be strong
be strong
be strong

be strong – खचून जाऊ नका तर खंबीर व्हा

be strong - खचून जाऊ नका तर खंबीर व्हा

be strong – खचून जाऊ नका तर खंबीर व्हा

 

 

be strong – खचून जाऊ नका तर खंबीर व्हा

 

 

 

 

शेखरचं ऑफिसचे कामं आता व्यवस्थित घरून चालू आहे. काय होईल ,कसं  होईल ते ठीक आहे जमतंय पर्यंत त्याने ३-४ महिने काढले. त्यात  lock-down चं कधी

शिथिल होणं -कधी  वाढणं ह्यात नाही म्हटलं तरी त्याला आता जरा मनातून एकंदरचं भीती वाटायला लागली. मनात अनामिक भीती दाटून यायची. कधी खूप आनंदी

तर कधी एकदम उदास वाटायचे. कशात  लक्ष्य नाही  लागत असं पण अधूनमधून त्याला जाणवतं  होतं . सगळंच निरुत्साही वाटतं होतं.काही मित्रांचे जॉब गेले होते ,

काही जणांचा पगार  वेळेत मिळतं नव्हता. काही जणांना पगार कपातीला सामोरे जावे लागत होते. बहुतेक जणांची आर्थिक  घडी विस्कळू लागली होती. दुसरीकडे

कधी covid – 19 चे छुपे विषाणू हल्ला करतील , ह्याची मनात धाकधूक. अँब्युलन्स मिळण्याची मारामार . हॉस्पिटलचा वेगळाच अनुभव,-  बेड न मिळणे ,

अवाच्या -सव्वा  बिल आकारणे.ह्यावर कहर म्हणजे माध्यमांनी २४ तास चालू ठेवलेला करोनाचा जप.सामान्य जनतेला घाबरून ठेवण्यास कुठेहि कमी पडू दयायचा नाही

असा जणू  विडा  उचलला होता. कधी कधी बाहेर आभाळं दाटून येतं , न नकळत आपल्या मनात पण  उदासी दाटून येते तसं काहीसं आज सगळेजणंच अनुभवत आहेत.

मान्य  परिस्थिती खूप काही छान  नाही ,पण आपण एकटे लढतो आहे का ? नाही . be strong सारं जग आज ह्या कठीण समयाला सामोरं  जातंय . बरोबर  ना ??

मग आपणं आपल्या परीने काही गोष्टी नक्कीच करू शकतो.

 • हे  ही  दिवस जातील , हे मनाला समजवायचं . आहे तो जॉब  सांभाळा, खर्च कमी केला तर नक्कीच फायदा होईल . बचतीचे महत्त्व समजा.

 • आपले छन्द /आवड लक्षात घेऊन काही अजून पूरक व्ययवसाय करत येईला का ,ते बघा. स्वतःला कामांत गुंतवा . कामं नसेल की मग उगीचं नको ते विचार मनात येत रहातात.

 • आपला focus  सकारात्मक राहू दे . बरंच  चांगलं पण घडतंय ना आजूबाजूला . लोकं एकमेकांची मदत करतायंत.प्रत्येक उद्योग हा या आलेल्या

 • संकटाला सामोरं जाण्याचा प्रयन्त करतं आहे. साथ रहेंगे  -साथ लढेंगे 

 • व्यवस्थापक मंडळी-कर्मचारी सोबत राहून परिस्थिती वर मात करायला पुढे आले आहेत. होईल ठिक ,हे लक्षात असू देतं.

 • ताण -तणाव देणाऱ्या गोष्टींपासून दूर राहा. आपल्या हातात जे करणं शक्य आहे ते करा. आपल्याला  समाधान/आनंद देणाऱ्या गोष्टी करा. वाचन , गाणी एकणे .

 • आपल्या भावना/विचार आपलं वागणं ठरवणार मग ते तर तुमच्या हातात सॉरी मनात आहे.. ना..?  मग ,उगीचं त्रास करून घेण्या  पेक्षा आहे त्यासाठी मनात कृतज्ञता ठेवा /व्यक्त करा.

 • जमलं तर बातम्या पाहूच नका.हतबलता वागण्या -बोलण्यात आणू नका. प्रेरणा देणारं बघा /वाचा .

 • आपलं रोजची कामं ,इतर काम  चालू ठेवा. योग्य आहार ,व्यायाम याने स्वतःला फिट ठेवा . योग्य माहिती ,मदतीचे sources हे सगळं समजून घ्या.

 • अफवा पासून दूर राहा,आपण सुद्धा ती पसरवू नये  म्हणून काळजी घ्या .ह्या आजरा बदल आला संदेश पाठव पुढे असं नका करू .शक्यतो उगीचं ह्या बद्दल चर्चा करणं  पण टाळा .

 • मन आणि शरीर सक्षम असू देत.तेच आपल्याला यातून मार्ग काढायला मदत करणार आहेत.

दुःखी वाटणे ,एकटे  वाटणे स्वाभाविक आहे पण आज ह्या संकटाने आपण बरच काही शिकलो पण ,आपल्या माणसांची ,कुटुंबाची आपल्या आयुष्यत किती किंमत आहे

हे समजलं ,त्यानां  वेळ देऊ लागलो. खरी नाती  समजली . गरजा  कमी झाल्या . तुटलेला संवाद परत जोडला गेला. ह्या सगळ्यात आपणं शिकलोय की  संयम किती

महत्वाचा आहे. be strong धीर धरा हा जणू आयुष्याचा मंत्र झालायं . कुठलीही परिस्थिती आज आपल्यावर हावी होऊ दयायची  नाही तर स्वतः खंबीर व्हायचं .

खंबीर व्हा, हिंमत धरा . आपल्या मनाचा निर्धार हीच आपली निराशा /मळभ दूर करणार आहे.. रात्री नंतर पहाट असतेच.

 

postboxindia.com
www.postboxindia.com
मेघना धर्मेश
9321314782 | [email protected]

 

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisement

More Stories
shiva kashid - वीर शिवा काशीद
shiva kashid – इतिहास वीर शिवा काशीद 
error: Content is protected !!
%d bloggers like this: