acharya atre
acharya atre
acharya atre

acharya atre – आचार्य प्रल्हाद केशव अत्रे

acharya atre - आचार्य अत्रे यांना जन्मदिनानिमीत्त विनम्र अभिवादन

acharya atre – आचार्य प्रल्हाद केशव अत्रे

 

acharya atre – आचार्य अत्रे यांना जन्मदिनानिमीत्त विनम्र अभिवादन

 

 

 

 

आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचा जन्म १३ ऑगस्ट १८९८ रोजी झाला. त्यांनी पुणे व लंडन इथे उच्च शिक्षण प्राप्त केले.

पुण्यातील कॅम्प एज्यूकेशन सोसायटीच्या शाळेत ते अध्यापक म्हणून कार्यरत होते. या शाळेचे पुढे ते मुख्याध्यापकही झाले.

`नवयुग वाचनमाले` द्वारे acharya atre त्यांनी लिहिलेली शालेय क्रमिक पुस्तकं हे त्यांचं शैक्षणिक क्षेत्रातील

मोठं योगदान होय.


लहानपणापासूनच अत्र्यांचे साहित्यावर अपरंपार प्रेम होते. एखादी गोष्ट मनात आली, किंवा आवडली कि ती

आपण मिळवावी अशी इच्छा त्यांना होत असे.अवलोकन आणि जिज्ञासा या दोन गोष्टी आपल्या जवळ

विपुल असल्याने आपल्याला सतत काहीतरी नवे सुचते असे ते म्हणत अत्रे यांची स्मरणशक्ती अतिशय

तल्लख होती. चेष्टा करावी, गंमत पहावी असा व्रात्यपणाकडे वळणारा त्यांचा स्वभाव होता. तो स्वभाव

पुढे शेवटपर्यंत तसाच राहिला. त्यांच्या बोचर्या विनोदाचे अप्रिय परिणामही झाले .अत्र्यांनी कायम नवनवीन

स्वप्ने पाहिली. ज्या क्षेत्रात त्यांनी निर्मिती केली त्यात ते यशस्वीही झाले.त्यांचे मन एका ठिकाणी कधीच रमत

नव्हते. त्यांना भव्यतेची व आफाटपणाची अतिशय आवड होती.प्रल्हाद केशव अत्रे acharya atre  महाराष्ट्रातील एक झंझावाती व्यक्तिमत्व मानले जात. साहित्य,

शिक्षण ,नाटक ,चित्रपट, राजकारण, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी आपला ठसा उमटवला .

या सर्वच क्षेत्रांमध्ये त्यांचा विलक्षण दबदबा होता. जनमानसावर त्यांचा प्रचंड पगडा होता. अत्रे हे फर्डे वक्ते होते.

ते आपल्या वक्तृत्वाने श्रोत्यांना भारावून टाकत असत. संयुक्त महाराष्टाच्या चळवळीमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण

भूमिका बजावली. काही काळ ते महाराष्ट्र विधानसभेत आमदारही होते.

त्यां काळात त्यांचे विद्वान व साहित्यिकाबरोबर होणारे वाद खूपच गाजले. तेव्हाचे राष्ट्रपती डॉक्टर राधाकृष्णन

यांनी त्यांचे “रायटर आणि फायटर ऑफ महाराष्ट्र ” असे यथार्थ वर्णन केले होते.

मराठी रंगभूमीच्या इतिहासात acharya atre  आचार्य अत्रे यांना विशेष स्थान आहे. त्यांनी एकूण २२ नाटके

लिहिली. विनोदप्रधान नाटकांची नवी परंपरा त्यांनी घडवली. `साष्टांग नमस्कार` ,मोरुची मावशी` `लग्नाची बेडी` ,

भ्रमाचा भोपळा` ही त्यांनी लिहिलेली नाटके सदाबहार ठरली आहेत. निखळ विनोद हे या नाटकांचं वैशिष्टय.

“तो मी नव्हेच`” हे त्यांचे उत्कंठाप्रधान नाटकही प्रचंड गाजलं. “`उद्याचा संसार`” सारखी शोकात्मक नाटकेही लिहिली.

अत्रे यांची चित्रपट कारकीर्दही मोठी आहे.


. मास्टर विनायक यांनी दिग्दर्शित केलेल्या” ब्रम्हचारी`” `”ब्रॅन्डीची बाटली`”या चित्रपटांच्या कथा पटकथा

त्यांनी लिहिल्या.” पायाची दासी,”`धर्मवीर`” हे त्यांचे आणखी काही उल्लेखनीय चित्रपट. `अत्रे पिक्चर्स` ही

संस्था त्यांनी स्थापन केली होती. साने गुरुजीच्या कथेवर आधारित `”श्यामची आई`” या चित्रपटाची निर्मिती

व दिग्दर्शन त्यांनी केले. या चित्रपटाला राष्ट्रपतींचे सुवर्णपदक लाभले. याशिवाय महात्मा फुले यांच्या

जीवनावरील चित्रपटाची निर्मितीही त्यांनी केली. अत्र्यांच्या बहुतांशी चित्रपटांमध्ये विनोद आणि सामाजिक

आशय यांचं चपलख मिश्रण आढळून येते. त्यांनी हिंदी चित्रपटाचीही निर्मिती केली. पं. जवाहरलाल नेहरु

यांच्या मृत्यूनंतर त्यांनी लिहिलेले श्रध्दांजलीपर लेख अजोड मानले जातात.

अचार्य अत्र्यांचे acharya atre  लेखन विविधांगी आहे. त्यात प्रवासवर्णन, चरित्र, आत्मचरित्र व ललित

साहित्याचा समावेश आहे. `मी कसा झालो ?` `हशा आणि टाळया` या आत्मकथनपर पुस्तकांबरोबरच

`करेचे पाणी` या आत्मचरित्राचे पाच खंड त्यांनी लिहिलेल्या विडंबन काव्याचा आवर्जून उल्लेख केला जातो.

अत्र्यांनी विडंबन या काव्यप्रकाराची फक्त रुजवातच केली नाही, तर या प्रकाराला प्रतिष्ठाही मिळवून दिली.

केशवकुमार` या टोपण नावाने त्यांनी विडंबन काव्य लिहिलं. त्यामध्ये रविकिरण मंडळ तसंच, केशवसुतादी

जुन्या कवींच्या काव्यांची रंगतदार विडंबनं आहेत. `झेंडूची फुले` या शीर्षकाने या विडंबन गीतांचा संग्रह त्यांनी

प्रकाशित केला. या विडंबन गीतांचा स्वतंत्र काव्य प्रकार म्हणून मराठीच्या शालेय अभ्यासक्रमात समावेश आढळतो.

आचार्य अत्रे यांचे लेखनीईतकेचवाणीवरही जबरदस्त प्रभूत्व होतं. त्यांची भाषणं म्हणजे श्रोत्यांकरिता मेजवानीचं असें. म्हणूनच त्यांच्या सभांना

विक्रमी गर्दी होत असे. भाषण करताना उभे राहण्याची त्यांची ढब, हावभाव व वक्तृत्वशैली यांचा प्रभाव इतका

होता की, इतर अनेक वक्त्यांनी त्यांचं अनुकरण केले. अत्र्यांच्या वाणीतून आणि लेखणीतून त्यांचं चतुरस्त्र

व्यक्तिमत्व प्रकट होत असे. शंकरराव देव, एस.एम. जोशी, बाळासाहेब ठाकरे, ना.सी.फडके, श्री.म. माटे,

मामा वरेकर अशा अनेकांबरोबर त्यांनी घातलेले वादही खूप गाजले.

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्यावेळी त्यांच्या मराठा या दैनिकातून त्यांनी मुंबई राज्याचे तत्कालिन

मुख्यमंत्री मोरारजी देसाई व मुंबईचे सर्वेसर्वा स.का. पाटील यांच्या विरुद्ध त्यांनी चढवलेले हल्ले

अविस्मरणीय असेच होते.

अत्रे राजकीय क्षेत्रातही चमकले.


महाराष्ट्र विधानसभेचे आमदारपद, पुणे शहराचे नगरसेवकपद काही काळ त्यांनी भूषवले.

`भांबूर्डा` या गावाचं शिवाजीनगर` आणि `रे मार्केट`चं महात्मा फुले मार्केट` असं नामकरण

करण्यात त्यांचा पुढाकार होता.सन. १९९४ साली झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य

संमेलनाचे ते अध्यक्ष होते. बेळगाव येथील अडतिसाव्या मराठी नाटय संमेलनाचे तसेच दहाव्या

मराठी पत्रकार संमेलनाचेही अध्यक्षस्थान त्यांनी भूषविले.

आपल्या हयातीत विविध क्षेत्रामधे

सारख्याच तोलामोलाची कामगिरी करणाऱया व्यक्ती विरळच असतात. acharya atre  आचार्य

प्रल्हाद केशव अत्रे हे अशा व्यक्तींपैकीच एक. त्यांनी सुरु केलेली दैनिकं, साप्ताहिकं त्यांच्या

मृत्यूनंतर कालांतराने बंद पडली, मात्र मराठी जनमानसावर त्यांचा प्रभाव दीर्घकाळ टिकून आहे.


अशा या चतुरस्र व्यक्तिमत्वाला जन्मदिनानिमीत्त विनम्र अभिवादन

डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर


Advertisement

More Stories
kumbh ka mela
kumbh ka mela – कुंभमेळा साधुंचा कि संधी साधुंचा
error: Content is protected !!
%d bloggers like this: