transport and communication
transport and communication
transport and communication

transport and communication – संभाषण कौशल्य  विषय रोजचा तरी महत्वाचा

transport and communication - संभाषण कौशल्य  विषय रोजचा तरी महत्वाचा

transport and communication – संभाषण कौशल्य  विषय रोजचा तरी महत्वाचा

 

transport and communication – संभाषण कौशल्य  विषय रोजचा तरी महत्वाचा

 

 

 

काळे सरांनी आपली नेहेमीची आठवड्याची मीटिंग संपवली .परत एकदा सगळ्यांना विचारलं ,सर्व मुद्दे  समजले ना ? काही प्रश्न आहेत  का ? तर ,लागायचं ना कामाला ? सर्वानी अगदी आनंदाने आणि उत्साहाने  हो म्हटले . काळे सरांची मीटिंग म्हणजे सगळ्यांना अगदी सहज सामावून घेणारी आणि महत्वाची म्हणजे सगळ्यांचे मत विचारात घेऊन मग निर्णय घेणारी अशी असायची. सर्व कर्मचारी अगदी आंनदाने  वाट पाहायचे. पूर्ण मीटिंग म्हणजे नवीन कर्मचाऱयांना transport and communication उत्तम संभाषण कौशल्य कसे असावं याची एक कार्यशाळांचं असायची.आपले बोलणे पुढच्याला व्यवस्थितपणे सांगणे, मुद्दे सहजतेने समजावणे हे काळे सर खूप शांतपणे, आपुलकीने करायचे.

चांगलं संभाषण प्रत्येकाला जमतंच असं नाही. एकमेकांशी संवाद साधताना तो प्रभावी होण्यासाठी आपण हे करु शकतो:

1. बोलण्यात स्पष्टता असावी.साध्या,सोप्या भाषेत बोलावं. मुद्दे नेमके आणि अचूक असावे.

2. सावकाश बोलावे पण एकदम हळू किंवा मोठयाने बोलू नये.

3. आपली भाषा संपन्न करण्यासाठी वाचन, लेखन, मनन केलं तर आपला शब्दसंग्रह /शब्दसंपदा वाढते,त्याचा आपल्याला उत्तम संवादासाठी मदत होते.

4. बोलताना त्या व्यक्ती कडे बघून ( Eye Contact ) बोला , त्यातून आपलयाला बोलण्यात स्वारस्य आहे आणि व्यक्तीबद्दल आदर आहे हे कळतं.

5. चेहर्याचे हावभाव,तसेच हातवारेही गरज असेल तेव्हाचं वापरा. आपली देहबोली ही सकारात्मक असावी.

6. उत्तम श्रवणकौशल्य (Good listening Skills) , शांतपणे इतरांचे ऐकून घेण्याची क्षमता /कला पण खूप महत्वाची आहे, जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीचे म्हणणं नीट ऐकालं तेव्हाचं त्या अनुषंगाने आपले विचार/मत मांडू शकाल .

 

Also Visit : https://www.postboxlive.com

 

7. आपल्या मातृभाषे व्यतिरिक्त इतर भाषेत संवाद साधताना आत्मविश्वास यावा यासाठी रोजच्या जीवनात /कामात त्या भाषेत बोलण्याचा सराव करा.

8. नुसती माहिती / ज्ञान असून उपयोग नाही ,ते लोकांसमोर त्याच प्रभावीपणे मांडता यायला हवं.

9. अभिप्राय ( Feedback) द्या आणि  घ्या ,त्याचा  नक्कीचं फायदा होतो.

10. समोरच्या व्यक्तीचे बोलणे झाल्यावर मग आपला मुद्दा मांडा. कोणालाही मध्येंच बोललेले व्यत्यय आणलेला आवडणार नाही .

बोलणे म्हणजे आपल्या विचारांचे सादरीकरण, मग ते जर आपण व्यवस्थित केले तर का नाही लोकांपर्यंत पोहचणार ?  त्यासाठी ऐकणे,  निरीक्षण करणे ह्यावर पण कामं करायला हवे . transport and communication काय बोलू ? कसे बोलू या हो – नाहीच्या चक्कर मध्ये आपणं बोलायची, व्यक्त होण्याची, आपले मतं मांडण्याची संधी घालवतो. एकदा का आपण सहज, सोप्या भाषेत बोलायला सुरवात केली, की मग नक्की जमतं.

योग्य माहिती योग्य प्रकारे  योग्य  व्यक्तींपर्यंत पोहचवणे ह्याला आपण उत्तम संभाषण कौशल्य म्हणू शकतो. स्पष्ट आणि संक्षिप्त संदेश ह्यात आपणं जे  शब्द  निवडतो (शब्दरचना), ज्या प्रकारे आपली देहबोली वापरतो हे महत्वाचे असते. नुसते बोलणे ,सांगणे म्हणजे झालं असं नव्हे तर आपलं म्हणणं पुढच्या पर्यन्त  योग्य  प्रकारे पोहचावं ह्या साठी आपल्याला ह्यावर काम करायचं असतं. ज्याच्या  बोलणायत ,सांगण्यात गोंधळ नाही तर  स्पष्टता आहे तो उत्तम संभाषण करू शकतो. कर्मचारी असू देतं, बॉस असू देतं किंवा इतर कोणी, सर्वाना त्याच्या व्यावसायिक प्रगतीसाठी उत्तम संभाषण कौशल्य हे अतिशय जरुरी आहे .

जसे समर्थ रामदास म्हणाले –

अभ्यासें प्रगट व्हावें । नाहीं तरी झांकोन असावें ।

प्रगट होऊन नासावें । हें बरें नव्हे ॥

म्हणजेचं आपल्या विषयाचा अभ्यास करा आणि मग बोला, नाहीतर स्वतःस झाकून दूर राहा / बोलू नका. एकदा आपण  बोलायला सुरवात केली पण आपले विचार ,आपली भूमिका आणि आपली मांडणी ह्यात गल्लत झाली तर ते चांगलं वाटणार नाही, ते पुढच्या पर्यंत पोहचणारं नाही .

     चांगल्या संवादाने चांगलं व्यक्त होता येतं आणि एकदा का आपण व्यवस्थित बोलू शकलो तर बऱ्याच समस्या ह्या पर्वता एवढ्या होण्या आधीचं ,त्यावर उत्तरं शोधता येईल . बोलण्याने समस्यांवर  मार्ग काढता येतात. तेव्हा वेळीच ओळखा संभाषण कौशल्याचे महत्त्व !

 

postboxindia.com
www.postboxindia.com
मेघना धर्मेश
9321314782

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisement

More Stories
Comred
Comred – कॉ.तारा रेड्डी यांचा आज स्मृतीदिन
error: Content is protected !!
%d bloggers like this: