social worker India - Dr. Gail Omvhet social scientist
social worker India - Dr. Gail Omvhet social scientist
social worker India - Dr. Gail Omvhet social scientist

social worker India – आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या समाजशास्त्रज्ञ गेल ऑम्व्हेट

social worker India - आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या समाजशास्त्रज्ञ गेल ऑम्व्हेट - समीर मणियार

social worker India – आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या समाजशास्त्रज्ञ गेल ऑम्व्हेट

 

social worker India – आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या समाजशास्त्रज्ञ गेल ऑम्व्हेट – समीर मणियार

 

 

 

 

31/8/2021,

बुद्ध, फुले, आंबेडकर, मार्क्स विचारांची सोप्या भाषेत मांडणी करुन श्रमिक कष्टकऱ्यांच्या प्रश्नासोबत हयातभर काम केले. स्री मुक्तीचा विचार, संत साहित्य,

वारकरी तत्वज्ञानाच्या व्यासंगी अभ्यासक, आंतरराष्ट्रीय किर्तीच्या समाजशास्त्रज्ञ, श्रमिक मुक्ती दलाच्या संस्थापक सदस्या डॉ. गेल ऑम्व्हेट उर्फ शलाका पाटणकर

ह्या आज काळाच्या पडद्याआड गेल्या त्या ८१ वर्षांच्या होत्या. त्याच्या पश्चात पती डॉ. भारत पाटणकर, मुलगी प्राची, जावई तेजस्वी, नात निया असा परिवार आहे.

सांगली जिल्ह्यातील कासेगाव येथे अखेरचा श्वास घेणाऱ्या या महान विदुषीच्या समाजकार्यास आणि स्मृतीस विनम्र अभिवादन.

ज्येष्ठ संशोधक-लेखिका, स्त्री मुक्ती चळवळ, नवऱ्याने टाकून दिलेल्या परित्यक्ता स्त्रियांची चळवळ, आदिवासी चळवळीत पायाला भिंगरी लावून झपाटल्यासारखे

काम करणाऱ्या विचारवंत कार्यकर्त्या अशी social worker India गेल ऑम्व्हेट यांची ओळख होती.

डॉ. गेल मूळच्या जन्माने अमेरिकेच्या असल्या तरी त्या तेथे विद्यार्थीदशेपासूनच वेगवेगळ्या चळवळीमध्ये सक्रिय होत्या. अमेरिकेच्या साम्राज्यवादी युद्धखोर

प्रवृत्तीच्या विरोधात त्यावेळी उभ्या राहिलेल्या तरुणाईच्या चळवळीत त्या अग्रस्थानी होत्या. अमेरिकेत पदव्युत्तर शिक्षण झाल्यानंतर त्या भारतात आल्या,

वेगवेगळ्या चळवळींचा अभ्यास करत असताना त्या महाराष्ट्रात आल्या. महात्मा फुले यांनी केलेल्या संघर्षाला त्यांनी आपलेसे केले. पुढे महात्मा फुले यांच्या चळवळीवरच

त्यांनी वसाहतिक समाजातील सांस्कृतिक बंड (नॉन ब्राम्हीण मूव्हमेंट इन वेस्टर्न इंडिया) हा आपला पीएचडी प्रबंध अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया बरकली

विद्यापीठात सादर करून त्यांनी डॉक्टरेट पदवी संपादन केली. त्यांच्यापूर्वी समाजसुधारक, द्रष्टे विचारवंत महात्मा ज्योतिराव फुले यांच्या चळवळीवर भारतातील कोणीही

सखोल सविस्तर अभ्यास करून मांडणी केली नव्हती. त्यांचा हा प्रबंध देशातच नव्हे तर जगभरात अभ्यासकांना मैलाचा दगड ठरला आहे. त्यांच्या या पुस्तकामुळे

फुलेंची चळवळ पुन्हा नव्याने अधोरेखित झाली.

 

Also Visit : https://www.postboxlive.com

इतकेच नव्हे या पुस्तकामुळेच प्रभावित होऊन बहुजन समाज पार्टीचे संस्थापक नेते दिवंगत कांशीराम हे त्याकाळी सांगली जिल्ह्यातील कासेगाव येथे येऊन त्यांचे

मार्गदर्शन व सल्ला घेत असत. डॉ. गेल यांनी अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्राच्या मोहात न अडकता भारतात खासकरुन महाराष्ट्रात राहण्याचा निर्णय घेतला.

स्री-मुक्ती ळवळींचा अभ्यास करीत असतानाच क्रांतीविरांगना इंदूताई पाटणकर यांची भेट झाली. एमडीचे शिक्षण अर्धवट सोडून पूर्णवेळ चळवळीत काम

करण्याचा निर्णय घेतलेल्या डॉ. भारत पाटणकर या वादळाला आपला जीवनसाथी म्हणून निवडले आणि त्यांचा वादळी प्रवास सुरू झाला.

प्रगत राष्ट्राचे नागरिकत्त्व सोडून भारतीय नागरिकत्व स्वीकारले. डॉ. गेल आणि डॉ. भारत यांनी आपल्या निरामय आणि तितक्याच निर्भिड सहजीवनातून सावित्री

जोतिबांचा वारसा पुढे नेत पुढच्या पिढीसाठी एक नवा आदर्श घालून दिला. अफाट वाचनशक्ती, पायाला भिंगरी बांधून फिरण्याची वृत्ती यामुळे डॉ. गेल संपूर्ण

भारतभर फिरत, लिहीत राहिल्या. वेगवेगळ्या चळवळीत पुढाकारात आणि सहभागात राहिल्या आणि चळवळींच्या बौद्धिक मार्गदर्शक बनून भारतभर मांडणी करु लागल्या.

पश्चिम महाराष्ट्रात क्रांतिवीरांगना इंदूताई पाटणकर यांच्या पुढाकाराने परित्यक्ता स्त्रियांच्या चाललेल्या चळवळीच्या त्या प्रमुख राहिल्या. तत्कालीन खानापूर (जि. सांगली)

तालुक्यात दुष्काळ निर्मूलन चळवळ, दुष्काळ निर्मूलनासाठी बळीराजा धरणाची निर्मिती यासाठी झालेल्या संघर्षात नेहमीच पुढाकारात राहिल्या आहेत.

डॉ. गेल यांनी देशभरातील विविध विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम केले आहे. त्यात पुणे विद्यापीठात फुले-आंबेडकर अध्यासन प्रमुख, समाजशास्त्र विभागाच्या प्राध्यापक,

ओरिसामधील निस्वासमध्ये आंबेडकर चेअर, नोर्डीक येथे आशियाई अतिथी प्राध्यापक, इन्स्टिट्यूट ऑफ एशियन स्टडीज कोपनहेगन, नेहरू मेमोरिअल म्युझियम आणि

लायब्ररी नवी दिल्ली, सिमला इन्स्टिट्यूटमध्ये प्राध्यापक म्हणून काम केले आहे. त्या FAO, UNDP, NOVIB यांसारख्या संस्थांच्या सल्लागारही होत्या. त्यांनी ICSSR च्या

वतीने भक्ती या विषयावर संशोधन केले. दि इकॉनॉमिक अँड पोलिटिकल विकली या प्रतिष्ठित नियतकालिकात आणि द हिंदू या नावाजलेल्या इंग्रजी वृत्तपत्रामध्ये यांचे

विविध विषयावरचे लेख प्रकाशित झाले आहेत. द हिंदू यामधील लेख वाचून विरप्पन यांनीसुद्धा पत्र पाठवून त्यांचे कौतुक केले आहे.

social worker India डॉ. गेल यांची २५पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित असून, त्यात प्रामुख्याने कल्चरल रिवोल्ट इन कोलोनियल सोसायटी- द नॉन ब्राम्हीण मुहमेन्ट इन वेस्टर्न इंडिया, सिकिंग बेगमपुरा, बुद्धिझम इन इंडिया, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतीबा फुले, दलित अँड द डेमॉक्रॅटिक रिव्ह्यूलेशन, अंडरस्टँडिंग कास्ट, वुई विल स्मॅश दी प्रिझन, न्यू सोशल मुमेन्ट इन इंडिया यांचा समावेश आहे. डॉ. गेल यांनी देश आणि परदेशात अनेक संशोधन पेपर सादर केले असून शेकडो व्याख्याने दिली आहेत. त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.

समाजमनाशी एकरुप असलेल्या या महान विदुषीचे लोकपरंपरा, सामाजिक क्षेत्र आणि वैचारिक प्रबोधनाच्या चळवळीतील काम मोठे आहे.

त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण अभिवादन.

समीर मणियार,

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisement

More Stories
Artificial intelligence essay
Artificial intelligence essay – आर्टिफिशियल इंटेलिजेंस च्या माध्यमातून व्हिडीओ
error: Content is protected !!
%d bloggers like this: