Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

INDIAMAHARASHTRANewsPostbox Marathi

dhule police – आंतरराज्यीय टोळीस स्था.गु.शा. ने केले जेरबंद

1 Mins read

dhule police – आंतरराज्यीय टोळीस स्था.गु.शा. ने केले जेरबंद

 

dhule police – एटीएम कार्ड हाताचालाखाने बदलुन व क्लोनिंग करुन लोकांची फसवणुक

 

 

1/10/2021

एटीएम कार्ड हाताचालाखाने बदलुन व क्लोनिंग करुन लोकांची फसवणुक करणारी आंतरराज्यीय टोळीस
स्था.गु.शा. ने केले जेरबंद, फसवणुकीचे अनेक गुन्हें आले उघडकीस
धुळे जिल्हयातील वेगवेगळया पोलीस ठाण्यात तसेच सायबर पोलीस ठाण्यात एटीएम कार्ड हातचालाखीने
बदलुन व क्लोनिंग करुन बँक खात्यातील पैसे परस्पर काढुन फसवणुक झाल्ने बाबतचे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या
त्या अनुपंगाने मा.पोलीस अधीक्षक श्री. प्रविणकुमार पाटील, धुळे, मा.अपर पोलीस अधीक्षक श्री. प्रशांत बच्छाव, धुळे
यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांना गुन्हयाच्या कार्यपध्दती बाबत बारकाईने आभ्यास करुन सदर गुन्हे
उघडकीस आणण्याच्या सुचना दिल्या.
पोलीस ठाण्यात प्राप्त झालेल्या तक्रारीचा बारकाईने आभ्यास केला असता गुन्हयातील आरोपी हे वरील प्रकारचे
गुन्हे हे सकाळच्या वेळी करीत असल्याचे निर्दशनास आले त्या अनुषंगाने आरोपीने आदलाबदल केलेल्या एटीएमच्या
आधारे ज्या ज्या ठिकाणाहुन पैसे काढले त्या ठिकाणचे सीसीटीवी फुटेज प्राप्त केले व तात्रिक बाबीची तपासणी केली
असता अशा प्रकारचे गुन्हेगार हे हिसार (हरीयाणा) येथील असल्याचे निणन्न झाले.
आज दि. ०१/१०/२०२१ रोजी सकाळी गुप्त बातमी मिळाली की, हरीयाणा पासिंगची एक्स.यु.व्ही कार क्रमांक
एच. आर. ८० डी ३९८२ ही मालेगाव कडुन धुळयाकडे येत आहे व त्यामध्ये वरील प्रकारचे गुन्हे करणारे काही
संशयास्पद इसम आहेत. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व कर्मचारी यांनी चाळीसगाव रोड चौफुली
येथे सापळा लावुन सदर कार व त्यातील चार संशयीत इसमांना ताब्यात घेवुन स्थानिक गुन्हे शाखा कार्यालयात आणुन
त्यांची नांवे विचारली असता त्यांनी त्यांची नांवे १) विजयकुमार पालाराम राजपुत वय ३५ वर्ष २) सुनिलकुमार
धुपसिंग राजपुत वय ३२ वर्ष ३) शिवकुमार चंदकिशोर शर्मा वय ३८ वर्ष व एक विधी संघर्षात बालक सर्व रा.,
बरवाला जि.हिसार हरीयाणा असे सांगुन त्यांची व कारची झडती घेता खालील वर्णनाचा मुद्येमाल मिळुन आला आहे.

dhule police - आंतरराज्यीय टोळीस स्था.गु.शा. ने केले जेरबंद

dhule police – आंतरराज्यीय टोळीस स्था.गु.शा. ने केले जेरबंद

१) १,३०,३००/-रु. रोख रक्कम
२) २०,०००/- रु. किंमतीचे एकुण ०७ मोबाईल हॅन्डसेट ज्यात व्हिओ, नोकीया, सॅमसंग इ. कंपनीचं
३) ८,००,०००/- रु.कि.ची एक महींद्रा कंपनीची एक्स.यु.व्ही कार क्रमांक एच. आर. ८० डी ३९८२
४) ६०००/- रु..किं. DEFTUN कंपनीचे एटीएम कार्ड स्वाईप व क्लान करण्याचे स्किमर मशिन
५) ३०००/- रु..किं. एटीएम कार्ड स्वाईप व क्लोन करण्याचे स्किमर मशिन
६)००.०० रु.किं. चे वेगवेगळया बँकेचे एकुण ६६ एटीएम कार्ड

dhule police - आंतरराज्यीय टोळीस स्था.गु.शा. ने केले जेरबंद 2

dhule police – आंतरराज्यीय टोळीस स्था.गु.शा. ने केले जेरबंद 2

येणे प्रमाणे असा एकुण ९,५९,३००/- रु. किं. चा मुद्येमाल थरील नमुद संशयीतांकडे मिळुन आल्याने मुधमाल व
प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने आरोपीतांकडे कसुन चौकशी केली असता त्यांनी देवपुरातील पंचवटी टॉवर जवळील
एच.डी.एफ.सी. बँकेच्या एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी आलेल्या व्यक्तीचे एटीएम कार्ड हातचालाखीने बदलुन व क्लोनिंग
करुन त्यांचे बँक खात्यातील एकुण ३,८०,०००/- रु. हे वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या एटीएम मशिन मधुन काढले
असल्याचे कबुली दिली असुन त्या संदर्भात देवपुर पोलीस ठाणे येथे भाग ५ गुरनं ७७/ २०२१ भादंवि कलम ४२०, ३४
अन्वये गुन्हा दाखल आहे. त्या व्यतिरिक्त धुळे शहरात वेगवेगळया पाच ठिकाणाचे घटनांची कयुली दिलेली आहे. तसेच
त्यांनी नाशिक, पुणे, ठाणे, मुंबई, नागपुर,यवतमाळ, धुळे तसेच मध्यप्रदेश, राज्यस्थान, गुजरात, हरीयाणा, उत्तरप्रदेश, दिल्ली
ई. राज्ययातील वेगवेगळ्या ठिकाणावरुन सामान्य जनतेच्या अज्ञानाचा गैर फायदा घेवुन एटीएम कार्ड आदला-बदल तसेच
क्लोन करुन गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. आरोपीस पुढील तपासकामी देवपुर पोलीस टाण्याच्या ताब्यात देण्यात आले
असुन आरोपीतांकडे अधिक विचारपुस करुन गुन्हे उघडकीस आणण्याचा प्रयत्न चालु आहे.
सदरची कारवाई श्री.प्रविणकुमार पाटील, पोलीस अधीक्षक, धुळे, श्री. प्रशांत बच्छाव, अपर पोलीस अधीक्षक, धुळे
यांचे मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा.चे पो.निरी.श्री.शिवाजी बुधवंत, सपोनि प्रकाश पाटील, पोसई योगेश राऊत, पोसई बाळासाहेब
सुर्यवंशी पोहेकॉ संजय पाटील, प्रकाश सोनार, पोना/कुणाल पानपाटील, संदीप सरग, उमेश पवार, रविकिरण राटोड, विशाल
पाटील, पंकज खैरमोडे, सुनिल पाटील, मनोज महागन अशांनी केली आहे.

 

Also Visit : https://www.postboxlive.com

 

अंजनी मिश्रा

Leave a Reply

error: Content is protected !!