Astrology
Astrology
Astrology

Astrologist  ज्योतिष्यांची तयारी ! बौद्धिक महामारी !

Astrologist ज्योतिष्यांची तयारी ! lost rationalism बौद्धिक महामारी !

Astrologist ज्योतिष्यांची तयारी ! बौद्धिक महामारी !

Astrologist ज्योतिष्यांची तयारी ! lost rationalism बौद्धिक महामारी !

लेखक : ज्ञानेश महाराव

 

4/7/2021,

पंधरा महिन्यांपूर्वी ’कोरोना भगाव’चा कार्यक्रम देशवासीयांना टाळ्या-थाळ्या वाजवायला लावून सुरू करणार्‍या आपल्या

प्रधानमंत्रींनी आता ‘लशीचे मनावर घ्या,’ असं आवाहन जनतेला केलंय. ’कोरोना’च्या तिसर्‍या लाटेचं संभाव्य संकट आणि

लसीकरणाचा मंदावलेला वेग, ह्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमातून लसीकरणासाठी

आवाहन करताना, ”कोरोना विषाणू बहुरूपी आहे. तेव्हा महामारी संपली असं समजण्याची चूक करू नका,” असा इशाराही

दिलाय. ह्या बदलाला देशातील ’कोरोना’ बळींच्या संख्येने ३ लाखाचा आकडा ओलांडल्यावर आलेले शहाणपण म्हणता येत नाही.

कारण ’कोरोना’ विषाणूला ‘बहुरूपी’ म्हणणारे स्वत:ही तसेच आहेत. म्हणूनच ’विज्ञान’युक्त लसीकरणाचा आग्रह धरताना त्यांनी

Astrologist ज्योतिषशास्त्राचं थोतांड चर्चेला आणलंय.

‘केंद्र सरकार’च्या अखत्यारितील ‘इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ’ने (IGNOU- इग्नू) यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून

Astrologist ज्योतिषशास्त्राची ‘मास्टर्स डिग्री’ (MA) देणारा दोन वर्षांचा अभ्यासक्रम सुरू केलाय. त्यात

Astrologistज्योतिषशास्त्राच्या विविध शाखांबाबतचं व्यावहारिक शिक्षण विद्यार्थ्यांना दिलं जाईल. तथापि, ‘ज्योतिषशास्त्र हे

अवैज्ञानिक असल्याने हा अभ्यासक्रम रद्द करावा,’ अशी मागणी विज्ञान प्रचार-प्रसाराचं काम करणार्‍या संस्था-संघटना करीत

आहेत. डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या ‘महाराष्ट्र

अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ने प्रसिद्ध केलेल्या पत्रकातून ”Astrologist ज्योतिष या विषयाला कोणताही शास्त्रीय आधार नाही. ते

’छद्म विज्ञान’ आहे. ग्रह-तार्‍यांचा शास्त्रीय अभ्यास करणार्‍या विज्ञान शाखेला ’खगोलशास्त्र’ म्हणतात. त्या शास्त्राच्या उपलब्ध

अभ्यासानुसार,

आकाशातल्या ग्रह-तार्‍यांचा मानवी जीवनावर कोणताही प्रभाव पडत नाही; परिणाम होत नाही. त्यामुळे अशा संपूर्ण अशास्त्रीय

गोष्टींचे प्रशिक्षण देण्याचा दावा करणारा Astrologist ‘ज्योतिष’ अभ्यासक्रम रद्द करावा,” अशी मागणी केलीय.

ही मागणी योग्य आणि विज्ञान प्रसाराचा आग्रह धरणाऱ्या ‘भारतीय संविधान’ला धरून आहे. अशाच प्रकारचा Astrologist

ज्योतिषशास्त्राचा अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय २००१ मध्ये ‘भाजप आघाडी’ (NDA)च्या ‘वाजपेयी सरकार’नेही घेतला होता.

त्याला मोठ्या

प्रमाणात विरोध झाल्याने तो रद्द करण्यात आला. हा विरोध करण्यात ज्येष्ठ खगोल वैज्ञानिक डॉ.जयंत नारळीकर यांचाही समावेश

होता. भारतीय वंशाचे ’नोबेल’ पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ व्ही.के.वेंकटरामन यांनी ज्योतिषशास्त्राची तुलना ’छद्म’ विज्ञानाशी

(स्यूडोसायन्स) केलीय.

‘छद्म’ विज्ञान म्हणजे, विज्ञानासारखी मांडणी करून केलेली फसवणूक! ह्यात ज्योतिषशास्त्र ’क्रमांक एक’ वर आहे; आणि ते

विविध प्रकारे जगभर आहे. ह्या सार्‍यांचा उद्योग आकाशातल्या ग्रह-तार्‍यांवर असतो. त्यातही भारतीय

Astrologist ज्योतिष्यांनी आपली उंची वाढवण्यासाठी भटी शेंडी लावल्याने आकाशात नसलेले ’राहू-केतू’ हे काल्पनिक ग्रह

जन्मकुंडलीत आणले आहेत. ते

’कालसर्पयोग’ बनून (ज्याची जन्मकुंडली तयार केली आहे त्या-) जातकाला ’नारायण-नागबळी’ विधीसाठीचं ’गिर्‍हाईक’ बनवतात.

याशिवाय, शनीची साडेसाती, २२ कोटी किलोमीटर दूरवर असलेल्या मंगळाची ’कडक’ बाधा, हातावरच्या गुरू-बुध-शुक्राचा

दुबळेपणा दाखवणाऱ्या रेषा- चिन्हं- उंचवटे जाळ्या आहेत. शुभ-अशुभ दिवसाचे, मुहूर्ताचे खूळ आहे. वास्तुशास्त्र, ’नाडी’माहात्म्य,

जपजाप्य- मंत्रमाहात्म्य यांचे उपाय-तोडगेही आहेत. ह्या साऱ्या बनावट उद्योगांसाठी ’मास्टर ऑफ आर्ट’ ज्योतिषी बनवून ’मोदी

सरकार’ लोकांनी कष्टाने कमावलेल्या पैशावर हात मारणारे खिसेकापू आणि दरोडेखोर तयार करणार आहेत का ?

छत्रपती शिवरायांच्या आणि राजमाता जिजाऊंच्या चरित्राची नटव्या-नाटकी शब्दांत विटंबना करणाऱ्या कथित ‘शिवशाहीर’ ब. मो.

पुरंदरेंना ‘महाराष्ट्रभूषण पुरस्कार’ देऊन ‘फडणवीस सरकार’ने त्याच्या नालायकीला ‘सरकारमान्य’ केले. तोच प्रकार ‘मोदी

सरकार’ राष्ट्रीय विद्यापीठातून ज्योतिषशास्त्राचा ‘मास्टर डिग्री’चा अभ्यास राबवून नकली विज्ञानाला ‘सरकार मान्यता’ देऊन

करीत आहे. २,००० कोटी रुपये खर्चून तयार केलेलं भारताचे चांद्रयान चंद्रावर पोहोचले नाही. ‘ते पोहोचणार नाही,’ असे भाकित

देशातला एकही ज्योतिष करू शकला नाही. तिथे ’मोदी सरकार’ने तयार केलेले ’मास्टर्स’ ज्योतिषी लोकांच्या कुंडल्या मांडून,

हस्तरेषा पाहून त्यांच्यावर आकाशातल्या ग्रह-तार्‍यांचा प्रभाव किती पडतो, ह्याचा काय डोंबलाचा अभ्यास करणार आणि त्यांचे

भविष्य सांगणार ?

