Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

News

slogans on organ donation – बाळाने दिले सात जणांना आयुष्य !

1 Mins read

slogans on organ donation – बाळाने दिले सात जणांना आयुष्य !

 

slogans on organ donation – अडीच वर्षाच्या बाळाने दिले सात जणांना आयुष्य !

 

सुरत,अवघ्या अडीच वर्षांच्या बाळ, या जगाचा निरोप घेतला आणि जाताना दिले 7 जणांना नवीन आयुष्य. सुरत, चेन्नई ते युक्रेन मध्ये सात जणांच्या शरीरात जगणार त्याचे आयुष्य, अक्षरश: रशियापर्यंत त्याच्या आठवणी राहणार. आपल्या शेजाऱ्यांकडे खेळायला जातो म्हणून गेलेला अडीच वर्षांचा जश अचानक तोल जाऊन बाल्कनीतून पडला आणि पुन्हा घरी परतला नाही. हॉस्पिटल मध्ये भरती केल्यानंतर डॉक्टरांच्या उपचारला त्याचा प्रतिसाद मिळत न्हवता. डॉक्टरांनी ब्रेन डेड घोषित केल्यानंतर त्याच्या आई वडिलांनी एक मोठा निर्णय घेण्याचे ठरविले. आज कोविड च्या वेळी सर्व जग देवाधर्माच्या जोखडातून बाहेर पडत आहे असे चित्र सध्या दिसत आहे, विज्ञानवादी दृष्टिकोन लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जागृत होताना दिसतोय, त्यामुळे slogans on organ donation धर्म त्याची कर्मकांडे माणूस संपल्यानंतर काय उपयोगाची.

आपले शरीर कोणाच्या उपयोगात येत असेल तर याहून आणखी मोठे पुण्यकर्म किंवा मोक्ष प्राप्ती ती काय असणार. हेच जणू त्या चिमुरड्याच्या आई वडिलांना वाटले असणार म्हणून त्यांनी चिमुरड्या जशची आठवण जगभरात काढली जाईल अशी व्यवस्था केली. सहसा असे निर्णय घ्यायला वाघाचे काळीज हवे. पण जसे च्या आई वडिलांनी निर्णय घेतला जशचे अवयव दान करण्याचा ते ही इतक्या लहान बाळाचे.17 डिसेंबर अवयवदानाबाबत मोठी जागृती होत असल्याने माणुसकीला जागवणाऱ्या अशा घटना वाढल्याचे बघायला मिळत आहे. अशीच एक डोळे ओलावतानाच चेहऱ्यावर हसू आणणारी घटना सुरतमध्ये समोर आली आहे. अशा घटनांचे अनुकरण फक्त भारतातच न्हवे तर जगात होत राहिले तर अनेकांचे अश्रू आपण पुसू शकतो याची कल्पना येईल.

slogans on organ donation अनेकांना जीवनदान मिळेल, अनेकांचे कुटुंब त्याचे दुःख आपल्याला पुसता येईल. एक अवघा अडीच वर्षांचा चिमुरडा जश अपघात झाल्याने ब्रेन डेड झाला होता. मात्र स्वतःचं आयुष्य संपलेलं असतानाही त्यानं आपल्यासारख्याच सात बाळांना जीवनदान दिलं. यातली दोन बाळं तर रशिया आणि युक्रेनमधली आहेत. बाळ ब्रेन डेड झाल्याचं कळल्यानंतर त्या धक्क्यातून स्वतःला सावरत त्याच्या आई वडिलांनी आपल्या बाळाचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. बाळाचं हृदय रशियातील 4 वर्षांच्या एका बाळात प्रत्यारोपित करण्यात आलं असून त्याची फुफ्फुसं चेन्नईच्या एमजीएम हॉस्पिटलमध्ये एका युक्रेन इथल्या बाळाच्या शरीरात मंगळवारी प्रत्यारोपित करण्यात आली. कोरोना च्या काळात सुरत शहरात घडलेलं हे दुसरं अवयवदान आहे. 9 डिसेंबरला सुरतच्या भातर भागातील रहिवासी जश संजीव ओझा हा अडीच वर्षांचा मुलगा आपल्या शेजारच्या घरात खेळायला गेला होता. दुसऱ्या मजल्यावरच्या फ्लॅटच्या बाल्कनीत खेळता खेळता त्याचा अचानक तोल गेला आणि काही कळायच्या आत तो पडला. त्याला लगोलग अमृता हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिथे काही दिवस उपचार घेतल्यानंतर 14 डिसेंबरला डॉक्टरांनी त्याला ब्रेन डेड घोषित केलं.

निलेश मांडलेवाला हे सुरतच्या डोनेट लाईफ या एनजीओचे अध्यक्ष आहेत. अमृता हॉस्पिटलमध्ये जात त्यांनी जशचे वडील आणि पत्रकार संजीव ओझा यांचं मन वळवलं. आपल्या मुलाच्या मृत्यूनंतरही त्याची आठवण जगभरात जागती ठेवण्यासाठी संजीव यांनी मोठा निर्णय घेतला. त्यांच्या निर्णयामुळे जगभरातल्या 7 जणांना नवं आयुष्य मिळालं. आता जश बाळाचे अवयव गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचवण्याची धावपळ सुरू झाली. त्याचं हृदय आणि फुफ्फुसं हवाई मार्गाने थेट चेन्नईच्या एमजीएम हॉस्पिटलला नेण्यात आली. जशचं हृदय चार वर्षांच्या रशियन बाळाला तर फुफ्फुसं दुसऱ्या चार वर्षांच्या युक्रेन इथल्या बाळाला बसवली गेली. दोन्ही मुलांवर चेन्नई हॉस्पिटलमध्ये गेल्या वर्षांपासून उपचार सुरू होते.

जशच्या किडन्या सुरेंद्रनगर इथल्या 13 वर्षांच्या मुलीला आणि सुरतेच्या 17 वर्षीय मुलीला दिल्या गेल्या. ‘इन्सि्टट्यूट ऑफ किडनी डिसीज अँड रिसर्च सेंटर, अहमदाबाद’च्या माध्यमातून हे करण्यात आलं. याच संस्थेत एका दोन वर्षीय मुलाला यकृत दिलं गेलं. ब्रेन डेड बाळाचे कॉर्नियाज अर्थात डोळ्याच्या बाहुलीचा पारदर्शक पडदा सुरतच्या लोक दृष्टी चक्षू बँकेला दान दिला गेला.

 

 

www.postboxindia.com

www.postboxindia.com

Leave a Reply

error: Content is protected !!