Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

NewsPostbox Marathi

Tention meaning – वाढत्या चिता, जळती चिंता

1 Mins read

Tention meaning – वाढत्या चिता, जळती चिंता

 

Tention meaning – वाढत्या चिता, जळती चिंता – ज्ञानेश महाराव

देशातली आणि राज्यातली वर्षापूर्वीची ’कोरोना-महामारी’ची लाट आणि आताची दुसरी लाट ; यातला फरक आता देशातील प्रत्येक नागरिकाला जाणवू लागलाय. ’कोरोना-महामारी’ आता राज्यापुरती वा जिल्हा-तालुका, शहरापुरती मर्यादित राहिलेली नाही. ती गाव-पाड्यापर्यंत पोहोचून आता लोकांच्या नावाशी जोडली गेलीय. Tention meaning आपल्या असंख्य आप्त-मित्रांना, त्यांच्या घरातील लोकांसह ’कोरोना’ने ग्रासलंय. काहींचा जीव घेतलाय. वाढत्या-जळत्या चितांची दृश्यं प्रसार माध्यमांनी दाखवायची नाही आणि आपण ते पाहायचं नाही; असं ठरवलं तरी आसमंतात दाटलेला चितांचा धूर प्रत्येकाच्या नाकापर्यंत येतोय आणि चिंता निर्माण करतोय.


https://www.bbc.com/

पहिल्या लाटेतला ’कोरोना’ हा वयोवृद्ध आणि व्याधीग्रस्तांपुरता मर्यादित होता. तो Tention meaning आता सर्वांचा आणि सर्वांसाठी झालाय. हे ’कोरोना म्युटेशन’मुळे म्हणजे ’कोरोना व्हायरस’ने आपला आकार बदलल्यामुळे घडतंय, असं म्हणतात. त्यात तथ्य असेलही! तथापि, ज्याची तुलना भक्त मंडळी देवाशीच करू शकतील ; असा डोळ्यांना न दिसणारा, पण आपलं अस्तित्व महामारीतून दाखवणारा ’कोरोना’ स्वत:त बदल करतो, अधिक व्यापक आणि धोकादायक होतो; परंतु, धोका लक्षात येऊनही आपण बदलत नाही, आवश्यक त्या नियमांचं, सुरक्षेच्या सूचनांचं पालन करीत नाही, ह्या नालायकीबद्दल कुणाला दोष द्यायचा ?

’कोरोना’ हा हवेतून पसरणारा किंवा पशू-पक्षी, फुलं-फळं आणि खाद्यपदार्थांतून पसरणारा विषाणू नाही. तो माणसाकडून माणसाकडे जातो. वाढतो. पसरतो. ह्या उपकाराची परतफेड तो अधिकाधिक लोकांना ग्रासून, त्यांची दमछाक करून, प्रसंगी त्यांचा जीव घेऊन करतो. अशा जीवघेण्या ’कोरोना’ला रोखणारं औषध नाही. लस आहे, पण ती ’कोरोना’ला संपवण्यासाठी नाही. ती आपला जीव सुरक्षित राहण्यासाठी, ’कोरोना’शी लढण्यासाठी आपल्यातली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आहे. ’कोरोना’ प्रतिबंधक लस जी उपलब्ध असेल, ती फुकट वा विकत घेतलीच पाहिजे. Tention meaning लस घेण्याचं टाळणे म्हणजे संकट ओढवून घेण्यासारखं आहे.



http://amarujala.com

हा काही नवा विषाणू-व्हायरस नाही. तो आधीपासून वातावरणात होता. पण माणसाच्या रोगप्रतिकारक शक्तीच्या कह्यात होता. तो माणसाच्या शरीरात परस्पर घुसत होता आणि परस्पर संपत होता. पण ह्या लढाईत टिकून राहण्यासाठी ’कोरोना’ आपली विघातक शक्ती वाढवत राहिला. त्याकडे दुर्लक्ष करण्याचा गाफीलपणा हा पोलिसांसारखा आहे. जोवर गुन्हेगार आपली विघातक शक्ती दाखवत नाहीत; तोवर पोलीस यंत्रणा आपली तपास यंत्रणांची शक्ती वाढवत नाहीत. ह्या सूत्रानुसार ’कोरोना’ने आपली माणसाचा जीवघेणी शक्ती दाखवल्यानंतर त्याला प्रतिबंधक नव्हे; तर माणसाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीच्या Tention meaning लस निर्मितीचा खेळ सुरू झाला. तो धंदेवाईक आहे. आपल्या देशात तो कुरघोडीच्या राजकारणासाठीही वापरला जातोय.


ह्यात ’कोरोना’चं संकट कसं संपणार? ते संपणार नाही. संपवावं लागेल. ’कोरोना’ संपू शकतो आणि तो माणसाच्या शरीरातच संपतो. ’कोरोना-व्हायरस’चं आयुष्य १४ दिवसांचं असतं. तेवढ्या दिवसांत तो एका कुडीतून दुसऱ्या कुडीत गेला नाही, तर त्याचा नाश होतो. तथापि, ’कोरोना’ची लक्षणं लक्षात येण्यापूर्वी आपण निष्काळजीपणाने संपर्कात येणाऱ्या शेकडो जणांना ’कोरोना’चं विधिवत दान केलेलं असतं. हे टाळण्यासाठी ‘मास्क’ आणि स्वच्छतेच्या सूचना पालनाबरोबरच माणसांपासून चार हात दूर राहणे; अनावश्यक बोलणे टाळणे, हे आवश्यक आहे. ह्यात जे शक्य नाही ते करून देण्यासाठी आपली गरज लोकप्रतिनिधी वा प्रशासकीय यंत्रणेमार्फत शासनापर्यंत पोहोचवून करायला भाग पाडणे, हाच ’कोरोना-महामारी’ रोखण्याचा जालीम इलाज आहे.



http://navbharattimes.indiatimes.com

केवळ १४ दिवसांचं आयुष्य असलेला ’कोरोना’ लोकांच्या बेजबाबदारपणामुळे आणि सरकारच्या चुकांमुळे देशात गेले १४ महिने ताकदीने टिकून राहिलाय. आपली दहशत वाढवण्यासाठी तो स्वत:त बदल करतोय. डोळ्याला न दिसणारा ’कोरोना’ विषाणू! त्यात त्याचा मेंदू आणि बुद्धी कुठे असणार? स्वत:ची ताकद वाढवण्यासाठी तो देवाचा धावा करत नाही. सत्संग- बैठकांना जात नाही. कुणा मंत्र्या- संत्र्याचा वशिला वापरत नाही. आपल्याला ’अच्छे दिन’ आले म्हणून मातत नाही, की टाळ्या-थाळ्या पिटत नाही. तो निसर्गनियमाप्रमाणे स्वत:ला वाढवतोय, वागतोय.

Tention meaning त्याच्या विपरीत भारतीय जनता वागतेय. त्यामुळे गेल्या वर्षातील मार्च-सप्टेंबर ह्या सहा महिन्यांचा ‘लॉकडाऊन’ वाया गेला. हा ’लॉकडाऊन’ माणसांची वर्दळ कमी होण्यासाठी होता. तथापि, दारूची दुकानं आणि देवळांची दारं उघडी होताच; ’देव-दारू-दुवा’च्या भक्तांनी आधाश्यासारखी गर्दी केली. हळदी-लग्नाचे, अंत्यविधीचे आणि राजकीय सभांचे कार्यक्रम गर्दीत झाले. त्यामुळे ‘कोरोना’चे भंडाऱ्यासारखे वाटप झाले. कुंभमेळ्यातही ‘कोराना’च्या शाही प्रसादाचे वाटप झाले.



http://navbharattimes.indiatimes.com

परिणामी, Tention meaning  महाराष्ट्रासह अनेक राज्यात आता पुन्हा ‘लॉकडाऊन’चा अंमल सुरू झालाय. त्यामुळे ’कोरोना’ रुग्णांची आणि मृत्यूंची संख्या घटताना दिसतेय. तथापि, ’लॉकडाऊन’ संपल्यावर जर पूर्वीसारखाच बेजबाबदारपणा दाखवल्यास बदलत जाणारा ’कोरोना’ अधिकच्या ताकदीने लोकांच्या नाकात घुसेल आणि लोकवस्त्यांचंही स्मशान करील.

देशातल्या वाढत्या चितांच्या ज्वाळा टाहो फोडत सांगत आहेत, “लोकहो, ’कोरोना’सारखे तुम्हीही बदला आणि आम्हाला टाळा!” तेव्हा सावध व्हा! स्वत:त बदल करा. ’कोरोना’ प्रतिबंधक नियम पाळा. राजकारण्यांच्या स्वार्थी कसरतींचे आणि करामतींचे बळी होऊ नका! त्यावर मत बनवू नका! Tention meaning काळाबाजारवाल्यांची गिऱ्हाईक होऊ नका! स्वयंशिस्तीने वागा. माणसांचा संपर्क टाळा. ’कोरोना’ला संपवा. कारण, जाती घडी पुन्हा येणार न्हाय !



मूर्खपणाचे ध्यान, हनुमानाचे जन्मस्थान

बुद्धी आणि शक्तीची देवता असलेला ‘हनुमान’ ऊर्फ ‘मारुती’ हा रामभक्त! म्हणजे प्रभू रामचंद्र हे हनुमानासाठी सुपिरियर! तथापि, विष्णूचा सातवा अवतार असलेल्या त्रेतायुगातील श्रीरामाच्या जन्मस्थानी मंदिर उभारण्यासाठी; मंदिर-मशीद वादाच्या आडून हिंदू-मुस्लीम तेढ वाढवण्याचा खेळ तब्बल ४५० वर्षं सुरू होता. त्यासाठी गेल्या ३० वर्षांत अमानुष घटनांच्या होळ्यावर होळ्या पेटवण्यात आल्या. त्यावर सत्तेच्या पोळ्या शेकायला मिळाल्यावरच शांत झाल्या.

तेव्हा कुठे आता अयोध्येत राम जन्मभूमी मंदिर आकार घेऊ लागलंय ! म्हणजे राम खोटा ठरला आणि सत्तेसाठीचे सत्यात उतरले. कल्पनाविलासाला इतिहास मानलं की, देव-देवतांची पुराणांसकट अशी लक्तरं ही निघणारच! पण असा ’शेंदूर खरवडून धोंडा’ दाखवण्याचा प्रकार हनुमानाच्या जन्मस्थानाबाबत झाला नाही. तथापि, या जन्मस्थानाबाबत वाद सुरू झालाय. कारण, आंध्र प्रदेशातील भगवान बालाजीच्या ’तिरुपती- तिरुमाला देवस्थान’ (टीटीडी) व्यवस्थापनाने ’अंजनाद्री’ हे हनुमानाचं जन्मस्थान असल्याचं ’रामनवमी’ला (२१ एप्रिल) आंध्र प्रदेशचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्या उपस्थितीत घोषित केलं आहे.



Also Read : जानव्याचे हिंदुत्व राष्ट्रीयत्वाची शेंडी | Postbox India

’अंजनाद्री’ हा तिरुमाला येथील सात डोंगरांपैकी एक आहे. तेथील तिरुमाला मंदिरापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेलं ’जपाली तीर्थम’ हे स्थान हनुमानाचं जन्मस्थान असल्याचं ’टीटीडी’ने नेमलेल्या संशोधन समितीने मान्य केलंय. ’राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ’चे कुलगुरू प्रा. मुरलीधर शर्मा यांच्या नेतृत्वाखाली नेमलेल्या ह्या समितीने पुरालेखातील नोंदी, शास्त्रीय व पौराणिक दाखले, खगोलशास्त्रीय आडाखे यांचा अभ्यास करून ’अंजनाद्री’ हेच हनुमानाचं जन्मस्थान असल्याच्या ’टीटीडी’च्या दाव्यावर शिक्कामोर्तब केलंय. प्रभू रामचंद्राला राजा दशरथ आणि कौसल्या हे मानवी आकारातले पिता- माता होते.

हनुमान हा ’वायूसुत!’ म्हणजे ’वारे’मामाचा मुलगा! रामदास स्वामींनी वर्णन केलेला –
भीमरूपी महारुद्रा, वज्रहनुमान मारुती
वनारी अंजनीसुता, रामदूता प्रभंजना
– अशा महाबलवंत पुत्रप्राप्तीसाठी माता अंजनी तपाचरणाला बसली. तिथे ’वायू’देव प्रसन्न झाले आणि बजरंगबलीचा जन्म झाला. ही जशी पुराणातली बात, तशी वार्‍यावरची थाप! ती सनातन परंपरेने थापटत राहिल्याने, अंजनीच्या तपाचरणाचा डोंगर ’अंजनाद्री’ झाला आणि तिथलं ’जपाली तीर्थम्’ हे हनुमानाचं जन्मस्थान झालंय ! तथापि, ह्या ’टीटीडी’च्या दाव्याला कर्नाटकातल्या धार्मिक संस्थांनी विरोध केलाय. त्यांचं आणि पुरातत्त्वशास्त्र अभ्यासकांचं म्हणणं आहे की, कर्नाटकातील बेल्लारी जवळील हम्पी येथे हनुमानाचा जन्म झालाय.

तिथे कपींचं (म्हणजे मानव सदृश वानरांचं- अर्थात, गोरिला-चिपांझी यांचं) साम्राज्य होतं. ‘रामायणा’त त्याचा उल्लेख, वाली- सुग्रीव यांचं ’किष्किंधा’चं साम्राज्य म्हणून येतो. अर्थात, हा दाव्या-प्रतिदाव्याचा पीळ हनुमानाच्या शेपटीसारखीच लांबलचक आहे.

कर्नाटकातल्या समुद्रालगतच्या गोकर्ण भागात हनुमानाचा जन्म झालाय, असाही एक दावा आहे. ह्या दाव्याच्या शेपटीत महाराष्ट्रही आहे. हनुमानाचा जन्म नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ’अंजनेरी’ डोंगरावर झाला, असं इथल्या लोकांना वाटतं. ’अंजनेरी’ हे नाव हनुमानाची आई-अंजनीमातेच्या नावावरून पडलं, असं अभ्यासकांचं म्हणणं आहे. ह्या डोंगरावर अंजनी मातेचं आणि हनुमानाचं मंदिर आहे. तसाच, नाशिकचा संबंध थेट ‘रामायण’शी जोडण्यासाठी दाखले दिले जातात.

वनवास सुरू झाल्यावर राम- लक्ष्मण- सीता हे अरण्यात राहात होते. त्याचं नाव ’पंचवटी’! ते नाशिकमध्ये आहे. इथून सीतेचं अपहरण झाल्यावर राम-हनुमान भेट झाली. इथेच लक्ष्मणाने शूर्पणखाचं नाक कापलं म्हणून ह्या प्रदेशाला ’नासिक’ हे नाव पडलं ; त्याचं पुढे नाशिक झालं, असं सांगितलं जातं.



Also Read : सत्तासंघर्षाची ब्रेक द चेन – ज्ञानेश महाराव| Postbox India

नाशकात सीतागुंफा, काळाराम मंदिर, जटायू-रामाची भेट झालेला ’टाकेद’ हा भाग आहे. नाशकातील ’पंचवटी’ इंडोनेशियातही आहे. ’रामायण-महाभारत’ हे प्राचीन ग्रंथ आहेत. तो मानवी जीवनाचा इतिहास नाही. ह्या ग्रंथांच्या कथा-कहाण्या जिथवर गेल्या, तिथे लोकांनी आपल्या संततीला त्यातील पात्रांची नावं दिली; तशी त्यातल्या प्रदेशातली नावं सभोवतालाही दिली.

ही शेकडो वर्षांची प्रक्रिया आहे. कल्पनेतूनच वास्तव निर्माण होतं. तो इतिहास नसतो. इतिहास माणसं घडवतात. तथापि, रामभक्त हनुमान ते बिनशेपट्यांचे ’भक्त’ हा बदलाचा इतिहास मूर्खपणाचा आहे. पत्थरी देव-देवतांच्या नादात मिळालेल्या मानवी जन्माची माती करणार्‍यांचा आहे.

मयूरचा पराक्रम, नाही चक्रम-विक्रम
आला सास-गेला सास
जिवा तुझं रे तंतर !
अरे जगणं-मरणं
एका सासाचं अंतर !
हे कविश्रेष्ठ बहिणाबाई चौधरी यांनी सांगितलेलं ’एका श्वासाचं महत्त्व’ मयूर शेळके या धाडसी तरुणाने करोडो लोकांना श्वास रोखून अनुभवायला लावलंय. हा थरारक प्रसंग १७ एप्रिलच्या दुपारी मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील कल्याण-कर्जत दरम्यानच्या ’वांगणी’ रेल्वे स्थानकात घडला.

Tention meaning लोकल ट्रेनमध्ये खेळणी विकून गुजराण करणारी ’विनाआधार’ अंध महिला आपल्या ८-९ वर्षांच्या मुलासह दोन क्रमांकाच्या फलाटावरून चालली होती. मुलगा आईचा हात ओढत चालत होता. तेवढ्यात त्याचा हात सुटला आणि तो तोल जाऊन रेल्वे मार्गावर पडला. त्याच वेळी समोरून (त्या स्थानकावर न थांबणारी) ’उद्यान एक्सप्रेस’ भरधाव वेगाने येत होती. ती मुलापर्यंत पोचण्यासाठी फक्त १२ सेकंदांचा अवधी होता. ‘एक्सप्रेस’ने काळजाचा ठोका चुकवणारा ’हॉर्न’ दिला.

त्याने हादरलेली अंध महिला मुलाला शोधण्यासाठी टाहो फोडत फलाटाच्या टोकाला मृत्यूच्या दिशेने जाऊ लागली. मुलाचा मृत्यू निश्चित होता. ते दृश्य रेल्वेमार्गाची देखरेख ठेवणार्‍या ’पॉईंटमन’ मयूर शेळके यांनी पाहिलं. तो मुलाच्या दिशेने शंभरेक फूट वार्‍यासारखा सुसाट धावला.



Also Read : https://www.postboxindia.com/strongest-man-of-india-railway-pointsman-mayur-shelke-saves-the-life-of-a-child/

 

आता तिघेही मृत्यूच्या कक्षेत आले होते. हे लक्षात आल्यानेच असेल; मयूरच्या डोक्यात आपल्यापुरता धोका टाळण्याचा विचार आल्याचं त्यांच्या देहबोलीवरून दिसतं. पण तो क्षणातला ’कणक्षण’ असेल. तोवर शंभर फुटांवर ’एक्सप्रेस’ पोचली असतानाही त्याने मुलाचं बकोटं पकडलं, उचलून फलाटावर फेकलं आणि स्वत:ही फलाटावर उडी मारून आला! तिघेही वाचले !!

’एक्सप्रेस’ तिच्या सुपरफास्ट वेगात निघून गेली. हे सारं १२ सेकंदांत घडलं. ते रेल्वेच्या ’सीसी’ कॅमेर्‍याने पकडलं आणि ’सोशल मीडिया’ वरून ‘व्हायरल’ झालं. त्यासरशी ३२-३५ वयाच्या मयूरवर शुभेच्छांचा वर्षाव झाला. केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: फोन करून त्याच्या धाडसाचं कौतुक केलं. रेल्वेकडून त्याला ५० हजार रुपयांचं बक्षीस दिलं. ’जावा कंपनी’ने त्याला ’स्पोर्टस बाईक’ भेट दिली. पण हे धाडस अपयशी ठरलं असतं तर ?

’राजा हरिश्चंद्र’ नाटकातला प्रसंग आहे. विश्वामित्राला स्वप्नात दिलेल्या वचनाने कफल्लक झालेल्या हरिश्चंद्राच्या आयुष्याचा एक दिवस; पत्नी तारामतीच्या आयुष्याचे दोन दिवस आणि मुलगा रोहिदासचे तीन दिवस शिल्लक असतात. हरिश्चंद्राने स्मशानात श्रम करून आणलेल्या पिठाच्या गोळ्याची तारामतीने एक भाकरी तयार केलेली असते. तिचे ती चार तुकडे करते.

एक चतकोर समोर बसलेल्या हरिश्चंद्राच्या पुढ्यात ठेवते. एक आपल्या पुढ्यात ठेवते आणि बाहेर खेळायला गेलेल्या रोहिदासचा एक चतकोर बाजूला काढून ठेवते. आता भाकरीचा एक चतकोर उरतो. तो नवर्‍याला द्यायचा की आपल्या पश्चात एक दिवस जास्त जगणार्‍या मुलासाठी ठेवायचा, असा प्रश्न तारामतीला पडतो.


तो हरिश्चंद्र ओळखतो. म्हणतो, “तो चतकोर रोहिदाससाठी ठेव. मी अधिकचा एक खाऊन काय होणार? उद्याचं मरण नक्की आहे. रोहिदासला माझ्यापेक्षा दोन दिवस अधिक जगायचं आहे. त्याच्यासाठी मी माझ्या वाट्याचाही चतकोर ठेवतो ! हे ऐकून तारामतीला भरून येतं. तीही आपल्या वाट्याचा चतकोर रोहिदाससाठी ठेवते. मुलाच्या भुकेसाठी आपण पूर्ण भाकरी ठेवली, ह्याचा दोघांनाही आनंद होतो.

हे दृश्य रोहिदास विंगेतून पाहत असतो. तो तडक रंगमंचावर येतो. त्या भाकरीला दूर सारत म्हणतो, “आई-बाबा, तुम्ही स्वत:चं पोट मारून माझ्या पोटाचा, भुकेचा विचार करता! तसा माझ्या स्वाभिमानाचा विचार कधी करणार? त्या स्वाभिमानासाठी हे पोट आडवं येत असेल, तर हे पोट मी फेकून देतो!” पडदा पडतो. ज्या देशात असे स्वाभिमानासाठी पोट फेकून देऊन कर्तव्यकर्म करणारे तरुण असतात; त्या देशाला भुकेचे आणि भिकेचे डोहाळे कधी लागत नाहीत.


मयूर शेळके याने पोटच नाही, तर आपला अवघा जीव फेकून त्या मुलाला आणि त्याच्या आईला मृत्यूच्या जबड्यातून खेचून बाहेर काढलंय. अशा वेळी त्याच्या यशस्वी धाडसाचा विचार केला पाहिजे. हे धाडस काही मिळवण्यासाठी नव्हतं, तर जीव वाचवण्यासाठी होतं. म्हणूनच त्याने आपल्याला मिळालेल्या बक्षिसातली अर्धी रक्कम त्या अंध मातेला दिली. घेता क्षणीच, तो देता झाला! अशा असंख्य मयूर शेळकेंची आज देशाला गरज आहे. ’नाच रे मोरा’च्या गाण्यावर ’मयूर डान्स’ करणार्‍यांची नाही! आणि तरुणांना नाचवण्यासाठी मोरांना दाणे टाकणार्‍या राज्यकर्त्यांची तर अजिबात नाही !!


 

 ज्ञानेश महाराव

Leave a Reply

error: Content is protected !!