आई-वडील, पूर्वजांचे गुण-दोष अपत्यात उतरतात. तसे, ‘चंद्रसूर्यादि ग्रहांवरून येणार्‍या लहरींचे ठसे गर्भातून बाहेर येताना

अर्भकाच्या मृदू शरीरावर उमटतात आणि त्याच्यात काही शारीरिक व बौद्धिक दोष जन्मत:च निर्माण करतात!’ ह्या गृहीतकावर

ज्योतिषशास्त्राचा डोलारा उभा आहे. परंतु, चंद्रसूर्यादी ग्रह-तार्‍यांच्या प्रकाश-लहरींचा कोणताही परिणाम अर्भकावर होत नाही, हे

विज्ञानाने सिद्ध केलंय. कारण सूर्याचा प्रकाश आपणापर्यंत आठ मिनिटांनंतर पोहोचतो. इतर ग्रह-तार्‍यांच्या प्रकाश-लहरी

आपणापर्यंत पोहोचण्यास शेकडो वर्षं लागतात. अशा परिस्थितीत ग्रह-तार्‍यांचे प्रभाव-परिणाम मानवी जीवनावर कसे होणार?

ते होत नाहीत, हे इयत्ता तिसरीच्या पुस्तकात शिकवायचे आणि ’एमए’ला त्याच्या उलटे शिकवायचे, हा ’मोदी सरकार’ पुरस्कृत

उफराटेपणा आहे. त्यासाठी ज्योतिषशास्त्राचा ’देशी बाणा’ दाखवला जातो; तोही खोटा आहे. कारण १२ राशी आणि

जन्मकुंडलीतल्या १२ घरांत लोकांना ’गिर्‍हाईक’ बनवणारं ज्योतिषशास्त्र हे ’भारतीय’ नाही. १२ राशी ही ‘ग्रीक कालगणना’ पद्धत

आहे. ‘भारतीय कालगणना’ ही २७ नक्षत्रांवर आधारित आहे.

—– 2—–

भविष्य खोटे, संकट मोठे

राशीला आलेल्या ग्रहांचा इष्ट-अनिष्ट परिणाम अनिवार्य किंवा अटळ असतो; असे ज्योतिषीही मान्य करीत नाही. तसा इतिहास नाही. तरीही भय, अज्ञान, अगतिकता यामुळे लोक ज्योतिष्यांचे ‘गिर्‍हाईक’ बनतात. अरिष्ट टाळण्यासाठी, ग्रहशांती करण्यासाठी तोडगे-विधी करतात. थोरले माधवराव पेशवे यांना क्षयरोगाने मृत्यूच्या दाढेत लोटले. त्यातून त्यांची सुटका करण्यासाठी मृत्युंजय मंत्राचा गजर अखंड चालू ठेवण्यासाठी शेकडो ब्राह्मण नियुक्त केले होते. तरीही, त्यांच्या मंत्रजागराला न जुमानता मृत्यूने माधवरावांना ओढून नेले!
दुसरे महायुद्ध गाजवणारा जर्मनीचा ’हुकूमशहा’ हिटलर ह्याचा ज्योतिषावर नितांत विश्वास होता. त्याने आपल्या दिमतीला पाच प्रख्यात ’ज्योतिर्भास्कर’ बाळगले होते. त्यापैकी एकाला (त्याला स्वत:चेच भविष्य न समजल्यामुळे) इंग्लंडच्या हेरांनी पळवून नेले. उरलेले चार हिटलरला सल्ला देण्यास तत्पर होते. पण त्यांच्या सल्ल्याचा काडीमात्र उपयोग झाला नाही, असेच इतिहास सांगतो. आपला संपूर्ण पराभव होऊन शत्रूच्या हातात सापडण्याची नामुष्की टळावी, यासाठी हिटलरने स्वत:ला स्वत:च्या हाताने पेटविलेल्या भडाग्नीत जाळून घेतले. हा निर्घृण प्रकार टाळण्यासाठी ग्रहांची अनुकूल स्थिती मिळवण्यात ज्योतिष्यांना यश लाभले नाही. चौघांपैकी एका ज्योतिष्याला तर हिटलरच्याच ’कॉन्सन्ट्रेशन कॅम्प’मध्ये मृत्यू आला.
हिटलरचा विश्वासू मित्र हिमलर याचाही ज्योतिषशास्त्रावर गाढ विश्वास होता. त्याने हिटलर जगत्जेता व्हावा, यासाठी ’मंत्र-तंत्रज्ञ’ अशा चोवीस ज्योतिष्यांवर चमत्कारिक सहाय्याचे काम सोपवले होते. त्यातील एका ज्योतिष्याने इटलीच्या नकाशावर ‘सिद्धिलंबक’ ठेवला असता; त्या लंबकाच्या डोलण्याने हिटलरच्या यशाची खात्री दिली होती. पण भविष्य उलटे फिरले!
राजर्षी शाहू महाराजांकडे भविष्यकथन करण्यासाठी एक नामवंत ज्योतिषी आला. शाहूराजांनी त्याला दोन दिवसांच्या कडक उपासाचा आणि चाबकाच्या फटक्यांचा पाहुणचार दिला. तो टाळण्यासाठी ज्योतिषी गयावया करू लागला. शाहूराजांनी त्याला सुनावलं, ”दोन दिवसांनी तुझ्यावर कोणतं संकट कोसळणार आहे, ते तुला ज्योतिषशास्त्राने समजत नाही. तू काय माझं भविष्य सांगणार? लोकांना फसवण्याचे धंदे बंद कर!”
Astrologist ज्योतिषशास्त्राचा खोटेपणा शाहूराजांनी कृतीतून सप्रयोग उघडा पाडला. ‘१९६४ मध्ये तिसरे महायुद्ध होणार’, ‘२००० मध्ये जगबुडी होणार’, त्याआधी ‘हिमालय वितळणार’, अशी भविष्यकथनं नामवंत ज्योतिष्यांनी केली होती. ती खोटी ठरली. ‘गांधीजींची हत्त्या होणार’, ‘कॉम्प्युटरवरून कुंडल्या निघणार’, ‘टीव्हीवरून ज्योतिष सांगितले जाणार’, ‘जगाला लॉकडाऊन करणारी कोरोना- महामारी येणार’, याबाबत सावधानतेचा इशारा देणारं भविष्य जगातल्या एकाही ज्योतिष्याने कथन केलेलं नाही. ह्या शास्त्रात ’उडाला तर पक्षी आणि बुडाला तर बेडूक’ ठरवणारीच चलाखी आहे!
लग्नासाठी जन्मपत्रिकचे ३६ गुण जुळवण्याच्या बहकाव्यातून वर्ण्य-जाती व्यवस्थेची तुच्छता ज्योतिषशास्त्रातून पोसली जाते. उच्च जातीतल्या मुलीशी लग्न करणार्या मुलाचा आणि कनिष्ट जातीतील मुलाशी लग्न करणार्या मुलीचा एक-एक गुण-जुळणीत कमी होतो. अशा जातिभेद घट्ट करणार्या शास्त्राचं भविष्य हे त्याच्या इतिहासासारखेच खोटे ठरणारे असणार! हे असंख्य पुराव्यांनिशी स्पष्ट झाले आहे.
‘आकाशातल्या आणि कुंडलीतल्या ग्रहांपेक्षा मनाचा निग्रह श्रेष्ठ असतो,’ अशी खात्री लोकांना देण्याची आज आत्यंतिक गरज असताना ’मोदी सरकार’ मात्र राष्ट्रीय विद्यापीठातून ’मास्टर्स ज्योतिषी’ तयार करीत आहे. ही देशाच्या ’बौद्धिक महामारी’ची तयारी आहे. त्यासाठी ‘फुले-शाहू-आंबेडकर’ यांचा विचार कृतीत आणणे, हीच जालीम लस आहे. ती घ्या आणि ‘लॉस’मुक्त आयुष्य जगा !

——3——

रुग्णांचा शेजार, डोक्याचा आजार

कॅन्सर हा महात्रासिक आणि खर्चिक रोग आहे. ह्या रोगाचं प्रमाण वाढत आहे. त्या तुलनेत ह्या रोगावर उपचार करणारी रुग्णालयं राज्यातच नव्हे, तर देशातही तुरळक आहेत. मुंबईच्या परळ येथील ’टाटा मेमोरियल रुग्णालया’त महाराष्ट्रभरातूनच नव्हे तर आजूबाजूच्या राज्यांतूनही रुग्ण येत असतात. त्यांच्या बरोबर मदतनीस म्हणून एक-दोन नातेवाईक असतात. रुग्णालयात अनेकदा खाटा उपलब्ध नसल्याने रुग्ण एखाद्या खोलीवजा हॉलमध्ये वा ’काॅरिडॉर’ मध्ये जमिनीवर टाकलेल्या गाद्यांवर बसलेले-झोपलेले दिसतात. सोबत असलेल्या मदतनीस-नातेवाईकाची अवस्था तर अत्यंत बिकट असते. त्यांच्यासाठी तिथे बसायला वा पाठ टेकायला रुग्णांइतकीही जागा नसते. त्यातले काहीजण रात्रीच्या वेळेस रुग्णालयाच्या फूटपाथवर वृत्तपत्राच्या कागदावर वा टॉवेल-रूमालवर झोपलेले दिसतात. काहीजण नातेवाईक- ओळखीच्यांकडे रात्र काढतात. पण अशी सोय सर्वांना उपलब्ध नसते.
ज्यांच्याकडे बर्‍यापैकी पैसा आहे, ते जवळच्या ‘लॉज’मध्ये भाड्याने राहतात. पण ’लॉज’मध्ये भाड्याने खोली घेऊन राहणे सर्वांनाच परवडणारे नसते. आधीच उपचारासाठीच्या खर्चाने बँक खाते रिकामे झालेले असते. ही परवड आणि फरफट लक्षात घेऊन परळ-दादर विभागात ‘रा.स्व.संघा’ची ’नाना पालकर रुग्ण सेवा’, माजी न्यायाधीश बी. जी. कोळसे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेला ’संत गाडगे महाराज सेवा ट्रस्ट’ ह्या संस्था मुंबईत उपचारासाठी येणार्‍या रुग्ण व त्यांच्या बरोबरच्या मदतनीसांच्या राहण्यासाठी विनामूल्य वा अल्पमूल्यात सदनिका देतात.
तथापि, त्यांच्या सदनिका मर्यादित असल्याने परळ भागात असलेल्या ‘टाटा’, ‘वाडिया’, ‘केईएम हॉस्पिटल’ परिसरात वरीलप्रमाणे दृश्य पाहायला मिळतं. ते बदलण्यासाठीच गृहनिर्माणमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी परळमधील हाजी कासम इमारतीच्या पुनर्बांधणी प्रकल्पातून ’म्हाडा’कडे आलेल्या प्रत्येकी ३०० चौरस फुटांच्या १८० पैकी १०० सदनिका ’टाटा मेमोरियल रुग्णालय’च्या व्यवस्थापनाकडे वार्षिक १ रुपया भाड्याने सुपूर्द केल्या. त्याच्या चाव्या व कागदपत्रं शरद पवार यांच्या हस्ते देण्याचा कार्यक्रम १६ मे रोजी पवार यांच्या निवासस्थानी झाला. या सदनिकांमुळे कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांची आणि काळजीवाहू व्यक्तींच्या उपचारादरम्यानच्या निवासाची उपयुक्त सोय होणार होती. तथापि, ह्या सदनिका असलेल्या इमारतीच्या आजूबाजूच्या इमारतीतील रहिवाशांनी त्याला विरोध केल्याने आणि त्यांच्या भावना ’शिवसेना’चे स्थानिक आमदार अजय चौधरी यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचवल्याने उद्धव ठाकरे यांनी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या ह्या निर्णयाला स्थगिती दिली आहे.
त्याची बातमी प्रसारमाध्यमांनी ’महाविकास आघाडी सरकार’च्या घटक पक्षात शह- काटशहचं राजकारण कसं सुरू आहे? मुख्यमंत्री व ’राष्ट्रवादी काँग्रेस’- ’’काँग्रेस’ पक्षांच्या मंत्र्यांत समन्वयाचा अभाव कसा आहे? शरद पवारांनी ’टाटा’ व्यवस्थापनाला दिलेल्या सदनिकांच्या चाव्या उद्धव ठाकरे कशा काढून घेऊ शकतात? अशा लावालावीच्या पद्धतीने चालवली. त्यात तथ्य नसलं तरी अशाप्रकारचे सार्वजनिक निर्णय घेताना ; संभाव्य आक्षेपांचा व परिणामांचा विचार करून ठोस निर्णय घेऊनच त्याची अंमलबजावणी करावी लागते.
भारतीय समाजमन विचित्र आहे. लोकं विपरीत वागण्यात पटाईत आहेत. लोकांना गरज असते, तेव्हा जे हवं ते समाज- सरकारने विनासायास द्यावं, उपलब्ध करावं, अशी अपेक्षा असते. पण स्वत:वर काही देण्याची- सोडण्याची वेळ येते, तेव्हा ते नाना कारणांनी टाळलं जातं; कोर्टबाजीत अडकवलं जातं. सार्वजनिक कचराकुंड्या, मुताऱ्या, स्मशानभूमी ह्या लोकांसाठी गरजेच्या व्यवस्था आहेत. पण त्या आपल्या घरा-इमारतीच्या जवळपास नकोत; आणि असल्या तर त्या हटवण्यासाठी लोक कितीतरी आटापिटा करतात. प्रधानमंत्री-मुख्यमंत्री यांच्यापर्यंत पत्रव्यवहार करतात. शाळा, कॉलेज, इस्पितळ, बस-टॅक्सी -रिक्षा स्टँड, रेल्वे स्टेशन घरापासून जवळ हवे ; पण गर्दी टाळण्यासाठी ते थोडे दूर असावे, अशी लोकांची इच्छा असते. हेच कॅन्सरग्रस्तांसाठी ’म्हाडा’ने दिलेल्या १०० सदनिकांबाबत झालं आहे.
पशू-पक्ष्यांकडे भूतदयेने पाहणारे, कावळ्याला घास घालून तो मेलेल्या पूर्वजांपर्यंत पोहचवणारे, दगडाला देव मानणारे हे रुग्णाईतांना सेवाभावाने जवळ करीत नाहीत. जणू काही त्यांच्यावर अशा प्रकारच्या सेवेचा लाभ घेण्याची वेळ येणारच नाही! दगड्या देवाला रात्री झोपवणारा (शेजारती) आणि पहाटे उठवणारा (काकडारती) कानफोड्या घंटानाद चालेल; पण बांग नको! ह्या दुटप्पीपणालाच धर्म समजणारे, रुग्णसेवा हाही धर्मच आहे, हे कधी समजून घेणार? घरातला रुग्णाईत घरात चालतो, पण दुसर्‍या ठिकाणचा-बाहेरगावचा रुग्णाईत बाजूच्या इमारतीत नको, अशा अप्पलपोट्या हट्टाला सरकारने थारा देऊ नये. सार्वजनिक हिताचे निर्णय सरकारने कठोरपणे राबवावेत त्याबाबत धरसोडपणा नको !

ज्ञानेश महाराव

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisement

More Stories
savitribai phule jayanti
savitribai phule jayanti – ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले
error: Content is protected !!
%d bloggers like this: