suez canal on world map
suez canal on world map
suez canal on world map

suez canal on world map – सुएझ कालव्याची पायाभरणी

suez canal on world map - सुएझ कालव्याची पायाभरणी २५ एप्रिल १८५९ रोजी झाली.

suez canal on world map – सुएझ कालव्याची पायाभरणी

 

suez canal on world map – सुएझ कालव्याची

पायाभरणी २५ एप्रिल १८५९ रोजी झाली.

 

 

१० वर्षांनी १७नोव्हेंबर १८६९ रोजी “सुएझ कालवा वाहतुकीसाठी खुला झाला

” सुएझ कालवा ” अरबी नाव कनात ॲस-सुवेस. ईजिप्तच्या सुएझ संयोगभूमीतून खोदलेला एक

कालवामार्ग. उत्तर-दक्षिण गेलेल्या १६२ किमी. लांबीच्या या कालव्यामुळे उत्तरेकडील भूमध्य समुद्र व

दक्षिणेकडील सुएझ आखात-तांबडा समुद्र एकमेकांना जोडले गेले आहेत.

तसेच या कालव्यामुळे suez canal on world map आफ्रिका खंड आशिया खंडापासून अलग झाला आहे.

कालव्याच्या पश्चिमेस नाईल नदीचा त्रिभुज प्रदेश तर पूर्वेस सिनाई द्वीपकल्पाची उंच, ओबडधोबड व

शुष्क भूमी आहे. कालव्याच्या उत्तर टोकाशी पोर्ट सैद तर दक्षिण टोकाशी सुएझ (पोर्ट तौफीक) बंदर आहे.

कालव्यातील पाण्याची पातळी दोन्ही बाजूंकडील समुद्रातील पाण्याच्या पातळीबरोबर ठेवण्यात आलेली

असल्यामुळे त्यात जलपाशांचा वापर करावा लागत नाही. हा कालवा झाल्यामुळे जहाजांना अटलांटिक

महासागरातून भूमध्य समुद्र, तांबडा समुद्र व अरबी समुद्रामार्गे थेट हिंदी महासागरात जाता येते. हा

कालवा होण्यापूर्वी यूरोपकडून आग्नेय आशियाकडे जाणाऱ्या जहाजांना आफ्रिकेच्या दक्षिण टोकावरील

केप ऑफ गुड होपमार्गे संपूर्ण आफ्रिका खंडाला वळसा घालून जावे लागे.

 

 

जगाच्या साधारण suez canal on world map मध्यातून जाणाऱ्या या कालव्यामुळे प्रामुख्याने पश्चिम यूरोपीय देश आणि पूर्व आफ्रिका, आग्नेय आशिया, ओशिॲनिया यांदरम्यानचा जवळचा जलमार्ग उपलब्ध झाला आहे. केप ऑफ गुड होप सागरी मार्गाच्या तुलनेत या मार्गाने लंडन–मुंबई यांमधील अंतर सु. ७,१७८ किमी.ने कमी झाले आहे. साहजिकच इंधनाचा खर्च कमी झाला. वाहतुकीचे भाडे व वेळ वाचून व्यापाराची वृद्घी झाली.

इसवी सन पूर्व विसाव्या किंवा एकोणिसाव्या शतकांत ईजिप्तच्या राजांनी नाईल नदी व तांबडा समुद्र यांना जोडणारा पश्चिम-पूर्व कालवा काढलेला होता; परंतु तो दुरुस्तीअभावी निरुपयोगी झाला. त्यानंतर फेअरो नेको (इ. स. पू. सु. ६००), डरायस द ग्रेट (इ. स. पू. सु.५००) व दुसरा टॉलेमी (इ. स. पू. सु.२५०) वगैरे राजांनी या कालव्याच्या पुनःखुदाईचे काम हाती घेतले होते.

पंधराव्या शतकात suez canal on world map व्हेनेशियनांनी, तर सतराव्या शतकात फ्रेंचांनी, सुएझ संयोगभूमीतून भूमध्य समुद्र व सुएझ आखात यांना कालव्याने जोडता येईल, अशी कल्पना मांडली होती. परंतु त्याचा पाठपुरावा केला गेला नाही. पुढे अठराव्या शतकाच्या अखेरीस पहिला नेपोलियन (१७६९–१८२१) हा ईजिप्तच्या मोहिमेवर असताना त्याला तांबडा समुद्र व भूमध्य समुद्र जोडण्याची कल्पना सुचली.

इ. स. १८३० च्या दशकात ईजिप्तमध्ये राजदरबारी असलेल्या फर्दिनान्द द लेसेप्स (१८०५–९४) या फ्रेंच मुत्सद्दी व अभियंत्याच्या प्रयत्नांनी या संकल्पनेस चालना मिळाली. त्याने ईजिप्तचे राज्यपाल सैद पाशा याजकडून दोन सवलती मिळविल्या आणि फ्रान्स हा कालवा बांधून देण्यास तयार असल्याचे सांगितले. त्यानुसार सुएझ कॅनल कंपनीची स्थापना झाली (१८५८). तिच्याद्वारे कालव्याचे खोदकाम व बांधकाम पूर्ण झाल्यानंतर हा कालवा सर्व देशांसाठी वाहतुकीला खुला ठेवावा आणि ९९ वर्षांच्या कराराने कंपनीने जकात कराचे उत्पन्न घ्यावे, असे ठरले.

कालवा खणताना गुंतागुंतीच्या तांत्रिक अडचणी उद्‌भवल्या. suez canal on world map तसेच ग्रेट ब्रिटनसारख्या देशांनी काही राजकीय समस्या निर्माण केल्या; पण या सर्वांवर मात करून लेसेप्स याच्या देखरेखीखाली अकरा वर्षांत (१८५९–६९) या कालव्याचे काम पूर्ण झाले. त्याच्या जलप्रवाहात मॅन्झाला, टिमसाह, ग्रेट बिटर व लिटल बिटर या मधल्या सरोवरांचा अभियंत्यांनी चपखल उपयोग करून घेतला आहे.

या सरोवरांपैकी टिमसाह सरोवराकाठी असलेल्या इझमेअलिआ शहरात कालव्याची ( सुएझ कॅनल ऑथॉरिटी ) सर्व प्रशासकीय कार्यालये आहेत. हा कालवा पूर्ण होण्यास ९,२४,१४,००० डॉलर खर्च आला.

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisement

More Stories
film school in India - filmagic.in
film school in India – ‘फिल्मॅजिक’ फिल्म स्कुल
error: Content is protected !!
%d bloggers like this: