Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

SANSKRITISANSKRITI DHARA

moropant – आज मोरोपंतांचे पुण्यस्मरण (१७९४) अभिवादन

1 Mins read

moropant – आज मोरोपंतांचे पुण्यस्मरण (१७९४) अभिवादन

 

moropant – आज मोरोपंतांचे पुण्यस्मरण (१७९४) अभिवादन

१२१ सुरस केकांचे केकावली हे प्राकृत भाषेतील अत्यंत प्रसिद्ध काव्य रचणारे
महाकवि मोरोपंत यांचे आज पुण्यस्मरण (तारखेनुसार). मोरोपंत पूर्ण नाव: मोरेश्वर रामचंद्र पराडकर. (जन्म : पन्हाळगड, इ.स. १७२९ – बारामती, १५ एप्रिल, १७९४-चैत्री पौर्णिमा)
व्यासांनंतर सत्प्रमेय रचनाचातुर्य ज्या लाभले’ असे ज्यांचे वर्णन केले जाते अशा महाकवि मोरोपंतांच्या या रचनाप्राकृत भाषेला मिळालेली ती एक देणगीच आहे .

सुसंगत सदा घडो सुजनवाक्य कानी पडो.
कलंक मतिचा झडो, विषय सर्वथा नावडो.
सदंघ्रिकमळी दडो, मुरडिता हटाने अडो,
वियोग घडता रडो, मन भवच्चरित्री जडो .’
काव्याच्या नावातूनच कविच्या महानतेची जाणीव होते. “संसारातील तापत्रयाने पीडित होणा-या मयूराने ‘दयामृतघना’च्या वृष्टीसाठी टाहो फोडला. हा टाहो म्हणजे ‘केका’, व त्यांची ही आवली (अर्थात माला किंवा माळ), अशी ही केकावली”.

मोरोपंत moropant हे स्वराज्याच्या कालातील शेवटचे आणि पंडित कवींच्या परंपरेतील सर्वश्रेष्ठ कवी होत. बाबूजी नाईकांच्या घरातील स्त्रियांना पुराण सांगणे हा त्यांचा मुख्य उद्योग होता. त्यातून त्यांची प्रतिभा जागृत झाली आणि संस्कृत महाकाव्ये व पुराणे यांतील कथाभाग त्यांनी प्रचंड परिश्रम करून मराठीत आणला. मोरोपंतांची रचना केवळ प्रचंड आहे. त्यांची एकूण रचना जवळजवळ साठ हजार आऱ्या भरते. त्यांचे आऱ्याभारत ही सर्वांत सरस व प्रदीर्घ अशी रचना होय. मोरोपंतांच्या परिणत प्रज्ञेचे व परिपक्व प्रतिभेचे दर्शन येथे घडते. यातील विविध प्रसंग व निरनिराळ्या व्यक्ती यांची त्यांनी केलेली वर्णने अतिशय वेधक उतरली आहेत.

आऱ्याभारताखालोखाल त्यांची रामायणावर रचना आहे. रामकथा त्यांनी एकशेआठ वेळा गायिली आहे. हा एक अदभुत चमत्कारच म्हणावयास हवा. रचनेचे नाना प्रकार त्यांत त्यांनी केले आहेत. त्यानंतर कृष्णविजय ऊर्फ बृहद्दशम, मंत्रभागवत आणि ब्रह्मोत्तरखंड ही प्रदीर्घ काव्ये येतात. भागवती प्रकरणे, संतचरित्रे, कुशलव्याख्यान, मोरोपंतांचे साहित्य अपार आहे. ते सर्व आता लक्षात नाही. पण माझ्या आठवणीप्रमाणे moropant मोरोपंतांनी १०८ रामायणे लिहीली आहेत. प्रत्येक रामायण हे कव्यबद्ध असून प्रत्येकाचे वेगवेगळे वैशिष्ट्य आहे. उदा. त्यांनी एक ‘निरोष्ठ रामायण’ लिहीले.

याचा अर्थ, हे रामायण वाचत असताना असा कुठलाही स्वर किंवा व्यंजन योजलेले नाही कि ज्यामुळे शब्द उच्चारत असताना आपले दोन ओठ एकत्र येतील. आश्चर्य आहे ना. राम या शब्दातच ‘म’ उच्चारण्यासाठी ओठ एकत्र आणावे लागतात. पण तरिही हे शक्य केले आहे. याचा अर्थ राम ऐवजी कदाचित मोरोपंतांनी ‘राघव’ या श्रीरामांच्या दुस-या नावाचा उपयोग केला असेल. असे उदाहरण जगाच्या ईतिहासात क्वचितच कुठे असेल, परंतु संकुचित राहिलेल्या मराठी साहित्याची ओळख जगाला करून देण्याची खरोखरच वेळ आली आहे.

Also Raed : https://www.postboxlive.com

 

संशयरत्नावली इ. अनेक छोटीमोठी प्रकरणे त्यांनी लिहिली आहेत. भगवद्गीतेचा समश्लोकी अनुवाद त्यांनी आऱ्याछंदात केला आहे व त्यावर वामनांच्या समश्लोकीची गाढ छाया आहे. संसारतापाने श्रांत झालेल्या मोरोपंतानी केकावलीमध्ये ईश्वराची करुणा भाकली आहे. सीतागीत, रुक्मिणीगीत यांमधील भाषा, भावना व आविष्कार स्त्रीमनास शोभेल असा आहे. पंतांची ही रचना साधी, प्रसादपूर्ण व वैदर्भी रीतीची आहे. अन्यत्र त्यांची शैली गौडी आहे.

Also Read : https://www.postboxindia.com

मोरोपंतांनी moropant आऱ्याछंदास प्रतिष्ठा मिळवून दिली. ज्ञानेश्वरांची ओवी, तुकोबाचा अभंग आणि वामनांचा श्लोक यांबरोबरच मोरोपंतांच्या आर्येस जुन्या मराठी साहित्यात मानाचे स्थान मिळाले आहे. यमकांचा हव्यास, अपरिचित शब्दांची योजना, संस्कृतप्रचुरता आणि समासप्रचुरता यांमुळे त्यांच्या रचनेत अनेकदा क्लिष्टता, दुर्बोधता व प्रसादहीनता शिरलो आहे. त्यामुळेच मोरोपंत हे कवीच नव्हेत, असे मतही व्यक्त केले गेले आहे, पण ऐकांतिक मत झाले. योग्य घटनांची निवड व संक्षेपातील विवेक.

निवेदनातील ओघ व प्रवाहीपणा, व्यक्तिदर्शनातील चातुर्य व प्रसंगवर्णनातील कसब, त्याचबरोबर नाट्यपूर्ण संवाद व विविध उपमादृष्टांतांची पेरणी यांमुळे मोरोपंतांची कविता, ही एकदा त्यांच्या संस्कृतप्रचुर भाषेचा तट ओलांडला, की रसिकाला मोहविणारी ठरते. काही ढोबळ व स्पष्ट जाणवणारे असे दोष असूनही त्यांची कविता मान्यता पावलेली आहे, यातच त्यांचे यश व मोठेपण आहे. त्यांच्या या गुणांमुळेच त्यांची कविता संस्कृत जाणणाऱ्या विद्वानांनाही मान्य झाली, कीर्तनप्रसंगी तिचा सर्वत्र उपयोग केला गेला आणि अव्वल इंग्रजीच्या काळात त्यांची एक परंपराच निर्माण झाली. त्यांचे वास्तव्य बारामती येथे होते .

आज मोरोपंतांचे moropant पुण्यस्मरण (१७९४)अभिवादन
मोरोपंतांची सिद्ध काव्ये
आर्याकेकावलि
आर्याभारत
आर्यामुक्तमाला
कुशलवोपाख्यान
कृष्णविजय
नाममाहात्म्य
नारदाभ्युगम
परमेश्वरस्तोत्र
प्रल्हादविजय
भीष्मभक्तिभाग्य
मंत्ररामायण
संशयरत्‍नावली
साररामायण
सीतागीत

 

 

माधव विद्वांस 

PostBox India

Leave a Reply

error: Content is protected !!