govt job
govt job
govt job

Government job alert – शासकीय कार्यालयांत नोकरीच्या संधी

Government job alert - रिक्त पदांबाबत माहिती

Government job alert – शासकीय कार्यालयांत नोकरीच्या संधी

Government job alert – रिक्त पदांबाबत माहिती

 

मुंबई,

12/6/2021,

राज्यात शासकीय कार्यालये आणि इतर ठिकाणी २ लाखाहून अधिक पदे रिक्त भरावयाची बाकी आहेत ?

या रिक्त पदांसाठी अनेक तरुण स्पर्धा परीक्षेच्या निमित्ताने वाट पाहत आहेत. कोरोना आणि जागतिक आरोग्य संकटामुळे

अनेक कर्मचारी निवृत्त झालेत तर काही मृत्यू मुखी पडले तर काही स्थलांतरीत झाले. आपण आणि आपल्या कुटुंबाच्या रक्षणासाठी

आरोग्याच्या दृष्टीकोनातून अनेकांनी नोकरी सोडून शेतीच्या पारंपारिक व्यवसायाकडे धाव घेत आपले गाव गाठले.

या सर्व प्रकारच्या घटनांमुळे शासकीय कार्यालये, जिल्हा परिषद कार्यालये आणि अनेक सरकारी संस्था मध्ये भरती होणे शासकीय

कामकाज सुरळीत होण्याच्या आणि पूर्वपदावर आणण्याच्या दृष्टीकोनातून गरजेचे आहे. सुरेश गज्जलवार हे माहिती

अधिकार कार्यकर्ते असून यांनी याबाबाबत माहिती अधिकाराखाली पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला.

या पार्श्वभूमीवर सुरेश गज्जलवार यांनी माहिती अधिकारात वर्ग एक ते वर्ग चारच्या रिक्त पदांचा तपशील राज्य शासनाकडे मागितला होता,

तेव्हा त्यांना खालील रिक्त पदांबाबत ही माहिती मिळाली.

राज्य शासकीय कार्यालये आणि जिल्हा परिषदातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची मिळून २ लाखांहून अधिक पदे रिक्त असल्याचे वास्तव उघड झाले आहे.

रिक्त असलेल्या पदांपैकी १ लाख ४१ हजार ३२९ पदे सरळ सेवेने, तर ५८ हजार ८६४ पदे पदोन्नतीने भरायची आहेत.

या रिक्त पदांसाठीची भरती प्रक्रिया कधी होणार याची राज्यभरातील स्पर्धा परीक्षा उमेदवारांना प्रतीक्षा आहे.

गेल्या काही वर्षांपासून राज्यातील रिक्त पदांचा आकडा वाढत असूनही राज्य शासनाकडून ही पदे भरण्यात आलेली नाहीत.

सामान्य प्रशासन विभागाने प्रशासकीय विभागांकडून माहिती संकलित करून त्या अर्जाला दिलेल्या उत्तरातून

३१ डिसेंबर २०१९ अखेर राज्य शासकीय कार्यालये आणि जिल्हा परिषदांमध्ये २ लाखांहून अधिक पदे रिक्त असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मात्र काही विभागांकडून माहिती उपलब्ध न झाल्याने त्या विभागातील रिक्त पदांचा समावेश आकडेवारीत नाही.

राज्य शासकीय कार्यालये आणि जिल्हा परिषदांमध्ये मिळून १० लाख ९९ हजार १०४ मंजूर पदे आहेत. त्यातील ७ लाख ८० हजार ५२३ पदे सरळसेवेची,

३ लाख १८ हजार ५८१ पदे पदोन्नतीची आहेत. त्यापैकी ८ लाख ९८ हजार ९११ पदे भरलेली आहेत. तर २ लाख १९३ पदे अद्याप रिक्त आहेत.

त्या पैकी १ लाख ४१ हजार ३२९ पदे सरळसेवेने, तर ५८ हजार ८६४ पदे पदोन्नतीने भरायची असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

एकू ण रिक्त पदांपैकी राज्य शासकीय कार्यालयांची रिक्त पदे १ लाख ५३ हजार २३१, जिल्हा परिषदांची रिक्त पदे ६४ हजार ९६२ आहेत.

गृह विभागात सर्वाधिक रिक्त पदे

सर्वाधिक रिक्त पदे असलेल्या विभागांमध्ये गृह विभाग आघाडीवर आहे. गृह विभागातील २४ हजार ५८१, सार्वजनिक

आरोग्य विभागातील २० हजार ५४४, जलसंपदा विभागातील २० हजार ८७३ पदे रिक्त असल्याचे दिसून येत आहे.

पदे रिक्त असताना कंत्राटी भरती

राज्य शासकीय कार्यालये आणि जिल्हा परिषदांची मिळून लाखो पदे रिक्त असताना राज्य शासनाकडून कं त्राटी भरती करून

तात्पुरती मलमपट्टी के ली जात आहे. मात्र, रिक्त पदांवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे च (एमपीएससी) भरती प्रक्रिया राबवण्याची मागणी सातत्याने के ली जात आहे.

शासकीय कार्यालये, जिल्हा परिषद मिळून रिक्त पदांचा तपशील

अ वर्ग – १० हजार ५४५

ब वर्ग – २० हजार ९९९

क वर्ग – १ लाख २७ हजार ७०५

ड वर्ग – ४० हजार ९४४

राज्य शासनाने डिसेंबर २०१९ अखेरच्या रिक्त पदांची माहिती दिली आहे. त्यामुळे त्या पुढील दीड वर्षांत आणखी काही पदे रिक्त झाली असतील.

महापरीक्षा संके तस्थळाद्वारे ३५ हजार पदांची भरती प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे रिक्त पदांची आकडेवारी तीन लाखांच्या घरात जाते.

एवढ्या मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असूनही शासन भरती प्रक्रिया राबवत नसल्याने प्रशासनावर ताण येतो, त्याशिवाय स्पर्धा परीक्षांच्या उमेदवारांना संधी मिळत नाही.

कंत्राटी पद्धतीने भरली जाणारी पदे ठरावीक काळापुरती असल्याने ती पदेही रिक्त होतात. त्यामुळे रिक्त पदांवर शासनाने के वळ एमपीएससीद्वारेच भरती प्रक्रिया करावी.

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisement

More Stories
Sangola - former MLA of Sangola Assembly constituency Ganapatrao Deshmukh
Sangola – सांगोला विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय माजी आमदार श्री गणपतरावजी देशमुख
error: Content is protected !!
%d bloggers like this: