Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

News

maharashtra chief minister – महाराष्ट्राची भावी महिला मुख्यमंत्री ?

1 Mins read

maharashtra chief minister –

महाराष्ट्राची भावी महिला मुख्यमंत्री ?

 

maharashtra chief minister – महाराष्ट्राची भावी महिला मुख्यमंत्री ?

भाग – २ मुलाखत : सौ. उज्ज्वला सुशीलकुमार शिंदे

 

 

 

 

झालेल्या चुकांतूनच मार्ग काढत
उज्ज्वल भविष्य घडविता येते !!

सौ. उज्ज्वला सुशीलकुमार शिंदे

 

महाराष्ट्राची महिला / स्त्री मुख्यमंत्री कोण असू शकते ? मला मात्र यासाठी उज्ज्वलाताईंची अर्थात उज्वला सुशीलकुमार शिंदे यांची मुलाखत अत्यंत महत्त्वाची वाटत होती, अशा विषयासाठी उज्वला ताईंची मुलाखत घेतली नाही तर अशा विषयाला घेऊन काहीच फायदा नाही. अत्यंत साध्या, सोज्वळ व मनमिळावू, उज्ज्वलाताईबद्दल खुप काही ऐकले होते; म्हणूनच त्यांच्याशी दिलखुलास गप्पा मारण्याची संधी या विषयामुळे मिळाली. मुलाखत लांबणार नाही असे असताना फक्त वेळेचा प्रश्न होता, तरी देखील मुलाखत लांबली. भेटण्याचा प्रश्न होता तो देखील सुटला त्यांच्या बंगल्यावर आमची भेट झाली, या भेटीतून मला भावलेल्या maharashtra chief minister उज्ज्वलाताई. सुरुवातच ओळख, भेट आणि लग्न, शिक्षण हेच नेहमीप्रमाणे. वाचकवर्गाला या सर्व माहिती आणि चर्चेचे आकर्षण असतेच त्यामुळे आपसूकच प्रश्न चहा घेता घेता बिस्किटांसोबत सुरु झाले कारण चहा बिस्किटवाले पत्रकार विरोधी पक्षाने माध्यमांसोबत सर्वसामान्य माणसाला सुद्धा कोणत्याच किंमतीचा ठेवला नाही.

साहेबांची अर्थात सुशिलकुमार शिंदे व उज्ज्वला वैद्य यांची भेट १९६७-६८ सालची. माँटेसरी टीचर म्हणून ट्रेनिंग पूर्ण केलेल्या उज्ज्वलाताईंनी आयुष्याचा जोडीदार म्हणून रांगड्या व्यवसायातील मृदू माणसाची निवड केली. सुशिलकुमार शिंदे तेव्हा पोलिस खात्यात होते. आजवरचं आयुष्य सरधोपट मार्गांनी गेलेलं. अशा वेळेकाळाचं बंधन नसलेल्या व्यवसायातल्या वक्तीशी लग्न आणि लग्नानंतर दोनच वर्षात सुशीलकुमारांनी नोकरी सोडून सक्रिय राजकारणात यायचं ठरवलं, अशा वेळी नवविवाहित स्त्री ला जे वाटेल ते मलाही वाटलं. आता पुढे काय कसे व्हायचे, पण जोडीने जगायचं ठरवलं आहे तर जे होईल ते होईल पण साहेबाना तिकीट मिळालं आणि ते रद्दही झालं. मग त्यांनी वकिली सुरु केली. १९७४ साली झालेल्या पोटनिवडणुकीत पुन्हा संधी चालून आली आणि maharashtra chief ministerसुशीलकुमार शिंदे थेट राज्यमंत्रीही झाले. “या चार वर्षात आपणास खूपच तणाव जाणवला असेल नाही का?” “खरं सांगू का ? तेव्हा विचार करायला वेळच मिळाला नाही. वय लहान, माझी मोठी मुलगीही तेव्हा अगदी लहान होती. घरात सासू व सासरे होते. घरचं करण्यात वेळ कसा जायचा कळायचंही नाही आणि राजकारण तेव्हा आजच्याइतकं भयंकर वगैरे वाटायचं नाही.

तेव्हाचं वातावरण फार छान आणि साधं होतं. असुरक्षितता म्हणाल तर तेवढी नाही वाटली. फक्त नोकरी सोडल्यानंतर क्वाटर्स सोडावे लागले. घराचा प्रश्न निर्माण झाला; पण तेव्हा जागांचा प्रश्न एवढा बिकट नव्हता, शिवाय त्यांच्या धडपडीबद्दल खात्री आणि प्रामाणिकपणावर विश्वास होताच. हाच विश्वास कुटुंब घडवायला कारणीभूत होतो. राजकारणात तर शिंतोडे उडवणं चालतंच वेगवेगळे आरोप-प्रत्यारोप होत राहतातच. त्याने आपण डिस्टर्ब व्हायचं नाही, हे एक पथ्य सांभाळावं लागतंच आणि असे विषय आम्ही घरात शक्यतो काढतच नाही. ‘ते’ तर जराही चिंतेत असले, की अधिक गप्प होतात. मुली किंवा नातवंडं सोबत असली की
मग थोडे खुलतात.” “विविध प्रकारच्या भूमीका निभावत मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहोचणाऱ्या
व्यक्तिस सांभाळताना आपली नक्कीच कसोटी लागली असणार? “खरं सांगायचं म्हणजे ते तसे खूपच शांत आहेत. आरडाओरडा, चिडचीड त्यांच्या स्वभावातच नाही. शिवाय आपण ज्या घरात राहतो ते घरपण टिकून ठेवणं फार महत्त्वाचं आहे. घरातही जर सतत राजकारणाचे विषय होत राहिले, तर घराचं ऑफिसच होऊन जाईल.””मुख्यमंत्र्याची पत्नी म्हणून आपण काही अधिकाराचा उपयोग करुन घेतला होता का ?” उगाच फिरकी घ्यावी म्हणून विचारता झालो. “रोज अकरा ते दोन ही वेळ मी अभ्यागतांना भेटण्यासाठी राखीव ठेवली होती.

लोक अनेक कामे घेऊन यायचे. नोकरी मागणारे, आश्रमशाळांसाठी मदत मागणारे, मतदार संघातली गा-हाणी सांगणारे. जेवढे शक्य असेल तेवढे मी करत होती. सगळीच कामं होत होती असे नाही. अनेक जण आपल्या स्वार्थासाठी गोड बोलायचे. तुम्ही नुस्ती सही करा म्हणायचे. अशा वेळी डोकं शांत ठेवावं लागायचे मी हात जोडून सांगायचे, “मी सरकारी अधिकारी नाही. सही करण्याचा मला अधिकार नाही. मी सही करणार नाही.” चालत आलेल्या अधिकारांचा दुरुपयोग सोडाच, परंतु उज्ज्वलाताई आपले उपलब्ध अधिकारही पूर्णपणे वापरत नसायच्या हे त्यांच्या बोलण्यातून प्रतीत झाले. “जुन्या मैत्रिणीशी आपलं नातं अजूनही टिकून आहे का?” “हो, माझ्या सगळ्या जुन्या मैत्रिणींशी आजही पूर्वीचच नातं आहे. सासरचे सारे नातेवाईक पूर्वीपासूनच maharashtra chief minister सुशीलकुमारांना भेटण्यापूर्वी उज्ज्वलाताईंना भेटतात; कारण हे नातेसंबंध टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी तसे कष्ट घेतले होते. आजही त्या सर्वांना एकत्र जेवायला बोलावतात. “वलयात जगणं माझ्या फारसं मनास येत नाही, कदाचित मुंबईत वाढल्यामुळे असेल. मी शॉपिंगला जाते, नाटक-सिनेमा बघते. तेव्हा मी सरकारी गाडी वापरत न्हवती. पोलीस संरक्षणही घेत नसायची. मुख्यमंत्र्यांची बायको आहे, याचं टेन्शन मीच सदासर्वकाळ वागवत राहिले तर मी माझं आयुष्य जगायचं कधी ? अजूनही स्वतःला सर्वसामान्य नागरिकच मानते. अर्थात हे ‘सर्वसामान्य’ आयुष्य तशा अर्थानं सामान्य नाहीच. हा काटेरी मुकुट आहे.

कोणत्याही परिस्थितीत तोल ढळता कामा नये. ‘घर’ हा प्रत्येक स्त्रीचा जिव्हाळ्याचा विषय. ‘वर्षा’ सारखं घर मात्र पूर्णार्थांनं घर मानता येत नाही. ते सरकारी आहे याच कायमचं आपलं नाही हे भान त्यावेळी सुद्धा कधी विसरली न्हवती. कधी ना कधी सोडावं लागणारच. हे भान सतत ठेवावं लागलं होते तेव्हा शेवटी तेच झाले. पाय जमिनीवर असतील तरच हे शक्य होते.” “आपण मुख्यमंत्र्यांच्या पत्नी होता यात आपणास काही वेगळेपण जाणवते का सध्या तरी ?” “मी सध्या जरीmaharashtra chief minister मुख्यमंत्र्यांची पत्नी असली असती तरी पूर्वीच्या माझ्या वागण्यात आणि आताच्या रुटीनमध्ये कोणताही बदल झालेला मला तरी जाणवला नाही आणि जाणवणार नाही. साहेब जरी मुख्यमंत्री होते तेव्हा आणि आज पत्नी म्हणून माझ्या जबाबदारीत कोणत्याही प्रकारचा बदल झालेला नाही. यात सर्वसामान्यांपेक्षा वेगळे असे काहीच नाही. साहेब आता मुख्यमंत्री
नसले तरी माझी घरकामाची आवड तेव्हा आणि अजूनही कमी झालेली नाही.

दैनदिन वापराच्या गोष्टी आणण्यास उदा. – किराणामाल, भाजीपाला मी अजूनही बाजारात जाते; कारण स्वतः खरेदी करण्यात एक वेगळाच आनंद असतो. तो आनंद व ते समाधान मिळविण्यासाठी मी स्वतः बाजारात जाते या सर्व गोष्टी आणण्यासाठी मीच जायला पाहिजे असे
काहीच नाही; परंतु स्वतः एखादी गोष्ट पारखून खरेदी करण्यात एक वेगळाच आनंद असतो. राजकारणात येण्यापूर्वी साहेब पोलीस दलात होते तेव्हा तर त्यांना अजिबातच वेळ मिळत नसे. वेळी अवेळी ड्युटीवर जावे लागे. त्यामुळे घरातील संपूर्ण जबाबदारी माझीच असे आणि तिच सवय अजूनही आहे. साहेब राजकारणात आले त्यावर आपली प्रतिक्रिया काय होती?” पोलीस खात्यातील चांगली नोकरी सोडून राजकारणात जायचं उरवलं तेव्हा किंचित अस्वस्थ वाटलं होतं. राजकारण हे नेहमी अस्थिर असतं. त्यामुळे सुरिक्षत नोकरी सोडून अस्थिर राजकारणात साहेब
प्रवेश करणार म्हटल्यावर थोडसं मन चलबिचल झालं होतं; परंतु साहेब अत्यंत विचारी आहेत. ते निर्णय घेणार तो योग्यच असणार याची मला खात्री होती. maharashtra chief minister साहेबांनी जवळजवळ तीस वर्षापूर्वी राजकारणात प्रवेश केला आहे. त्यामुळे या राजकारणी जीवनाची मला सवयच होऊन गेलेली आहे. त्यामुळे आता कसलाच त्रास आम्ही मानून घेत नाही.” “साहेबांच्या कार्यात आपली कितपत मदत होते ? “सुरुवातीला घराच्या जबाबदारीतून वेळ मिळत नव्हता; परंतु आता मुली मोठ्या झाल्या आहेत.त्यामुळे भरपूर वेळ मिळतो. साहेबांच्या कार्यात मी थोडीफार मदतही करायला सुरुवात केली आहे. सोलापूरला अधूनमधून जाऊन येते, कार्यकर्त्यांना भेटणे, लोकांना भेटणे, त्यांचे प्रश्न ऐकून सोडवण्यासाठी मदत करणे, मला जेवढे शक्य आहे तेवढे करण्याचा मी प्रयत्न करते. मध्ये सोलापूरला गेले होते तेव्हा काही झोपड्यांना आग लागल्याचं समजलं. मी स्वतः तेथे जाऊन सर्वपरिस्थितीची पाहणी केली होती. त्या लोकांचे विस्कटलेले संसार पाहून मन विषण्ण झाले होते. त्या सर्वांना मदत केल्यावरच मनाला समाधान वाटले. अनपेक्षितपणे चालून आलेल्या maharashtra chief minister मुख्यमंत्रिपदाकडेदेखील आम्ही जनसेवेची संधी म्हणूनच पाहिले होते. त्यांची ही कारकीर्द कुठल्याही राजकारणबाह्य कारणामुळे वादग्रस्त होऊ द्यायची नाही, याबाबत आमच्यात खूपच वैचारिक सामंजस्य असायचे. ‘वर्षा’ या निवासस्थानात आपल्याला काय वेगळेपण जाणवले होते तेव्हा ?” “शिंदेसाहेब गेली चाळीसएक वर्षे राजकारणात सक्रिय असल्याने त्यांच्यासोबत रॉयलस्टोन आदि अनेक सरकारी बंगल्यात कैक वर्ष राहण्याची संधी मिळाली; पण ‘वर्षा’ या मुख्यमंत्री-निवासाची शान काही औरच आहे ! मुंबईत राहूनही मुंबईबाहेरच्या एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी प्रशस्त डाकबंगल्यात अलिशानपणे राहतोय अशी सुखद भावना असायची. ‘वर्षा’ मागची अर्धचंद्राकृती ताडा-माडा देवनारांनी सजलेली बाग इथल्या भाग्यशाली रहिवाशांना सुखद भावना देत असते. त्यामुळेच महाराष्ट्राच्या राजकारणातलं सर्वोच्च पद आपल्या पतीलाही लाभावं आणि कधीतरी आपणही ‘वर्षा’ वासी व्हावं असं गुलाबी स्वप्न प्रत्येक राजकारण्यांच्या पत्नीप्रमाणे मी देखील १९७० साली विवाहबद्ध झाल्यापासून अनेकदा पाहिले होते. सुदैवाने (सोनीयाजी) मॅडमच्या आशीर्वादाने ते स्वप्न प्रत्यक्षात साकारले. साहेबांनी १८ जानेवारीला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती तेव्हा आणि फेब्रुवारीच्या आरंभी आम्ही येथे राहायला आलो त्यावेळी दुसरं . एक स्वप्न पुरे झाले होते, पहिलं ते मुख्यमंत्री झाले.  “साहेब आपल्याला कितपत वेळ देतात?” “साहेब मुख्यमंत्री झाले तेव्हा तरी आमच्या वैयक्तिक आयुष्यात फार काही फरक पडलेला नव्हता. साहेबांना घरचं जेवण खूप आवडतं. त्यामुळे रात्री कितीही उशीर झाला तरी ते जेवायला घरीच यायचे आणि आताही घरीच येतात. कधी बाहेर जेवणार असतील तर फोन करुन ते अगोदरच कळवतात. मुख्यमंत्री कोणीही असो त्यांना काम तर खूपच करावे लागते. साहेबही त्याला अपवाद न्हवते. सकाळी सहाला आमचा दिवस सुरु व्हायचा, तो रात्री उशिरापर्यंत. ते एकटे कधी येतच नाहीत. बरोबर फायलींचा डोलारा असायचा. काम बघत बघत बघत ते आमची चौकशी करायचे. सारे कसे डोळ्यासमोर आजही दिसत आहे.

“आपल्याकडे गणपती उत्सव जोरदार असतो ?” “साहेब लहान असल्यापासून सोलापूरच्या घरात गणपती येतो. तिथे एक वेगळीच पद्धत आहे. पूजलेली मूर्ती त्याचवर्षी अनंत चतुदर्शीला विसर्जित न करता केवळ सोबतची छोटी मूर्ती शिळवतात आणि पुढील गणपतीला नवी मोठी मूर्ती घरी आली की, गतवर्षीची मोठी मूर्ती विसर्जित करतात. माहेरीही दीड दिवसांचा गणपती बसायचा. त्यामुळे मलाही गणेशपूजनाची आवड होतीच. लग्नानंतर सासूबाईंनी घरच्या गणेशपूजनाची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे आणि मीही ती आनंदाने व मनोभावे पार पाडते. शेवटी त्याच्या आशीर्वादाने तर हे सारं सुख आम्हांला लाभलंय ना ! दहा दिवस श्रींच्या आरासासाठी ताज्या फुलांचा वापर मात्र ती सढळ हाताने करते. तिथे मी पैशासाठी खळखळ करत नाही. भुलेश्वरचा माझा मारुती फुलवाला कायमचा ठरलेला आहे. दोन मोठ्या मुलींच्या लग्नातील पुष्परचना त्यानंच केली होती. त्यावेळी मी घाबरुन त्याला विचारलं होतं, ए बाबा, तू उगाच मुख्यमंत्रीन म्हणून अव्वाच्या सव्वा बिल तर लावणार नाहीस ना ? तर त्यावर तो हसून नकार देत म्हणाला, उलट तुमच्यामुळं यंदा मला मुख्यमंत्री-निवासावर श्रींच्या सेवेची संधी लाभली याबद्दल मी आपला ऋणी आहे.अशा सर्व आठवणी उज्वला ताई सांगत होत्या आणि आम्ही जवळजवळ ताटातील सर्व बिस्किटे संपवून टाकली होती. सगळ्यांच्या आयुष्यात बरेवाईट अनुभव येतच असतात. माझ्या जीवनातही असे बरेवाईट अनुभव आलेले आहेत; पण झालेल्या चुकांतूनच मार्ग काढत आपल्याला उज्ज्वल भविष्य घडविता येते. त्याप्रमाणे मी प्रयत्न करीत राहणार आहे.” महाराष्ट्राला maharashtra chief minister स्त्री मुख्यमंत्री म्हणून उज्वला ताई लाभल्या तर नक्कीच सुशीलकुमार शिंदे साहेबांची त्यांच्या कर्तव्याची प्रचिती आताच्या पिढीला ताईंमुळे नक्कीच लाभेल आणि अशा सामाजिक, प्रशासकीय कामकाजाची जाण ठेवणारे अनुभवी नेतृत्व महाराष्ट्र पुन्हा अनुभववेल यात वाद नाही.

 

Also Read : https://www.postboxindia.com/strongest-women-of-maharashtra/

 

 

PostboxIndia Editorial 

www.postboxindia.com

www.postboxindia.com

Leave a Reply

error: Content is protected !!