Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

NewsPostbox Marathi

veer Savarkar – स्वातंत्र्यवीर सावरकर अभिवादन 

1 Mins read

veer Savarkar – स्वातंत्र्यवीर सावरकर अभिवादन 

 

veer Savarkar – जन्मदिनानिमीत्त विनम्र अभिवादन

 

 

 

28/5/2021,
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म भगूर या गावी दिनांक २८ मे १८८३ रोजी झाला. भगूर हे नाशिक पासून जवळच आहे.


सावरकरांचे वडील हे स्वाभिमानी आणि करड्या स्वभावाचे गृहस्थ होते. एका अपरात्री घरात शिरणाऱ्या दरोडेखोरांना हाती तलवार घेऊन परतवणारे

ते एक निर्भय पुरुष होते. निर्भयता आणि देशभक्ती हा सावरकरांच्या वाट्याला आलेला वडिलोपार्जित वारसा होता. सावरकरांचा भगूर येथील वाडा हे

एक संस्कार पीठ होते. एका खोलीत शौर्य कथा सांगणारी शस्त्रे होती तर एक दालन ग्रंथांनी व्यापलेले होते. उदंड पाठांतर असणारे कवी प्रकृतीचे

दामोदर पंत वाड्यात संचार करताना संतांचे अभंग ,शाहिरांचे पोवाडे, नाथांचे भारूड गुणगुणत असत. विनायकांच्या कानी मराठीचा हा सगळा

स्वरशृंगार बालपणीच पडला होता. सावरकरांनी अगदी बालवयातच महाभारत वाचले होते. छत्रपतींची बखर त्यांना आवडत असे.

वयाच्या पंधराव्या वर्षी veer Savarkar सावरकरांच्या मनात आणि मस्तकात सशस्त्र क्रांतीचे वेड शिरले. दोघेही बंधु पारतंत्र्याचे विघ्न दूर करण्यासाठी जन्माला आले होते.

वयाच्या पंधराव्या वर्षी सावरकरांच्या मनात आणि मस्तकात सशस्त्र क्रांतीचे वेड शिरले.चाफेकरांच्या चितेतून निर्माण झालेले

विचारांचे एक वादळ सावरकरांच्या जीवनात जन्मभर घोंगावत राहिले. भारतीय प्रजेला पायदळी तुडवणार्या दुष्ट अधिकाऱ्यांना


पिस्तुलांच्या साह्याने आपली जागा दाखवणाऱ्या चाफेकर बंधूंना फाशी देण्यात आले. सावरकरांनी त्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली

ती वज्रकठोर अशा प्रतिज्ञेच्या स्वरूपात. सावरकर देवघरात गेले .अष्टभुजेपुढे त्यांनी प्रार्थनापूर्वक प्रतिज्ञा केली :”माझ्या देशाच्या

स्वातंत्र्यासाठी शत्रुला मारीत मारीत चाफेकरांसारखा मरेन किंवा छत्रपती शिवाजीराजेंसारखा विजयी होऊन मातृभूमीच्या

मस्तकी स्वराज्याचा अभिषेक करवीन.” चाफेकर आणि veer Savarkar सावरकर ही पराक्रमी भावंडाची घरकुले होती.

देशाच्या स्वातंत्र्यासाठी घराचे रणांगण करणारी आणि मृत्यूच्या वाद्यवृंदात राष्ट्रगीत आळवणारी ही मुलखावेगळी माणसे होती.

१९०२ ते १९०६ ही वाढीच्या वयातील महत्त्वाची वर्षे सावरकरांनी पुण्यात घालवली.महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांनी

फर्ग्युसन महाविद्यालयाची निवड केली. त्या काळी पुणे हे भारतीय कीर्तीच्या लोकनेत्यांचे आणि विद्वानांचे आगर होते.

सावरकरांना दि १३मार्च १९१० या दिवशी लंडन येथे अटक करण्यात आली. त्यांच्यावर अभियोग भारतात चालवण्याचा इराद्याने त्यांना

जहाजावर चढविण्यात आले. सावरकर हे सागरवेडे होते. सागराशी त्यांनी अजन्म सख्य केले. त्यांची नौका मार्सेलिस बंदराजवळ आली


आणि सावरकरांना सागराची हाक ऐकू आली. त्यांनी समुद्रात जीव झुगारून दिला .सागराने आपले इमान राखले आणि सावरकरांना

फ्रान्सच्या किनाऱ्यावर पोहोचते केले.ब्रिटिश पोलीसांनी त्यांचा पाठपुरावा करून फ्रेंच हद्दीत शिरून त्यांना पकडले.

दोन आजन्म कारावासाच्या शिक्षा फर्मावण्यात आल्या. पहिली जन्मठेप सरणार होती आणि दुसरी सुरू होणार होती.प्रत्येकी २५ वर्षाचा एक

असे दोन सलग कालखंड अंदमान बेटावर रहावे लागणार होते. एवढे जगणेसुद्धा अवघड होते. पण सावरकर कचरले नाहीत. भांबावून गेले नाहीत.

न्यायालयाचा आदेश ऐकून एवढेच म्हणाले,” एवढी शिक्षा माझ्याकडून भोगून घेण्यासाठी न्यायालयाला आम्हा हिंदूंचा पुनर्जन्मसिद्धांत मानावा लागेल.”

सावरकरांना अंदमानला ठेवण्यात आले. त्याच्या अगोदर त्यांचे भाऊ गणेशपंत तेथे येऊन पोहोचले होते. एका आईची दोन लेकरे भरल्या ताटावरून उठली होती.

चाबकाचे फटकारे खात होती. घाण्याला जुंपली जात होती. हातापायाला बेड्या ठोकून टांगून ठेवली जात होती.

जिवंतपणी यमयातना अनुभवत होती. हे कशासाठी ?कोणासाठी ? देशा साठी, स्वातंत्र्यासाठी ! अंदमानला नेण्यापूर्वी सावरकरांना

वेगवेगळ्या कारागृहात ठेवले होते. डोंगरी, भायकाळा, ठाणे या सर्व कारागृहांना सावरकरांचे पाय लागले होते.गोणपाटाचे कपडे घालून


गजाआड असणारे सावरकर सौ.माईनी प्रथम पाहिले तेव्हा त्यांच्या काळजाने ठाव सोडला. सावरकरांना झालेली जन्मठेप माईना

यमयातना घडवणारी होती.आपल्या पत्नीला दिलासा देणारा स्वातंत्र्यवीर म्हणाला, “वाईट वाटून घेऊ नकोस. असेल दैवाच्या मनात तर

भेटू पुन्हा आणि करू संसार .पण एक लक्षात ठेव ,चार काटक्या एकत्रित करून चिमण्या आणि कावळेसुद्धा संसार करतात.

यापेक्षा वेगळा संसार आपल्या वाट्याला आला आहे. देशाचा ढासळलेला संसार सावरण्यासाठी तुझ्या – माझ्या संसाराचे अर्ध्य देण्याची वेळ आली आहे.

हे सावरकरांनी बोलावे,माईनी ऐकावे, इतिहासाने सांगावे ,समाजाने कृतज्ञतापूर्वक आठवावे असे काही होते. सावरकरांच्या शिक्षेचा

संकल्पित कालावधी कल्पनातीत होता. सावरकर पुन्हा भारताच्या वाट्याला येण्याची शक्यता नव्हती.

सावरकरांच्या सुटकेसाठी प्रयत्न झाले शेवटी १९११ 1 मध्ये अंदमानला गेलेले सावरकर १९२१ च्या जानेवारी महिन्यात भारतात परत आले.

तशी त्यांची सुटका झाली नव्हती पण ते स्वदेशात आले होते. बाबा आणि तात्या भारतात परत यायला निघाले तेव्हा त्यांच्या अंगावरची वस्त्रे कैद्यांची होती .


अनेक वर्षाच्या अमानुष बंदी वासामुळे दोघेही खंगले होते ; पण खचले नव्हते. दूर अंतरावरून दोघांना देशाचा किनारा दिसला तेव्हा दोघेही गहिवरले .

दोघांच्या मुखातून मातृभूमीचा जय जय कार बाहेर पडला.” स्वातंत्र्यलक्ष्मी की जय !भारतमाता की जय !”

सावरकर चांगले वक्ते होते .मराठी वक्तृत्वाचा मानबिंदू म्हणून सावरकरांचे बोलणे रसिकांच्या कानामनात निनादत राहिले.’काश्मीरच्या नंदनवनापासून मलयगिरीच्या चंदनवनापर्यंतचा हिंदुस्तान आमचा आहे,’ असे उच्चरवाने सांगणारे veer Savarkar सावरकर विराट सभांचे भूषण होते.विनायक दामोदर सावरकर एक राष्ट्रवादी नेते होते. त्यांना अनेकदा स्वातंत्र्यवीर , वीर सावरकर म्हणून संबोधले जाते . हिंदू राष्ट्रवादाची राजकीय विचारसरणी विकसित करण्याचे मोठे श्रेय सावरकरांना जाते. ते वकील, राजकारणी, कवी, लेखक आणि नाटककार देखील होते. धर्मांतरित हिंदूंना हिंदू धर्मात परत आणण्यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केले आणि त्यासाठी आंदोलन सुरू केले. त्यांनी हिंदुत्व हा शब्द तयार केला ज्यामुळे भारताची एकत्रित “हिंदू” ओळख निर्माण झाली.

उपयुक्ततावाद त्याच्या राजकीय तत्त्वज्ञान ,युक्तिवाद , सकारात्मकतावाद, मानवतावाद , सार्वभौमत्व , व्यावहारिकताआणि वास्तववाद हे घटक होते. सावरकर हे कट्टर तर्कवादी होते ज्यांनी सर्व धर्मांच्या कट्टर विश्वासांना विरोध केला. महाराष्ट्र हा भारताचा खडगहस्त झाला पाहिजे. भारत हा सदैव युद्धसज्ज असला पाहिजे. शत्रुराष्ट्राला आणि दुर्जनांना सरकारचा धाक वाटला पाहिजे, हा सावरकरांचा आग्रह अप्रस्तुत नव्हता .देश स्वतंत्र झाला याचा सावरकरांना अत्यंत आनंद होता .सशस्त्र क्रांतीचे स्वप्न साकार करण्यासाठी सावरकरांनी स्थापन केलेल्या ‘अभिनव भारत‘ या संघटनेचे समारंभपूर्वक १९५२ मध्ये विसर्जन करण्यात आले.


मृत्युवर मात करणार्या या मृत्युंजयाला आपला पार्थिव देह देशाच्या सेवेतून मुक्त करायचा होता. त्यांनी स्वतःच मृत्यूला बोलावणे धाडले .अन्न -पाणी – औषध वर्ज केले आणि तेवीस दिवसांच्या उपवासा नंतर दादरच्या सावरकर सदनातून त्यांनी जगाचा निरोप घेतला. २६ फेब्रुवारी १९६६ रोजी आपला देह देशाच्या सेवेतून मुक्त केला.

अशा या स्वतंत्रताभगवती पुत्राला जन्मदिनानिमीत्त विनम्र अभिवादन 


लेखन 
डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर

Leave a Reply

error: Content is protected !!