Comred
Comred
Comred

Comred – कॉ.तारा रेड्डी यांचा आज स्मृतीदिन

Comred - कॉ.तारा रेड्डी यांचा आज स्मृतीदिन

Comred – कॉ.तारा रेड्डी यांचा आज स्मृतीदिन.

 

Comred – कॉ.तारा रेड्डी यांचा आज स्मृतीदिन.

 

स्वातंत्र चळवळ,संयुक्त महाराष्ट्र आंदोलन,गोवा मुक्ति लढा यात त्यांचे योगदान याबद्दल सर्वसाधारण माहिती लोकांना आहे.मुंबईतून खेतवाडी मतदारसंघातून भारतीय

कम्युनिस्ट पक्षाच्या नगरसेविका म्हणून त्या दोन वेळा निवडून आल्या.त्याचबरोबर त्या साहित्यिक होत्या व सांस्कृतिक चळवळीबरोबर त्यांचे निकटचे संबंध होते व त्या

सांस्कृतिक चळवळीच्या भाग होत्या ह्याची माहिती आजच्या पिढीपर्यंत कमी गेली आहे.

त्या मार्क्सवादी होत्या.मार्क्सचे त्यांचे आवडते वाक्य होते ‘Nihil humanum a me alienum puत्e (I regard nothing human as alien to me) जे जे म्हणून मानवी,

त्यातले काहीही मला परावे नाही).त्यांनी ‘सहित्य आणि कला कार्ल मार्क्स फेडरिख एंगल्स’ही छोटी पुस्तिका १ डिसेंबर १९६७ साली प्रकाशित केली

( जागृती मंडळाचे भारूड प्रकाशन किंमत ४० पैसे)

याबद्दल एक पोस्ट लिहावी अस वाटल.त्याबद्दल आठवणीला सुरवात झाली.तो कालखंड डोळ्यासमोर ऊभा रहिला.जुनी पुस्तक पाहताना भोईवाड्यातील

साडेसहा बाय आठच्या युनूस कोंड्याच्या खाणीतील झोपडपट्टीत राहणाऱ्या फिनिक्स मिलमधिल कामगार कवी शिवराम देवलकर यांचा कविता संग्रह हातात पडला.

तेव्हा त्या कविता परत वाचताना भान हरपल.हे एका पोस्टच काम नाही.दैनंदिन कामेही आहेत परत याबद्दल कधितरी सविस्तर लिहू

बाबुराव बागुल यांची कथा Comred कॉ.तारा रेड्डीनी आचार्य अत्रे यांच्या नवयुगमध्ये प्रकाशित केली.ती बागुलांची पहिल्यांदा प्रसिध्द झालेली कथा.कॉ.तारा रेडी

आचार्य अत्रेंच्या नवयुग साप्ताहिकात शिरीष पै यांच्याबरोबर काम करत होत्या.कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या सहित्यातील स्त्रीया,गिरणी कामगार आंदोलनातील

स्त्रीया असे अनेक लेख त्यांनी लिहिले.’जीवन’ हा त्यांचा कथासंग्रह,भारूड हे जागृती मंडळाचे अनियतकालित प्रसिध्द करून ‘लिटल मॅगझिन चळवळीत त्यांनी

लेखक कविंना जोडले.भारूड सायक्लोस्टाईल मशिनने प्रकाषित होत असे.पुष्पा त्रोलोकीकर यात डिझायन करत असत.नारायण सुर्वे,प्र श्री नेरूरकर,शिवराम देवलकर,

सतिश काळसेकर,बाबुराव बागुल,डॉ.सदा कऱ्हाडे,प्रल्हाद चेंदवणकर ह्या लेखक कवि साहित्यकांचा संवाद त्या काळी होत असे.तेंडुलकऱ्यांच्या नाटकांचे वाचन

आमच्या नाना चौकातील घरी झालेले आहे,नीला भागवत व अरूण खोपकर यांचे दुसते घर म्हणजे आमची खेतवाडी राजभुवन मधली १४ बाय दहाची खोली.

श्याम मोकाशीही येत असे.

कॉ.तारा रेड्डी यांचा तो प्रवास ‘विद्रोही साहित्य संमेलनाच्या’ अध्यक्ष पदापर्यंत व पुढेही चालू राहिला.

त्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या ‘ युगांतर’ सप्तहिकाच्या संपादक मंडळात होत्या.तसेच ‘ महिला आंदोकन पत्रिका’ या भारतीय महिला फेडरशनच्या पाक्षिकाच्या

संपादिका होत्या.महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यात ग्रानीण भागात त्यांनी हे पाक्षिक पोहोचवल होत. Simone de Beauvoir यांचे सेकंड सेक्स पुस्तक,बाल्झाक,गॉर्की पासून

देशातिल विविध लेखकांच्या साहित्याचे त्यांचे वाचन होते.दिना पाठक त्यांच्याबरोबर महिला फेडरेशनमध्ये सक्रिय होत्या.

अजुन बरेच काही,पुढे कधितरी..

Comred कॉ.तारा रेड्डी यांना स्मृतिदिनी लाल सलाम..

कॉ. प्रकाश रेड्डी

Advertisement

More Stories
national press day - मराठी पत्रकार दिन !
national press day – मराठी पत्रकार दिन !
error: Content is protected !!
%d bloggers like this: