vasantdada patil
vasantdada patil
vasantdada patil - वसंतदादा पाटील

vasantdada patil – सांगली – वसंतदादा पाटील

vasantdada patil - ब्रिटिश सत्तेच्या छाताडावर लाथ मारत सांगली जिल्ह्यातील जिगरबाज क्रांतिकारकांनी जी उडी मारली होती

vasantdada patil – सांगली – वसंतदादा पाटील

 

vasantdada patil – ब्रिटिश सत्तेच्या छाताडावर लाथ मारत सांगली जिल्ह्यातील जिगरबाज क्रांतिकारकांनी जी उडी मारली होती

 

 

 

भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात अनेक उड्या नोंदवल्या असतीलही, पण ब्रिटिश सत्तेच्या छाताडावर लाथ मारत सांगली जिल्ह्यातील जिगरबाज

क्रांतिकारकांनी जी उडी मारली होती ती नुसतीच ऐतिहासिक नव्हती तर ब्रिटिश हुकमतीला कृष्णेच्या पाण्याची ताकत दाखवणारी होती. सांगलीचा जेल

फोडून, त्याच्या तटावरून पूर आलेल्या कृष्णेत ज्या बहाद्दर स्वातंत्र्यसैनिकांनी उड्या घेतल्या, त्या त्यांच्या शौर्याला सलाम.

१९४२ चं वर्ष म्हणजे स्वातंत्र्य लढ्यातलं धगधगणारं वर्ष. महात्मा गांधीजींनी ब्रिटिश सत्तेला चले जाव चा इशारा दिला आणि सारा देश रस्त्यावर उतरला.

सांगली म्हणजे पूर्वीचा सातारा जिल्हाही या लढ्यात धगधगत होताच. अनेक स्वातंत्र्यसैनिक भूमिगत होते आणि बिनीचे साथीदार तुरुंगात होते. १९४२ च्या चळवळीत

क्रांतिकार्यात भाग घेतल्याबद्दल वसंतदादा पाटिल, हिंदूराव पाटील , गणपतराव कोळी, जयराम कुष्टे, जिनपाल खोत, सातलिंग शेटे, महादेव बुटाले, वसंत सावंत,

अण्णासाहेब पत्रावळे, बाबूराव जाधव, विट्ठल शिंदे, जयराम बेलवलकर, दत्तात्रय पाटील, नामदेव कराडकर, कृष्णा पेंडसे, बाबूराव पचोरे यांना कैद करुन ब्रिटिशांनी

सांगलीच्या जेलमध्ये डांबले होते. पण तुरुंगाला घाबरतील ते लढवय्ये कसले? त्यांनी तुरुंगात बसूनच तुरुंग फोडायचा जबरदस्त प्लॅन तयार केला. नुसता तयार केला नाही तर तो फोडलाही.

या सर्व क्रांतिकारकांनी शनिवार दि.२४ जुलै १९४३ रोजी अभेद्य असा सांगलीचा जेल फोडला. नुसता जेल फोडला नाही तर पहारेकऱ्यांना कोंडले. किल्ल्याच्या उंच

तटावरुन खंदकात उडी मारून हे क्रांतिकारक बाहेर पडले. पहारेकरी सावध झाले. या वेळी तुरुंग फोडणाऱ्या क्रांतिकारकांच्या मागे १२५ ब्रिटिश घोड़ेस्वार पोलिसांची

तुकड़ी व लष्कराच्या दोन गाड्या असा पाठलाग सुरु झाला. एखाद्या हॉलिवूड सिनेमातल्या थरारक सीनलाही लाजवेल असा हा प्रसंग. सांगलीच्या गर्दी भरल्या चौकातून

आणि रस्त्यावरून हे क्रांतिकारक दुथड़ी भरून वाहणाऱ्या कृष्णा नदीकड़े धावले. नदीकाठावर ब्रिटिश पोलिस आणि क्रांतिकरकांच्यामध्ये गोळीबार चालू झाला. यामध्ये

अण्णासाहेब पत्रावळे व बाबूराव जाधव शहीद झाले. बाबुराव जाधव यांचा मृतदेह कृष्णेच्या पाण्याच्या प्रवाहात तसाच वाहून गेला. वसंतदादा पाटील यांना देखील गोळी

लागली. काही क्रांतिकारकांनी पूर आलेल्या कृष्णेच्या पाण्यात उड्या टाकल्या आणि पालिकड़चा काठ गाठला. वसंतदादा आणि राहिलेल्या क्रांतिकारकांना ब्रिटिश

पोलिसांनी अटक केली.

भारताच्या स्वातंत्रलढ्यातील हा प्रचंड धाडसी प्रयत्न होता. ज्यांच्या सम्राज्यावर सूर्य मावळत नव्हता अशा ब्रिटिश सत्तेच्या उरात धडकी भरवणारी ही सांगली जेल फोड़

कृति होती. सांगलीच्या किल्ल्याच्या तटावरुन मारलेली उडी व कृष्णेच्या महापुरात मारलेली क्रांतिकरकांची उडी ही ब्रिटिश सत्तेला हादवणारी उडी ठरली. देश प्रेमाने

भारावलेले हे क्रांतिकारक, आणि त्या उडीचा धाक अजूनही संपलेला नाही. स्वातंत्र्य लढ्यात सहभागी नसलेले, इंग्रजांची पाठराखण करणारे आणि खोट्या देशप्रेमाचा

आव आणणारे याना पण या उडीने धडकी भरली होती. ती अजूनही कमी झालेली नाही.

अशाया शूर योद्याला मनःपूर्वक अभिवादन

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisement

More Stories
dilip Kumar saira Banu
Dilip Kumar Saira Banu दिलीपकुमार आणि सायराबानो प्रेमकथा
error: Content is protected !!
%d bloggers like this: