Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGS

subject teacher – संपुर्ण साक्षर असे आदर्श गाव मास्तरांचे विद्यापीठ

1 Mins read

subject teacher – संपुर्ण साक्षर असे आदर्श गाव मास्तरांचे विद्यापीठ

 

subject teacher – संपुर्ण साक्षर असे आदर्श गाव मास्तरांचे विद्यापीठ

 

 

 

 

‘मौजे आंबेगाव’ सांगली जिल्हा, ‘कडेगांव’ तालुक्यातील संपुर्ण साक्षर असे आदर्श गाव. गावाच्या ग्रामपंचायती कार्यालया

बाहेर नोटीस बोर्डावर जिल्हा परिषद निवडणुकाच्या तारखा जाहीर झाल्या की सगळ्या शाळेच्या मास्तरांची ‘कडेगांव’

तालुका वारी पक्की ठरलेली असायची, बाजाराच्या दिवशीच तालुक्याला जाणारे समदे यावेळी तासाला तालुक्याच्या

जिल्हाधिकारी कार्यालयात, पक्ष कार्यालयात, बाजारात, पाराच्या झाडाखाली नाहीतर ‘सरकारी देशी दुकानात’ हजर

असायचे निवडणुक प्रचार, पोलिंग बूथ असो की मतमोजणी समद्या कामाला हे जुपले जायचे, तालुकाध्यक्ष,जिल्हाध्यक्ष,

आमदार,खासदार,पक्षनेते, अपक्ष नेते समद्याना यांचा मुजरा व्हायचा. गाड्या भरुन भरुन नोटा तालुक्यावरुन गावागावात

पोहचायच्या. वर्षभर अन्ना वाचुन दुष्काळ भोगलेले रात्री कोंबड्या, मटणावर तुटून पडायचे. नेत्यांच्या ,सरपंचाच्या वाड्यावर

न अन मळ्यात रात्री फक्कड लावणी जमायची, पैसा उधळला जायचा. मास्तरांचे घोळके बीयर च्या बीयर बाटल्या रेचवायला

दंग व्हायचे, subject teacher इतिहासाचे ‘मोहीते मास्तर’ तोंडात चना,चिवड्याचा चकना टाकत दारुचा इतिहास सांगुन जायचे तर, भुगोलाचे

पिसाळ सर तोंडातील तंबाखू बाजुलाच थुंकत..’मदीरेची उत्पत्ती,कालखंड सांगणार इतक्यात त्याना मद्य उत्पादन फायद्या- तोट्यावर

गणिताचे subject teacher ‘जावळे’ सर दोन पेग आधीच रेचवून ग्लास पुढे करायचे, तोच इंग्रजीच्या साने मास्तरानी देशीवर टिका करत नाक

मुरडत इंपोर्टेड ‘रोझ वाइन’ चकचकीत ग्लासात घेत तुछ कटाक्ष टाकून… तुम्ही सगळे कसे अजुन मागास आहात…

‘यु आर नॉट जंटलमन कलीग्स,…..यु पीपल नॉट ड्रिंकिंग इंग्लीश…असे तसे काही बाही बरळत बरळत शेवटी स्कॉचss शब्द

बाहेर आला आणी हे महाशय नुसत्या वाइन मध्येच आडवे झाले. साने मास्तरांचा मुलगा अमेरीकेत उच्च शिक्षण घेतोय, आपल्या

‘डॅड’ साठी मधुन मधुन भारतात आला की आणतो एखादी काळी निळी वाइन ची बाटली. इतक्यात कोणाच्या तरी तोंडात

‘तकीला पाहीजे होता रे श्याss असा उल्लेख आला पण ते काय असते हे माहीत नसल्याने मराठीच्या ‘जोशी’ सरानी

तोंडातल्या तोंडातच माघार घेतली. तमाशा साहीत्य संस्कुती बद्दल भरभरुन बोलता बोलता तिथल्या तमासगीरीच्या

पायातल्या घुंगरांवरुन बोटे फिरवत गळ्यात हात घालणार..इतक्यात ‘अय काय बोलयचय ना ते लांबन..पायतान काढाय लावू नका’

तमासगीर बाई भडकलेल्या बघुन संस्कृतचे subject teacher कुलकर्णी मास्तर लगेच ‘अरे बापरे हीss हीss ( असे खोटेच हसत)

सॉरी हा…वेरी सॉरी..मला काय ती जोश्यांची ‘शंकुतलाच वाटली’ हाहा असे म्हणत.. ‘जोशी मास्तराना डोळा मारत’ जरा

आलोच हाss डोळ्यावर पाणी मारून’ असे म्हणत आत जे गेले ते बैठकीला परत न येता, व्हराड्यातच बसुन ‘विस्कीचा विथ सोडा…

लार्ज ग्लास’ आस्वाद घेवू लागले. सगळा तमाशा चालु होता’ ..आताची शिक्षण पद्धती कशी चुकीची आहे.. इथपासुन ते

‘मंत्रीमडळात आणी निवडणूकीत ‘शिक्षकाना जास्तीत जास्त आरक्षण मिळाले पाहीजे आणी… ‘एक शिक्षकच देशाचा

पंतप्रधान झाला तरच तो हा देश आपण ‘तारु’ इतक्यात …’दारु….कोणीतरी मध्येच बोलले.. झिंगलेले भुगोलाचे ‘कांबळे मास्तर’

आता डुलायला लागले होते. सगळा प्रकार डोळ्यानी शांत पणे पाहून साधे सरळ दिसणारे सायन्स शिकवणारे निवृत्त ‘यशवंत कदम’

मास्तर या तरुण शिक्षकांच्या व्यवहारावर काहीच बोलत न्हवते. काळ बदलला आहे, “राजकारणच ‘शिक्षण’ आणी शिक्षणाचेच

‘ राजकारण’ झालेय हे त्याना माहीत होते की काय त्यानी हातातली काठी सावरली, डोक्यावरची गांधी टोपी घालायला आता

शाळेच्या पोराना बी लाज वाटते, पण कदम मास्तरांना स्वता:ची गांधी टोपी सावरताना, आणी विसरताना कधीच पाहीले न्हवते.

 

Also Visit : https ://www.postboxlive.com 

 

हातातली काठी, चेहऱ्यावर लख्ख तेज, करारी बाण्याचे आणी सरळ स्वभावाचे असे उच्च बुद्धीवादी विचारांचे’ ते या व्यवस्थे

विरुद्ध लढण्याच्या भानगडीत कधीच पडले नाहीत. आता मास्तरांचे वय झाले होते, ‘आवाजातल्या हरकती आणी डोळ्यात

दाटलेले पाणी, शरीरावरच्या स्पष्ट दिसणाऱ्या सुरकुत्या आता आणखी स्पष्ट दिसत होत्या, झिजलेल्या चपला आता ‘करss करss’ असा

आवाज करत न्हवत्या. शाळेत वर्गात मास्तर येतायत हे शाळेच्या तासाच्या घंटे पेक्षा मास्तरांच्या चपलांच्या आवाजानेच आधी समद्या

वर्गाला कळायचे. आज मास्तरांची दोन्ही पोर सैन्यात मोठ्या हुद्द्यावर देशाची सेवा करतायत ऱोज सात किलोमीटर सायकल तर कधी

चालत शाळेचा बिकट प्रवास आणी नोकरी करणारा मास्तर “झिंगुन आडवे झालेल्या एक एका शिक्षकाच्या ‘प्रेताला’ त्यांच्या घरी

व्यवस्थीत पोहचवायची जवाबदारीचा ‘आदेश’ सर आंखोपर ठेवून पुढची पिढी सुरक्षीत करत होता. डोळ्यात पाणी दाटुन आले.

‘गुरुदक्षिणा’ शब्द मराठी साहित्य विश्वशब्द कोशातुन कुठे हरवू नये याची भिती वाटु लागली होती आता मला..!!

 

www.postboxindia.com

www.postboxindia.com

 

Editorial

Leave a Reply

error: Content is protected !!