Shivrajyabhishek Sohala
Shivrajyabhishek Sohala
Shivrajyabhishek Sohala

Shivrajyabhishek Sohala – १ जुन इ.स.१६७४ छत्रपती शिवराय राज्याभिषेक

Shivrajyabhishek Sohala - छत्रपती शिवरायांनी राज्याभिषेक सोहळ्यापूर्वी आजच्या दिवशी दानधर्म केला.

Shivrajyabhishek Sohala – १ जुन इ.स.१६७४ छत्रपती शिवराय राज्याभिषेक

 

Shivrajyabhishek Sohala – छत्रपती शिवरायांनी राज्याभिषेक सोहळ्यापूर्वी आजच्या दिवशी दानधर्म केला.

 

 

1/6/2021,

Martha Stewart CBD Products

राज्याभिषेका बरोबर इतर समारंभ व विधी चालूच होते. छत्रपतींची राजसभा रोजच भरत होती.सार्वभौम स्वत्व व स्वाभिमान व्यक्त करण्यासाठी हा Shivrajyabhishek Sohala  सोहळा होता. महाराजांनी या अलौकिक महत्त्वाच्या सोहळ्याचे स्मरण कायम युगानुयुगे राहावे म्हणून ‘ राज्याभिषेक शक ‘ सुद्धा सुरू केला .या शकाला त्यांनी स्वतःचे नाव न देता राज्याभिषेकाचे नाव दिले. अष्टप्रधानांची फार्सी नावे बदलून त्यांना संस्कृत नावे दिली. इतकेच नव्हे, तर राज्यकारभारात रूढ झालेले शेकडो फार्शी शब्द काढून त्यांना संस्कृत प्रतिशब्द देण्याचे निश्चित केले .पंडित रघुनाथपंतास राजांनी आज्ञा केली की ,अशा
प्रतिशब्दांचा एक ‘राज्यव्यवहार ‘कोश सिद्ध करा. संज्ञात परिवर्तन झाले की संवेदनातही परिवर्तन होते .जशा संज्ञा ,तशा संवेदना . राजपत्र लेखनाविषयीही असेच नियम केले. आपल्या मुद्रेची सुवर्णाची व तांब्याची नाणी पाडण्यास प्रारंभ केला.


Martha Stewart CBD Products

या नाण्यावर ‘राजा शिवछत्रपती ‘अशी अक्षरे घातली. स्वराज्याचा ध्वज भगवा ठेवला. संस्कृत भाषेत स्वत्वाची बीजे आहेत .हे महाराजांनी ओळखूनच संस्कृत भाषेचा व भाषापंडितांचा फार मोठा आदर केला.’ प्रतिपच्चद्रलेकेव -‘ही संस्कृत मुद्राच निश्चित केली .आपल्या स्वातंत्र्याचा व सार्वभौमत्वाचा पूर्ण साक्षात्कार प्रत्यक्ष महाराजांना पूर्णपणे झाला होता .म्हणूनच वरील गोष्टी करण्याची अचूक स्फूर्ती त्यांना झाली.

अशा विविध गोष्टी या सोहळ्याच्या निमित्ताने करण्यात आल्या .त्या योग्य व आवश्यकच होत्या. नाहीतर राज्याभिषेकाचा हेतू अपुरा राहिला असता. राज्याभिषेक समारंभ म्हणजे केवळ वैभवाचे प्रदर्शन, कलावंताचा परामर्श, भोजने, मिरवणुकी आणि सामुदायिक चैन नव्हे. या समारंभाच्या मागे काही एक उदात्त व तात्विक व ऐतिहासिक भूमिका होती. अंगी बळ व बुद्धी असूनही पराभूत वृत्तीमुळे परधार्रजिणेपणामुळे राजकीय व सामाजिक विवेक जागृत नसल्यामुळे हिंदूंचा सर्वनाश होत आहे व होत राहणार हे महाराजांनी अचूक ओळखले होते.


Martha Stewart CBD Products

राज्याभिषेक Shivrajyabhishek Sohala प्रसंगी रायगडावर आलेल्या सर्व ब्राह्मणांना महाराजांनी मुक्तहस्ताने दानधर्तम करण्यात आला. सामुदायिक देनगीत प्रत्येकास किमानपक्षी तीन रुपये दक्षणा मिळाली. शिवाय नित्यदानात व विविध विधीच्या वेळी दक्षणा मिळाल्याच. विशेष विद्वानांना स्वतंत्रपणे जास्त दक्षणा देण्यात आल्या. संन्याशी ,गोसावी तडीतापसी यांचाही योग्य तो सत्कार करण्यात आला. गोरगरीब व याचक यांना विपुल दानधर्म करण्यात आला. सर्व ॠत्विजांस प्रत्येकी पाच पाच हजार रुपये दिले. प्रत्यक्ष गागाभट्टांना तर एक लक्ष रुपये दक्षिणा वस्त्रे व भूषणे देऊन महाराजांनी त्यांचा आदर सत्कार केला .कवी ,भाट ,कलावंत व गुनिजन यांना संतुष्ट करण्यात आले. राजदूत,सरदारपदाधिकारी ,मुत्सद्दी,आप्त सेवकजन, अष्टप्रधानमंडळ यांना वस्त्रे, हत्ती ,घोडे ,पालख्या, ढाली, तलवारी, शिक्के, कट्यार, चौऱ्या, द्रव्य वगैरे त्याच्या माना प्रमाणे देण्यात आले. समारंभासाठी आलेल्या सर्व स्त्रियांचा व मुला मुलींचा देखील राजांनी सन्मान केला. कोणालाही वगळले नाही .राजा कोणालाही विसरला नाही. बाळाजी आवजी चिटणीसांना वास्तविक अष्टप्रधानात पद देण्याची महाराजांची इच्छा होती.


Martha Stewart CBD Products

पण चिटणीस म्हणाले , मला मंत्रिमंडळात पद नको ! मला माझी चिटणिशीच कायमची वंशपरंपरेने द्या! महाराजांनी त्यांना रुप्याचे कलमदान, घोडा ,चौरी, भूषणे,चौकडा व चिटणिशीची वस्त्रे दिली. शामजी नाईक पुंडे यांना स्वराज्याची पोतदारी म्हणजे खजिनदार दिली. आजोबांचा शब्द महाराजांनी पाळणा .नाइकांना पोतदारीचे वस्त्रालंकार दिले. सर्वांनी महाराजांना खूप खूप दिले. सर्व संतुष्ट झाले .कोणाला काही द्यावयाचे राहिले नाही. फक्त एकच माणूस उरला .एक तरुण पोरगा उरला. कोण ?- मदारी मेहतर आग्र्याच्या बंदीवासात महाराजांसाठी हिरोजी बरोबर स्वतःचे प्राण तळहातावर घेणारा मदारी मेहतर .

या पोराला काय द्यायचे ? महाराजांनी त्याला विचारले ,तुला काय देऊ? मदारीने काय मागावे ? हत्ती ?पालखी ? सरदारी?- अहं! तो म्हणाला ‘ महाराज, आपल्या सिंहासनाची व्यवस्था ठेवण्याचे, सिंहासनावर चादर पांघरण्याचे काम मला द्या.!’

Martha Stewart CBD Products

राज्याभिषेक  Shivrajyabhishek Sohala  झाल्यानंतर महाराष्ट्रात आयोध्या अवतरणार होती. न्यायाचे , स्वधर्माचे, सुसंस्कृतीचे
छत्रसिंहासन पुन्हा प्रकटणार होते. साडेतीनशे वर्षाचे सुतक फिटून सगळीकडे आनंदी आनंद होणार होता. सारी विषण्णता, नैराश्य, दुःख लयाला जाणार होते. सार्या जखमा बुजून अपमान धुवून निघणार होता. सर्वत्र आनंदी आनंद होऊन जीवनाचे सारथक होणार होते. न्यायासाठी, संरक्षणासाठी, सुखदुःखे सांगण्यासाठी हवे ते हक्काने मागण्यासाठी ममतेचे,समतेचे, उदार आणि बलाढ्य सिंहासन निर्माण होणार होते. सावलीसाठी विशाल छत्र उडणार होते .मुलाबाळांस, लेकीसुनास, शेतकऱ्यास हक्काने रूसावयास जागा निर्माण होणार होती .अवध्यांना आजोळ – माहेर लाभणार होते. महाराष्ट्रात आनंदी आनंद होणार होता. समुद्रमंथनात देवा नाही मिळाले नाही असे अपूर्व रत्न राजा शिवछत्रपतीच्या रूपाने महाराष्ट्राला मिळणार होते. राज्याभिषेकामुळे सह्याद्री खोर्यातील मातीचा ,सृष्टीचा कण आणि कण आनंदून जाणार होता.


Martha Stewart CBD Products

लेखन 
डाॅ. सुवर्णा नाईक निंबाळकर

संदर्भ
राजा शिवछत्रपती
राजमाता जिजाऊ साहेब
मराठी रियासत


Martha Stewart CBD Products

Advertisement

More Stories
crime branch - Police station - Dhamangao - badhe
crime branch – पोलिस स्टेशन – धामणगाव बढे
error: Content is protected !!
%d bloggers like this: