world map creator
world map creator
world map creator

world map creator – जगाचा नकाशा बनविणारे मर्केटर गेरहार्ट

world map creator - पहिल्यांदा जगाचा नकाशा बनविणारे मर्केटर गेरहार्ट यांची आज जयंती.

world map creator – जगाचा नकाशा बनविणारे मर्केटर गेरहार्ट

 

world map creator – पहिल्यांदा जगाचा नकाशा बनविणारे मर्केटर गेरहार्ट यांची आज जयंती.

 

 

 

 

मर्केटर, गेरहार्ट : (५ मार्च १५१२−२ डिसेंबर १५९४). सुप्रसिद्ध फ्लेमिश भूगोलवेत्ता, गणिती व मानचित्रकार. अँटवर्प शहराजवळील ऱ्‍यूपल्‌मोंद या गावी त्याचा जन्म झाला.

याचे मूळ नाव गेरार्ट क्रेमर. क्रेमर ’ या शब्दाचा फ्लेमिश भाषेत ‘फेरीवाला’ वा ‘व्यापारी’, असा अर्थ होत असून लॅटिन भाषेत व्यापाऱ्‍याला ‘मर्केटर’ असा शब्द आहे.

आपल्या आडनावाचे लॅटिनीकरण करून गेरहार्टने ‘मर्केटर’ या नावाने आपले सर्व लिखाण प्रसिद्ध केले.

त्याचे पहिले शिक्षण ‘द ब्रदर्स ऑफ द कॉमन लाइफ’ या संस्थेच्या एका शाळेत पार पडले. तेथे त्याने ख्रिस्ती सिद्धांत, द्वंद्ववाद व लॅटिन यांचे अध्ययन केले. १५३० मध्ये

तो लूव्हाँ विद्यापीठात दाखल झाला. मानव्यविद्या आणि तत्वज्ञान या विषयांमध्ये त्याने १५३२ साली एम्. ए. ही पदवी संपादन केली.

लूव्हाँ येथे गेमा फिरिसियस या सुप्रसिद्ध सैद्धांतिक गणितवेत्याच्या हाताखाली मर्केटरचे शिक्षण झाले व तेथेच त्याने भूगोल,नकाशाशास्त्र, गणित आणि ज्योतिषविज्ञान

या विषयांत पारंगतता मिळविली. फ्लँडर्स प्रदेशाचे सर्वेक्षण त्याने १५३७−४० या काळात पूर्ण केले व सर्वेक्षणाची काही साधनेही तयार केली. टॉलेमीच्या जगाच्या

नकाशावर आधारित असा नकाशा त्याने १५३८ मध्ये तयार केला.

१५४१ मध्ये १.३० मी. परिघ असलेला पृथ्वीचा गोल त्याने बनविला. ही त्याची अतिशय गाजलेली व त्या काळी अगदी नवीन असलेली कलाकृती होय. १५५१ मध्ये

त्याने याच धर्तीवर तारामंडळाचा गोल तयार केला. वयाच्या अवघ्या चोविसाव्या वर्षी मर्केटरने खगोलशास्त्रात असामान्य गती व शास्त्रीय उपकरण निर्मितीबाबतचे

अचूक ज्ञान मिळवून हुबेहूब आकृतिबंध तयार करणे, तसेच उत्कीर्णन व सुलेखन यांमध्ये असाधारण कौशल्य संपादिले होते.

प्रॉटेस्टंट मताकडे त्याचा ओढा असल्याने तसेच नकाशांकरिता विविध माहिती मिळविण्यासाठी सतत लूव्हाँमधून तो बाहेरगावी जात असल्याने त्याच्याविषयी संशय

निर्माण होऊन त्याच्यावर पाखंडीपणाचा आरोप ठेवण्यात आला व १५४४ मध्ये त्याला तुरूंगात टाकण्यात आले. तथापि लूव्हाँ विद्यापीठाचे अधिकारी त्याच्या पाठीशी

खंबीरपणे उभे राहिल्याने त्याला फारसा त्रास न होता त्याची सात महिन्यांनी कारावासातून मुक्तता झाली.

world map creator मर्केटर १५५२ मध्ये बेल्जियम सोडून कायम वास्तव्य करण्यासाठी ड्युइसबुर्क (प. जर्मनी) येथे गेला. त्याच्या या स्थानांतरणामागे दोन प्रमुख हेतु होते:

पहिला म्हणजे त्याकाळी असलेली जर्मनीमधील धार्मक सहिष्णुतेची वृत्ती व दुसरा म्हणजे क्लीव्ह्‌झचा सरदार (ड्यूक) विल्हेल्म ह्याच्या संकल्पित विद्यापीठात मर्केटरला

प्राध्यापकपद मिळण्याची शक्यता, हा होता. अर्थात त्याच्या हयातीत हे विद्यापीठ होऊ शकले नाही. लवकरच मर्केटरचा सर्वत्र बोलबाला होऊ लागला; त्याने ड्यूकला

त्याची व्याकरणशाळा व तिचा अभ्यासक्रम यांच्या उभारणीमध्ये बहुमोल सहकार्य दिले; ड्युइसबुर्क येथे त्याने एक मानचित्रकलाविषयक तंत्रनिकेतनही उभारले.

१५५४ मध्ये world map creator मर्केटरने त्यावेळेपर्यंत प्रमाणभूत मानल्या जाणाऱ्या परंतु अनेक चुका व अपुरेपणा असलेल्या दुसऱ्या शतकातील टॉलेमीच्या यूरोपच्या

नकाशावरून नवीन माहितीच्या आधारे, १५ तक्ते एकमेकांना जोडून १.२२ मी.×१.५९ मी. आकाराचा आधुनिक धर्तीचा यूरोपचा नकाशा बनविला. १५७२ मध्ये याच

नकाशाची पुनरावृत्ती निघाली. १५६४ मध्ये त्याने ब्रिटिश बेटांचा नकाशा तयार केला. क्लीव्ह्‌झच्या ड्यूकच्या दरबारात मर्केटरची ‘विश्ववर्णनज्ञ’ म्हणून नियुक्ती करण्यात

येऊन त्याला गौरविण्यात आले. कृतज्ञता म्हणून मर्केटरने आपली काही पुस्तके ड्यूकला अर्पण केली आहेत. ज्या नकाशाच्या प्रक्षेपणाकरिता तो अजरामर झाला,

त्या पद्धतीने १८ तक्ते जोडून बनविलेला व नाविकांकरिता काढलेला जगाचा नकाशा त्याने १५६९ मध्ये प्रसिद्ध केला.

ग्रहणे आणि इतर खगोलशास्त्रीय घटनांच्या आधारे जगाच्या उत्पत्तीपासूनचा इतिहास world map creator मर्केटरने लिहावयास घेतला. त्याला त्याने ‘ॲटलास’

असे नाव दिले. पुढे नकाशासंग्रहालाच ‘ॲटलास’ अशी संज्ञा रूढ झाली. त्याचा पहिला भाग १५७० मध्ये प्रसिद्ध झाला. १५७८ मध्ये त्याने टॉलेमीच्या मूळच्या सर्व २७

नकाशांचे व तक्त्यांचे दुरूस्त्या व टीकाटिप्पणी यांसह पुनर्मुद्रण केले.

१५८५ मध्ये त्याच्या सुप्रसिद्ध ॲटलासचा − नकाशासंग्रह भाग प्रसिद्ध झाला. त्यात फ्रान्स, जर्मनी, नेदर्लड्‌स यांचे नवीन नकाशे अंतर्भूत होते. १५८९ मध्ये इटली,

आग्नेय यूरोप यांचे नकाशे असलेला ॲटलासचा दुसरा भाग प्रसिद्ध झाला. तिसऱ्‍या व अखेरच्या भागात ब्रिटिश बेटांचा नकाशा घालण्यात येऊन एकूण १०७ नकाशे

(प्रामुख्याने पश्चिम व दक्षिण यूरोपचे नकाशे) असलेला संपूर्ण ॲटलास मर्केटरच्या मुलाने १५९५ मध्ये प्रसिद्ध केला. त्याच्या आधीच्या वर्षीच मर्केटरचे ड्युइसबुर्क येथे हृदयविकाराने निधन झाले.

जगातील जलमार्ग व हवाईमार्ग दाखविणाऱ्या नकाशांकरिता वापरले जाणारे ‘मर्केटर प्रक्षेपण’ ही मर्केटरची भूगोलशास्त्राला मिळालेली सर्वांत मोठी देणगी होय.

 

 

 

 

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisement

More Stories
Comred
Comred – कॉ.तारा रेड्डी यांचा आज स्मृतीदिन
error: Content is protected !!
%d bloggers like this: