Tea seller एक सामान्य चहावाला ते विख्यात यशस्वी लेखक
Tea seller एक सामान्य चहावाला ते विख्यात यशस्वी लेखक
Tea seller एक सामान्य चहावाला ते विख्यात यशस्वी लेखक

Tea seller एक सामान्य चहावाला ते विख्यात यशस्वी लेखक

चहाची टपरी चालवत tea seller त्याने ३० पेक्षा जास्त पुस्तके स्वतः लिहून प्रकाशित केली. भेटा - लक्ष्मण राव

Tea seller एक सामान्य चहावाला ते विख्यात यशस्वी लेखक

चहाची टपरी चालवत tea seller त्याने ३० पेक्षा जास्त पुस्तके स्वतः लिहून प्रकाशित केली. भेटा – लक्ष्मण राव

14/6/2021,

फूटपाथ वर दिवस काढून विडी काडी विकणारा परिस्थितीने पुढे tea seller चहा वाला झाला, आपण काय आणि कसे म्हणून बघतो त्याच्याकडे ?

जर समजा, कोणी कोणी सांगितले कि हा चहावाला साहित्य क्षेत्रातील एक अवलिया लेखक आहे , तर मग तुमचा विश्वास बसेल कि नाही माहीत नाही पण हे सत्य आहे.

मूळचे महाराष्ट्राचे असलेले लक्ष्मण राव लेखक म्हणून स्वप्न उराशी बाळगून दिल्लीला पोहोचले आणि उदरनिर्वाह व्हावा

यासाठी पान विडीची टपरी ते चहा चा फूटपाथवर यशस्वी व्यवसाय उभारत आज देशातील हिंदी साहित्य विश्वातील

अग्रगणी लेखक / प्रकाशक म्हणून नावारूपाला आले आहेत. त्यांच्या या प्रवासाविषयी जाणून घेऊया पोस्टबॉक्स इंडिया च्या व्यक्तिविशेष मध्ये.

चहाची टपरी चालवता चालवता ६५ वर्षांचे tea seller लक्ष्मण राव यांची हिंदी भाषा साहित्यात तब्बल ३५ पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत.

त्यांच्या या साहित्य विश्वात नजर फिरवली तर कल्पना रम्यतेबरोबर, अनेक विषयांचे विश्लेषणात्मक, प्रबोधनात्मक, नाट्य साहित्य ,

राजकारण , आणि अर्थव्यवस्था अशा अनेक पद्धतीचे त्यांचे लेखन कौशल्य त्यांनी त्यांच्या साहित्यातून जगासमोर आणले आहे.

फक्त पुस्तक प्रपंचच नव्हे तर आजच्या प्रगत तंत्रज्ञानासोबत ई- कॉमर्स ,

वेब साईट असे त्यांचे लिखाण अमेझॉन, ऑक्सफोर्ड , इत्यादी साहित्य संकुलात रसिकांसाठी उपलब्ध आहे.

चहाची टपरी चालवत त्याने ३० पेक्षा जास्त पुस्तके स्वतः लिहून प्रकाशित केली. भेटा - लक्ष्मण राव
चहाची टपरी चालवत त्याने ३० पेक्षा जास्त पुस्तके स्वतः लिहून प्रकाशित केली. भेटा – लक्ष्मण राव

१९७७ साली विष्णू नगर येथील हिंदी भवनाबाहेर, आयटीओ, दिगंबर मार्ग, नवी दिल्ली येथील फूटपाथ खाली tea seller लक्ष्मण राव यांचा लेखक म्हणून प्रवास सुरु झाला.

आजही ते तुम्हाला त्या ठिकाणी भेटतील. गुलशन नंदा यांच्या लिखाणामुळे प्रभावित झालेले ते नंदा यांची शर्मिली, कटी पतंग, डाग, आणि खिलोना यांचे चाहते होते ,

हेच साहित्य हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये सुद्धा चित्रपटाच्या माध्यमातून गाजले होते.

चहाची टपरी चालवत त्याने ३० पेक्षा जास्त पुस्तके स्वतः लिहून प्रकाशित केली. भेटा - लक्ष्मण राव
चहाची टपरी चालवत त्याने ३० पेक्षा जास्त पुस्तके स्वतः लिहून प्रकाशित केली. भेटा – लक्ष्मण राव

आश्चर्य म्हणजे मी लहानपणापासून हा छंद जोपासला आणि पुढे विकसित केला, पुढे हिंदी साहित्यात हेच पॅशन सातत्यपूर्ण ठेवले.

हि आवड होतीच पण मराठीतली माझी गोडी कधीच कमी झाली नाही , मराठी माझ्या आईसारखी आहे.

कदाचित म्हणूनच मला हिंदीमध्ये लिहण्यास या मराठीने भाग पाडले असावे. tea seller लक्ष्मण राव यांचा महाराष्ट्रातून दिल्लीत

येण्याचा आणि इथे बस्तान बसविण्याचा प्रवास तितकासा सोपा न्हवता. पण पॅशन त्यांना इथपर्यंत खेचून घेऊन आले.

चहाची टपरी चालवत त्याने ३० पेक्षा जास्त पुस्तके स्वतः लिहून प्रकाशित केली. भेटा - लक्ष्मण राव
चहाची टपरी चालवत त्याने ३० पेक्षा जास्त पुस्तके स्वतः लिहून प्रकाशित केली. भेटा – लक्ष्मण राव

दिल्लीत येण्यापूर्वी ( अमरावतीतील, तळेगाव दशासार, महाराष्ट्र ) इथे एका डॉक्टरांच्या घरी नोकर हवा होता , तिथे मी काम केले.

त्यानेच मला पुढे सूत गिरणीत नोकरी मिळवून दिली. मी तिथे पाच वर्ष काम केले. गिरणी बंद होण्यापूर्वी मी थोडे दिवस शेती केली.

पण मला माझे पॅशन जिवंत ठेवायचे होते म्हणून मी वडिलांकडून ४० रुपये कर्ज घेऊन भोपाळ येथे ३ महिने काम केले.

९० रुपये मिळकत कमविल्यानंतर मी जुलै १९७५ मध्ये दिल्लीला आलो, इथे आल्यावर विविध प्रकारच्या नोकऱ्या करत

उदरनिर्वाहाचा तोडगा शोधत बदलत राहावे लागले. कधी मजूर तर कधी सफाईवाला म्हणून ढाब्यावर काम करत राहावे लागले.

१९७७ मध्ये राव यांनी पण विडी काडी याची विक्री करण्यास सुरुवात केली. विष्णू दिगंबर मार्गावरील याच ठिकाणी मोकळ्या वेळेत

मी शेक्सपियर आणि टॉल्स्टॉय यांचे वाचन लेखन भाषांतर करण्यास सुरुवात केली होती.

चहाची टपरी चालवत त्याने ३० पेक्षा जास्त पुस्तके स्वतः लिहून प्रकाशित केली. भेटा - लक्ष्मण राव
चहाची टपरी चालवत त्याने ३० पेक्षा जास्त पुस्तके स्वतः लिहून प्रकाशित केली. भेटा – लक्ष्मण राव

” नयी दुनिया कि नयी कहाणी ” हे त्यांचे पुस्तक प्रकाशकांनी नाकारले, काहींनी प्रकाशित करण्याच्या अव्वाच्या सव्वा अटी ठेवल्या

तर काहींनी पैशांची मागणी जी त्यांच्या अवाक्याबाहेरची होती. एका प्रकाशकाने ” चालता हो ” म्हणत हाकलून दिले तर

दुसऱ्या एकाने अवास्तव पैशांची गुंतवणूक करावी लागेल असे सांगितले. मग मीच स्वतः च ते पुस्तक प्रकाशित करण्याचा मानस केला

आणि पैसे वाचवत मार्गाला लागलो. आणि १९७९ मध्ये त्यांनी भारतीय साहित्य कला प्रकाशन स्थापन केले आणि ” नयी दुनिया कि नयी कहाणी “

अवघ्या ७००० रुपये खर्च करून प्रकाशित केले. १९८१ पर्यंत त्यांच्या आयुष्याची जीवनगाथा आणि त्यांच्या पुस्तकांची कथा हि

त्या दिवसांमध्ये संपूर्ण शहराच्या चर्चेचा भाग होती. आणि अखेरीस त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांना भेटावयाचे निमंत्रण दिले.

चहाची टपरी चालवत त्याने ३० पेक्षा जास्त पुस्तके स्वतः लिहून प्रकाशित केली. भेटा - लक्ष्मण राव
चहाची टपरी चालवत त्याने ३० पेक्षा जास्त पुस्तके स्वतः लिहून प्रकाशित केली. भेटा – लक्ष्मण राव

१ मे १९८४ रोजी इंदिरा गांधी यांची किशोर मूर्ती भवन येथे नेहरूंच्या “पुण्यतिथी.” स्मरणार्थ एक कार्यक्रम होता तिथे भेट झाली.

एक नाटक पटकथा आणि इंदिराजींची भाषणे प्रधानमंत्र्यानी प्रकाशित सुद्धा केले. पुढे १९९५ मध्ये tea seller राव यांनी चहा विक्रीला सुरुवात केली. दुकान सांभाळत पुस्तक प्रकाशित झाले. त्यांची सर्व पुस्तके नर्मदा , रेणु , पंच प्रतिनिधी कहानीया आणि दंश यामुळे अनेकांच्या आयुष्याला प्रेरणादायी ठरले तर इतर आयुष्यातील सत्य घटनेवर आधारित अशा आशयाची होती.

चहाची टपरी चालवत त्याने ३० पेक्षा जास्त पुस्तके स्वतः लिहून प्रकाशित केली. भेटा - लक्ष्मण राव
चहाची टपरी चालवत त्याने ३० पेक्षा जास्त पुस्तके स्वतः लिहून प्रकाशित केली. भेटा – लक्ष्मण राव

रेणू नामक एका मुलीची कथा जी वास्तवातील दारूण्य आणि गरिबीमुळे वडिलांच्या दारू पिण्याच्या व्यसनामुळे व्यथित होती, ती या सर्वांवर मात करत शहरात चांगली नोकरी मिळवते. या पुस्तकाच्या घवघवीत यशानंतर राव राष्ट्रपती प्रतिभा ताई पाटील यांना भेटले. ते आधीच यशस्वी लेखक झालेच होते पण आपल्या शिक्षणामुळे लोकांनी आपल्याला काही बोलायला नको म्हणून tea seller राव यांनी स्वतःची प्रतिभा अधिक उजळ करण्यासाठी त्यांनी वयाच्या ३७ व्या वर्षी सीबीएसई बोर्डातील बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली. वयाच्या ५० व्या वर्षी दिल्लीतून त्यांनी सीबीएसई अभ्यासक्रमातील बी.ए. हिंदी विषयामध्ये उत्तीर्ण झाले, आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातून हिंदी मध्ये एम.ए पूर्ण केले.

चहाची टपरी चालवत त्याने ३० पेक्षा जास्त पुस्तके स्वतः लिहून प्रकाशित केली. भेटा - लक्ष्मण राव
चहाची टपरी चालवत त्याने ३० पेक्षा जास्त पुस्तके स्वतः लिहून प्रकाशित केली. भेटा – लक्ष्मण राव

आज tea seller लक्ष्मण राव हे स्वतः चालते बोलते प्रकाशन संस्था आहेत. ते स्वतः लिहितात, प्रकाशित करतात आणि ग्रामीण , शहरी बाजारपेठेसाठी आपली आवर्तने विक्रीस उपलब्ध करतात. राव शाळा कॉलेज येथे भेट देतात त्यांचे साहित्य शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. आज अनेक राष्ट्रीय संस्था आणि आंतरराष्ट्रीय संस्थाच्या व्यासपीठावर राव यांना निमंत्रण आणि प्रोत्साहन भाष्य करण्यास बोलाविण्यात येते. त्यांना समाजात वेगळा आणि उच्च कोटीचा मान सन्मान मिळत आहे. त्यांच्या चहाच्या टपरीवर आजही पुस्तके विक्रीस असतात. ८००० रुपये इतके मासिक उत्पन्न ते पुस्तक विक्रीतून मिळवतात. सोबत ई – पुस्तक विक्रीतून सुद्धा त्यांना उत्पन्न मिळते. tea seller राव लवकरात लवकर काम संपवून दुकान बंद करतात कारण त्यांना लिखाणासाठी वेळ द्यायचा असतो. त्यांचे पत्तियों कि सरसराहट हे नुकतेच प्रकाशित झालेले पुस्तक खूपच लोकप्रिय ठरले आहे.

चहाची टपरी चालवत त्याने ३० पेक्षा जास्त पुस्तके स्वतः लिहून प्रकाशित केली. भेटा - लक्ष्मण राव
चहाची टपरी चालवत त्याने ३० पेक्षा जास्त पुस्तके स्वतः लिहून प्रकाशित केली. भेटा – लक्ष्मण राव

एक प्रामाणिक tea seller चहावाला आजही फुटपाथवर बसून यशस्वी लेखक आहे. त्यांना भारतात आणि भारताबाहेरील आंतरराष्ट्रीय व्यासपीठे आणि संस्था यांच्याकडून भेटी मिळतात. अनेक विद्यापीठानी त्यांच्या साहित्यकृतीला रॉयल्टी देऊन त्यांचा सन्मानच केला आहे. त्यांचे आयुष्य , ध्यास , त्याग यामुळे ते साहित्य विश्वात अत्योच ठिकाणी स्थान निर्माण केले आहे. अनेक परदेशी वाचकांना त्यांच्या साहित्याचा रसास्वाद घ्यायचा आहे पण भाषिक अडथळे निर्माण होत असल्यामुळे त्यांना हे करणे अशक्य होत आहे अशी खंत देखील लक्ष्मण राव यांनी व्यक्त केली.

चहाची टपरी चालवत त्याने ३० पेक्षा जास्त पुस्तके स्वतः लिहून प्रकाशित केली. भेटा - लक्ष्मण राव
चहाची टपरी चालवत त्याने ३० पेक्षा जास्त पुस्तके स्वतः लिहून प्रकाशित केली. भेटा – लक्ष्मण राव

साहित्य विश्वातील अनेक पुरस्कार पुष्पांनी त्यांचा गौरव करण्यात आला आहे तसेच अनेक राज्य आणि विभागातील हिंदी साहित्य संमेलन प्रकारांमध्ये त्यांचा सहभाग आणि गौरव सुद्धा मोठ्या प्रमाणावर झाला आहे. महाराष्ट्राच्या मराठी मातीतून अस्सल हिरा तापून सुलाखून आज हिंदी साहित्याचे चे तख्त राखीत आहे. सलाम त्यांच्या कर्तुत्वाला. 

वैभव जगताप

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisement

More Stories
Happy friendship day song - निखील नमीतचे ‘आपली यारी’ गाणे
Happy friendship day song – निखील नमीतचे ‘आपली यारी’ गाणे
error: Content is protected !!
%d bloggers like this: