ambedkar jayanti
ambedkar jayanti
ambedkar jayanti

ambedkar jayanti – डाॅ. बाबासाहेब आंबेडकर विनम्र अभिवादन 

ambedkar jayanti - डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनानिमीत्त विनम्र अभिवादन

ambedkar jayanti – डाॅ. बाबासाहेब

आंबेडकर विनम्र अभिवादन

 

 

ambedkar jayanti – डाॅ. बाबासाहेब आंबेडकर

यांच्या जन्मदिनानिमीत्त विनम्र अभिवादन

 

 

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म दिनांक १४ एप्रिल १८९१ मध्ये रामजी व भिमाबाई यांच्या पोटी झाला.

रत्नागिरी जिल्ह्यातील, मंडणगड जवळचे आंबवडे हे त्यांचे मुळ गाव . कोणाचा जन्म कोठे व्हावा हे कोणाच्या

हाती नसते. आपल्या जीवनाचा जन्मपूर्व संदर्भ नियती ठरवित असते. ambedkar jayanti जन्माबरोबर

येणाऱ्या उपाधी स्विकारुन जीवन यात्रेला माणसाला प्रारंभ करावा लागतो, असे डाॅ बाबासाहेब आंबेडकर

यांना निश्चित माहिती होते. त्यावेळच्या सामाजिक स्थितीमुळे अस्पृश्य समाजाचे जीवन मातीमोल झाले होते .

सरकारी चांगल्या नोकऱ्या, प्रतिष्ठित धंदे, अथवा पोलिस खात्यात त्यांना प्रवेश मिळत नसे. हलकी सलकी

कामे करून पोटाची खळगी त्यांना भरावी लागत होती. धार्मिक , शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक या

व्यवसायिक बंधनामुळे हा समाज अगदी माणुसकीहीन झाला होता. हिंदू समाजाचा तो घटक असूनही

अस्पृश्याला दारिद्र्यात आणि उपासमारीत जीवन जगावे लागत होते. त्या काळाच्या सामाजिक परंपरेमुळे

व विध्वंसक रुढीच्या वरवंट्याखाली हा सर्वच्या सर्व समाज रगडून ,भरडून निघाला होता. दुःख ,दारिद्र्य

आणि दास्य यांच्या चिखलात युगानुयुगे गाडून टाकला गेला होता.

थोर पुरुष राजवाड्यात जसे जन्माला येतात तसे झोपड्यातही जन्माला येतात. हे ambedkar jayanti

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलेले होते. आंबेडकरांचे अलौकिकत्व

अनन्यसाधारण होते . ज्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला त्या कुटुंबातील शंभर पिढ्या या अत्यंत वाईट

रीतीने वागविण्यात आल्या होत्या. त्यांचा स्पर्श अमंगल मानला जात होता. त्यांच्या सावलीला विटाळ

मानण्यात येई. आंबेडकरांच्या जीवनाने हे सिद्ध केले की ,पददलित जातीच्या बिजामधे उत्कर्षाची शक्ती

नष्ट झालेली नाही. त्यांच्या ठायी असलेले धैर्य ,पौरूष आणि सद्गुण जिवंत आहेत. त्याचा हा भरभक्कम

पुरावा आहे. जो मनुष्य आपल्या व्यक्तित्वाचा विकास अखंड उद्योग, व्यासंग,तळमळ, कळकळ,अलौकिक

धैर्य आणि स्वार्थत्याग या गुणांवर करावयाचा निर्धार करतो त्याच्या मार्गात वर्गाची, जातीची ,विशेष

अधिकाराची व श्रीमंतीची धोंड आड येऊ शकत नाही.

समाज बदलासाठी सचोटीची आणि बुद्धिमान माणसे पाहिजेत .आपल्या अन्य बांधवांचे विषयी ज्यांना

आदर वाटतो,आणि साचेबंद निर्बंधापासून मुक्त अशा समाजव्यवस्थेचा आदर्श ज्यांच्या डोळ्यापुढे असतो ,

अशी बुद्धिनिष्ठ आणि स्वाभिमानी माणसे हे जग घडवू शकतील असा विश्वास आंबेडकरांना वाटत होता .

पददलित मानवांना त्यांचे जीवन हे धडे देत आहे.जो वर्ग व्यक्तीचा उत्कर्ष आणि कामगिरी ही विशिष्ट

वर्गाची मत्ता आहे असे समजतो त्या वर्गाच्या मग्रुरीवर डाॅ. बाबासाहेबआंबेडकरांनी निर्दयपणे प्रहार केले.

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांसारखा पुरुष पुन्हा होणार नाही .कारण’ तिरस्करणीय गुलामगिरी आणि

अमानुष अन्याय यांच्या गर्तेत पिचत पडलेल्या या समाजात मी जन्मास आलो आहे त्या समाजाची

गुलामगिरी नष्ट करण्यात मी अपेशी ठरलो तर स्वतःला गोळी घालीन ,अशी घनघोर प्रतिज्ञा आंबेडकरांनी

केली होती. स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेनुसार अस्पृश्यतेचे उच्चाटन झाले आहे. ती प्रतिज्ञा पूर्ण झाली.

स्वप्न साकार झाले. आपली महत्वकांक्षा सफल झाली. गुलामगिरी नष्ट झाली. त्यांनी असे अभिवचन दिले होते.

ते त्यांनी आपले बोल खरे करून दाखवले.

ambedkar jayanti बाबासाहेब आंबेडकर यांचे पुस्तकावर अतिशय प्रेम होते .आपल्या ग्रंथाविषयी

भावना व्यक्त करताना ते म्हणतात ,”सगळ्या जगाने मला दूर लोटले तेव्हा माझ्या ग्रंथांनी मला धीर दिला.

प्रकाश दिला, दिशा दिली. माझे डोळे अधू झाल्यामुळे माझ्या वाचनात खंड पडला , तर माझ्या जीवनातील

स्वारस्यच संपेल .माझ्या दुर्दैवाने कधी घरावर जप्ती आली, दागदागिने आणि मौल्यवान वस्तू लिलावात

निघाल्या तरी मी ते सहन करीन. पण.  पण माझ्या ग्रंथांना कोणी हात लावला तर जीवाच्या कराराने मी तो हात कलम करेल.

अशा रीतीने विश्वभुषण आंबेडकर यांच्या आलौकिक जीवनाने भारतात दलित वर्गाला ज्ञानाचे एक नवीन तीर्थ निर्माण झाले. या भक्तांसाठी नवीन प्रेरणेचे एक केंद्र जन्मास आले आहे. त्या जीवनातून एक नवी देवता अवतरली आहे. आणि ह्या मंदिरमय देशातील त्या देवतेच्या मंदिरातील तो नंदादीप जगातील कुठल्याही कोपऱ्यातून प्रकाशत असलेला दिसतो आहे. ज्ञानाचे एक नवे विद्यापीठ जन्मास आले. काव्याला एक नवे स्फूर्तिस्थान लाभले आहे. यात्रेसाठी एक नवीन तीर्थ निर्माण झाले .तसेच वांग्म;याला एक नवीन संधी लाभली आहे. अमर कृती करतात ते असेच देवपण पावतात.
अशा या महामानवाला जन्म दिना निमित्त विनम्र अभिवादन

लेखन
डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर
( इतिहास अभ्यासक)

Advertisement

More Stories
sambhaji maharaj
sambhaji maharaj – सरनोबत म्हाळोजीबाबा घोरपडे
error: Content is protected !!
%d bloggers like this: