Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

NewsPostbox Marathi

vaccine लसीकरण संदर्भात दाखल गुन्हा

1 Mins read

vaccine लसीकरण संदर्भात दाखल गुन्हा.

 

हिरानंदानी हेरिटेज,एस.व्ही.रोड,कांदिवली पश्चिम,मुंबई

 

 

18/6/2021,

 

vaccine कोवीशिल्ड लसीकरण

 

दिनांक ३०/०५/२०२१ रोजी हिरानंदानी हेरिटेज क्लब हाउस, एस व्ही रोड,कांदिवली पश्चिम मुंबई

येथे सकाळी १०.०० ते दुपारी ०२.०० वा. दरम्यान कोविड vaccine लसीकरण मोहिम आयोजित करण्यात आली होती .

या लसीकरणाकरिता vaccine सोसायटी सदस्यांपैकी एकुण ३९० सभासदांनी लस  घेतली होती. त्याकरिता प्रत्येकाने रूपये १२६०/-
प्रति दराने असे एकुण ४,५६,०००/- रूपये आयोजकांना दिले.

नमुद लसीकरण vaccine झाल्यानंतर सोसायटी सदस्यानी प्रमाणपत्राबाबत मागणी केली असता आयोजकांनी लस घेतलेल्या सदस्यांचा डाटा मागितला

आणि त्याची मागणी लावून धरली व त्याप्रमाणे सदस्यांना तीन वेगवेगळया संस्थेचे लस घेतले बाबत प्रमाणपत्र कोविन ॲपद्वारे देण्यात आली.

नमुद लसीकरण मोहिमेअंतर्गत लस घेणारे फिर्यादी यांनी पोलीस ठाण्यात येवून तकार दिली की, नमुद लसीकरण मोहिमे दरम्यान आयोजकांनी सिल ,
तुटलेल्या कोविशिल्ड vaccine बॉटल मधून सदस्यांना लस दिली होती, तसेच कमिटी मेंबर्स ने पुरविलेला डाटा द्वारे त्यांना या तीन
वेगवेगळया संस्थेमार्फत प्रमाणपत्र देण्यात आले होते. त्यावरून फिर्यादी यांचा सविस्तर जबाब नोंद करून आयोजकांविरूध्द
गु.नो कं ५९१ /२०२१, कलम २६८,२७०,२७४,२७५,२७६, ४१९,४२०,४६५,४६७,४६८, ४७०,४७१,१८८,३४ भा.
द.वि सह कलम ४३, ६६(सी) माहिती तंत्रज्ञान कायदा सह कलम ३ साथीचे रोग अधिनियम अन्वये गुन्हा दाखल
करण्यात आला आहे.

vaccine Authorized प्रमाणित सोर्सकडुन घेण्यात आले
नव्हते असे दिसुन येते. महानगर पालिकेने आदेशित केलेल्या नियमाचे पालन करण्यात आले नव्हते.

 

अशा प्रकारच्या गुन्ह्यांमुळे कोविड कॅम्प चालवून लसीकरण करणाऱ्या संस्थेवरचा विश्वास

नागरिकांचा कमी होत जाईल असे पोलिसांनी मत व्यक्त केले. एकूणच नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

सदर गुन्हयाचा तपास मा.श्री. दिलीप सावंत सर, अपर पोलीस आयुक्त, उत्तर प्रादेशिक विभाग,मुंबई व मा. श्री.
विशाल ठाकूर सर, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ- ११, मुंबई व मा अस्मिता भोसले, सहाय्यक पोलीस
आयुक्त,मालवणी विभाग,मुंबई यांचे मार्गदर्शनाखाली कांदिवली पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. बाबासाहेब
साळुखे, तपासी अधिकारी पो.नि दिपशिखा वारे, पो.नि विजय कांदळगांवकर,पो.नि अतुल मोहिते, पोउनि सुर्यकांत
पवार,पोउनि संदिप पाटील, पोउनि इद्रजित भिसे, पोउनि सुनिल वाघ स फौ अनिल सावंत व म.पो.शि मोनिका गोम्स
यांनी केलेला आहे.

 

 

 

अंजनी मिश्रा 

postbox India

Leave a Reply

error: Content is protected !!