token of appreciation
token of appreciation
token of appreciation

token of appreciation – करा कौतुक मनापासून !!

token of appreciation - करा कौतुक मनापासून !!

token of appreciation – करा कौतुक मनापासून !!

 

 

token of appreciation – करा कौतुक मनापासून !!

 

 

आपण जितक्या पटकन दुसऱ्यांवर  टीका करतो किंवा त्यांच्या  चुका काढतो, तितक्या पटकन आपण कोणी काही छान काम  केलं तर त्याच कौतुक करतो का ? वा  छान काम केलंस ! / मस्त झालं प्रेसेंटेशन ! /खूपचं मस्त आपल्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न हाताळले / क्या बात ,त्या नाराज ग्राहकाला मस्त पैकी मनवलंस !/ इतकी महत्वाची मिटिंग मस्त manage केली.  असं म्हटलं जात का ??  तर उत्तरं असतं – नाही . कारण सरळ आहे कौतुक करायला सर्वाना जरा जडच जातं. कुठेतरी कौतुक करण्यास ,शाबासकी देण्यास आपण फार कंजूषपणा करतो. त्यात काय ? त्याच ते कामच होत. किती गृहीत धरतो ना आपण आपल्या कर्मचार्यांना  !

चांगल्या कामाची प्रशंसा केली ,मस्त म्हटलं तर ते काम करणाऱ्या व्यक्तीला सुद्धा नक्कीच छान वाटेल , नाही  का ??आपण सर्व इतके धावपळीचे ,ताण-तणावाचे आयुष्यं जगात असतो की कौतुकाचे दोन शब्द सुद्धा एखाद्याच्या मनाला उभारी देऊ शकतात. कौतुकाची थाप ही  नक्कीच समोरच्याला अजून उत्तम काम करण्यासाठी हुरूप देणारी ठरते.

ऑफिसमध्ये प्रत्येक कर्मचारी आपापले काम करतं असतात ,पण चांगल्या कामाची पोच-पावती म्हणजे कौतुक ,ते करायला विचार करू नका पण मनापासून करा  . बऱ्याच कंपन्या चांगल्या कामासाठी आपली कर्मचार्यांना token of appreciation प्रशस्ती पत्र ( Appreciation letter ) देतातं . तुम्ही कार्ड पण देऊ शकता ,बोलून दाखवू शकता , मस्त  मेल करू शकता ,छानसं पत्र लिहून ऑफिसच्या नोटीस बोर्ड वर लावू शकता. आपल्या सहकाऱ्याला प्रेरित करायला याहून चांगलं काय ?आपल्या संघाच्या सदस्याला किती आनंद होईल जेव्हा त्याच्या मेहनतीचे, प्रयत्नांचे असे कौतूक झाले तर !

दोन कौतुकाचे शब्द आपल्या कर्मचाऱ्यांना काम अजून उत्तम कसं करता येईल ,याचे बळ देतं .त्यामुळे, आहे त्यापेक्षा जास्तच देण्याचा / करण्याचा आपसूक कर्मचारी सुद्धा आपल्यापरीने कामासाठी प्रयन्त करतो. Appreciation /कौतूक ही सर्वांची एक महत्वाची भावनिक गरज आहे. ती भावनिक गरज जर साध्या चांगल्या शब्दाने भागणार असेल तर त्यात मागे का पहावे ? त्यासाठी काही टॅक्स लागणार नाही आहे.

कुठला पण शब्द token of appreciation वापरा -छान काम ! ग्रेट  वर्क  ! धन्यवाद ! वेल डन ! keep  it up ! पण ,बोला कौतुकाचे शब्द मनापासून !हो ! महत्वाचे ,पाठीमागे बोलू नका तर सर्वांसमोर बोला . आपल्या  कर्मचाऱयांच्या कामाचे   / गुणांचे कौतूक करा . कोणाचे कौतूक केल्याने आपण छोटे होत नाही , हे नक्की ! उलट समोरची व्यक्ती आपल्या मनाच्या मोठेपणाची नकळत नोंद करते.

पूर्ण सफेद पेपर बघायचा की त्यावरचा फक्त काळा ठिपका बघून त्याबद्दल बोलत राहायचे ?दोष काढायला काहीचं लागत नाही ,फारचं सोपं काम असतं  ते ,खरी कसोटी असते शाबासकी देण्यात , कौतुक करण्यात !तेव्हा आता मागे- पुढे पाहू नका .जेव्हा केव्हा संधी मिळेल लगेच प्रशंसा करा व्यक्तीची ,त्यांच्या चांगल्या कामाची ,त्यांच्या योगदानाची ! करून तर पहा !

postboxindia.com
www.postboxindia.com
मेघना धर्मेश
Success Mantra
HR consultant, Soft skills Trainer and faculty of Entrepreneurship
[email protected]

 

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisement

More Stories
Maratha Empire - baaji prabhu deshpande
Maratha Empire – पावन खिंडीतला पराक्रम बाजीप्रभू देशपांडे
error: Content is protected !!
%d bloggers like this: