सिंहगड sinhgad
सिंहगड sinhgad
सिंहगड sinhgad

सिंहगड – नावजी बलकवडे, गड घेऊनी सिंह आला

सिंहगड (पराक्रम दिन- (३० जून १६९३)

सिंहगड – नावजी बलकवडे, गड घेऊनी सिंह आला

सिंहगड (पराक्रम दिन- (३० जून १६९३)

 

लेखन
डाॅ. सुवर्णा नाईक निंबाळकर

 

 

 

नावजी बलकवडे हे कुरवंडे गावचे असून मराठा पायदळात पंच हजारी सरदार होते.

छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या एका शब्दावर प्राणाची बाजी लावणारे अनेक शूर होऊन गेले

त्यातलेच एक नाव म्हणजे नावजी बलकवडे .

छत्रपती संभाजी राजांच्या मृत्यूनंतर सिंहगड मुघलांनी जिंकून आपल्या ताब्यात घेतला.

राजमाता जिजाऊ साहेब छत्रपती शिवाजी महाराज यांचे सिंहगडावर अतिशय प्रेम होते.

स्वराज्यातला अत्यंत महत्वाचा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेल्यामुळे तो जिंकणे आव्हानात्मक काम होते.

तो किल्ला जिंकण्याचे आव्हान नावजी बलकवडे यांनी स्वीकारले.

सिंहगडाचा इतिहास दोन दशकाहून अधिक काळ असा आहे. १६७० ते १६९३ दरम्यान सिंहगडावर

मराठे आणि मोगल यांची आठ वेळा सत्तापालट झाली होती. यावरून सिंहगडाचे महत्त्व लक्षात येते.

१६७० मध्ये तानाजी मालुसरे यांनी आपल्या प्राणाची बाजी लावून सिंहगड जिंकला होता.

उत्तर शिवकालात सिंहगड, राजगड, पुरंदर रायगड यासारखे बुलंद किल्ले मोगलांच्या ताब्यात गेल्याने मराठ्यांना

देशावर प्रभावी हालचाली करणे अवघड जात होते. त्याच बरोबर कोकणात देखील प्रतिकारात अडथळे निर्माण होऊ लागले होते.

अशा बिकट परिस्थितिवर मात करण्यासाठी, हा बलदंड किल्ला परत जिंकणे आवश्यक होते.

या सर्व गोष्टीचा विचार करून इ.स.१६९३ मध्ये शंकराजी नारायण सचिव यांनी धाडसी लोकांच्या सहाय्याने किल्ला जिंकण्याचा विचार सुरु केला.

या विचारातूनच एक नाव पुढे आले ते म्हणजे नावजी लखमाजी बलकवडे.

नावजीनी सिंहगड जिंकुन देण्याचे कबुल केले. त्या बदल्यात शंकराजी पंतानी त्यांना मावळातील सावरगाव इनाम द्यायचे असे ठरले.

शंकराजी पंताना सिंहगडाच्या भौगोलिक परिस्थितिचा चांगला अंदाज होत. हे काम नावजीसारख्या एकट्या दुकट्याचे नाही हे त्यांनी जाणले होते.

त्यामुळे नावजी बरोबर सरदार विठोजी कारके याना मदतनीस म्हणुन पाठवून दिले.त्यानुसार प्रथम विठोजींनी

एकट्याने आणि नंतर विठोजी आणि नावजी दोघांनी मिळून सिंहगडाच्या घेराची तपासणी केली.

या दोघांना असे आढळले की सिंहगड आधीच कठीण, त्यात मोगलांनी सावध होउन काही ठिकाणी किल्ल्याची पुनर्बाधणी

आणि दुरुस्ती करुन तेथे चौक्या, पहारे आणि रात्रीच्या गस्ती वाढवलेल्या होत्या. शिवाय जास्तीचे सैन्य देखिल या काळात किल्ल्यावर तैनात होते.

या काळात किल्ल्यावर भरपुर सैन्य तैनात होते. दगा फटका करुन किल्ला घेण्याची सोय राहिली नव्हती.

त्यामुळे सुभेदार मालुसरेनां जेवढ्या अडचणी आल्या तेवढ्याच आता पण असणार याची जाण नावजी आणि विठोजी यांना होती.

दि. २५ जून १६९३ रोजी नावजी बलकवडे आणि विठोजी कारके यांनी निवडक माणसे घेतली आणि ते राजमाचीवरुन निघाले.

पावसाळ्याचे दिवस त्यात अंधार अशा स्थितीत मराठे रान तुडवत सिंहगड नजीकच्या जंगलात येउन पोहोचले

आणि योग्य संधीची वाट पाहत ५ दिवस दबा धरुन बसले.

दि. ३० जूनच्या मध्यरात्री नावजी बलकवडे शिड्या व दोर बरोबर घेउन सिंहगड चढू लागले.

अवघड मार्गांनी खाचा खळग्यातुन ते तटबंदीच्या खाली आले. परंतु किल्ल्यावर मोगलांची गस्त सुरु होती आणि पहारेकरी सावध होते .

त्यामुळे मराठ्यांना तटाला शिड्या लावता आल्या नाहीत. सुर्योदय झाला तेव्हा किल्ल्यावरच्या गस्तवाल्यांची वेळ संपून नवे लोक गस्तीसाठी येत होते.

पावसाळ्यातल्या धुक्यामुळे लांब वरुन काय चालले आहे ते दिसत नव्हते. या लवचिक संधीचा फायदा घेउन नावजींनी शिड्या तटाला लावल्या

आणि ते मावळ्यांसह सिंहगडवर आले.

मराठे सैनिकांनी पहारेकरी गुपचुप कापुन काढले. अकस्मात हल्ला झाल्याने मोगलांची फार हानी झाली होती.

मराठे किल्ल्यावर आले आहेत अशी चाहुल जर किल्लेदाराला लागली असती तर तो सावध झाला असता

आणि मोगल सैन्याने एकवटुन नावजींच्या सैन्यावर हल्ला चढवला असता. पण नावजींनी त्यांचे काम चोख बजावले होते.

नावजींचे धैर्य बघुन विठोजी कारकेंना हुरुप आला. ते यावेळी तटाखाली योग्य संधीची वाट बघत थांबले होते.

ते ही शिड्या लाऊन वर आले, आता मराठ्यांचे सर्व सैन्य गडावर पोहोचले होते.

हर हर महादेवच्या गजरात सिंहगडाने परत एकदा स्वराज्याचा उंबरा ओलांडला.

नावजी बलकवडे यांनी ३० जून च्या रात्री चारशे मावळ्यांनिशी सिंहगडा सारखा अभेद्य किल्ला जिंकून घेतला.

या कामगिरीवर खुश होऊन छत्रपती राजाराम महाराज यांनी जिंजीहून पाठवलेल्या अभिनंदन पर पत्रात लिहिले,

तुम्ही सिंहगडचे कार्यसिद्धी समयी धारेस चढोन तलवारीची शर्त केली .पूर्वी सुभेदार तानाजी मालुसरे यांनी जीव देऊन किल्ला सर केलात.

तानाजीच्या पराक्रमाची पुनरावृत्ती करणाऱ्या नावजी यांना एक गाव इनाम देऊन, पायदळाचे सप्त हजारी सरदार करण्यात आले.

अशाप्रकारे नावजी बलकवडे यांच्याबाबतीत ” गड घेऊनी सिंह आला.” सिंहगडाची मोहीम फत्ते करणाऱ्या

नावजी बलकवडे यांनी बारा मावळातील कोरीगड , लोहगड, सुधागड हे किल्लेही स्वराज्यात सामील करून घेतले.

अशा या नावजी बलकवडे यांच्या पराक्रमाच्या अखंड परंपरेला त्रिवार मानाचा मुजरा.

लेखन
डाॅ. सुवर्णा नाईक निंबाळकर


संदर्भ 
मराठी रियासत 
गो.स.सरदेसाई 
मराठे शिलेदार

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisement

More Stories
dhondo keshav karve
dhondo keshav karve – स्री – मुक्तिदाता धोंडो केशव कर्वे
error: Content is protected !!
%d bloggers like this: