Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

NewsPostbox Marathi

Tecnology – दशा आणि दिशा

1 Mins read

Tecnology – दशा आणि दिशा – तंत्रज्ञान, पर्यावरण आणि मानव

 

Tecnology – संतोष कदम

 

 

20/5/2021,

आजच्या स्पर्धात्मक युगात प्रत्येक देश-विदेश नव-नवीन तंत्रज्ञान प्रणाली विकसित करत एकमेकांच्या पुढे सरसावताना दिसत आहे;

यामध्ये आपला भारत देशही प्रगतीपथावर आगेकूच करत आहे; याचं कौतुक होणं स्वाभाविक आहे; मात्र दुसरीकडे त्याचे घातक दुष्परिणाम

लक्षात घेता त्यावर मर्यादा व निर्बंधही येणं गरजेचं आहे; कारण Tecnology तंत्रज्ञान कितीही विकसित झाले तरी ते विकसित होताना तयार केलेल्या सामग्रीचा

बहुतांश उगम नैसर्गिक साधनसंपत्तीद्वारे झाला आहे (नैसर्गिक साधन संपत्तीवर प्रक्रिया करून निर्माण केलेली नवीन सामग्री) हेही लक्षात घेतले पाहिजे.

उदाहरण म्हणून एक भाग म्हणजे एकमेकांशी परिसंवाद साधण्यासाठी विकसित करण्यात आलेले साधन ते म्हणजे मोबाइल.

             मोबाईल हा माणसाच्या जीवनातील अविभाज्य घटक बनला आहे; त्यामुळे माणसाला बऱ्याच बाबींची पूर्तता मोबाइलद्वारे करता येत आहे;

 

त्यामुळे माणसाला आरामदायी सुख-सुविधांचा मार्ग मिळाला आहे; परंतु नाण्याच्या दोन्ही बाजूंची तपासणी व अवलोकन होणं आज काळाची गरज आहे.

जसे कि; मोबाईलपासून फायदे होतात तसे त्यापासून काही नुकसान होते का? हेही लक्षात घेतलं पाहिजे.

आजची पिढी लहान-थोरांपासून मोबाइलचा वापर करताना दिसत आहे; सदस्थितीत शालेय मुलांचा ऑनलाइन अभ्यास चालू आहे;

परंतु अभ्यासाच्या नावाखाली, मुलांना मोबाइलचा अतिरेक वापर करण्याची सवय लागू नये तसेच त्यांचे आरोग्यावर अनिष्ट परिणाम होवू नये,

यासाठी दक्षता घेणं गरजेचं आहे; कारण हीच मुले, उद्याच्या उज्वल व सक्षम भारताचे भावी रक्षक आहेत हे विसरून चालणार नाही.

काही तज्ज्ञांच्या सर्वेक्षणानुसार मोबाइल टॉवरमधून निघणारे रेडिएशन (उत्सर्जित किरणांमुळे) अर्थात इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज मुळे

 

मानवी आरोग्यावर घातक दुष्परिणाम होत आहेत. तसेच त्याचे परिणाम पशु-पक्षी व पर्यावरणावरही होत आहे. याबाबत शासनाने मान्यता

दिलेल्या प्रसार माध्यमांनीही वेळोवेळी या बाबींचा प्रसार केला आहे. मोबाइलचेच नव्हे तर; इतरही अशा इलेट्रॉनिक सामग्री ज्यांच्या

रेडिएशनमुळे विविध व्याधी जडण्याची शक्यता नाकारता येत नाही. जसे कि थकवा येणे, अस्वस्थ वाटणे, रक्तामध्ये गाठी होणे, दृष्टी कमी होणे,

कर्णबधिरपणा येणे, त्वचारोग, ब्रेन ट्युमर, कर्करोग, अशा संभाव्य व्याधी जडण्याची शक्यता असल्याचे जर तज्ज्ञ सांगत असतील तर याकडे

कानाडोळा करून कसे चालेल? यावर अति तात्काळ प्रतिबंधात्मक उपाय काढले पाहिजेत.

 

मानव हा सर्वात बुद्धीमान मनुष्यप्राणी आहे असे म्हटले जाते तर त्याच्या आरोग्यावर परिणाम झाला तर तो बुद्धीहीन होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

उलटपक्षी तो निरोगी राहिला तर त्याची सद्सद विवेक बुद्धीही चांगली काम करेल आणि तो एक वैचारिक पातळीवर विचार करून,

काय चांगले आणि काय वाईट? याबाबत तर्कशुद्ध विचार करून ते अंमलात आणू शकतो.

 

दुसरी बाब म्हणजे मोबाइल रेडिशनमुळे पर्यावरणामध्ये बदल होऊन पशु-पक्षी, यांच्यावरही घातक दुष्परिणाम होत असेल तर याबाबतही

गंभीरपणे दखल घेतली पाहिजे. कारण पर्यावरणाचा समतोल बिघडला तर नैसर्गिक मोठं संकट किंवा प्रलय येण्याची शक्यता आपण नाकारू शकत नाही.

कारण निसर्गाच्या पुढे कोणीही मोठं नाही. अजून एक बाब आपला देश कृषीप्रधान देश आहे यामुळे कोणतीही प्रगती किंवा Tecnology तंत्रज्ञान विकसित करताना

याचा शेती उत्पादनावर काही परिणाम होत आहे का? याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे; कारण कृषिधनाचा जर ऱ्हास झाला तर भविष्यात

आपणाला अन्न-धान्य यासाठी दुसऱ्या देशावर अवलंबून राहावे लागू नये हीच माफक अपेक्षा आहे.

 

           कारण शत्रूराष्ट्र आपल्या देशाची अर्थव्यवस्था कमजोर कशी होईल तसेच कृषीप्रधान असलेला आपला भारत देश अन्न-धान्य

निर्मितीपासून कसा अडचणीत येईल यादृष्टीने वेळग्या पध्दतीने रणनीती तसेच युद्धनीती आखतील याबाबत वेळीच सतर्क होणं गरजेचं आहे.

थोडक्यात शत्रूराष्ट्र आपल्या देशावर अधिराज्य गाजविण्यासाठी विविध मार्गाचा अवलंब करतील याची साशंकता वाटते. तसेच “निसर्गाचा समतोल राखा;

तरच टळेल सर्व धोका” हे घोषवाक्य समोर ठेवून याबाबत दक्ष राहून अति शिग्रतेने अंमलबजावणी होणं सर्वांसाठी हितकारक राहील.

सरतेशेवटी लिहिण्यासारखं खूप आहे; परंतु काय लिहिलंय याचं आकलन होणंही गरजेचं आहे.

 

   संतोष कदम, पाटण, सातारा

Leave a Reply

error: Content is protected !!