swami ramkrishna paramhans
swami ramkrishna paramhans
swami ramkrishna paramhans

swami ramkrishna paramhans – रामकृष्ण परमहंस

swami ramkrishna paramhans - रामकृष्ण परमहंस यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन

swami ramkrishna paramhans – रामकृष्ण परमहंस

swami ramkrishna paramhans – रामकृष्ण परमहंस

यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन

 

 

 

17/8/2021

पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्याच्या आरामबाग परिसरातील कामावरपुकुर नावाच्या अगदी आडरानात

असणार्या एका धर्मनिष्ठ ब्राह्मण परिवारात रामकृष्ण परमहंस यांचा जन्म झाला .वडील श्रीराम चटोपाध्याय व

आई चंद्रमणीदेवी यांचे हे चौथे अपत्य होते. त्यांचे पाळण्यातले नाव होते “गदाधर.”त्यांच्या एका

परमार्थगुरुने त्यांना swami ramkrishna paramhans ‘परमहंस ‘ केले .


रामकृष्णांना शालेय असे संस्कार फारसे लाभले नाहीत. थोडेफार बंगाली वाचता – लिहिता येऊ लागले,

आणि ते शाळेला कंटाळले. उच्चवर्णीय आणि अध्यात्म निष्ठ कुटुंबातील मुलांनी विद्यासंपन्न असावे अशी

वडिलधार्‍यांची अपेक्षा होती. रामकृष्णांचे एक वडील भाऊ कलकत्ता शहरात एक संस्कृत पाठशाळा

चालवीत होते. त्यांना असे वाटले की आडगावात राहिल्यामुळे वृत्तीत येणारे अक्षरशत्रुत्व शहरात टिकून

राहणार नाही. रामकृष्ण जर कलकत्त्यात राहिले, तर पाठशाळेत रमतील आणि आपोआप अध्ययनशील

होतील. भावाने शिक्षणाचा आग्रह धरला. रामकृष्णांनी न शिकण्याचा आपला निग्रह बोलून दाखवला.


रामकृष्ण कलकत्ता शहरात आले तेव्हा १७ वर्षांचे होते .आपल्या भावाला त्यांनी निक्षून सांगितले ” तू बोलावलेस

म्हणून मी आलो ; पण तू सांगतोस म्हणून मी शिकणार नाही. तुझ्या पाठशाळेतील पुस्तकी शिक्षण मला

काही देईल ? मला हवा परतत्त्वस्पर्श , मला हवे ईश्वरदर्शन. मी अन्नवस्त्राशिवाय जगू शकेन , पण माणसाच्या

जन्माला येऊनही मला भगवंत भेटणार नसेल , तर व्यर्थ आहे हे जिणे ” आपल्या धाकट्या भावाचे हे

बोलणे ऐकून मोठे भाऊ हतबल झाले.या पोराचे काय करावे हे त्यांना कळेना .


रामकृष्णांना देव हवा होता. मात्र हवा तो देव समोरच्या मूर्तीत त्यांना दिसत नव्हता. ते यथासांग पूजाविधी

करीत होते. परंतु त्यात पूजापाठापलीकडे काही नव्हते.हा निर्जीव, साचेबंद, पारंपारिक, पूजा प्रकार या मनस्वी

भक्ताला खरा आनंद देऊ शकत नव्हता. त्यांना हवा होता प्रत्यक्ष अनुभव ! पाषाणाची खोळ पांघरून नजरेआड

राहणारे हे देवपण रामकृष्णांना नको होते. शेवटी मूर्ती हे प्रतीक आहे .मूळ रूप नव्हे.ज्यांचे प्रतिनिधित्व

मूर्ती करते ते मुलतत्व कोणते ? देव दिसत नसेल, फक्त मूर्तीच दिसत असेल आणि मूर्तीलाच देव मानावे

लागत असेल, तर देवाचे वेगळेपण उरले कोठे ? देव ही केवळ कल्पनाच नव्हे काय ? कल्पनेची पूजा करून

पदरी काय पडणार ? हाती काय येणार ? माणूस कोठे जाऊन पोहोचणार. swami ramkrishna paramhans

रामकृष्ण अस्वस्थ झाले. त्यांच्या जीवाची काहिली झाली.कोणाच्या आधारे करू मी विचार ? कोण देईल

धीर माझ्या जीवा ‘ हे तुकोबांचे आर्त ते अनुभवू लागले.


रामकृष्णांनी हिंदूच्या धर्म जीवनाचा अभ्यास केला तो स्वतःच्या जीवनग्रंथांच्या आधाराने .पुस्तकापेक्षा

अनुभवाला ,पोथीपेक्षा सत्याला , गुरूपेक्षा स्वाधीनतेला महत्त्व देणारे रामकृष्ण स्वधर्मातील अशा,

अनुभवविश्वाचाही ठाव घेण्यासाठी अधीर होते .

रामकृष्णांनी एकही ग्रंथ वाचला नव्हता .काही पुराणे-प्रवचने ऐकली होती. आध्यात्मिक साधनेतून

घेतलेला साक्षात अनुभव हा त्यांच्या विचारांचा एकमेव आधार होता. सारे बोलणे प्रचीतीचे होते. त्यामुळे

स्वामी दयानंद ,बंकिमचंद्र चतर्जी, पं. ईश्वरचंद्र विद्यासागर , केशवचंद्र सेन अशा नामवंत व्यक्तीही त्यांच्या

आध्यात्मिक धारणेच्या दर्शनाने प्रभावित झाल्या. बलराम बसू, डॉ. रामचंद्र दत्त, साधू नागमहाशय, महेंद्रनाथ गुप्त,

गिरीशचंद्र घोष, सुरेंद्रनाथ मित्र हे त्यांचे प्रमुख गृहस्थाश्रमी शिष्य होते. काही स्त्रियाही त्यांच्या शिष्यवर्गात होत्या.

दहा बारा तरुण अंतरंगशिष्य हे सारे संन्यासी होते. त्यांतील अग्रणी म्हणजे स्वामीविवेकानंद .परमहंस यांनी

स्थापन केलेल्या रामकृष्ण मिशन या संस्थेच्या देशविदेशांतील शंभरावरील शाखांच्या द्वारा रामकृष्णांचा

आध्यात्मिक संदेश आज जगात सर्वदूर पसरलेला आहे.

रामकृष्णांनी एकही ग्रंथ वाचला नव्हता, काही पुराणे-प्रवचने ऐकली होती. आध्यात्मिक साधनेतून

घेतलेला साक्षात अनुभव हा त्यांच्या विचारांचा एकमेव आधार होता. सारे बोलणे प्रचीतीचे होते.बलराम बसू, डॉ. रामचंद्र दत्त, साधू नागमहाशय, महेंद्रनाथ गुप्त, गिरीशचंद्र घोष, सुरेंद्रनाथ मित्र हे

त्यांचे प्रमुख गृहस्थाश्रमी शिष्य होते.दहा बारा तरुण अंतरंगशिष्य हे सारे संन्यासी होते.

. रामकृष्ण यांचे जीवन यात कसलाही दिखावू व डामडौल नव्हता .अगदी साधे सरळ जीवन पण अशा

ही जीवनाचे अनेकांना आकर्षण वाटले. देवेंद्रनाथ टागोर , केशवचंद्र सेन बंकिमचंद्र , मायकेल मधुसूदन दत्त ,

महर्षी दयानंद ,गोंदवलेकर महाराज अशी अनेक प्रकारची आणि अनेक क्षेत्रातली माणसे त्यांच्याकडे

आकर्षित झाली. रामकृष्ण परमहंस राजकारणी नव्हते ,सरकारी अधिकारी नव्हते ,गर्भश्रीमंत नव्हते ,

प्राध्यापक, वकील ,डॉक्टर ,लोकनेते यापैकी कोणी नव्हते .आपल्या ध्यासात मग्न असणारे एक सर्वसामान्य

साधक होते. केवळ अनुभव आणि साधना यांच्या बळावर ते महामानव झाले.रामकृष्णांनी swami ramkrishna paramhans ग्रंथलेखन केले नाही .एखादा नवीन संप्रदाय स्थापन केला नाही .

अनेकांनी यापूर्वी जे जाणले होते ते पुन्हा एकदा जाणून घेतले. ते सर्व अनुभवपूर्वक अभ्यासले. त्यांच्या हातून घडले

ते फक्त बोलणे .ते केवळ बोलत, जे दिसले , कळले ,भावले ,अनुभवले तेवढेच सांगत .त्यांच्या सहजस्फूर्त

उद्गगारांना ‘ गाॅस्पेल ‘हे ग्रंथरूप प्राप्त झाले. रामकृष्ण अनुभवाशिवाय बोलत नव्हते त्यांना प्रसिद्धीचे वावडे होते .

त्यांनी सांगितलेला सहजसुलभ परमार्थ आज अमेरिका, युरोप आणि आशिया खंडातील अनेक नगरात

असणाऱ्या रामकृष्ण संघाच्या शाखा अभ्यासपूर्वक आणि विचारपूर्वक समजावून देण्याचे काम करीत आहेत.

जगाच्या इतिहासात अनेक धर्ममार्गाची साधना आपल्या जीवनात अनुसरणारा दुसरा कोणी महात्मा आढळत नाही.

रामकृष्णांनी वेदांतसारं अनुभवले , इस्लामचा अनुग्रह घेतला , ख्रिस्तचरित्राने मनन – चिंतन केले ,

बुद्ध – महावीरांचे स्तवन केले, तंत्रमार्ग ,वैष्णवसाधना या वाटा वहिवाटल्या . कर्म – भक्ती – ज्ञान- योग हे

मार्गही जाणून घेतले , समाधी साधन केले ; मंत्रजप आणि पुरश्चरण केले. अध्यात्म ,परमार्थ ,धर्म

आणि संस्कृती यांचे सार अनुभवाच्या लिपीतून सांगितले.


देवपूजेएवढेच लोकसेवेला महत्व देणारे swami ramkrishna paramhans रामकृष्णांनसारखे महापुरुष

ही आजच्या काळाची गरज आहे. रामकृष्ण – संघ ही संस्था आणि स्वामी विवेकानंदांनी शिकागोच्या

व्यासपीठावरून मांडलेली विश्वधर्म ही कल्पना रामकृष्ण नावाच्या बोधिवृक्षाला आलेली मधुर फळे आहेत .

वयाच्या पन्नासाव्या वर्षी दिनांक १५ऑगस्ट १८८६ या दिवशी , गळ्याच्या कर्करोगाने निरूपयुक्त झालेले शरीर

निसर्गाच्या स्वाधीन करून रामकृष्ण आपल्या आराध्य देवतेशी एकरूप झाले.

अशा या देवमानवास स्मृतिदिनानिमित्त विनम्र
अभिवादन

लेखन
डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर


Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisement

More Stories
shahu maharaj
shahu maharaj – छत्रपती थोरले शाहू महाराज
error: Content is protected !!
%d bloggers like this: