Adar Poonawala - पुण्याच्या सिरम कंपनीचे अदर पूनावाला
Adar Poonawala - पुण्याच्या सिरम कंपनीचे अदर पूनावाला
Adar Poonawala - पुण्याच्या सिरम कंपनीचे अदर पूनावाला

Adar Poonawala – पुण्याच्या सिरम कंपनीचे अदर पूनावाला

Adar Poonawala - पुण्याच्या सिरम कंपनीचे अदर पूनावाला - निखिल वागळे

Adar Poonawala – पुण्याच्या सिरम कंपनीचे अदर पूनावाला

 

Adar Poonawala – पुण्याच्या सिरम कंपनीचे अदर पूनावाला – निखिल वागळे

 

4/5/2021

पुण्याच्या सिरम कंपनीचे Adar Poonawala अदर पूनावाला सतत प्रकाशझोतात आहेत.


त्यांच्या लसीची देशाला गरज आहे हे खरं, पण जनतेच्या असहाय्यतेचा किती फायदा घ्यायचा?

आधी लसीच्या किमतीचा वाद निर्माण झाला.
१५० रु. ची लस थेट ४००/६०० ला जाहीर केली. मग बोंबाबोंब झाल्यावर ३०० रु. वर आणली.

वर आपण समाजकार्य म्हणून हे करतोय असंही त्यांनी जाहीर केलं.

आता तर Adar Poonawala पूनावाला एक पाऊल पुढे गेलेत. british media  ब्रिटीश मिडीयाचा


वापर करुन ते आपलं राजकारण करताहेत. केंद्र आणि राज्यावर दबाव आणण्याचा त्यांचा हेतू लपून राहिलेला नाही.

त्यांनी british newspapers online   लंडन टाइम्सला दिलेल्या मुलाखतीने वादंग निर्माण झालं. आपल्याकडे तीच मुलाखत इकनॅामिक टाइम्सने छापली.

‘मला वजनदार नेत्यांकडून धमक्या येताहेत’ असं ते म्हणाले. पण त्यांनी कुणाचंही नाव घेतलं नाही.
सहाजिकच चर्चा आणि अफवांना तोंड फुटलं. ही चतुर चाल होती.


पहिला संशय आला शिवसेनेवर.
त्यात इंडिया टुडेचे ॲंकर राहुल कंवल यांनी सेनेचं नाव घेतलं. सेना नेते चिडले आणि त्यांनी चॅनलला जाब विचारणारं पत्र पाठवलं.

मग या राहुलने टोपी बदलली. पूनावालांनी आपल्याला काही क्लिप्स पाठवल्या. त्यात धमक्या देणाऱ्या लोकांची संघटना SSS असं म्हटल्याने आपला गोंधळ झाला. ते सेनेचे कार्यकर्ते नव्हते,तर SSS म्हणजे राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते होते असा खुलासा त्याने केला. माफी मागितली नाही, पण खेद व्यक्त केला.

यावर राजू शेट्टींचा खुलासा अजून तरी आलेला नाही. शेट्टींनी सिरमला जो इशारा दिला तो जाहीरपणे दिला होता. त्याला धमकी म्हणायचं का , हा प्रश्न आहे.


पुन्हा शेट्टी हे वजनदार ‘राजकीय नेते’ कधीपासून झाले. त्यांच्यापेक्षा वजनदार नेते स्वत: अमित शहासुद्घा आहेत. मग राहुलने त्यांचं नाव का घेतलं नाही?

ते अशक्य होतं. कारण राहुल हा अमित शहांचा चाहता नाही, ‘चमचा’ आहे !Also Read : https://postboxindia.com/didis-historic-victory-a-huge-blow-to-modi-shah/

मधल्या काळात मोदी सरकारने Adar Poonawala पूनावालांना संरक्षण दिलं आहे. त्यांना कोणताही प्रश्न विचारण्यात आलेला नाही.

सरकारने पुरेशी लसची ॲार्डर नोंदवलेली नाही, ही पूनावालांची तक्रार होती. ती त्वरेने दूर करण्यात आली आहे.वर सरकारने त्यांना एक हजार कोटीहून अधिकची ‘मदत’ही केली आहे.


लंडनच्या एका मुलाखतीने हा फरक पडलाय.
पूनावाला निरव मोदी किंवा विजय मल्ल्यांप्रमाणे पळून गेले असा काहीजणांचा समज आहे. तसे WhatsApp सगळीकडे फिरताहेत.

पण त्यात तथ्य नाही, आपण परत येत आहोत असं अदर पूनावालांनी जाहीर केलं आहे.

दरम्यान, त्यांनी लंडनमध्ये एक प्रॅापर्टी विकत घेतली आहे. हा सौदा इतका मोठा आहे की त्यामुळे लंडनमधल्या जागांचे भाव वाढले आहेत असं बोललं जातंय.

करोनाने जगाचा तोटा झाला, लाखो लोकांना जीव गमवावा लागला, हजारोंचा रोजगार गेला. पण Adar Poonawala अदर पूनावाला नावाचा उद्योगपती श्रीमंत होणार आहे.

आपण लस टोचून घेऊ आणि शांत बसू.निखिल वागळे

Advertisement

More Stories
dada kondke hits
dada kondke hits – दादा कोंडके
error: Content is protected !!
%d bloggers like this: