vishwas patil श्री.विश्वास पाटील
vishwas patil श्री.विश्वास पाटील
vishwas patil श्री.विश्वास पाटील

vishwas patil – जेष्ठ कादंबरीकार श्री.विश्वास पाटील

vishwas patil - जेष्ठ कादंबरीकार श्री.विश्वास पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा  

vishwas patil – जेष्ठ कादंबरीकार श्री.विश्वास पाटील

vishwas patil – जेष्ठ कादंबरीकार श्री.विश्वास पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

 

विश्वास पाटील यांचा जन्म कोल्हापूर जिल्हातील नेर्ले या छोट्याशा गावात शेतकरी कुटुंबात झाला. घरात तसा वंशपरंपरेने लेखनाचा वारसा नव्हता. आई निरक्षर, वडील

चौथीपर्यंत शिकलेले. विश्वास पाटील यांचे वडील महिपती पाटील हे शेतकरी कामगार पक्षाचे पुढारी होते. त्यामुळे बालपणापासून विश्वास पाटील शेतकरी मेळावे, मोर्चे,

सभा या सर्व वातावरणाशी परिचित होते. पाचवी मध्ये असताना विश्वास पाटील विविध वीरांचे, नेत्यांचे पोवाडे गात असत. त्यामुळे पोवाडे गाणारे शाहीर म्हणून ते ओळखले जात.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी मराठी, इंग्रजी ग्रंथांचे भरपूर वाचन केले. त्यातूनच त्यांच्यातील लेखकाला काही प्रमाणात मार्गदर्शन लाभले .

विश्वास पाटलांनी तरुण वयातच साहित्य लेखनाला प्रारंभ केला. कथा ,कादंबरी ,नाटक यांची निर्मिती करून vishwas patil त्यांनी विपुल लेखन केलेले आहे.

चरित्रात्मक, ऐतिहासिक, सामाजिक ,ग्रामीण असे वेगवेगळे विषय त्यांनी हाताळले आहेत.

खेडेगावातील वेगवेगळ्या लोककला उदाहरणार्थ. तमाशा, भजन , श्रावणातले रामायण, महाभारताचे ग्रंथ पठण .यामुळे भाषेबद्दलचा नैसर्गिक ओढा त्यांच्यामध्ये निर्माण झाला .

जात्यावरची गाणी, पाण्याच्या वाटेवरची गाणी, वारणेच्या काठीचा गौरीचा खेळ,अशाप्रकारे लोकगीता मुळे कळत – नकळत साहित्याचे संस्कार त्यांच्यावर होत गेले होते.

vishwas patil  विश्वास पाटलांचे वडील शेतकरी कामगार पक्षाचे पुढारी होते . त्यामुळे त्यांच्या विचारांचा, जीवन कार्याचा निश्चितच परिणाम त्यांच्या लेखनावर झाला .

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात बालपण गेलेले विश्वास पाटील लेखक म्हणून ग्रामसंस्कृतीशी किती उत्कटतेने समरस झाले होते ते त्यांच्या कादंबर्या वाचताना लक्षात येते.

विश्वास पाटील साहेब १९९६ मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत अधिकारी म्हणून रूजू झाले .

विश्वास पाटील यांची पहिली कादंबरी पानिपत १९८८ मध्ये प्रकाशित झाली होती. ही कादंबरी पानिपताच्या युद्धावर आधारित आहे. ज्यामध्ये अहमदशाह अब्दालीने

मराठ्यांचा पराभव केला होता . लेखक वि.वा. शिरवाडकर  यांनी पाटील यांच्या कादंबरीच्या लेखनीचे कौतुक करत त्यांच्या ‘सुंदर भाषा आणि भव्य वर्णनात्मक शैली’

ची प्रशंसा केली होती. दोनच वर्षात पानिपतच्या २०,००० हून अधिक प्रती विकल्या गेल्या.विश्वास  पाटील यांनी लिहिलेल्या ‘ झाडाझडती’ या कादंबरीसाठी

१९९२ मध्ये vishwas patil त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आला .ही कादंबरी महाराष्ट्रातील विविध विकास प्रकल्पांनी विस्थापित झालेल्या लोकांच्या जीवन कथांवर आधारित आहे.

मराठी कादंबरी क्षेत्रात सध्याचे तळपते ‘बेस्टसेलर’ नाव म्हणजे विश्वास पाटील. ऐतिहासिक कादंबरी लेखन हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय. त्यामुळेच पानिपत, संभाजी,

महानायक या त्यांच्या कादंबर्‍यांनी विक्रीचे नवनवे विक्रम प्रस्थापित केले आहेत.  छत्रपती संभाजी या कादंबरीसाठी तर सर्वाधिक मानधन घेणारा लेखक असा नावलौकिकही

त्यांनी मिळवला.ज्याप्रमाणे खरे छत्रपती संभाजी महाराज शोधण्याचा प्रयत्न करणारे वा.सी.बेंद्रे, डाॅ.कमल गोखले, डाॅ. जयसिंगराव पवार यांनी केला त्यांच्याच पावलावर

पाऊल ठेवून vishwas patil  विश्वास पाटील यांनी छत्रपती संभाजी या कादंबरीचे लेखन करून ऐतिहासिक क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला आहे. त्यांची

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावरील ‘महानायक’ कादंबरी खूपच नावाजली गेली. ऐतिहासिक कादंबरीचे लेखन करतांना पाटलांनी ऐतिहासिक तथ्ये व कादंबरी

लेखनातील नाट्यमयता यांच्याशी समझोता न करता उत्कृष्ट साहित्य निर्मिती केली आहे.  पानिपत या कादंबरीच्या माध्यमातून आतापर्यंत उपेक्षित राहिलेल्या व

कायम टीकेच्या केंद्रस्थानी असलेल्या सदाशिवराव भाऊ पेशवे यांच्यावरील अन्याय ऐतिहासिक सत्याद्वारे दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. छत्रपती

शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराजांची प्रतिमा आजपर्यंत वेगळी होती.  मात्र, त्यांच्यावरचा अन्याय दूर करून खरे संभाजी कसे होते हे पुराव्यानिशी

त्यांनी त्यांच्या संभाजी या नव्या कादंबरीत सिद्ध करून दिले आहे. लढाईतले, बाहेरचे डावपेच, शह काटशहाचे खेळ, युद्धस्थळीची वर्णने, प्रवासातील

भौगोलिक सहल, चेहर्‍यांमागची माणसे शोधण्याचा प्रयत्न, हरण्या-जिंकण्याची कारणे हे सारे ते इतक्या जिवंतपणे उभे करतात की वाचक त्यात गुंतून जातो.

सनावळ्यांचा बेसुमार आणि उबग आणणारा मारा करणारा आणि स्वप्नरंजन करणारा, सत्याला बाजूला सारून स्वतःच रचलेला इतिहास ते कधीच सांगत नाहीत.

इतिहासाशी पूर्ण प्रामाणिक राहून व त्याचे नवे पैलू शोधून मांडणारा लेखक अशी त्यांची प्रतिमा आहे.  नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कादंबरीसाठी तर त्यांनी पार

ब्रम्हदेशमार्गे जपानपर्यंत प्रवास केला. कारण काय तर याच मार्गाने सुभाषबाबूंनी प्रवास केला होता. त्यामुळे त्यांच्या कादंबरीत एक जिवंतपणा जाणवतो.

सुभाषबाबूंच्या चरित्राचा एवढा व्यापकपणे शोध घेणारी कादंबरी खुद्द बंगालीतही कोणी लिहिली नाही.त्यामुळे या कादंबरीचा अनुवाद बंगालीसह अनेक भाषांत झाला.

तेथेही ती बेस्टसेलर ठरली. वर्षातील सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणूनही ती गौरवली गेली. एेतिहासिक लेखक ही त्यांची

ओळख हा खरे तर त्यांच्यावर अन्याय आहे.

कारण त्यांची झाडाझडती ही कादंबरी धरणग्रस्तांच्या प्रश्नावर आहे. शिवाय पांगिरा नावाची एक कादंबरी आहे. झाडाझडतीला साहित्य अकादमीच्या

पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पानिपत या कादंबरीवर आधारीत रणांगण हे नाटकही त्यांनी लिहिले.तेही खुप गाजले.

विश्वास पाटील हे भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी होते. प्रशासीकय अधिकार्‍याची महत्वपूर्ण जबाबदारी सांभाळत vishwas patil  विश्वास पाटलांनी

साहत्यिक कारकिर्द घडविली आहे.  पांगिरा,पानिपत, झाडाझडती, महानायक, संभाजी, चंद्रमुखी,बंदारूपया, रणांगण,नागकेशर,गाभुळलेल्या चैत्रबनात .

श्री.विश्वास पाटील यांच्या झाडाझडती या कादंबरीवर समीक्षा करून” शोध झाडाझडतीचा” या पुस्तकाचे लेखन करण्याचे भाग्य मला लाभले.

ही माझ्या लेखनाची विशेष बाब होय.

अशा एकापेक्षा एक सरस कादंबरी लिहिणारे श्री.विश्वास पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

postboxindia.com
www.postboxindia.com

डाॅ. सुवर्णा नाईक निंबाळकर

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisement

More Stories
nagpur places to visit
nagpur places to visit – नागभूमीचा प्यारे खान
error: Content is protected !!
%d bloggers like this: