veer savarkar books
veer savarkar books
veer savarkar books

veer savarkar books – स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

veer savarkar books - स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

veer savarkar books – स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

 

veer savarkar books – स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

 

 

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म भगूर या गावी दिनांक 28 मे 1883 रोजी झाला. भगूर हे नाशिक पासून जवळच आहे. सावरकरांचे वडील हे स्वाभिमानी आणि करड्या स्वभावाचे गृहस्थ होते. एका अपरात्री घरात शिरणाऱ्या दरोडेखोरांना हाती तलवार घेऊन परतवणारे ते एक निर्भय पुरुष होते. निर्भयता आणि देशभक्ती हा सावरकरांच्या वाट्याला आलेला वडिलोपार्जित वारसा होता. सावरकरांचा भगूर येथील वाडा हे एक संस्कार पीठ होते. एका खोलीत शौर्य कथा सांगणारी शस्त्रे होती तर एक दालन ग्रंथांनी व्यापलेले होते. वयाच्या पंधराव्या वर्षी सावरकरांच्या मनात आणि मस्तकात सशस्त्र क्रांतीचे वेड शिरले. दोघेही बंधु पारतंत्र्याचे विघ्न दूर करण्यासाठी जन्माला आले होते. वयाच्या पंधराव्या वर्षी सावरकरांच्या मनात आणि मस्तकात सशस्त्र क्रांतीचे वेड शिरले.चाफेकरांच्या चितेतून निर्माण झालेले विचारांचे एक वादळ सावरकरांच्या जीवनात जन्मभर घोंगावत राहिले. भारतीय प्रजेला पायदळी तुडवणार्या दुष्ट अधिकाऱ्यांना पिस्तुलांच्या साह्याने आपली जागा दाखवणाऱ्या चाफेकर बंधूंना फाशी देण्यात आले.सावरकरांनी त्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली ती वज्रकठोर अशा प्रतिज्ञेच्या स्वरूपात. सावरकर देवघरात गेले .अष्टभुजेपुढे त्यांनी प्रार्थनापूर्वक प्रतिज्ञा केली :”माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी शत्रुला मारीत मारीत चाफेकरांसारखा मरेन किंवा छत्रपती शिवाजीराजेंसारखा विजयी होऊन मातृभूमीच्या मस्तकी स्वराज्याचा अभिषेक करवीन.” चाफेकर आणि सावरकर ही पराक्रमी भावंडाची घरकुले होती. देशाच्या स्वातंत्र्यासाठी घराचे रणांगण करणारी आणि मृत्यूच्या वाद्यवृंदात राष्ट्रगीत आळवणारी ही मुलखावेगळी माणसे होती. 1902 ते 1906 ही वाढीच्या वयातील महत्त्वाची वर्षे सावरकरांनी पुण्यात घालवली.महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयाची निवड केली. त्या काळी पुणे हे भारतीय कीर्तीच्या लोकनेत्यांचे आणि विद्वानांचे आगर होते.
सावरकरांना veer savarkar books दि.13 मार्च 19 10 या दिवशी लंडन येथे अटक करण्यात आली. त्यांच्यावर अभियोग भारतात चालवण्याचा इराद्याने त्यांना जहाजावर चढविण्यात आले. सावरकर हे सागरवेडे होते. सागराशी त्यांनी अजन्म सख्य केले. त्यांची नौका मार्सेलिस बंदराजवळ आली आणि सावरकरांना सागराची हाक ऐकू आली. त्यांनी समुद्रात जीव झुगारून दिला .सागराने आपले इमान राखले आणि सावरकरांना फ्रान्सच्या किनाऱ्यावर पोहोचते केले.ब्रिटिश पोलीसांनी त्यांचा पाठपुरावा करून फ्रेंच हद्दीत शिरून त्यांना पकडले. सावरकरांना दोन आजन्म कारावासाच्या शिक्षा फर्मावण्यात आल्या. पहिली जन्मठेप सरणार होती आणि दुसरी सुरू होणार होती.प्रत्येकी 25 वर्षाचा एक असे दोन सलग कालखंड अंदमान बेटावर रहावे लागणार होते. एवढे जगणेसुद्धा अवघड होते. पण सावरकर कचरले नाहीत. भांबावून गेले नाहीत. न्यायालयाचा आदेश ऐकून एवढेच म्हणाले,” एवढी शिक्षा माझ्याकडून भोगून घेण्यासाठी न्यायालयाला आम्हा हिंदूंचा पुनर्जन्मसिद्धांत मानावा लागेल.”
सावरकरांना अंदमानला ठेवण्यात आले. त्याच्या अगोदर त्यांचे भाऊ गणेशपंत तेथे येऊन पोहोचले होते. एका आईची दोन लेकरे भरल्या ताटावरून उठली होती. चाबकाचे फटकारे खात होती. घाण्याला जुंपली जात होती. हातापायाला बेड्या ठोकून टांगून ठेवली जात होती. जिवंतपणी यमयातना अनुभवत होती. हे कशासाठी ?कोणासाठी ? देशासाठी, स्वातंत्र्यासाठी !
सावरकरांच्या सुटकेसाठी प्रयत्न झाले शेवटी 1911 मध्ये अंदमानला गेलेले सावरकर 1921 च्या जानेवारी महिन्यात भारतात परत आले. सावरकर कवी होते, लेखक होते, वक्ते होते .मराठी वक्तृत्वाचा मानबिंदू म्हणून सावरकरांचे बोलणे रसिकांच्या कानामनात निनादत राहिले.’काश्मीरच्या नंदनवनापासून मलयगिरीच्या चंदनवनापर्यंतचा हिंदुस्तान आमचा आहे,’ असे उच्चरवाने सांगणारे veer savarkar books सावरकर विराट सभांचे भूषण होते. महाराष्ट्र हा भारताचा खडगहस्त झाला पाहिजे. भारत हा सदैव युद्धसज्ज असला पाहिजे. शत्रुराष्ट्राला आणि दुर्जनांना सरकारचा धाक वाटला पाहिजे, हा सावरकरांचा आग्रह अप्रस्तुत नव्हता .देश स्वतंत्र झाला याचा सावरकरांना अत्यंत आनंद होता .सशस्त्र क्रांतीचे स्वप्न साकार करण्यासाठी सावरकरांनी स्थापन केलेल्या ‘अभिनव भारत’ या संघटनेचे समारंभपूर्वक 1952 मध्ये विसर्जन करण्यात आले.
मृत्युवर मात करणार्या या मृत्युंजयाने 26 फेब्रुवारी 1966 रोजी आपला देह देशाच्या सेवेतून मुक्त केला.
अशा या स्वतंत्रताभगवती पुत्राला  विनम्र अभिवादन

लेखन
डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर

Advertisement

More Stories
vande mataram lyrics in hindi - वेदाहुनी वंद्य आम्हा मंत्र वंदे मातरम
vande mataram lyrics in hindi – वेदाहुनी वंद्य आम्हा मंत्र वंदे मातरम
error: Content is protected !!
%d bloggers like this: