social reformer raja ram mohan roy राजा राम मोहन रॉय
social reformer raja ram mohan roy राजा राम मोहन रॉय
social reformer raja ram mohan roy राजा राम मोहन रॉय

social reformer raja ram mohan roy – राजा राममोहन राॅय

social reformer raja ram mohan roy - जन्मदिनानिमीत्त विनम्र अभिवादन 

social reformer raja ram mohan roy – राजा राममोहन राॅय

 

 

social reformer raja ram mohan roy – जन्मदिनानिमीत्त विनम्र अभिवादन 

 

 

 


राजा राममोहन राॅय यांचा जन्म पश्चिम बंगालमधील हुबळी कलकत्ता येथील राधानगर येथे २२ मे १७७२ या दिवशी झाला. ते एक भारतीय समाजसुधारक होते.

ब्राम्हो समाजाचे संस्थापक ,एक समाजसुधारक पत्रकार, शिक्षण तज्ञ ,अशी त्यांची ओळख होती.स्रियांना मालमत्तेत अधिकार देण्यासाठी त्यांनी आवाज उठवला होता.

मुगल सम्राट अकबर( दुसरा) यांनी राममोहन राॅय यांना राजा ही उपाधी बहाल केली. सम्राट अकबराचे राजदूत म्हणून ते इंग्लंडला गेले होते.

तेव्हा त्यांना पाहण्यासाठी माणसे रस्त्यावर गोळा होऊ लागली. भारतीय संस्कृतीची भव्यता रॉय यांच्या रूपात आम्ही पाहिली असे अनेक इंग्लिश


नागरिकांनी बोलून दाखवले. ब्रिटनमधल्या आपल्या तीन वर्षांच्या वास्तव्यात राजाराम मोहन रॉय यांनी भारताची प्रतिमा उंचावली . त्यांना लोक

भारताचे सांस्कृतीक दूत म्हणून संबोधू लागले. भारतातून इंग्लंडला जाणारे ते पहिले भारतीय होते .

राजा राममोहन राॅय  social reformer raja ram mohan roy यांना भारतात नव विचाराचे जनक म्हटले जात. ते कालांतराने समाज सुधारक व

धर्मसुधारक म्हणून मान्यता पावले. सत्यशोधनाच्या क्षेत्रातील कोलंबस म्हणून त्यांचा उल्लेख इतिहासकारांनी केला. पूर्व आणि पश्चिम , ज्ञान आणि विज्ञान ,

धर्म आणि संस्कृती यांच्यातला तौलानिक अभ्यासाचा पाया राजा राममोहन राॅय यांनी घातला. राजा राममोहन राॅय यांची दृष्टी अतिशय व्यापक होती.

भारताचा युरोपियन राष्ट्राशी संबंध आल्याशिवाय सांस्कृतिक दळणवळण वाढणार नाही असे रॉय यांना वाटत होते.

विज्ञानाची साक्ष आणि मानवाची सद्बुद्धी यांचा कौल मानला तर एकच निष्कर्ष निघतो तो म्हणजे अवघी मानव जात एक आहे .

मानवकुलाची एकता ही वस्तुस्थिती आहे .अशा स्थितीत भावनिक एकात्मता हाच एक धर्म ठरेल . राजा राममोहन राॅय यांनी हिंदू मुस्लिमांना

सामाजिक ऐक्याचा मार्ग दाखवला .मूर्ती पूजेचे ते कट्टर विरोधक होते. सत्यशोधनाच्या क्षेत्रातील कोलंबस म्हणून त्यांचा उल्लेख इतिहासकारांनी केला.

अनेक भाषांचा आणि विचारशाखांचा त्यांनी अभ्यास केले होता. इंग्लीश भाषांचा पायाशुध्द अभ्यास त्यांनी केला.


सतत वाचन , चिंतन यात रममाण होणारे social reformer raja ram mohan roy राजा राममोहन राॅय गर्दीतही कधी ध्यानमग्न होत असत.

आपल्या मातृभाषेला त्यांनी कायमचे उपकृत केले होते.ते बंगाली गद्याचे जनक आणि बंगाली व्याकरणाचे रचनाकार ठरले. भारतातील

असंख्य हिंदू -मुस्लिम बांधवांना राजा राममोहन राॅय यांनी विवेकाची वाट दाखवली.राजा राम मोहन राॅय यांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या महसूल

विभागात नोकरी सुरू केली. त्यांनी जॉन डिग्बीचे सहाय्यक म्हणून काम केले. तेथे ते पाश्चात्य संस्कृती आणि साहित्याच्या संपर्कात आले.

त्यांनी जैन विद्वानांकडून जैन धर्माचा अभ्यास केला आणि मुस्लिम विद्वानांच्या मदतीने सूफीवादाचा अभ्यास केला.

राजा राम मोहन रॉय यांनी सती, बालविवाहासारख्या समाजातील वाईट गोष्टींबद्दल उघडपणे लढा दिला. गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिक

यांच्या मदतीने त्यांनी सती प्रथेविरूद्ध कायदा बनविला. ते म्हणाले की सती प्रथेला वेदांमध्ये स्थान नाही. त्यानी आपल्या विरुद्ध लोकांना जाणीव करुन दिली.

लोकांच्या विचारसरणीत बदल करण्याचा त्यांनी अथक प्रयत्न केला .त्यांनी आत्मियसभा स्थापन केली आणि समाजात सामाजिक आणि

धार्मिक सुधारणांचा प्रयत्न केला.महिलांच्या मालमत्ता हक्कासह पुन्हा लग्न करण्याच्या हक्कांसाठी त्यांनी मोहीम राबविली.


सती आणि बहुविवाहाच्या प्रथेला त्यांनी कडाडून विरोध केला. समाजातील वाईट गोष्टींमध्ये बरेच मागासलेपणा होता आणि लोक संस्कृतीच्या

नावाखाली त्यांच्या मुळांकडे पाहत होते, तर राजा राम मोहन रॉय यांचा युरोपमधील पुरोगामी व आधुनिक विचारांचा प्रभाव होता. त्यांना ही

लोकांची नाडी समजली आणि मूळ डोळ्यासमोर ठेवून वेदान्तला नवीन अर्थ देण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

राजा राम मोहन रॉय यांनी शिक्षण, विशेषत: महिला-शिक्षणाचे समर्थन केले. इंग्रजी, विज्ञान, पाश्चात्य औषध आणि तंत्रज्ञानाच्या अभ्यासावर त्यांनी भर दिला.

पारंपारिक शिक्षण पद्धतीपेक्षा इंग्रजी शिक्षण चांगले आहे, असा त्यांचा विश्वास होता. १८२२ मध्ये त्यांनी इंग्रजी शिक्षणावर आधारित एक शाळा स्थापन केली.

सतीच्या वेदीवर अगनीत नारी जाळल्या जात होत्या.निष्ठुर जाती व्यवस्थेच्या अमानुष जाचक प्रथा ,बेगडी देवत्वाच्या नावाखाली स्रीला मृत्यू दंडाची

भयंकर शिक्षा देत होत्या.त्यांचे गगनभेदी आक्रोश ढोलनगारेच्या आवाजात दाबले जात होते.


मृत शरीरा सोबत जिवंत जीव जाळणेही कृतीच किती भयानक पण स्रीला आपले पती प्रेम सिद्ध करण्यासाठी सरणावर अक्राळविक्राळ आगीत झोकून द्यावे लागत होते.

राजाराम मोहन राॅय यांनी सतीची प्रथा बंद केली नसती तर सर्व स्रियांच्या सतीशिळा मशानात दिसल्या असत्या.राजा राम मोहन राॅय हे मूर्ती पूजेचे कट्टर

विरोधक होते.त्यांनी एक महत्वाची कामगिरी केली.

सतीबंदीचा कायदा केला होता. त्याच्यावर अंतिम शिक्कामोर्तब घडू नये म्हणून काही कर्मठांनी चंग बांधला .रॉय यांच्या दृष्टीने सती जाणे ही धार्मिक बाब नव्हती

तर तो मूर्तिमंत अधर्म होता व मानवतेवर कलंक होता .सतीबंदीच्या कायद्याला अंतिम मंजुरी मिळाली.या विजयाने चकित झालेली भारतीय जनता

त्यांच्या स्वागतासाठी उत्सुक असतानाच अल्पकालीन आजारानंतर त्यांचे ब्रिस्टल येथे दि. २७ सप्टेंबर १८३३ मध्ये देहावसान झाले.


अशा या social reformer raja ram mohan roy प्रबोधनकारांना जन्मदिनानिमीत्त विनम्र अभिवादन

लेखन
डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisement

More Stories
Ganesh chaturthi song - नवं गाणं ‘गजर तुझा मोरया’
Ganesh chaturthi song – नवं गाणं ‘गजर तुझा मोरया’
error: Content is protected !!
%d bloggers like this: