ झाला होता. shivrajyabhishek din भाळी मळवट लेवून राजे सर्व विधीसाठी तयार होते.

रायगडावर आता जिकडे तिकडे प्रफुल्ल वातावरण विलसत होते. मंगल वाद्ये वाजत होती. राजवैभव भरून चालले होते, हे पाहून सर्वांचे डोळे तृप्त झाले होते.


All Jewelry 75% OFF

विविध प्रांतातील थोर थोर विद्वान, मुत्सद्दी, कलावंत ,राजकीय अधिकारी ,कवी, वकील वगैरे व्यक्तींच्या परस्परात गाठीभेटी व परिचय घडत होते.

सकाळ- संध्याकाळ राजप्रासादात मिष्टांनाची भोजने होत होती. पाहुण्यांचे मनोरंजन करण्यात गुणीजन तप्तर होते. वाद-विवाद,

शास्त्रचर्चा वगैरे गोष्टींमुळे शास्त्री पंडितांना पर्वणी लागली होती. रायगडावर जनु दसरा-दिवाळी प्रकटली होती .

पोथ्या पुराणातून आणि हरदासांच्या तोंडून ऐकलेल्या राज नगरांच्या वैभवाचा साक्षात अनुभव सर्वांना येत होता. कुणास काही उणे पडत होते असे नाहीच.

एका दिवशी एक एक विधी पार पडत होते .सर्व शांतीचे विधी ३१ मे १६७४ रोजी पार पडले. रायगडावरचा आनंद आणि गडबड शिगेला पोहोचली होती.

रायगड म्हणजे स्वर्गीय नगरी शोभू लागली. दिवस संपून रात्र झाल्याचे भान तरी कोणाला राहिले असेल का?


All Jewelry 75% OFF

अंधार वगळला तर रायगडावरची रात्र दिवसा सारखीच होती! राज मंडळातील सर्व लोकांना कामेधामें इतकी होती की,

वेळ पुरत नव्हता. shivrajyabhishek din राज्याभिषेक समारंभातील प्रत्येक विधी अत्यंत अभ्यासपूर्वक,

शास्त्रीय चिकित्सेने ठरविलेले होते .व ते अत्यंत साक्षेपाने पार पडत होते.

 

महाराजांचे सर्व विधी अत्यंत चांगल्या पध्दतीने होत होते. आनंदवन भुवनी अवघा आनंदी आनंद उसळला. कशाशी तुलना करायची त्या आनंदाची ?

अमृतपानाशी ? नंदनवनांतील विलासांशी ? कल्पवृक्षाच्या छायाश्रयाशी ? इंद्र सभेतील वैभवोपभोगांशी ?छे छे छे! हे सर्व आनंद

आनंदवन भुवनाच्या स्वच्छंद आनंदापुढे अगदीच फिके, अगदीच किरकोळ होते.अहो हा सार्वभौमत्वाचा आनंद होता. हा स्वातंत्र्याचा स्वच्छंद आनंद होता.

आमचा राजा ,आमचा ध्वज , आमचे प्रधानमंडळ , आमची भूमि, आमचे पाणी ,आमचे आकाश,आता सार्वभौम सिंहासनावर राज्याभिषिक्त होणार होते.

आम्ही कोणाचे गुलाम उरणार नव्हतो ! स्वतंत्र, स्वतंत्र होणार होतो. महाराष्ट्राचा समुद्र , सह्याद्री ,प्रजा , गाईगुरे ,पक्षिपाखरे, वृक्षलता ,

आज अभिषिक्त होणार होत्या. त्यांच्या मस्तकावर छत्रचामरे झळाळणार होती. सांगा या स्वातंत्र्यानंदाला आहे का या विश्वात तुलना ?


All Jewelry 75% OFF

कोणत्या तराजूत कशाशी तोलणार हा आनंद? स्वर्गीच्या इंद्रधनुष्याचाच तराजू हवा त्यासाठी.या तराजूला पारडी हवी ती सुद्धा इंद्रसभा

आणि नंदनवन यांचीच अन हा तराजू बांधायला हवा कल्पवृक्षाच्या फांदीला आणि मग त्यात तोलायला हवा शिवराज्याभिषेकाचा आनंद

आणि स्वर्गसुखाचा आनंद .स्वर्गसुखाचे पारडे शिवराज्याभिषेकापुढे ताडकन हवेत उडाले असते.


All Jewelry 75% OFF

राज्याभिषेक समारंभातील प्रत्येक विधी अत्यंत अभ्यासपूर्वक शास्त्रीय चिकित्सेने गागाभट्टांनी ठरविलेले होते व ते अत्यंत साक्षेपाने ते पार पाडत होते.

मोठी पहाट झाली. दीपज्योती उजळल्या. चौघडा दणाणू लागला .आकाशात शुद्ध द्वादशीचा चंद्र व तारकामंडळ ढगांच्या दाटीतून डोकावत होते.

मंगल वाद्यांचे निनाद रायगडावर कोंदले होते.सर्व स्त्री-पुरुषांची समारंभासाठी पहाटेच्या अंधारात व चिरागदानांच्या सुंदर केसरी उजेडात गर्दी उडाली.

कल्पनाच करा , सह्याद्रीच्या उंच उंच शिखरांच्या दाटीत, एका उत्तुंग शिखरावर ,पहाटेच्या काळोखात सहस्त्रावधी दिवे तेजाळत आहेत ,

सुंदर सुंदर रंगीबेरंगी भरजरीची वस्रे लेऊन हजारो स्त्री-पुरुष हालचाल करीत आहेत, वाद्यांचे प्रतिध्वनी भवतीच्या दऱ्याखोऱ्यात निनादत आहेत,

कसे दिसत असेल ते दृश्य ? गरुडांच्या उंच घरट्यात आज गोड तारांबळ उडाली होती .शिंगाच्या ललकार्या उठत होत्या .


All Jewelry 75% OFF

राजा शिवाजी राजराजेश्वर छत्रपती होणार होते. ही तर फक्त पूर्वतयारी चालली होती. मोठ्या थाटामाटात अग्नि प्रतिष्ठान आणि इंद्रायणी विधि करण्यात आला.

लेखन
डाॅ. सुवर्णा नाईक निंबाळकर

संदर्भ
राजा शिवछत्रपती
मराठी रियासत


All Jewelry 75% OFF

Advertisement

More Stories
fasist
fasist dictator – बेनिटो मुसोलिनी तानाशाह
error: Content is protected !!
%d bloggers like this: