shrinivas khale
shrinivas khale
shrinivas khale

shrinivas khale – तो राजहंस एक ! – भारतकुमार राऊत

shrinivas khale - तो राजहंस एक ! - भारतकुमार राऊत

shrinivas khale – तो राजहंस एक ! – भारतकुमार राऊत

 

shrinivas khale – – तो राजहंस एक ! – भारतकुमार राऊत

 

 

संगीताचे मनाजोगते काम मिळत नाही व उदरनिर्वाहाचे दुसरे साधन नाही, म्हणून वैफल्यग्रस्त होऊन

घरातील हार्मोनियम विकायला निघालेल्या एका जन्मजात संगीत दिग्दर्शकाला अचानक कळले की,

shrinivas khale ‘…तो राजहंस एक!’ !

त्या राजहंसाने मग मागे वळून पाहिलेच नाही. भावगीत व भक्तीगीतांच्या दुनियेत स्वत:चे आगळे वेगळे

स्थान व ओळख केवळ स्वत:च्या प्रतिभेच्या व कष्टाच्या जोरावर निर्माण करणाऱ्या shrinivas khale

श्रीनिवास खळे यांचा आज जन्मदिन.


Get your winter fashion

‘खळेकाका` (त्यांचे निकटवर्तीय त्यांना याच नावाने ओळखत) आज आपल्यात असते, तर त्यांचा ९५ वा

वाढदिवस आपण साजरा केला असता. पण आठ वर्षांपूर्वीच काळाने त्यांना आपल्यातून ओढून नेले

आणि मागे उरल्या केवळ त्यांनी सजवलेल्या धुंद संगीत मैफिलींच्या आठवणी आणि त्यांनी स्वरबद्ध

केलेली सुमधूर गाणी.

आताच्या गुजरातमधल्या बडोद्यात १९२६साली आजच्याच दिवशी हा गंधर्व ईहलोकी अवतरला.

संगीताच्या जन्मजात आवडीमुळे त्यांनी महाराजा सयाजीराव विद्यापीठात संगीत विभागात प्रवेश

मिळवून पदविका घेतली. आग्रा-ऐत्रोली घराण्याचे पंडित मधुसूदन जोशी यांच्या तालमीत ते तयार झाले.

बडोदा आकाशवाणीत काही काळ नोकरी केल्यानंतर ते हिंदी चित्रपटसृष्टीच्या ओढीने ते मुंबईत आले खरे,

पण त्यांनी उभ्या हयातीत जेमतेम सहा चित्रपटांना संगीत दिले.

या सृष्टीत संगीताशी जी तडजोड करावी लागते, ती त्यांना मान्य नव्हती व मानवतही नव्हती. त्यामुळेच

वैफल्यग्रस्त होऊन संगीताची करियर सोडून देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. पण पत्नीच्या आग्रहामुळे

त्यांनी हार्मोनियम विकली नाही.


Get your winter fashion

याच काळात त्यांचा दत्ता कोरगावकर (के. दत्ता) या तेव्हाच्या प्रख्यात संगीतकाराशी परिचय झाला व shrinivas khale खळेकाकांनी के. दत्ता यांचा सहाय्यक म्हणून काम करण्यास सुरूवात केली. काही मराठी चित्रपटांचे स्वतंत्रपणे संगीत दिले खरे, पण ते सर्व चित्रपट डब्यातच राहिले.

अत्यंत कठीण अशा आर्थिक व मानसिक स्थितीशी सामना करत असतानाच १९५२ मध्ये त्यांच्या हाती ग. दि. माडगूळकर यांनी लिहिलेली ‘गोरी गोरी पान’ व ‘एका तळ्यात होती बदके पिले सुरेख’ ही दोन गाणी आली. खळेकाकांनी ती स्वरबद्ध केली. गदिमांच्या शब्दाखातर ‘एचएमव्ही’ या प्रख्यात कंपनीने त्याची स्वतंत्र रेकॉर्ड काढली. ती तुफान लोकप्रिय झाली.

१ मे १९६० हा महाराष्ट्र स्थापनेचा दिवस. या कार्यक्रमासाठी कविवर्य राजा बढे यांनी दोन गीते रचली. खळेकाकांनी रात्रभर मेहनत घेऊन त्यांना चाली दिल्या. त्यातील शाहीर साबळे यांनी गायलेले ‘जय जय महाराष्ट्र माझा’, हे गीत जणू महाराष्ट्राचे राष्ट्रगीत बनले. दुसरे गीत ‘जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, ‘जय जय राष्ट्र महान’, या गीतालाही अमाप लोकप्रियता लाभली.

१९६८ मध्ये खळेकाकांना ‘एचएमव्ही’ने नोकरीत सामावून घेतले.. तिथे त्यांची संगीत कारकीर्द अधिकच बहरली. १९७३ मध्ये ‘अभंग तुकयाचे’ ही रेकॉर्ड त्यांनी लता मंगेशकर यांच्या स्वरांत तर ‘अभंगवाणी’ पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरांत गाऊन घेतली. दोन ‘भारत रत्न’ गायकांकडून गाणी गाऊन घेण्याचा अनोखा विक्रम खळेकाकांच्या नावावर नोंदला गेला. नंतर त्यांनी या दोघांनाही एकत्र आणून ‘श्याम गुणगान’ ही भक्तीगीतांची रेकॉर्ड मुद्रित केली.


Get your winter fashion

एका बाजूला लताबाई, पं. भीमसेन यांच्यासारख्या दिगंत कीर्तीच्या गायकांकडून गाणी गाऊन घेत असतानाच खळेकाकाकांच्या आजुबाजूला तरुण संगीतकार व गायकांचा वेढा कायमच असायचा. कविता कृष्णमूर्ती, वीणा सहस्त्रबुद्धे, उल्हास कशाळकर, शंकर महादेवन यांच्यापासून कमलेश भडकमकर, अजित परब यांच्यासारख्या नव्या दमाच्या संगीतकर्मींबरोबर त्यांनी काम केले.

केवळ सहाच चित्रपटांना त्यांनी संगीत दिले हे खरे असले, तरी त्यातील अनेक गाणी केवळ चालींमुळे अजरामर झाली. ‘आई आणिक बाबा यातून कोण आवडे अधिक तुला’, ‘देवा दया तुझी रे शुद्ध दैवलीला’ (बोलकी बाहुली), ‘लळा जिव्हाळा शब्दच खोटे’, ‘प्रिया तुज काय दिसे स्वप्नात’, ‘या चिमण्यांनो परत फिरा रे’, `चंदाराणी का गं दिसतेस थकल्यावणी’ (जिव्हाळा) ही गीते तुफान लोकप्रिय झालीच. शिवाय अरुण दाते व सुधा मल्होत्रा यांनी गायलेले ‘शुक्रतारा मंद वारा’ हे युगुल गीत पन्नास वर्षांनीही रसिकांच्या मनात टवटवीत राहिले. ह्रदयनाथ मंगेशकरांनी गायलेले ‘लाजुन हासणे अन् हसून हे पहाणे’ या प्रेमविव्हळ गीताने तर अनेक प्रेमवीरांच्या भावनांना स्वर दिला.

खळेकाकांना अनेक पुरस्कार मिळाले. सूरसिंगार, महाराष्ट्र सरकारचा जीवनगौरव असे अनेक पुरस्कार त्यांच्या वाट्याला आलेच, शिवाय २०१० मध्ये भारत सरकारने ‘पद्मभूषण’ पुरस्काराने त्यांच्या संगीतमय वाटचालीचा गौरव केला.

shrinivas khale खळेकाकांचे वृद्धापकाळाने आलेल्या अल्प आजारात २ सप्टेंबर २०११ रोजी मुंबईत निधन झाले. संगीतासाठीच उभी हयात आनंदात घालवणारा एक स्वरगंधर्वच पुन्हा स्वर्गातील मैफिली सजवण्यासाठी मार्गस्थ झाला !

त्यांच्या संगीतमय स्मृतींना वंदन !


Get your winter fashion

 

– भारतकुमार राऊत

Advertisement

More Stories
Sunil Datt भारतकुमार राऊत
Sunil Datt – भोला ‘पडोसन’ !
error: Content is protected !!
%d bloggers like this: